✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शुष्क शब्दचित्र

क — कर्नलतपस्वी, Tue, 06/18/2024 - 11:36
पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा... संपले का रंग तुमचे का कुंचले मोडले किंतान सोडून तुम्हीं अभासी चित्र का काढले? शब्द गुंत्यात भंजाळले , टकांळता कंटाळले का? रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून रंगीत चित्र कसे साधले? अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला? ___________________________________ कल्पनेत मन दंगले कृबू ने ते साकारले लेवूनी शुन्य,एक साज अभासी चित्र ते रंगले शुष्क शब्दांच्या उड्या कल्पना सागरातल्या बुड्या रंग सारे दाटले तरीही नाही उमटल्या भावनांच्या खुणा. जाणतो सारे तरीही नवोन्मेषी गीत मी गातो रात्रीच्या स्वप्नात माझ्या उद्याचा उष:काल पाहतो .

प्रतिक्रिया द्या
2358 वाचन

💬 प्रतिसाद (6)

एकदम मस्त कर्नलसाहेब

प्रचेतस
Tue, 06/18/2024 - 12:25 नवीन
एकदम मस्त कर्नलसाहेब
  • Log in or register to post comments

कुह्राडीचा दांडा होतास काळ.

कंजूस
Tue, 06/18/2024 - 12:26 नवीन
कुह्राडीचा दांडा होतास काळ.
  • Log in or register to post comments

@ कंजूसः दांडा गोतास काळ होणार नाही.

चित्रगुप्त
Tue, 06/18/2024 - 17:54 नवीन
प्रयोगशीलता आणि स्वयंशिस्त यातून कलेची आणखी उच्च्चतर पातळी गाठली जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

झकास.

चित्रगुप्त
Tue, 06/18/2024 - 17:52 नवीन
कविता खूपच आवडली. अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृप्रज्ञा सवे खेळ का मांडला? --- देवप्रज्ञा आणि कृबु या दोन्हीच्या संयोगातून आणखीही उत्कृष्ट कलानिर्मिती होऊ शकते, सध्या तोच प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

सर्वांचे

कर्नलतपस्वी
Wed, 06/19/2024 - 10:36 नवीन
मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रसंगोचीत कविता आवडलीच :)

अथांग आकाश
Wed, 06/19/2024 - 13:54 नवीन
प्रसंगोचीत कविता आवडल्याच :) कृ बु चे आगमन झाल्यावर सहित्य आणि कला विश्वातील जाणकारांनी वर्तवलेली भीती खरी ठरताना दिसत आहे!! Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा