मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

सांज

कुमार जावडेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर

पाहू

नाहिद नालबंद ·
लेखनविषय:
काव्यरस
एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू

दोन लघु कथा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

चित्रगुप्त ·
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

स्वप्नजा!

राघव ·
लेखनविषय:
काव्यरस
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-) कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक! चालुनी येते खरी आहेस का? राग छेडी तार हृदयाचीच माझ्या.. अजुनी तू "रागा"वली आहेस का? काल मज दिसलीस तू होती म्हणूनी.. आज वाटे, तू उद्या आहेस का? --- का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर? सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का? राघव [१९ जुलै २३]

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले....सुरेश भट

चौकस२१२ ·
लेखनविषय:
सुरेश भट यांच्या अनेक गीतांपैकी मनाला चटका लावणारे हे गीत दोन वेगळ्या गायकांनी वेगळ्या चालीने म्हणलेले , नक्की ऎका https://www.youtube.com/watch?v=h8IxIyWkJBw https://www.youtube.com/watch?v=T6RE9Q9xpTM दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच ज

भरु आज पेला ( गटारी स्पेशल)

किरण कुमार ·
लेखनविषय:
काव्यरस
मला ते विचारी भरु आज पेला तसा मी म्हणालो कशाला कशाला विजय कासवाचा पुन्हा का असावा कशी झोप येते भिणा-या सशाला तिला बोलण्याचे खरे टाळले मी उगा दोष देतो रिकाम्या खिशाला जरा दोन घटका चला घोट घेवू किती चांदण्या या विचारु निशेला जरासे पिल्याने कुठे काय होते किती थंड वाटे बिचा-या घशाला - किरण कुमार

(शोध)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही