Skip to main content

Whatsapp Romantic Shayari

लेखक तृप्ति २३ यांनी शनिवार, 28/12/2019 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari
काव्यरस

तू मेरे रुबरु है

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 16/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 24/07/2019 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

गझल : पुन्हा एकदा...

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 18/06/2019 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा
काव्यरस

सजले अंतर

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 06/03/2019 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर विसरलो गेला कसा सारा दिवस सरून झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर... - कुमार जावडेकर

भाषा

लेखक कुमार जावडेकर यांनी शनिवार, 23/02/2019 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला? तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला? देव अथवा देश दोन्हीं कल्पना या माणसांच्या व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला? माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला? रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला? मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण - सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला? - कुमार जावडेकर

स्वप्नांची गोष्ट (गझल)

लेखक कहर यांनी सोमवार, 28/01/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग क

देव्हारा

लेखक कहर यांनी शनिवार, 19/01/2019 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा
काव्यरस

गज़ल

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 26/10/2018 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
गज़ल गजल म्हणजे डोळ्यांच्या काजळातील रेघ! जसे श्रावणात बरसणारे मेघ!!! गजल म्हणजे जुन्या  आठवणीतील धागा! जशी कृष्णासाठी आसुसलेली राधा!!! गजल म्हणजे पहिले प्रेम! जसा गोऱ्या गालावरील नाजूक थेंब!!! गजल म्हणजे  श्रावणातील पाऊस! जसे श्रावणातील पावसात चिंब भिजलेले केस!!! गजल म्हणजे  नक्षत्र स्वाती! जसा त्या नक्षत्रात तयार झालेला सुंदर मोती!!! गजल म्हणजे ओंजळीतील हिरवंगार पान! जशी मल्हार रागातील घेतलेली सुंदर तान!!! गजल म्हणजे  राग मेघमल्हार! जसा कोणासाठी तरी केलेला साजशृंगार!!! ~ योगेश पुराणिक

तुझे नाव

लेखक कहर यांनी बुधवार, 12/09/2018 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे -- विशाल