{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 1:00 pm

पेर्णा
"याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.
नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता?
‘हॅलो…’
आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही. बरं एकही नातेवाईक असं करायला धजावणार नाही, कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
‘हा, अभ्याच बोलतोय’
‘बर्र, ह्यांच्याशी बोल जरा’, आवाजाने गूढ कायम ठेवलं.
‘हॅलो…’ आवाजात विलक्षण जरब होती, तरी मला काही तो ओळखू आला नाही.
‘रामराम, मधे एक छोटा पॉझ, ‘नीलकांत बोलतोय’, मी ताडकन उडालोच. मग वाटलं हे आमच्या किसन्याचं किंवा वल्ल्याचं प्रशांतच्या मदतीनं केलेलं कारस्थान असावं. मी संभाषण चालू ठेवून अंदाज घेण्याचं ठरवलं.
‘अरे, आहेस का जागेवर?’ माझ्या गोंधळण्याचा पलीकडील व्यक्तीला अंदाज आला असावा. आता मात्र हा आवाज प्रशांतने काढलेला वाटला नाही. तरीपण खुद्द नीलकांतमालक आपल्याला फोन करतील अशी कोणतीच पुण्याई मी माझ्या मिपाच्या कारकीर्दीत केलेली नव्हती. नाही म्हणायला माझी अन् त्यांची एक ओझरती भेट झाली होती, पण त्या गोष्टीला आता पुरतं दीड वर्ष लोटलं होतं.
‘हां मालक’, न जाणो खरंच मालक असतील तर, आपण बॅकफूटवर जाऊन संरक्षणात्मक पवित्रा घेतलेला बरा, असा मी विचार केला. अन् तो निर्णय फारच योग्य ठरला कारण पुढचे सर्व चेंडू, ब्लॉक होलमध्ये, यॉर्कर लेंथचेच असणार होते. पलीकडे खुद्द मालकच होते.
‘वेळ आहे ना थोडा बोलण्यासाठी, कुठे आहात?’
‘मी माझ्या नेहमीच्याच जागी, सोलापुरातल्या हपिसात’, खरं तर हे सर्व त्यांना चांगलंच ठाऊक असणार. कारण हे लोक पूर्ण तयारीशिवाय कुठे लॉगिनच करत नाहीत. त्या दीड वर्षापूर्वीच्या भेटीचा मला चांगलाच अनुभव होता. एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती. त्यांच्या पहिल्या वाक्याला मला ते लक्षात आलं होतं हे त्यावेळेस बरंच झालं, कारण त्यापुढचं वाक्य न् वाक्य कसलं अक्षर न् अक्षर मी अतिशय तोलून मापून बोललो होतो. त्याचा मला फायदाच झाला. एरव्ही अघळ-पघळ बोलणाऱ्या मला तो एक चांगलाच पाठ होता. पण तो तेव्हढ्यापुरताच. पुढे आम्ही सुधरलो नाही ते नाहीच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण आता तसं करून चालणार नव्हतं. माझी औपचारिक चौकशी, म्हणजे संभाषणात मोकळेपणा आणण्याचा तो एक प्रयत्न असावा.
‘नाही, म्हणजे काय चाललंय सध्या?’, अशा मोठमोठ्या व्यक्तींचं अजून एक असतं. त्यांनी काय विचारलं यापेक्षा त्यांना काय विचारायचं आहे हे तुम्ही ओळखायचं असतं. मला हे लक्षात यायला हवं होतं पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
‘काही नाही, थोडं फार लिखाण, प्रतिसाद, खरडफळा, बॅनर वगैरे…’
(ह्यापुढचं सर्व संभाषण जरा फॉर्मल भाषेतच देतो. कारण मालकांनी अलगद काढलेली आमची मापं चारचौघात सांगणं काही बरोबर नाही.)
‘पण तू इतक्या लवकर मिपावर सज्जनपणा धारण केला, वावर कमी केलास हे काही बरं केलं नाहीस’
‘म्हणजे, मी समजलो नाही.’
‘काही सदस्यांना बॅन करणं, समज देणं वगैरे इशारे तुझ्यासारख्या मिपाकरांसाठी नव्हतेच मुळी’
‘खरं आहे मालक, पण तो निर्णय सर्वस्वी माझा होता, मला कोणी जबरदस्ती केली नाही.’
‘पण तू माझ्यासारखंच मिपावरुन लांब राहूनही विभक्त होऊ शकत नाहीस !’
‘ते कसं काय?’
‘हे बघ, इतकी वर्षे तू मिपा परिवाराचा सदस्य होता. 'होता' म्हणणं तसं चुकीचं होईल. कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही. उलट आता तर ह्या सर्व व्यापातून मुक्त झाल्यामुळे त्या संस्काराचं उदात्तीकरण झालं असावं असं तुझ्या एकंदरीत मिपा नंतरच्या उर्वरित आयुष्यातील आत्तापर्यंतच्या जीवनशैलीमुळे मला वाटतंय.'
‘अरे, पुन्हा कुठे हरवलास? मी खरंच नीलकांत बोलतोय. विश्वास बसत नसेल तर एक काम कर. स्काईप वर ये. मी वेब कॅम लावतो. तू ही लाव. ओ. के.’, पलीकडून फोन कटही झाला. मी विचार केला कुणीतरी आपली खेचतंय असं दिसतंय तर हरकत नाही आपणही जरा मजा घ्यावी. गंमत म्हणून चॅटिगलाही बसलो. मनात आलं, आजकाल डूआयडींचीही कमी नाही, किंवा मालकांचाही आवाज काढणं ह्या अमरावती अकोल्यावाल्यांना काही अवघड नाही.
चॅटिंग सुरुही झालं. ते आधीच तिथे हजर होते. वेबकॅम सुरू झाल्यावर मात्र मी चपापलो. समोर खरंच हॅन्डसम मालक दिसत होते. घर ही त्यांचेच दिसत होते. मागच्या भिंतीवर लावलेलं ज्ञानोबा तुकारामाचं तैलचित्र, टेबलावरची मिसळीची डिश आणि इतर अनेक गोष्टी अगदी बहुतेक सर्व तशाच होत्या.
त्यांचंही माझ्या हपिसचं निरीक्षण चालू असावं. ते बोलले, ‘अभ्या, तुझं हपिस खूप लहान, पण टुमदार अन रंगीबेरंगी दिसतंय.’ ह्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य, जवळीक साधण्यासाठी एकेरी संबोधणं आणि दुसऱ्याच्या राहणीचा आदर करणं.
‘हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे.’ संवाद पुन्हा चालू झाला, माझं चाचपडणंही.
‘तुला आठवतंय, मागे काही दिवसांपूर्वीसुद्धा नव्या संपादकांबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्या वेळेस तू पुण्याला आला होतास. तेंव्हा गंमतीने तू तुझ्या शेजारच्या वल्ल्याला काय सांगत होता – आय अ‍ॅम दी मोस्ट एलिजीबल संपादक इन धीस मिपा ....आणि ते तिथून जातांना नेमके माझ्या कानावर पडलं होतं.’ हसत हसत ते म्हणाले. मला आता परत ते मालक असल्याची पुसटशी शक्यता वाटू लागली. कारण हा प्रसंग तंतोतंत खरा होता. मी हे वाक्य बोलायला आणि मालक माझ्या पाठीवर थाप मारून पुढे एक्काकाकांच्या कंपूत गेले होते हे वल्ल्याने मला त्या वेळेस सांगितलं होतं, माझी पाठ बरीच निब्बर झाली असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नव्हतं आणि माझी त्यावेळेस चांगलीच तंतरली होती हे मला चांगलंच आठवतं. हे मला, वल्ल्याला आणि ऐकू आलं असेल तर खुद्द मालकांनाच माहित असणार होतं. ह्याचा अर्थ त्यांनी ते नुसतंच ऐकलं नव्हतें तर लक्षातही ठेवलं होतं. मला पुन्हा एकदा घाम फुटला.
‘मालक, तसं काय नाही हो, ते सहजच गंमतीने बोललो होतो.’
‘पण मला आज त्यात तथ्य वाटतंय’
‘मालक, कैच्या कै, मी साधा मिपाकर, गावठी माणूस !’
‘कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?’
‘मालक ते तर उगी टाइमपास.’
‘पण त्याच क्वॉलिफिकेशनवर तू सोलापुरात एवढा बिझनेस करतोस ना?’
‘सर, मला वाटतं मी बॅचलर आहे, मी सोलापुरात बिझनेस करताना काळवेळ न बघता, गिर्‍हायकांची नड बघून काम करेन हे सोलापूरकरांच्या दृष्टीने माझं सगळ्यात जास्त क्वॉलिफिकेशन होतं.’
‘तेच तर!’
‘? ? ? ? ? ‘ माझ्या कपाळाच्या आठ्यांमधून डोकावणारे ग्राफीक प्रश्नचिन्ह त्यांना स्पष्टपणे दिसत असावं.
‘बॅचलर असणं तर सगळ्यात मोठं क्वॉलिफिकेशन आहे.’
‘ते कसं काय?’
‘ हे मी तुला सांगायला हवं? आत्ता तूच तर म्हणाला तसं! ते तर तुझं अ‍ॅसेट आहे. त्याचं असं आहे, बॅचलर लोकांना प्रापंचिक व्याप नसतात. ह्याचा अर्थ ते कुटुंबवत्सल नसतात असा मुळीच नाही. माझ्या मते ते उलट जास्त प्रेमळपणे ही जबाबदारी पार पाडू शकतात. कारण त्यांची कुटुंबाची कल्पनाच मुळी व्यापक असते. तो फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित विचार करतच नाही. एखादे संस्थळ, राज्य, देश, संपूर्ण जगच त्याचं कुटुंब होतं. एकटे असल्यामुळे काहीसे भावनाप्रधान असले तेरी महत्वाचे निर्णय घेतांना ते पुरेसे व्यावहारिक राहू शकतात. पंतप्रधान, राष्ट्रपती कुठलंही पद ते भूषवू देत, त्यांचा विश्वव्यापक दृष्टिकोन त्त्यांना सर्वसमावेशक, परिपक्व व योग्य तो निर्णय घ्यायला मदतच करतो.’
माझ्या दृष्टीने हे सर्व अकल्पित होतं. ह्या सर्व विचारांमध्ये तथ्य होतंच, पण ते माझ्या मते वैयक्तिक पातळीवर ठीक आहे, पण मालकांसारखी व्यक्ती असं म्हणते म्हणल्यावर मी जरा अचंबित झालो. माझा संभ्रम त्यांनी वाचला असावा.
‘काय झालं? कुठे हरवलास?’ त्यांनी मला पुन्हा संभाषणात ओढलं.
‘कुठे काय? काही नाही!’ काही तरी उत्तर द्यायला हवे म्हणून मी बोललो.
‘हे सर्व मी तुला का सांगतोय असं तुला वाटत असेल नाही?’, हे खरंच होतं तरी मी गप्पच होतो.
‘तुला आठवतं, आपली पहिली भेट?’, खरं तर मी ती भेट विसरणं कसं शक्य होतं?
‘नवीन मिपाकरांच्या वावराविषयी तू तुझं धाडसी मत नोंदवलं होतंस आणि त्यामुळेच आपली भेट झाली होती. नवीन मिपाकर आणि त्यांचे लेखन, त्यांना मिळणारा खास मिपाआहेर, डूआयडी आणि ट्रोलिंग हे जसे व्यक्तीसापेक्ष तसेच वेगवेगळे बॅनर्स आणी उपक्रम कसे वेगवेगळ्या पद्धतीने, विविध विचारांची सांगड घालून करायला हवेत असं बरंच काही तू अहमहमिकेनं बोलला होतास आणि तसे बदल मी सासंला अंमलात आणायलाही सांगितले होते, ते मला पक्कं आठवतंय. तुझ्यातील टारगटपणा तेव्हांच दिसला होता. तू बनवलेले बॅनर्स, गणेशचतुर्थीचे तर खासच होतं. आणि अभ्या, मिपाच्या रंगपंचमी उत्सवाला तू बनवलेलं बॅनर तर अप्रतिमच होतं. तुला हे सर्व कसं सुचतं ह्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. मिपाबद्दलचे त्यातले तुझे चित्ररुप भाष्य अतिशय कुत्सित आणि मापं काढणारं आहे. ती अजूनही माझ्या संग्रही आहेत.’ ते हे सर्व मला का सांगत होते हे मला थोडं कळेनासं झालं.
'आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ते बोलतच होते, मी ऐकत होतो.
‘अभ्याशेठ पुन्हा हरवलात की काय? पटताहेत का माझे विचार? मला माहित आहे तुझ्या मनात काय चाललंय ते. सध्या जो काय गदारोळ चाललाय त्यात मी तुला कां फोन करतोय असंच ना? काही हरकत नाही. जे चाललंय त्याकडे तूर्तास आपण दुर्लक्ष करूयात. ते कसं हॅन्डल करायचं हे मला पुरतं ठाऊक आहे. आता मला मिपाचा भविष्यकाळ खुणावतोय. तेंव्हा माझी अशी इच्छा आहे की मिपाची धुरा कोणीही वाहो, तुझ्यासारखे काही हितचिंतक जर आमच्याबरोबर असले तर मिपाचा झेंडा आपण कायम अटकेपार रोवत राहू, ह्याची मला खात्री आहे.
मिपाचे काही दिग्गज आणि मी स्वतः योग्य त्या संपादकांची निवड लवकरच करूच, पण तुझ्यासारख्या हितचिंतकांची आम्हाला नेहमीच गरज भासेल तेंव्हा तू उपलब्ध असशील अशी आशा व्यक्त करतो.
अरे हो अभ्या, तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो. भेटतोयस नं मग ! कधी येतो भेटायला ? पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच. !’

मी मनातल्या मनात म्हणालॊ, ‘कसंचं कसंचं...!!!’

...... दहा रिंगा वाजूनही झोपेतून न उठण्याबद्दल कस्टमर माझ्या नावानं शंख करत अकरावी रिंग देत होता .......!!!!!!

# # # # #
(अवांतर माफी: मालक्स लोक अशा गोष्टीबद्दल माफ करतात. नाही केले तर उडवतील धागा. अजून काय ;) )

मांडणीइतिहासबालकथाविडंबनउखाणेप्रतिशब्दशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारसमाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नीलकांत पुण्यातल्या कट्ट्याला नाही म्हणाला? र्‍हायचं ना त्याला मिपावर? =))

नाखु's picture

1 Nov 2016 - 1:17 pm | नाखु

आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन..

बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय?

फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2016 - 1:19 pm | टवाळ कार्टा

खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =))
बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

अभ्या..'s picture

1 Nov 2016 - 1:32 pm | अभ्या..

हायला अशी गेम झाली काय?
चुकले राव. पोतेच आणायला पैजे होते.

यशोधरा's picture

1 Nov 2016 - 1:34 pm | यशोधरा

पोते आणशील तेव्हा मला एक लहानसे पाकीट आण हां.

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2016 - 1:52 pm | टवाळ कार्टा

आणि पोते आणताना त्यात चटणी भरुन आण =))

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 2:10 pm | सतिश गावडे

आणि जाताना चितळेंची बाकरवडी भरुन घेऊन जा.

हि स्कीम चांगली आहे. आवडली.

कपिलमुनी's picture

1 Nov 2016 - 7:42 pm | कपिलमुनी

दोन्ही गोष्टी स्वखर्चाने कराव्यात :- पुणे ३०

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 8:20 pm | सतिश गावडे

हवं तर चितळेंच्या दुकानापर्यंत सोडण्यासाठी आमच्या खिशातून पेट्रोल जाळू आम्ही.

नाखु's picture

2 Nov 2016 - 8:48 am | नाखु

सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी.

तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2016 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा ठीक. (मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)

-दिलीप बिरुटे

(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)

ब्येस्ट. आता कोण? संजयजी का?
येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 1:50 pm | सतिश गावडे

ते आचारी आणि जिलबी संदर्भात होतं. तुम्ही आचारी आहात का? जिलबी पाडता का?

वटवट's picture

1 Nov 2016 - 2:14 pm | वटवट

शुभेच्छा...

लालगरूड's picture

1 Nov 2016 - 3:56 pm | लालगरूड

खिक्क अभ्या बेण्या o_O

जयू कर्णिक's picture

1 Nov 2016 - 5:02 pm | जयू कर्णिक

प्रिय 'अभ्या'सक,
"क्या बात है!"
वाचून मजा आली.
'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला.
जबरा कमांड आहे आपली.
ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले.
धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2016 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा

सोला पुरी माल.., वाचकांचे हाल! =))
.
.
.
.
.
.
पळा आता.. , अभ्या करतय हलाल! =))

चौथा कोनाडा's picture

1 Nov 2016 - 6:13 pm | चौथा कोनाडा

लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !

कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.

एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.

सुपर्सिध्द गावातील.. :-))))

पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.

हा.... हा.... हा... !

कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.

आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?

हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे

ह्ये क्लासिकच !

कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?

आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',

टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !

तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.

क्या बात, क्या बात, जी नाईन बात !

पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.

या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत !

आणि शेवटी

राघवेंद्र's picture

1 Nov 2016 - 7:59 pm | राघवेंद्र

+१

सूड's picture

1 Nov 2016 - 7:02 pm | सूड

बरं जमलंय.

वटवट's picture

1 Nov 2016 - 8:36 pm | वटवट

आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार...
अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला.....
तगडी स्पर्धा...

खंग्री इडंबण लिहिलास की बेऽऽऽ

(षोडशपुरीयमित्रलब्ध) बॅटमॅन.

चांदणे संदीप's picture

2 Nov 2016 - 12:41 am | चांदणे संदीप

येऊन येऊन येणार कोण.... वगैरेंच्या तयारीला लागावं काय??

Sandy

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2016 - 8:56 am | चौथा कोनाडा

:-)

संजय पाटिल's picture

2 Nov 2016 - 11:47 am | संजय पाटिल

खुसखुशित...
पेर्णा पेक्षा इडंबन सुरस आहे!