Skip to main content

पश्चिमाई

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 02/12/2024 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन् भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई - कुमार जावडेकर (अलीकडेच 'पश्चिमाई' हा ब्लॉग (त्रैमासिक स्वरूपात) आम्ही यु.के.त सुरू केला.
काव्यरस

( वर्दी )

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 18/09/2024 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.
काव्यरस

साक्षीला दिवस आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 12/08/2024 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षीला दिवस आहे दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो तारतम्य लागले जर हेलकावे खायला भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो - गंगाधर मुटे 'अभय' ====== बारा/आठ/चोवीस

बाँड आणि बांध

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 20/03/2024 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन - 'बाँड' बाँड हा वटण्यास थोडा समय आहे आणि त्याला देणगीचे वलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?' शासनाची का तमा मी बाळगावी? आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे - 'सुमार' जावडेकर माझीच मूळ गझल - 'बांध' बांध हा फुटण्यास थोडा समय आहे आणि मागे जीवनाचा प्रलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी चेहरे मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे' वादळाची का
काव्यरस

सांज

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 25/02/2024 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर
काव्यरस

पाहू

लेखक नाहिद नालबंद यांनी बुधवार, 13/12/2023 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू
काव्यरस

दोन लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 27/08/2023 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 04/08/2023 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

स्वप्नजा!

लेखक राघव यांनी गुरुवार, 20/07/2023 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-) कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक! चालुनी येते खरी आहेस का? राग छेडी तार हृदयाचीच माझ्या.. अजुनी तू "रागा"वली आहेस का? काल मज दिसलीस तू होती म्हणूनी.. आज वाटे, तू उद्या आहेस का? --- का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर? सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का? राघव [१९ जुलै २३]
काव्यरस

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस