Skip to main content

gajhal

तरीही....(विडंबन)

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 07/02/2026 19:17 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... 

तरीही.... 

 

नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही 

का होईना पोळी माझी गोल तरीही....

 

 पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. 

अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... 

 

काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी...

 तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही....

 

 भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय 

म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही....

सांज

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 25/02/2024 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर
काव्यरस

इलाज नाही

लेखक सागरसाथी यांनी शनिवार, 29/07/2023 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून...... गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही. उसने घेवून बीज पेरु नकोस काही मातीत खोट आहे त्याला इलाज नाही. सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही. बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही. ------- अभय बापट २९/०७/२०२३
काव्यरस

घाव.....गजलेमधून

लेखक तिरकीट यांनी रविवार, 26/07/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
काव्यरस

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 21/06/2020 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!

गाण्यास पावसाच्या...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 01/06/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

तू ठरव...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 01/06/2020 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

लेखक कौस्तुभ भोसले यांनी रविवार, 17/05/2020 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद