गुलाबी थंडी
हवेत गारवा
अंगावर रग
शेकोटीची धग
संक्रातीचा सण
सुगडाचं वाण
सवाष्णी सोळा
काळी चंद्रकळा
तीळाचा हलवा
हलव्याचे दागिने
तीळाचं दान
बाळाचं बोरन्हाण
बाजरीची भाकरी
तीळाची पेरणी
लोण्याचा गोळा
खिचडीचा मान
गुळाची पोळी
तीळाची वडी
हलव्याचा काटा
वाढवतो गोडी
तीळगुळ घ्या गोड बोला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4497
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलं काव्य.
छान मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
एकदम सुरेख.
लिहिते राहा.
+१
In reply to लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वांचे मनापासून आभार.
छान. बाळाचं बोरन्हाण सर्वात मर्मस्पर्शी.
व्वा, मस्तच ... क्या बात
सुरेख
धन्यवाद
In reply to सुरेख by Bhakti
व्वा व्वा ! खूपच गोड . छान .
आवडली \m/