मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विसरून जाऊ सारे.....

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
गुलाबी थंडी हवेत गारवा अंगावर रग शेकोटीची धग संक्रातीचा सण सुगडाचं वाण सवाष्णी सोळा काळी चंद्रकळा तीळाचा हलवा हलव्याचे दागिने तीळाचं दान बाळाचं बोरन्हाण बाजरीची भाकरी तीळाची पेरणी लोण्याचा गोळा खिचडीचा मान गुळाची पोळी तीळाची वडी हलव्याचा काटा वाढवतो गोडी तीळगुळ घ्या गोड बोला

वाचने 4483 वाचनखूण प्रतिक्रिया 12

कर्नलतपस्वी Sun, 01/15/2023 - 12:47
सर्वांचे मनापासून आभार. दोनच शब्द तीन आणी गुळ पण किती मोठा अर्थ. मनापासून मनाचा मनाशी संवाद साधणारा जणू पूलच. मुबंई च्या सी लि॔क किंवा कोलकात्यातील हावडा ब्रिज पेक्षाही सशक्त. कवीता पण दोन शब्द जोडून बनवली आहे.

Bhakti Sun, 01/15/2023 - 15:54
काळी चंद्रकळा , अजूनही मनाजोगती ही साडी नाही मिळाली.खुप सुंदर असते ही साडी.आज काळ्या वस्त्रांचा विशेष मान :) तिळगुळ घ्या गोड गोड बोला! A