मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

पावे मराठी

रोहन जगताप ·

कर्नलतपस्वी Wed, 10/23/2024 - 14:50
राहूल,प्रदीर्घ, म्हणजे तब्बल बारा वर्ष काही महिने वाचन तपस्या केल्यानंतर पहिली वहीली कविता मिपावर डकवलीत. पहिलाच प्रयत्न चांगला जमला आहे. म्हणून पहिल्या धारेची. प्रथम दर्शनीच विडंबन करण्याची उबळ आली होती पण आपले इतर लेखन बघावे या हेतूने पान पालटले. बघतो तर "एकलीच दिपकळी मी अभागीनी ", एकच कविता दिसली. विडंबनाचा मोह टाळला. तरी दोन लाईना वानगीदाखल, बाटली ओतून प्यावी जराशी ताटलीतून मजा घ्यावी चकण्या ची.... मला कविता खुप आवडतात.खरा मद्यपि कुठल्याच मद्याला नावे ठेवत नाही. आपली कवीता समजून घेण्यासाठी संध्याकाळी बसावे लागेल. प्रतिसाद आणी वाचक संख्येवर जाऊ नका. ते फक्त नंबर आहेत. मिपावर लिहीत रहा. दर्दी वाचक वाचतात. पु.ले. शु.(पुढील लेखनास शुभेच्छा).

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस Wed, 10/23/2024 - 15:06
नवकवी हळवे असतात असा अनुभव आहे. विडंबन न केल्यामुळे एका नवकवीच्या भ्रुणहत्येच्या पातकापासून तुम्ही मुक्त झालात.

In reply to by कर्नलतपस्वी

रोहन जगताप गुरुवार, 10/24/2024 - 00:02
मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला आहे म्हटल्यावर त्या आनंदात माय मराठीला वंदन करून आपल्या तर्फे एक छोटे पुष्प वहावे या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु १२ वर्षांची तपश्चर्या कमी पडल्याने आता आणखी १२ वर्षांची तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असे दिसते. तूर्तास मला अभिप्रेत असलेला या कवितेचा भावार्थ खाली स्वतंत्र प्रतिक्रियेत देत आहे. कविता ‘सुमंदारमाला’ वृत्ताच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रोहन जगताप गुरुवार, 10/24/2024 - 00:06
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्‍या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती
भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे. कविता : ‘पावे मराठी’ । रोहन जगताप

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 06:11
ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस कवीता प्रसवते लिहीता येत नाही असे माझे मत आहे.ज्या दृष्टीकोनातून कवी विचार करतो तो विचार वाचकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कवीता दुर्बोध होते. मग वाचक आवांतर गोष्टी शोधतो नाहीच समजली तर दुर्लक्ष करतो किंवा विडंवनाच्या दृष्टीकोनातून चाचपण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कवी व वाचक या दोघांनाही यात दोष देता येत नाही. आपली कवीता आवडली हे प्रथमच नमूद केले आहे. कृपया हलकेच घ्या व लिहीत रहा. आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण आनंदाचा त्यामुळे जास्त गंभीर होत नाही. भावार्थ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

शुष्क शब्दचित्र

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 17:52
कविता खूपच आवडली. अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृप्रज्ञा सवे खेळ का मांडला? --- देवप्रज्ञा आणि कृबु या दोन्हीच्या संयोगातून आणखीही उत्कृष्ट कलानिर्मिती होऊ शकते, सध्या तोच प्रयत्न आहे.

पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा... संपले का रंग तुमचे का कुंचले मोडले किंतान सोडून तुम्हीं अभासी चित्र का काढले? शब्द गुंत्यात भंजाळले , टकांळता कंटाळले का? रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून रंगीत चित्र कसे साधले? अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला? ___________________________________ कल्पनेत मन दंगले कृबू ने ते साकारले लेवूनी शुन्य,एक साज अभासी चित्र ते रंगले शुष्क शब्दांच्या उड्या कल्पना सागरातल्या बुड्या रंग सारे दाटले तरीही नाही उमटल्या भावनांच्या खुणा. जाणतो सारे तरीही नवोन्मेषी गीत मी गातो रात्रीच्या स्वप्ना

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार ·

Bhakti गुरुवार, 05/09/2024 - 18:44
छान, मस्तच शीर्षक थोडं छोटं पाहिजे होतं.. माणसाचा शोध!

रोबोट्सनी जग जिंकले होते माणूस इतिहास जमा झाला होता. पण रोबोट्सना पोट नव्हते, त्वचा झाकण्याची गरज नव्हती आकांक्षा नव्हत्या त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले आता पुढे काय असा प्रश्न पडला जेव्हा त्यांना मिसळपावच्या अर्काईव्हमध्ये माहितगारची एक जुनी कविता आढळली मग त्यांनी पोट असणारे त्वचा झाकाविशी वाटणारे आकांक्षा असणारे जन्म मृत्यू असणारे रोबोट बनवले असा लावला रोबोटमय जगाने माणसाचा पुर्नशोध

योद्धा

कर्नलतपस्वी ·

कर्नलतपस्वी Mon, 09/18/2023 - 09:09
खरी शक्ती,यानेच कित्येकदा नियती सुद्धा हार मानते. अशाच एका योद्ध्याची घमासान लढाई मध्ये लढताना केलेली आणखी एक शब्द रचना. शब्द येतात कविता घेऊन आजारी असताना माणसं येतात, डझनभर केळी घेऊन, किती असतात कोण जाणे, आलेली आपण होऊन.।। भेटताना ही येतात, हातावरती वेळ बांधुन, जाताना मात्र म्हणतात, परत येऊ वेळ घेऊन.।। कोणी आणतात फुलं पानं, क्षण जातात सुगंधात न्हाऊन , मळभ दाटलेले विरु लागते, जातात वृत्ती स्वच्छ होऊन.।। आलं कोणी भेटायला की, डॉक्टर तेंव्हाच जातात पाहुन , गर्दी कमी करण्यासाठी, जातात मोठ्ठं इंजेक्शन देऊन.।। सगळ्यांच्या शुभेच्छांनी, आजार जातो बरा होऊन, उमटतात त्याच्या पाऊलखुणा, अन शब्द येतात कविता घेऊन.।।

धष्टपुष्ट Fri, 01/05/2024 - 15:06
घेउनी जखमा उरी,फिरलो कसा ठाऊक नाही./ घेउनी व्रण ते उरी, फिरलो कसा ठाऊक नाही . अंधारल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. जिंकताना नेमके, हरलो कसा ठाऊक नाही. कटिबद्ध होती ती, नि होता विपुल तीचा शस्त्रसाठा/ बांधली होती कटी अन् विपुल होता शस्त्रसाठा

दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

विसरून जाऊ सारे.....

कर्नलतपस्वी ·

कर्नलतपस्वी Sun, 01/15/2023 - 12:47
सर्वांचे मनापासून आभार. दोनच शब्द तीन आणी गुळ पण किती मोठा अर्थ. मनापासून मनाचा मनाशी संवाद साधणारा जणू पूलच. मुबंई च्या सी लि॔क किंवा कोलकात्यातील हावडा ब्रिज पेक्षाही सशक्त. कवीता पण दोन शब्द जोडून बनवली आहे.

Bhakti Sun, 01/15/2023 - 15:54
काळी चंद्रकळा , अजूनही मनाजोगती ही साडी नाही मिळाली.खुप सुंदर असते ही साडी.आज काळ्या वस्त्रांचा विशेष मान :) तिळगुळ घ्या गोड गोड बोला! A

गुलाबी थंडी हवेत गारवा अंगावर रग शेकोटीची धग संक्रातीचा सण सुगडाचं वाण सवाष्णी सोळा काळी चंद्रकळा तीळाचा हलवा हलव्याचे दागिने तीळाचं दान बाळाचं बोरन्हाण बाजरीची भाकरी तीळाची पेरणी लोण्याचा गोळा खिचडीचा मान गुळाची पोळी तीळाची वडी हलव्याचा काटा वाढवतो गोडी तीळगुळ घ्या गोड बोला

नको ना रे

पाषाणभेद ·

कर्नलतपस्वी Sat, 12/31/2022 - 21:35
जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी घ्या ना थोडीशी थोडीशीच घ्या ना आजच्याच दिवस १ ६० ३० उलीशीच घ्या ना...... जशी समजली तशीच प्रतिसादली. पाभे भौ कृ ह घ्या.......

चित्रगुप्त Tue, 01/03/2023 - 11:37
नको नको म्हटलं तरी मिपावर येणं होतंच नको नको म्हटलं तरी कविता वाचणं होतंच ... बाकी काय काय नको, ते समर्थ सांगून गेलेतचः नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ नको वासना वीषयीं वृत्तिरुपें। पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥ नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी ॥ नको रे मना शीकवूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ ........ ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे.... असेही कुणितरी म्हटलेच आहे, तस्मात : नको वीट मानूं पाषाणभेदा। अती आदरे बोलिले सर्व वेदा ॥ जय जय रघुवीर समर्थ.

नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको