मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरु आज पेला ( गटारी स्पेशल)

किरण कुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मला ते विचारी भरु आज पेला तसा मी म्हणालो कशाला कशाला विजय कासवाचा पुन्हा का असावा कशी झोप येते भिणा-या सशाला तिला बोलण्याचे खरे टाळले मी उगा दोष देतो रिकाम्या खिशाला जरा दोन घटका चला घोट घेवू किती चांदण्या या विचारु निशेला जरासे पिल्याने कुठे काय होते किती थंड वाटे बिचा-या घशाला - किरण कुमार

वाचने 1442 वाचनखूण प्रतिक्रिया 1