Skip to main content

शायरी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/12/2020 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====
काव्यरस

नको सत्ता

लेखक केदार पाटणकर यांनी शनिवार, 07/11/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
(गैरमुरद्दफ गझल) नको सत्ता, नको दौलत हवी केवळ तुझी सोबत पुरे ती रोजची कामे चहा घेऊ, बसू बोलत कुणालाही नको सांगू तुझ्यामाझ्यातली गंमत कधी होणार तू माझी कळू दे ना तुझेही मत सभोती रंग मुबलक पण निराळी ही तुझी रंगत (समाप्त)
काव्यरस

प्रतिभा

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 28/09/2020 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझ्या रोज भोवती असते एक अदृश्य सोबती असते मी कधी रिक्त शाश्वती असते... वा कधी दिव्य आरती असते! आसवांचे जुनेच लोलक, पण- मी नवी रंगसंगती असते सांजवेळी तुझा विसावा मी आणि दिवसा तुझी गती असते तू करू पाहतोस जे त्याची फक्त मी मूक संमती असते - कुमार जावडेकर

व्यथा

लेखक अन्या बुद्धे यांनी गुरुवार, 17/09/2020 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
'अंतरात खोल काही दाटले आहे' 'वाहवा! काय सुंदर मांडले आहे!' वृक्ष काय वृद्ध रे होती कधीही? म्हणती, हे झाड छान वाढले आहे कसे आज अचानक सुटले कोडे? जाणीवेने क्षणास या गाठले आहे राहू दे ठिगळ, आणखी धागा-सुई व्यर्थ धडपड आभाळ फाटले आहे कितीक वर्षे, अजून ही जखम ओली पाहीन वाट, अन्य उत्तर कोठले आहे? आताशा उचकीही येत नाही मला वाटते कुणी नवे तुला भेटले आहे -अनुप

घाव.....गजलेमधून

लेखक तिरकीट यांनी रविवार, 26/07/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
काव्यरस

येत नाही...

लेखक अजब यांनी मंगळवार, 21/07/2020 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
हारण्याची* वेळ जोवर येत नाही शक्यता नाकारता तर येत नाही... प्रश्न हा भंडावतो आहे मनाला का कधी प्रश्नास उत्तर येत नाही... हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी? सावली माझ्याबरोबर येत नाही... टेकल्यावर रोज डोके, समजलो मी पत्थराला कधिच पाझर येत नाही... चोरले अन तोडले आहे हृदय तू आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही... दूरवर आलो कुठे आहे 'अजब' मी? एवढे चालूनही घर येत नाही... (*'हारण्याची'ऐवजी 'जिंकण्याची' वाचायलाही हरकत नाही.)

त्या पोराने

लेखक मनोज यांनी रविवार, 12/07/2020 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
येता गिर्‍हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे? वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ? चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे? नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे? भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?

ती आली तर

लेखक मनोज यांनी शनिवार, 27/06/2020 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
रंग किती गगनात पसरले ती आली तर मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर उभा असा मी बस थांब्यावर जाण्यासाठी कुठे जायचे तेच विसरले ती आली तर नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली भले भले ते ना सावरले ती आली तर मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला वाह का आपसूक उमटले ती आली तर मोहक मुखडे तिच्या सारखे किती पाहिले का क्षणभर ते हृदय थांबले ती आली तर

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 21/06/2020 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!