Skip to main content

विठ्ठल

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 18/12/2019 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।

काल धरण बांधिले

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 12/07/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल धरण बांधिले खेकड्यांनी हो तोडिले येरू म्हणे बघा नीट विठू चरणीची वीट सृष्टीचा जो तोले भार त्यासी विटेचा आधार युगे अठ्ठावीस ठेला विठू विटेवरी भला वीट अजूनी अभंग बघणारे होती दंग मूळ माल जर नीट (जशी विठ्ठलाची वीट) तर फिजूल बोभाट नको खेकडी खटपट
काव्यरस

माझे मन पाही

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/05/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मन पाही विठ्ठल मुर्ती सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१|| नाही मज वेळ जाण्या राऊळा नच पूजा केली कधी काळां ||२|| रमलो संसारी विना विचार भाव भक्तीचा केवळ उपचार ||३|| नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४|| ०९/०५/२०१९

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

#एकादशी #

लेखक सतिश गावडे यांनी मंगळवार, 14/11/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तारी भवसागरी करी मज मोकळा देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला माझा देह हा चंदनाचा रे झाला नामाचा गोडवा माझ्या ओठी आला पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी होई रुकमाई रे कावरी बावरी झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला देवा आला तू पाठी समजूत घालण्याला पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी देवा क्षण दोन क्षण तू थबकला देवा क्षण दोन क्षण तू थबकला आतून वीट फेकली पुंडलीक बोलला तू थांब मातापित्याची सेवा करु दे
काव्यरस

भेटी लागी जीवा . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/07/2017 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

वारी हो वारी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 23/06/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी मन केवळ विठूसाठी आक्रंदे । चालती पाऊले दिशा पंढरीची वारकरी आम्ही नाहू आनंदे । घोष एक गजर एक एक नाम जीव पिसावला या मधुर नादे । ना जुमानू आता ऊन पावसासी मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे । पडता दिठीस चरण ते सावळे जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे । वारीस न जाताही मनाने वारीमय हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

माऊली उत्सव

लेखक कवि मनाचा यांनी शुक्रवार, 01/07/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
|| माऊली उत्सव || विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं जगी नश्वरी नाही, इथे माझा राम देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा तुका म्हणे तेथे

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 05/05/2016 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ? याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील कुठेतरी धडपडतही असशील, काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली त्याला तू तरी काय करशील? नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?