Skip to main content

सांज..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/02/2008 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/01/2008 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी, तो, उंबरा असावा माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही' दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा - इलाही जमादार
Taxonomy upgrade extras

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 19/01/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.
Taxonomy upgrade extras

पुन्हा गंध आला...(गझल)

लेखक बहुरंगी यांनी शुक्रवार, 11/01/2008 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सकाळी सकाळी एक छान गझल वाचली ती तुम्हा सर्वांसाठी देत आहे .... या पूर्वी कुणी मिपा-कराने संपादित केली असल्यास कृपया पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, हि विनंति. ==================================== पुन्हा गंध आला...(गझल) पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला, पुन्हा जाग आली इथे चांदण्याला... अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जरी संपलेली रात्र वादळांची, पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला... फूले ही पसरली शेजेवरी मी, पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला... मला जाणले तू असे छान राणी, पुन्ह
Taxonomy upgrade extras

तूच नव्याने घडशील काय

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 31/12/2007 07:28 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?

गेल्या वर्षातील दिवस जे सार्‍यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय

आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?

Taxonomy upgrade extras

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 28/11/2007 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

वेड हे रक्तात माझ्या...

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 20/11/2007 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
वेड हे रक्तात माझ्या वादळाशी झुंजण्याचे जे किनार्‍याचेच प्रेमी वेगळे सगळेच त्यांचे पेटले वणवे विखारी ज्यात मी झोकून देई वाचवाया कातडी ना, कौल मिळती काळजाचे होऊ दे उध्वस्त आयू, होऊ दे जखमी जटायू घ्येयपथि हे घातलेले गालिचे ही कंटकांचे जो लढे लोकार्थ त्याला भुलविती ना शब्दलेणी दार मौनाचे खुणावी आतले हृदयांतरीचे नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

ही धार पहिलटकरीण ...

लेखक अप्पासाहेब यांनी गुरुवार, 20/09/2007 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला काल ठेविला तो 'ओपनर ' कुठे रे गेला गलासात आज माझ्या ओतु नकोस सोडा चखण्यात मात्र घाला कांदा अजुन थोडा अंड्यास कोंबडीच्या सोली हलकेच आता फर्साण शेवगाठी अन बोंबिल भेळ भत्ता सलाम आन्टीला तो, जल्लाद फार्मुल्याला घोट एकुलाच जिर्ता , आत्मा फरार जाला नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा (च्यामारी , आपल्याला बी जमतयां की )

विहंगगीत.

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 19/09/2007 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
विसरून पार गेलो, मीही असे लिहीत आकाश अक्षरांचे दिनरात रंगवीत शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच पण आतच वसंता बसलोच आळवीत केव्हातरी यशाची येई झुळूक मंद स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत झेपावतो कळेना कोठे शकुंत आता अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात त्या अनुभवामृताला सीमा असीमतेची मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras