लेखकसत्यजित...यांनी शुक्रवार, 06/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
कधी हसणे,कधी रुसणे..हजारो बाज गझलेचे...
तुला सांगू किती नखरे? किती अंदाज गझलेचे!
तिने नजरेत बाणांचा निशाणा बांधला आहे
कशी टाळू नजर! डोळे..निशाणेबाज गझलेचे!
लेखकप्रसाद गोडबोलेयांनी गुरुवार, 22/03/2018 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : यारहो ...
दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....
ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो
ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो
मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो
एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो
कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो
वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो
माँक कुठला? कोण मल्ल्या?
लेखकसत्यजित...यांनी बुधवार, 07/02/2018 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा
कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा!
कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली
तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा!
कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला
फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!