मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा

शुचि ·

(४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो.
=)) च्यायला, डेट गेली खड्ड्यात, काही पदार्थ असे असतात जे हातानीचं ओरपावे असे असतात. डेट भारतात चालुये असं गृहित धरु, मिसळीमधे पाव सुरीनी कापुन नंतर काट्यानी उचलुन खाणं डोळ्यासमोर पण आणवत नाहीये. उद्या टेबल मॅनर्स च्या नावाखाली पुरणपोळी काट्यानी तोडुन मग दुधात किंवा तुपात बुडवुन खायला लागली तर पुरणपोळी खाणं सोडुन द्यायची वेळ येईल. :). (मसाला डोसा काट्या-चमच्यानी खाता नं येणारा) अनिरुद्ध

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:33
मी पण ते वाचून दचकलोच पण.... अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. :) डोसा नाही खाता येत काही हरकत नाही, वडा सांबार मागवा. बाकी पहिल्या डेटला डोसा आणि वडासांबार हेच चित्र डोळ्यसमोर विनोदी म्हणून येतेय ;) यावरून आठवले - मी माझ्या बायकोबरोबर लग्नाआधी जेव्हा गर्लफ्रेंड म्हणून डेटींग करायला सुरुवात केली होती तेव्हा ती मला सांगते की तीच तेव्हा जास्त कॉशिअस असायाची, काय खायचे कसे खायचे, इम्प्रेशन चुकीचे नाही पडणार ना वगैरे वगैरे.. खरे तर ती माझ्यापेक्षा जास्त टेबल मॅनर्स जाणून आहे आणि माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. पण बहुधा त्यामुळेच मी देखील तसा विचार करत असेल या विचाराने ती काळजी घ्यायची आणि मी मस्त खुलेपणाने वागायचो.

In reply to by तुमचा अभिषेक

अहो उदाहरण दिलं हो. टेबल मॅनर्स अगदी झक्कासपणे पाळता येतात. फॉर्मल लंच किंवा डिनर ला पाळावेत. पण जे पदार्थ हातानी खायचे आहेत त्याला उगाच चमचा कशाला लावायचा? डेटला नाही हो वडा किंवा डोसा =)). बा.द.वे. काँशिअस झालं की जास्त चुका होतात =))

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Sun, 04/27/2014 - 14:47
अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. Smile
खरे आहे, पहिल्या डेटला, काटेरी आख्खा मासा, भरलेले खेकडे किंवा खेकड्याचा रस्सा (भारतात) अन पोर्क रिब्ज rack (परदेशात) मागवू नये अन मागवलेच तर हाताने खायला लाजू नये.

चौथा कोनाडा Sun, 04/27/2014 - 09:45
पुस्तका बद्दल छान माहिती. चेकलिस्ट मनोरंजक आहे. या बाबतीत आपणा सर्वांचा अनुभव पाहता हा धागा लढाईचा आखाडा बनायला फुल्ल स्कोप आहे !

In reply to by चौथा कोनाडा

एसमाळी Sun, 04/27/2014 - 11:23
smart भारतीय मुली पहिल्या डिनरडेटला काय चेकलिस्ट बघत असतिल हे कुणी सांगेल का ? पहिल्या डिनरडेटला मी तर हातानेंच curd rice ओरपला होता.

जेनी... Sun, 04/27/2014 - 10:06
सहिय ..... पण डेटिंग साठी येणारा पूरुष स्त्री वर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो ... हे वरचे पॉईंट्स जरा विचित्रच आहेत ... म्हणजे असं वागताना पाहिलहि नाहि न ऐकलहि नाहि .. एनिवेज .... माझी पहिली वहिली डीनर्डेट चा किस्सा सांगायला आवडेल ... कुणाला ऐकायला आवडनार असेल तर ;)

In reply to by जेनी...

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:37
सांगा की, मी सुद्धा माझ्या एका ऑर्कुट डेटचा किस्सा लिहिलेला तो आठवला.. त्याची लिंक हि.. माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 12:22
आयला! हे पुस्तक वाचून जी कोण डिनरडेटचे निष्कर्ष काढत बसेल ती बहुतेक आयुक्षभर डिनरडेट्सच करत बसेलसं दिसतंय. मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच. मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच. थोडक्यात, इथून पुढे (जर कधी संधी..हे आपलं.. वेळ आलीच तर!) डिनरडेटला जाण्यापुर्वी जिच्यासोबत डेट आहे तीने हे पुस्तक वाचलेलं नाही ह्याची खातरजमा केल्याशिवाय हाटेलात पाय टाकणे नाही! हौ ना राव. सगळं व्यवस्थित करुन सवरुन फुकट इज्जतीचा पंचनामा करुन घ्यायला कुणी सांगितलंय? म्हणजे, तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! ;)

In reply to by धमाल मुलगा

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:57
मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच. मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच. वरवर कन्फ्यूजिंग वाटत असले तरी सोप्पय ते. पहिले म्हणजे शक्यतो संभाषणाचे वेटेज ५०-५० टक्के वा त्याच्या जवळपास हवे. एकच जण बोलतोय आणि एका काहीच नाही असे टाळावे. समोरच्या मुलीलाही बोलायची आवड असेल आणि तिला बोलायला नाही दिले तर तिची प्रचंड चीडचीड होणारच. त्यामुळे बोलायलाही द्यावे आणि काय बोलतेय ते ईंटरेस्ट घेऊन ऐकावेही, हे महत्वाचे अन्यथा इकडे तिकडे लक्ष दिल्यास तिच्या मनात समोरच्या टेबलावरचा ग्लास उचलून तुमच्या डोक्यात मारावा असे विचार येण्याची संभावना असते. जर तिला ऐकण्यातच रस जास्त असेल तर मात्र तिला ऐकण्यात ईंटरेस्ट आहे अश्याच विषयांवर बोलावे. पण आपल्याला जे बोलता येते आणि जे विषय आवडतात त्यात त्या मुलीला ईंटरेस्ट नसेल तर तिने आपल्याला बाद करायच्या आधी आपणच तिला बाद करावे. पहिल्याच भेटीत उगाचच्या उगाच स्वताचेच पुराण लावणे टाळावे. कोणीही बोर होणारच. हे दुसर्‍या तिसर्‍या चौथ्या भेटींसाठी ठेवावे. पण जर ती मुलगी आधीच आपल्या प्रेमात असेल तर मात्र तिला हे आवडू शकते. तळटीप - लग्नासाठीच डेटींग असेल तर स्वता जसे आहोत तसेच वागणे कधीही चांगले. पण एखाद्या मुलीला भेटताना आपल्याला काही गोष्टींचे तारतम्य बाळगता येत नसेल तर ती नक्कीच सुधारणेची जागा आहे. हि एकमेकांशी बोलण्याची ट्यूनिंग जमली की खरे तर इतर बर्‍याच गोष्टी गौण असतात. आमचे स्वताचेही इतर सर्व गोष्टी एकमेकांशी जराही मिळत्याजुळत्या नसून या एका मुद्द्यावर जुळले आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:30
आहोऽऽऽ....तो माझा एक इनोद करण्याचा केविलवाणा (आणि आता बहुधा निष्फळ) प्रयत्न होता हो! इतक्या होपलेसली रोम्यांटिक बाबी इतक्या शिरेसली घेऊ नका जी. त्यात आणि मी बोलत असेल तर बिलकुलच नको. :)

In reply to by धमाल मुलगा

शुचि Sun, 04/27/2014 - 15:23
तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! Wink
वाट्टेल त्या अतिरेकी म्हणी बनवू नकोस =))

In reply to by प्रसाद गोडबोले

शुचि Sun, 04/27/2014 - 14:58
पाश्चात्यांत हाताने खाण्याकडे विशेषता: चारचौघात (fOrmal भेटीत ) खरच गर्हणीय मानले जात असावे . माझ्या मुलीच्या मैत्रिणीचे आई (Indonesian) अन वडील (कॉकेशिअन) आले असताना मी चुकून मटन तसे(हाताने ) खाल्ले होते कारण फार मोठे तुकडे असलेले मटन त्या दिवशी केले होते :( पण त्या लोकांना जेवण तर निट गेलेच नाही परत नंतर त्यांनी आमच्याबरोबर्चे संबंध अत्यल्प करून टाकल्याचे स्मरते. :( :( तेव्हापासून मी धडा घेतला आहे.

In reply to by शुचि

मग त्यांना घरी बोलवुन एकदा वरणभात आणि आळुची भाजी असा बेत करायला हवा होता ... अशी अळुची भाजी ओरपुन खाताना पाहुन ते चक्कर येवुनच पडले असते =)) बाकी माज्या मते तर आपण जिथल्या तिथल्या प्रथा पाळाव्यात ... मला तर चायनिज चॉप्स्टिक्सनेही अगदी व्यवस्थित जेवता येत पण ते केवळ चायनिज (चायनिज चायनिज : ऑथेन्टीक चायनिज) रेस्टरों मध्येच ! आणि आजही उत्तपम काटाचमचाने खाणार्‍यांची कीवच वाटते मला :)

पैसा Sun, 04/27/2014 - 15:09
म्हणजे डिनरडेटला सगळे सैधिंडियन्स पार नापास होणार की! ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!

In reply to by पैसा

शुचि Sun, 04/27/2014 - 15:26
कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!
हाहाहा लई म्हंजी लई खरं आहे!!! Traumaa होउन बसायचा त्याना ;)

In reply to by पैसा

विजुभाऊ Mon, 04/28/2014 - 01:36
ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार या पेक्षा कहर म्हणजे. भाताचे गोळे आणि दोन बोटांधून पिचकारीप्रमाणे पाझरणारे सांबार

रेवती Sun, 04/27/2014 - 18:36
भारतीय रेस्तरांत मी भाजी पोळी हाताने खात असताना शेजारच्या टेबलावरील हामेरिकन कुटुंब डोळ्याच्या कोपर्‍यातून बघत होते. त्यांनी प्रयत्न केला पण जमले नाही. मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. शाकाहारी असल्याने नॉनव्हेजीय पदार्थांशी कुस्ती खेळत खाण्याचा प्रसंग माझ्यावर आला नाही पण दोसा मऊ असल्यास काटा सुरीने जास्त चाम्गल्या पद्धतीने खाता येतो असे मत बनले आहे. तसाही पपडासारखा दोसा खाउन समाधानही होत नाही. शुचीमामी, वरील सर्व यमनियम वाचून भूक जाईल एखाद्याची, किंवा यासगळ्यात जेवायचे कधी? असा प्रश्न पडेल. बिले देण्यास मी मागेपुढे पहात नाही. नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. ;) पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल. ;)

In reply to by रेवती

>>> नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. >>>> रेवती....डिट्टो...!!! *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

In reply to by रेवती

धमाल मुलगा Sun, 04/27/2014 - 19:37
काकांच्या नशिबाचं नेहमीचं कौतुक वाटत आलं आहे, आज मात्र हे वाचून आनंदानं डोळेच पाणावले. :) काकू तुस्सी ग्रेट हो! भार्रऽत माताऽऽ की ज्जय!!!!

In reply to by रेवती

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 20:38
मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. सेम असाच अनुभव आपल्याइथे वाशीच्या मॉलमध्ये घेतलाय. एक आफ्रिकन कपल भगत ताराचंदची वेज थाळी घेऊन आता ती कशी खायची या विचारात होते. पाहिले तर त्यातील हिरो असाच चपातीचा रोल करून डाळीत डुबुक डुबूक करून खाऊ लागला, आणि भाजी राहिली बाजूलाच. एक तर त्याला तसे डाळचपाती खाण्यात मजाही येत नसणार आणि चपातीबरोबरच डाळ संपवली तर भाताबरोबर हा भाजी खाणार की त्यात ताक ओतणार. पण जे काही करेल त्यानंतर परत आपल्या देशात जाऊन भारतीत फूड ला नावे मात्र नक्की ठेवणार हे दिसून आल्याने मी देश के इज्जत क सवाल है बोलत लागलीच त्याच्या मदतीला धावलो. सुदैवाने आम्हीही तशीच एक वेज थाली मागवली असल्याने त्याला समजावणे सोपे पडले. बरेपैकी जमले त्यांना !

In reply to by रेवती

स्पंदना Mon, 04/28/2014 - 07:32
भर हो भर!! अशी हजारो बिलं भरत जा गो रेवक्का!! :)) :)) पाहिलतं? पाहिलतं? आमच्या रेवाक्काच मन किती मोठठ आहे ते? :))

In reply to by रेवती

शुचि Mon, 04/28/2014 - 19:21
पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल.
रेवती, खालती सुहास यांच्या प्रतिसादास , उप-प्रतिसादात आमचे कसे जम्ले ते लिहीले आहे. इच्छा असल्यास तुझे अनुभव शेअर कर :) .... मजा येते गं अन माहीते सगळ्यांच्या शेअरींगमधून एक सम्यक अनुभव मिळतो.

In reply to by शुचि

रेवती Mon, 04/28/2014 - 19:34
होय, तुझा वाचला अनुभव. चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत! ;) आमचे लग्न ५ मिनिटात ठरल्याने (व पुरती ओळख होण्याच्या आत झाल्याने)अनुभव असे काहीच नाहीत. लग्नाआधी एकदा बाहेर जेवायला गेल्यावर जेवताना गप्पा मारून विषय संपले मग बील येईपर्यंत बोलायला काही उरले नसल्याने गप्प बसून होतो दोघेही. फारशी ओळख नसल्याने काय बोलायचे हा प्रश्न! बील नवर्‍यानेच दिले व भाजीपोळी टाईप जेवण होते त्यामुळे खमंग किस्से नाहीत. एकंदरीतच माझे लग्न इतक्या नेहमीच्या आणि साध्या पद्धतीने ठरले की "अय्या, असं झालं का? " टाईप किस्से नाहीत. शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले. विश्वनाथन आनंदशिवाय विषय नसतो. सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.

In reply to by रेवती

शुचि Mon, 04/28/2014 - 21:47
चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत!
दुसरी भेट होती कारण पहीली सासू-सासरे व आई-बाबा अन मॅरेज ब्युरोतील एका व्यक्तीच्या समक्षच झाले. त्याचे पहीले वाक्य होते "त्याला म्युझिकचे व्यसन आहे" अन लगोलग माझे वाक्य होते "आणखी कोणती व्यसने आहेत आपल्याला?" त्यावर तो खूप हसला होता :) ..... वन ऑफ सम रियली फॉन्ड मेमरीज ऑफ दोस डेज!!! :)
शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले.सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.
हाहाहा

बाप रे........!!!

डेटींग हे प्रकरण असलं भयंकर असतं होय! http://www.sherv.net/cm/emo/hearts/sick.gif आमस्नी तर ह्ये सम्दं मुळ्ळीच खरं वाटत नाय. तिच्यायला,आम्च्या घाटावर..खेड्यापाड्यात सुदीक..पोरं पोरी कालिजात वळख होऊन..कुटतरी चिचच्या झाडाखाली,न्हायतर ओढ्याकाठी..येकदम्म पिरेमाच्या फुल्ल करंटमदी येऊन..कुनी हाकायला येत न्हाई..तो परेंत गुलुगुलु..गुलूगुलू करत्यात.. त्ये ह्या डेटिंग का फेटींग परास लै फर्मास!!! http://www.sherv.net/cm/emo/hug/cute-hug.gif आनी माणशिक आरोग्यास अत्यंण्त लाबदायक! http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif
काय म्हण्न्ता???

In reply to by शुचि

आत्मशून्य Mon, 04/28/2014 - 02:11
जोडिदाराला फरक पडत नसावा. आपण डेलिक्सि व जोडिदाराचा सेल्फ रिस्पेक्ट किती जपतो आणी काय धमाल करतो इतकेच महत्वाचे आहे. छोटसेे उदाहरण देतो, एकी सोबत Sndt रोड वर फिरत होतो, नुकतच स्वाद मधून बाहेर आलो होतो, तोच खिशात एक्लेअर्स सापडले, लगेच तोंडात टाकले व रेपर रस्त्यावर सोडुन दिले. लगेच मंजूळ आवाज कानी... असा रस्त्यावर कचरा कसा टाकतोस ? मी लगेच ते वेष्टन उचलून खिशात कोम्ब्ले. पुन्हा मंजूळ आवाज GOOD BOY. मी सांगितले म्हणून एकाही मुलाने आज पर्यंत लगेच असे काही परत उचलले नाहिये. तु GOOD BOY आहेस. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती स्त्रीमन दुखावु नये म्हणून केलेली. पण अर्थात व्यक्ती परत्वे हे आपोआप करावेसे वाट्ने सुधा महत्वाचे असते. उगा बिल बघून चेहरा कसा केला, काटा चमचा वापरला की नाही यागोष्टी वरील चेमिस्त्री साध्य झाल्यास गउन ठरतात.

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2014 - 01:44
बापरे! हल्ली असे 'नियमानुसार' प्रेम करावे लागते? बरं झालं आमच्या काळी हे कांही नव्हतं. बटाटेवडा (हो 'टे' वडा), वडा पाव, मिसळ पाव, व्हेज सँडविच, कांदा-बटाटा-मिरची भजी, चहा-पाव वगैरे वगैरेंवर आमचं प्रेम जोपासलं, फोफावलं आणि लग्नाच्या जाळ्यात जाऊन अडकलं ते आजतागायत. आजही बरेचसे पदार्थ हाताने आणि पाण्याचं भांडं तोंडाला लावून पिण्यातच सुख मानतो. अगदी गोर्‍यांच्या देशात जाऊनही. आपल्या भारतात येऊन्/राहूनही ते हाताने जेवायला शिकले नाहीत तर त्यांचेच स्वदेश प्रेम लक्षात ठेवून मी ही कधी माझ्या देशाच्या चालीरिती, निदान त्यांना रिझवायला तरी, सोडल्या नाहीत.

राजेश घासकडवी Mon, 04/28/2014 - 08:23
च्यायला, - दहा नियम बिलाविषयी आहेत. -पाच नियम गप्पा मारण्याविषयी आहेत. निष्कर्ष - स्मार्ट विमेनांना हा माणूस आपल्याशी बोलतो कसा यापेक्षा दुप्पट हा बिल कसा देतो याविषयी पडलेली असते.

बाबा पाटील Mon, 04/28/2014 - 13:02
आपल्याला बापजन्मी जमणार नाही.जेंव्हा कधी कुठल्या ललनेबरोबर मोठ्या हाटीलात हादडायचा टाइम आला तेंव्हा तेंव्हा तिला अगोदर टपरीवरचा चहा पाजला होता,त्यामूळे असला काय शानपणाचा विषय कोनी केलाच नाय.आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.

In reply to by बाबा पाटील

शुचि Mon, 04/28/2014 - 19:01
आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.
हाहाहा :)

सुहास.. Mon, 04/28/2014 - 13:29
डिनरडेट चा अनुभव नाsssssssssssssssé ही ... बाकी शुचिमामींचा काही अनुभव असल्यास आम्हाला वाचायला काही हरकत नाही ..धन्यवाद !!

In reply to by सुहास..

शुचि Mon, 04/28/2014 - 19:06
हाहाहा फार काही अनुभव नाही. माझ्या बी एस सी नंतर, नवरा मुंबईहून मला पहायला पुण्यात आलेला तेव्हा मी भला मोठा गॉगल लावून लुनावरुन आलेले. अजूनही नवरा म्हणतो अगं केवढा मोठा तो गॉगल, संपूर्ण चेहराभरच की. (अन तेव्हा मी समजत होते गॉगलमध्ये मी स्मार्ट दिसते आहे ;) )आम्ही फर्ग्युसन टेकडीवर गेलो, गप्पा मारल्या अन मग फर्ग्युसनच्या समोर तेव्हा व्हेन्कीज होते तिथे आईस्क्रीम सोडा अन चिकन नगेट्स मागवले होते. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. सोडा अफलातून होता. मला तो आवडलेला. माझा होकार होता पण याने १ वर्ष घेतलं होकार कळवायला. तोपर्यंत मी आय आय टी मध्ये अ‍ॅड्मिशन घेतली होती पण त्याला विसरले नव्हतेच नव्हते.

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 06:53
Friendships of women have usually been not merely unsung , but mocked, belittled and falsely interpreted.
दाट संशय येतोय हे सहितले वाक्य याच What Smart Women Know पुस्तकातील असावे.

कवितानागेश Tue, 04/29/2014 - 12:34
गमतीदार प्रकार आहेत. यातला १४वा प्रकार मी आणि माझा नवरा दोघे रेग्युलरली करतो. १०वा प्रकार मीच कधीतरी करते आणि २४वा प्रकार नवरा कायम करतो. :)

सूड Tue, 04/29/2014 - 15:35
खाण्याचं राहू देत हो...पहिल्या भेटीत मी मुलीच्या मराठी व्याकरण, उच्चारांच्या चुका काढेन की काय याची भीती वाटते आताशा. माझं नावंच ही चूक काढायला पहिलं कारण ठरु नये ही ईश्वरचरणी प्रार्थना!! ;)

समीरसूर Tue, 04/29/2014 - 15:45
यातलं बहुधा मी काहीच करणार नाही पण सणसणीत अपवाद क्र. ४! काही पदार्थ हातानेच खायला मजा येते. इन फॅक्ट, आपले जेवण काटा-चमच्याने कसे जेवावे? डाळगंडोरी, भरीत, भाकरी, शेवभाजी, सावजी चिकन, उकडलेल्या बटाट्याची लालेलाल रस्सा असलेली भाजी (भूक लागली राव!), इत्यादी स्वर्गीय पदार्थ काटा-चमच्याने कसे बरे खायचे? आणि तसा प्रयत्न करणे देखील अपमान आहे; त्या पदार्थांचा! रात्री १२ वाजताची वेळ आहे; पिक्चरचा शेवटचा खेळ झाल्यानंतर मित्रांचे टोळके घरी जायला निघाले आहे. थंडी कपड्यांमधून शिरून बोचते आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी' बघून लक्ष्मीनारायण टॉकीजवरून दोन-तीन दुचाक्यांवर स्वार होऊन तुम्ही रस्त्यावर घरंगळत जात आहात. "च्यायला, भूक लागली राव!" असं कुणीतरी कोकलतं. मग तुम्ही गाड्या स्वारगेट बसस्थानकाजवळ हळू करता. बाहेरच्या गाड्या तुम्हाला प्रेमळ साद घालतात. गरमागरम भुर्जी, भाजलेला पाव कळकट ताटल्यांमध्ये घेऊन तुम्ही चापायला सुरुवात करता. भूक शमेपर्यंत पावाचा रतीब सुरु असतो. लागल्यास अजून एक डबल भूर्जी मागवता. जठराग्नी शांत झाल्यावर गाड्यांवर निवांत बसून चहाचे घोट घेत घेत बिड्यांचा धूर सोडत गप्पा ठोकत बसता. बाकीचं जाऊ द्या पण हा भुर्जी-पाव काटा-चमच्याने खाणार कसा? तो गाडीवाला गाडी तशीच सोडून पळून जाईल. :-) बाकीच्या मुद्द्यांशी लई वेळा सहमत.

नानबा Tue, 04/29/2014 - 16:36
इकडे सिडनीत चायनिज मैत्रिणीसोबत हाटेलात गेलो, तर वेटरने ऑक्टोपस सलाड आणि नूडल्सच्या बाऊल्स सोबत त्या खायला लाकडी कांडक्या (चॉपस्टीक का कसलीशी अवदसा) आणून ठेवल्या. आमची परिस्थिती छोटी सी बात मधल्या चायनिज हाटेलात गेलेल्या असरानीसारखी. :))

In reply to by सूड

शुचि Tue, 04/29/2014 - 16:50
हाहाहा असा वाक्य दोहरायला (मराठी शब्द?) लावणारा खवचट प्रश्न विचारणे हा सूड मोडच झाला आहे. मी पहिल्यांदा लंबूटांग यांच्या प्रतिसादानंतर पाहिला व आता परत :)

सिफ़र Tue, 04/29/2014 - 17:25
(२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो.
यावरून तर पोरगा पोरीशी एकनिष्ठता पाळू शकतो असंच वाटत... १० वर्षे बिच्यार्याची खायची सुद्धा टेस्ट बदलत नाही तर बाकी तर सोडाच ;)

माझ्या मते काही पदार्थ हे हाताने खाण्याचे असतात तर काही काटा चमच्याने चपखल उदाहरण द्यायचे तर मेकडोनाल्ड चे बर्गर व के एफ सी चे चिकन हे जगाच्या पाठीवर कोठेही हाताने खातात मात्र जगाच्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात बर्गर हा सर्व करतांना काटा चमचा देतात .आणि त्याने खातांना मी माणसे पहिली आहेत. परदेशात भारतीय उपहार गृहात गोरेच काय पण भारतीय सुद्धा भात व बिर्याणी चमच्याने खातात. मला आमच्या घरी चमच्यानेच खावा लागतो. पण हा अपवाद वगळता , डोसे , ते नान हे हाताने खातात. आम्हाला हॉटेल व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षाला टेबेल मेनेर्स शिकवत असतांना एका चुकार मुलाचे लक्ष नव्हते ते पाहून आमचे सर त्याला सणसणीत पारशी शिवी हासडून म्हणाले ,ह्या कोर्स मध्ये शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडणार ,

लेखनप्रकार
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.

आयाळ असलेला वाघ - २ (अंतिम)

स्पार्टाकस ·

स्पार्टाकस Mon, 04/28/2014 - 05:55
द घोस्ट अ‍ॅन्ड द डार्कनेस पाहीला आहे. केनियातील त्सावो इथल्या नरभक्षक सिंहांच्या सत्यकथेवर आधारीत आहे. त्या नरभक्षकांनी केलेल्या हल्ल्याला अनेक भारतीय मजूर बळी पडले होते. युगांडा - मोंबासा रेल्वेमार्गाचं काम अनेकदा त्यामुळे स्थगित झालं होतं. लेफ्टनंट कर्नल जॉन हेनरी पॅटरसनने दोन्ही सिहांची शिकार केली. या पिक्चरमध्ये पॅटरसनच्या भूमिकेत वॅल किल्मर आणि त्याच्या मदतनीस आणि शिकारी चार्ल्स रेमींग्टनच्या भूमिकेत मायकल डग्लस होता. भारतीय मजुरांचा प्रमुख अब्दुल्लाची भूमिका ओम पुरीने केली होती.

In reply to by स्पार्टाकस

हे दोन्ही सिंह जे मारले गेले होते ते नर होते. त्यांच्याही जबड्यांचा अभ्यास केल्यावर त्यांचे वरचे आणि खालचे सुळे एकमेकांवर घट्ट बसत नसल्याने भक्ष्याचे लचके पटापट तोडण्यात हे सिंह मागे पडले होते. त्यामुळे कुपोषण आणि ओघानेच आयाळ गळणे ई. आले. म्हणूनच तुलनेने सोपे भक्ष्य म्हणजे मानव. त्यांच्यावर हल्ले चालू झाले. जालावर शोध घेतल्यावर कोणत्यातरी संग्रहालयात हे सिंह भुसा भरलेल्या अवस्थेत मिळाले. Ghost and Darkness

एस Mon, 04/28/2014 - 18:42
जिम कॉर्बेटच्या लेखनात किंचित आत्मप्रौढीचा सूर सापडतो आणि केनेथ अँडरसनच्या कथा त्यामानाने जास्त रसाळ वाटतात असा सूर काही वेळेस वाचकांकडून लावला जातो. कॉर्बेटच्या कथा वाचत असताना वाचकाला आपण स्वतः त्याठिकाणी आहोत आणि नरभक्षक झाडोर्‍यातून आपलाही पाठलाग करतो आहे असा भास होत राहतो. हा केवळ या दोन लेखकांच्या शैलीतील फरक असावा असे माझेतरी मत आहे. बाकी दोघेही ग्रेटच. सलाम!

In reply to by आत्मशून्य

एस Tue, 04/29/2014 - 13:22
'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या' (The Man-eating Leopard of Rudraprayag) हे पुस्तक वाचताना तर अक्षरशः खुर्चीला खिळून बसलो होतो. तीच गोष्ट 'Tigers of Chowgarh' ची. या दुसर्‍या कथेत एका हातात पक्ष्याची अंडी आणि एका हातात लाइट कॅलिबर रायफल असा कॉर्बेट जेव्हा त्या ओढ्यात खडकाला वळसा घालून थेट नरभक्षक वाघिणीच्या समोरच येतो तेव्हा क्षणभरासाठी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो... कॉर्बेटचे प्रत्येक परिस्थितीचे विश्लेषणही तितकेच भारी असते. वरील उदाहरणातही एका हातात अंडी व दुसर्‍या हातात नेहमीपेक्षा वेगळी हलकी रायफल असणे आणि वाघिणीचे नरभक्षक असणे या सर्व बाबींचा अंतिमतः त्याला फायदाच कसा झाला हे त्याच्याच शब्दांत (मूळ इंग्रजीतून) वाचण्यात मजा आहे.

कवितानागेश Tue, 04/29/2014 - 16:01
मस्त शिकार कथा. हे असे नरभक्षक वाघाच्या मागावर चालत जाणं फारच धोकादायक होतं. त्यातून टोर्च लावल्याशिवाय वाघ कुठेय हे दिसणार नाही. पण वाघाला मात्र आपण तॉर्चशिवाय सहज दिसणार... भयानक.

लेखनविषय:
आयाळ असलेला वाघ - १ - http://www.misalpav.com/node/27684 कराडीबेट्टा व्याघ्र अभयारण्य हे रस्त्याला लागूनच उत्तर दिशेला पसरलेलं आहे. म्हैसूरच्या महाराजांच्या हुकुमावरुन या अभयारण्याची निर्मीती करण्यात आलेली आहे. या अभयारण्यात कोणत्याही जनावराच्या शिकारीची परवानगी देण्यात येत नाही. म्हैसूरच्या राजाच्या दूरदर्शीपणाचं हे एकच उदाहरण नसून म्हैसूर प्रांतात अशा अनेक अभयारण्यांची निर्मीती त्यांनी केली आहे. या नरभक्षकाने माणसांचा संहार करून अभयारण्यात दडी मारण्याचा सुरक्षीत मार्ग पत्करला होता.

शुभंकरोती

मालविका ·

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 01:26
शुभंकरोती नो कॉमेंटस ! अगदी लहानपणापासूनच नास्तिक असल्याने आणि देव वगैरे काही नाही या श्रद्धेवर ठाम असल्याने शुभंकरोती किंवा सकाळी आंघोळ केल्यावर वा संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी देवासमोर हात जोडणे वगैरे प्रकार कधी केलेच नाहीत. मला तर तेव्हा असेही वाटायचे की हे आपल्यात थोडी करतात, या तर ब्राह्मण लोकांच्या प्रथा झाल्या. पण हा, जुन्या चाळीत कॉमन पॅसेजमधील लाईट लागल्यावर तिला नमस्कार करायचो. का ते माहीत नाही. सवय म्हणा वा संस्कार. घरचे मात्र माझ्या अगदी उलट. धार्मिक आणि देवभक्त. बायको सुद्धा आता तशीच मिळाली आहे. पण हे मात्र एक चांगले झाले. कारण आस्तिक-नास्तिक वाद एका बाजूला ठेवले तरी लहान मुलांना संस्कार लावायला म्हणून त्यांना देवबाप्पावर श्रद्धा ठेवायला सांगणे आणि शुभंकरोती व प्रार्थनांची सवय लावणे हा उत्तम मार्ग !

In reply to by तुमचा अभिषेक

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 02:26
१)माझ्या मते पाठांतराला विज्ञानाच्याच दृष्टीकोणातून बघितले पाहीजे. कारण लहानपणीच पाठांतराची सवय केल्याने मुलांच्या मेंदूची वाढ होत असतांनाच योग्य प्रकारे स्मृती(data storage capacity)तयार होणे व योग्य वेळी ते विचार करून लक्षात आणणे(instant data recall)ही खूप मोठी गरज आहे. २)विज्ञान युगातही पाढे आणि गणिताची सुत्रे यांचे महत्व कायम असून कॅल्क्युलेटरचा वापर करण्या ऐवजी पाठांतरावर देखील तेवढाच भर दिला पाहीजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पंडीत विद्यासागर यांनी कै.हिंमतराव पाटील व्याख्यान मालेचे 24 वे सुत्र गुंफतांना केले. कै.हिंमतराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त नंदुरबार येथे शिवाजी नाट्य मंदिरात विज्ञान तंत्रज्ञान काल,आज,उद्या या विषयावर डॉ.विद्यासागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, जीवनात प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा संबंध येतो. त्याकडे विज्ञानाच्याच दृष्टीकोणातून बघितले पाहीजे. तरच मानवाच्या प्रगतीला उपकारक अशा गोष्टी त्यातून घेता येतील असेही ते म्हणाले. विज्ञान युगातही पाठांतराचे महत्व अधिक - डॉ.विद्यासागर ३)नमाजमध्ये कुरआनचे पठन करण्याची आज्ञा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरीच्या पहिल्या दिवसापासूनच दिली गेली होती. शेकडो सहाबा (सहकारी) नी संपूर्ण कुरआनचे आणि सर्व सहाबांनी कोणत्या ना कोणत्या भागाचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनकालातच पाठांतर केलेले होते. त्या वेळेपासून आजपर्यंत, संपूर्ण कुरआन पाठ करण्याचा आणि दरवर्षी रमजान महिन्यामधील तरावीहच्या नमाजमध्ये ते तोंडपाठ ऐकविण्याचा क्रम सार्या इस्लामी जगतात चालत आलेला आहे आणि प्रत्येक काळात लाखो हाफिज (संपूर्ण कुरान मुखोद्गत असलेले लोक) झालेले आहेत. ४)या वैज्ञानिक कारणासाठी प्रत्येकाने आपल्या लहान मुलांकडून योग्ये वेळेला योग्य ते पाठांतर करून घेणे गरजेचे आहे.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:37
मिपा रॉक करत नाहिये ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरतीय. असो वृध्दाश्रमाचा सराव होतोय हे ही नसे थोडके.

In reply to by आत्मशून्य

पाषाणभेद Sun, 04/27/2014 - 02:25
येथील रॉकर्स जेष्ठ झालेत अन काही कदाचीत निवृत्तही झाले असल्याने असे होत असावे.

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 01:36
सर्व जण मावणारा असाच एक झोपाळा माझ्या मामाच्या घरी होता. माझ्यासाठी तर तो एक अड्डाच होता. रात्री मी त्यावरून पडेल म्हणून मला त्यावर झोपू दिले जायचे नाही, मात्र मामाकडे गेल्यावर सकाळ संध्याकाळ चारही वेळचे खाणे आणि दिवसभरातील सारे बैठे खेळ त्या झोपाळ्यावरच चालायचे. जर झोपाळ्याला अटॅच टॉयलेट असते तर त्यासाठीही उठलो नसतो कधी एवढी क्रेझ होती त्या प्रकाराची. कारण मुंबईत हा प्रकार दुर्मिळच, कोणाकडे आजूबाजुला पण नव्हता. गंमत म्हणजे त्या झोपाळ्याच्या दोन बाजूला दोन छोटे टेबलफॅन ठेवले होते, जणू मध्ये आपण महाराजासारखे आणि दोन्ही बाजूंनी दासी हवा घालताहेत.

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 02:11
उत्कृष्ट विषय आणि उत्तम लेखन! आपल्या जुन्या परंपरांचे पालन होणार की नाही माहित नाही परंतु किमान त्या अश्या प्रकारे लिहून जतन करून ठेवल्या पाहिजेत. लहान असतांना आम्ही हे सारे स्त्रोत्र व बरेच श्लोक पठन तर करायचोच परंतु आमच्या छोट्याश्या गावात एक चांगली प्रथा होती ती म्हणजे भगवदगीतेचे अध्याय पाठांतराची! ५ वी ते ७च्या विद्यार्थ्यांसाठी १२ व १५ वा अध्याय तर ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी ९ व ११ वा अध्याय पाठ करावा लागत असे. आणि ऐतिहासिक व्यक्तींवरील पुस्तक बक्षीस म्हणून मिळत असे. आणि माझा तर दरवर्षी पाठांतरात व बक्षीस घेण्यातही सहभाग असायचाच.

आमच्या जुन घर १२/१५ खोल्यांचं होत.त्यात २ झोपाळे होते.एक माजघरात मध्यम आकाराचा आणि दुसरा पडवीत पहिल्यापेक्षा मोठा.हा पडवीतला झोपळा मला खूप आवडायचा त्या झोपल्यावर आम्ही सगळे जन एका वेळी मावायचो.त्या झोपल्यावर बसून मोठ्यांदा गाणी म्हणायची,कविता म्हणायच्या हे आमच एक आवडत काम असायचं .

तू

पद्मश्री चित्रे ·

चाणक्य Sun, 04/27/2014 - 03:54
तू सावळा मुरारी निर्जीव बासरी मी देता तू श्वास हलके घेते तुझ्या लकेरी
हे फारच छान

इरसाल Sat, 05/03/2014 - 11:53
ही कविता : हा सागरी किनार्‍याच्या चालीवर नीट बसतेय.

काव्यरस
तू वादळी समुद्र मी एक लाट छोटी मिटते जरी तुझ्यात येतेच नाव ओठी     तू तेज:पुंज तारा     रात्री नभात येसी     मी एक रातराणी      फुलले तुझ्याचसाठी तू सूर्य अग्निगोल मी शांत तृप्त धरती फिरते यूगे यूगे का वेडावुनी सभोती     तू मेघ पावसळी     झरसी असा तूफान     मी एक वेल रानी       गाते तुझेच् गान तू गंध पारिजात मी लाजरी पहाट येते तुझ्याचसाठी  भेदूनी काळरात  तू सावळा मुरारी   निर्जीव बासरी मी   देता तू श्वास हलके    घेते तुझ्या लकेरी चैतन्य तू जीवाचे तू श्वास अंतरीचे तू भास

काळू बाळू

विकास ·

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 21:13
विकासजी, या धाग्याबद्दल धन्यवाद. लहू संभाजी खाडे उर्फ काळू आणि अंकुश संभाजी खाडे उर्फ बाळू या विनोदवीर कलाकार बंधुंच्या जोडीस श्रध्दांजली. एकदा तरी यांचा Live तमाशा पहायची इच्छा होती. आंतरजालावर यांची कोठली विडीओ क्लीप सापडली नाही. होप, सीडी च्या दुकानात मिळेल.

किसन शिंदे Sat, 04/26/2014 - 23:09
टिव्हीवर म्हणा किंवा कसाही, मला स्वत:ला यांचा कार्यक्रम कधी पाहायला मिळाला नाही, पण बाबांच्या तोंडून या दोन्ही कलावंतांचे नाव नेहमी ऐकायचो. अंकुश संभाजी खाडे उर्फ बाळू यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 23:47
काळू यांचे निधन २०११ साली झाले तेव्हा आईच्या तोंडून नाव ऐकले होते. स्वता मलाही बाकी काही माहीत नाही, फक्त कानावर काळू-बाळू जोडी असे नाव ऐकून होतो इतकेच. कोणाला काही विडिओ लिंक सापडल्यास इथे टाका.

खेडूत Sun, 04/27/2014 - 00:41
तीस वर्षांपूर्वी त्यांचं गाव आमच्या पासून जवळच असल्याने हे लोकनाट्य आमच्यां गावी नेहमी होत असे. जुळे असल्याने त्यांच्यात साम्य होतं आणि नेहमीच्या बोलण्यात पण कुणी माणूस ''एकदम एखाद्यासारखा दिसायला आहे'' हे सांगायचं तर ''एकदम काळू-बाळू सारखं'' असं बोली भाषेत रुजलं होतं. तोपर्यंत जुळे पाहिलेले नसल्याने कसे असतात याची उत्सुकता होती , पण दहाच वर्षाचे असल्याने आम्हाला तमाशा पाहण्याची परवानगी नव्हती. पण स्पिकर्स इतके जोरात असत की घरात सहज ऐकू येत असे. ते ऐकत झोप कधी लागायची कळत नसे. शाळेत दुसऱ्या दिवशी सविस्तर चर्चा होई- कारण वर्गातले बरेच जण रात्री तमाशा पाहून आलेले असत! दूरदर्शन मध्ये ''आमची माती आमची माणसं'' मध्ये त्यांची जराशी सभ्य आवृत्तीतली स्कीटस- (झी च्या 'फू बाई फू' स्टाईल) दाखवत असत. पण तो त्यांचा पडता काळ सुरु झाल्यावर. दादा कोंडके सुद्धा त्यांच्या तमाशाला मुंबईत असेल तर रोज जात. त्याबद्दल विचारलं तर '' मलाही त्यांच्याकडून शिकायला मिळतं'' असं म्हणत. सांगलीत नाट्य संमेलन होऊनही त्याना निमंत्रण पण दिलं नव्हतं त्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. त्याना श्रद्धांजली.

पैसा Sun, 04/27/2014 - 12:04
खर्‍या लोककलावंताला श्रद्धांजली. गावातल्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आपल्याला येणार नाही. पण एका काळात ते सगळ्यात लोकप्रिय कलाकार असावेत.

स्पंदना Sun, 04/27/2014 - 15:34
गावात लग्नामधुन यांच्या तमाशाच्या कॅसेटस लावत. रात्रभर दंगा असायचा यांच्या कॅसेटस्चा. पण तमाशा असा पाह्यला कधीच नाही. ऐकलं आहे लहाणपणी. विनोदी असायचे यांचे वग अस वाटतय. तरीही कलाकार तो कलाकारच. अन कलाकाराचा मानाचा मुजरा त्यांना अर्पित करत मी श्रद्धांजली वाहते.

अभिरुप Mon, 04/28/2014 - 15:07
लहानपणी काळू-बाळू यांचे कार्यक्रम दूरदर्शनवर पाहिलेले पुसटसे आठवतात. सुप्रसिद्ध लोककलावंत तमाशासम्राट बाळू यांना भावपू्र्ण श्रद्धांजली अन् मानाचा मुजरा.

बबन ताम्बे Mon, 04/28/2014 - 15:24
मी काळू बाळू यांचा तमाशा ३० वर्षांपूर्वी गावच्या जत्रेत पाहीला आहे. त्यांची वगनाट्यातली भूमिका धमाल आणायची. दोघांचेही विनोदाचे टाइमींग जबर्दस्त असायचे. पब्लिकला दोघेही प्रचंड हसवायचे.

Kaloo Baloo कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे तमाशा कलावंत 'बाळू' कालवश बातमी वाचली. काळू चे २०११ ला निधन झाले आणि ८२ वर्षीय बाळूचे काल निधन झाले...

विज्ञानाबद्दल माहिती हवी

माहितगार ·

उपाशी बोका Mon, 04/28/2014 - 00:53
(प्रयत्न करतो) :) विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे निसर्गातील घटना बघणे (observe), त्याबद्दल नियम शोधणे (propose a theory), घटनांबद्दल अंदाज बांधणे (computatation of consequence and prediction) आणि प्रयोगाद्वारे ते पडताळून बघणे (compare with experiment). वैज्ञानिक पद्धती म्हणजे प्रयोगाद्वारे कुठलीही थिअरी वस्तुनिष्ठ पद्धतीने (rationally) पडताळून बघता येते. वैज्ञानिक पद्धतीची गृहितके समान ठेऊन (keeping assumptions same) प्रयोग केला तर नेहमी एकसमान उत्तरच मिळते ही वैज्ञानिक पद्धतीची एक कसोटी (test) आहे. संदर्भ: (reference) प्रख्यात वैज्ञानिक रिचर्ड फाइनमन याचा व्हिडिओ देत आहे, तो बघावा.

चौकटराजा Mon, 04/28/2014 - 05:04
" विज्ञान" म्हणजे कार्य व त्याचे कारण शोधण्याचे शास्त्र.ते माहितीचे शास्त्र नव्हे.या अर्थाने वनस्पती शास्त्र व भूगर्भ शास्त्र ही माझ्या तरी मते विज्ञ्याने नाहीत.खरे तर फिजिक्स हे एकमेव विज्ञान आहे. रसायन हे त्यातीलच कार्यकारणामुळे चालते. बाकी गणित हे ही विज्ञान नाही . ती एक परिभाषा आहे.

In reply to by शुचि

माहितगार Wed, 04/30/2014 - 08:47
scepticism एका ऑनलाईन शब्द कोशा नुसार संशयी वृत्ती सरकारी पारिभाषिक शब्दकोशानुसार संशयवाद पण तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थछटेबद्दल मी साशंक आहे. संशय आणि शंका यांचे अर्थ जवळपास सारखे असले तरी अर्थछटेत जरासा फरक आहे असे वाटते. संशयी पेक्षा "शंकेखोर पणा" असा शब्द मला स्वतःला अधिक चपखल वाटतो

In reply to by आत्मशून्य

माहितगार गुरुवार, 05/01/2014 - 07:18
शुचि ताईंनी वापरलेला इंग्रजी शब्द scepticism स्केप्टीझम शब्द बरोबरच आहे. माझ्या मते प्रस्थापीत म्हणून सांगीतल्या गेलेल्या सत्या बद्दल शंका घेणे म्हणजे स्केप्टीझम. संशय हा शब्दाची अर्थछटा व्यक्तीच्या कृतींबद्दलची शंका अशी वाटते, म्हणून मी साशंकता व्यक्त केली.

In reply to by माहितगार

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 20:47
इंग्रजी शब्द scepticism स्केप्टीझम शब्दाला जवळचा आणि वापरात असलेला शब्द आहे "टीका" टीका ही दर्शनशास्त्र समजून घ्यायला खूप उपयोगी ठरलेली आहे.

मराठी विकिपीडियावरील वि़ज्ञान हा लेख अद्ययावत करू इच्छितो आहे. खालील माहितीचे स्वागत असेल १) वि़ज्ञान म्हणजे काय (व्याख्या) ? * उपप्रश्न : ** वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय ? वैज्ञानिक पद्धती कशी अवलंबिली जाते ? सायंटीफीक एनक्वायरी (मराठी शब्द सुचवा) म्हणजे काय ती कशी केली जाते ? २) वि़ज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे उद्दीष्ट/ध्येय/साध्य काय असते ?

sadism एक आदिम मानवी प्रवृत्ती.

मारवा ·

मनीषा Sat, 04/26/2014 - 20:58
माझ्या भाच्याने एकदा त्यांच्या एका खेळाबद्दल सांगीतले होते. एकाला मधे ठेवून त्याच्याभोवती वर्तुळाकार उभे रहायचे. आणि त्या मधल्या मुलाला भरपूर चिडवायचे, त्याच्या खोड्या करायच्या इ. तो मधे असलेला, जोवर न रडता, तक्रार न करता राहतो तो पर्यंत तो खेळात आहे. ज्यावेळी तो रडेल, चिडेल, तक्रार करेल किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्नं करेल त्या वेळी तो खेळातून बाद ठरतो म्हणे.

सहजीवन ही मूळ प्रवृत्ती आहे कारण अस्तित्वात आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत. फक्त मानव मानवांशी जोडलेले आहेत असं नाही, वृक्ष आपल्याशी जोडलेले आहेत कारण त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आहे आणि आपला उत्छ्वास त्यांचा श्वास आहे. आपण समुद्राशी जोडलेलो आहोत कारण तो जलनीधी वर्षेचा कारक आहे. चंद्र सागराशी जोडलेलायं कारण त्याच्यामुळे सागराला भरती-ओहोटी आहे; सागर चलायमान आहे. पृथ्वीचं सूर्याशी नातं आहे आणि पृथ्वीवर जीवन प्रकट झालंय म्हणून सूर्याला प्रकाशण्यात आनंद आहे. सूर्यामुळे पृथ्वी आहे असं नाही तर सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रह-तार्‍यामुळे सूर्य विविक्षित ठिकाणी आहे. आणि अश्या अनंत सूर्यमाला एकमेकांशी संलग्न आहेत कारण त्यांच्यात पारस्पारिक अनुबंध आहे! त्यामुळे सॅडिझम (परपीडन) किंवा मॅसोचिजम (स्वपीडन) सुख देत नाही ते उन्माद निर्माण करतं. तो उन्माद क्षणीक सुखाचा आभास निर्माण करतो पण शेवटी त्याचं रुपांतर अपराध भावात होतं. हा अपराधभाव विसरायला किंबा जस्टीफाय करायला पुन्हा नवा उन्माद लागतो आणि ते दुष्टचक्र चालू राहातं. तस्मात, सॅडिझम ही आदीम मानवी प्रवृत्ती नाही हे लक्षात घेणं श्रेयस आहे. एकदा आपण सर्व अस्तित्वाशी एकरुप आहोत याची जाणीव झाली की पीडनात दु:ख आहे हे समजतं.

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 00:26
छान लेख आहे. बरेच कवर केलेत. स्वताला काही माहीतीची फारशी भर टाकता येणार नाही. स्वानुभव बोलायचे झाल्यास माझ्यासाठी हातावर बसलेला मच्छर एकाच फटक्यात मारून त्याचे रक्त काढणे इतपतच आसूरी आनंद. अर्थात त्यापासून स्वताला धोका असेल तरच, अन्यथा इतर किडा न मारता उचलून भिरकाऊन देतो. तर माझ्यात याचा अंश नाहीये असे बोलू शकतो. तरी लहानपणी चतुर दोरीला बांधून त्यांचा छळ करायचो. हॉस्टेलमधले किळसवाणे आणि लैगिकतेशी संबंधित असलेले रॅगिंग प्रकाराबद्दल माहीत आहेच. नक्कीच हा मानसिक आजार वा विकृती, अन्यथा किडे तर आम्हीही केले. कधीतरी मस्करीची कुस्करी देखील होते पण काही जणांचा हेतूच कुस्करी करायचा असतो.

माहितगार Sun, 04/27/2014 - 09:27
मारवा यांचा सॅडीझम या विषयाचा विस्तृत धांडोळा घेण्याचा प्रयास स्तुत्य वाटतो. (त्याचवेळी एकाच बास्केट मध्ये अनेकवीध उपप्रकार एकत्र भरले गेले असल्याने प्रत्येक वाचक त्याच्या वेगवेगळ्या उपप्रकारावर प्रतिसाद नोंदवू शकतो असे होऊ शकते. हे नोंदवण्याचे कारण माझा प्रतिसाद माझ्या आधीच्या अथवा नंतरच्या प्रतिसादांशी जुळेलच असे नाही.) sadism ला मराठी न्यायव्यवहार कोशात परपिडानंद आणि masochism ला आत्मपीडानंद हे सुचवलेले शब्द चपखल वाटतात. वरच्या प्रतिसादात 'तुमचा अभिषेक' यांनी वापरलेला असूरीआनंद हा शब्दसुद्धा आहे पण काही वेगळ्या अर्थछटांचाही त्यात आंतर्भाव होत असावा का, अर्थात इतर अर्थछटा हा धाग्याचा मुख्य विषय नाही. मी मानववंशशास्त्राचा जाणकार नाही, ही माझी मर्यादा असूनही; शिकारी अवस्थेतून होत आलेल्या मानवी उत्क्रांतीच्या अंगाने या मानवी समस्यांना समजावून घेणे शक्य आहे का याबाबतीत माझ्या अनुमानीत परिकल्पना मांडणे आवडेल.

मारवा Sun, 04/27/2014 - 11:30
या दोन प्रयोगातुन येणारे निष्कर्ष धक्कादायक आहेत. हे प्रयोग सर्वसामान्य माणसांमध्ये सॅडीस्टीक वृत्ती कशा विपुल प्रमाणावर आढळुन येतात हे दाखवितात. यातील पहील्या प्रयोगात ७१ विद्यार्थ्यांना ४ प्रकारची कामे देण्यात आली आणि कोणते काम निवडायचे याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले. यात एक काम होते बग्ज मारणे दुसरे बग्ज मारण्यासाठी मदत करणे तिसरे टॉयलेट क्लीन करणे चौथे थंड पाण्यात हात घालुन काम करणे यात बग्ज कीलर च काम घेणारयांची संख्या सर्वात जास्त होती त्यांना मग एक एक जीवंत बग देण्यात आला त्या बग्ज ना मुद्दाम नावे देण्यात आली त्यांना एक एक बग कॉफी ग्राइंडर मध्ये टाकण्यास सांगण्यात आले त्यानंतर एक क्वेश्चनरी देण्यात आली त्यात त्यांना त्यांच्या भावनासंबंधी विचारण्यात आले...... ..... ...... कृपया हा आणि पुढील प्रयोगा साठी येथे वाचा त्यातुन एक निष्कर्ष असा काढण्यात आला की.........तीन प्रकारच्या प्रवृत्ती एक वा अधिक प्रमाणात ज्या व्यक्ती त आढळतात ती सह्सा सॅडीझम कडे झुकते त्या म्हणजे narcissism, psychopathy, and Machiavellianism. तिघांना मिळुन संबोधन आहे डार्क टायरॅड ..... या संबधातील लिंक कृपया बघावी हा लेख मुळातुन वाचण्यासारखा आहे http://well.blogs.nytimes.com/2013/09/16/everyday-sadists-among-us/?_php=true&_type=blogs&_r=0

In reply to by मारवा

माहितगार Sun, 04/27/2014 - 14:22
मारवाजी, माझ्या मतांना कदाचित कुठे बदलण्याची गरज असू शकते, या मोकळेपणा सहीत आपले आणि इतरांचे विचार अभ्यासेन; मी विषयातला कुणी जाणकार वगैरे नाही त्यामुळे कदाचित जरा अंमळ वेळ घेईन, कदाचित माझ्या विचारांच्या फ्लो मधील विचार आधी लिहून मोकळा होईन, पण स्वतःच्या अल्पमतीने आपल्या उत्तरांना प्रतिसाद नक्कीच देण्याचा माझा निश्चीत प्रयत्न असेल. माझ्या प्रतिसादांना आपली उत्तरे येताहेत ती अशीच येऊ द्यात आपल्या धाग्यांच्या आणि प्रतिसादांच्या निमीत्ताने मला माझे विचार पडताळून घेण्याची संधी आपण उपलब्ध करून देताय त्या बद्दल धन्यवाद.

मारवा Sun, 04/27/2014 - 11:46
माणुस कसा असला पाहीजे काय केले पाहीजे हे सर्व आयडीयलीझम मध्ये येते. तुमच स्टेटमेंट आयडीयलीस्टीक आहे. परंतु प्रत्यक्षात माणुस कसा आहे व्हॉट इज जे आहे ते जसा माणुस आहे तसा हे हा आयडीयलीझम नाकारतो. बिकमींग महत्वाचे असु शकते असायला हवे परंतु बीइंग कम्स फर्स्ट, माणसात हिंसा, वर्चस्वाची भावना सॅडीझम असतो हे वास्तव आहे. त्याच काय करायच त्याला कस बदलायच हा नंतरचा भाग आहे महत्वाचा विषय ही आहे. पण मुळात माणसात हे सर्व ट्रेट्स आहेत हे स्वीकार करण ही सत्याकडे जाण्याची पहीली पायरी आहे. एक म्हण या संदर्भात आठवतेय मॅन इज नो डाउट ग्रेटेस्ट अ‍ॅनिमल अमाँग ऑल अ‍ॅनिमल्स बट ही कन्व्हेनियंटली फरगेट्स दॅट ही इज अ‍ॅनिमल फर्स्ट !

In reply to by मारवा

आणि पीडन हा व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आहे, वास्तविकतेचा नाही. चुकीच्या गृहितकांवर बांधलेली इमारत बरोबर असू शकत नाही. मागे समर्पण नांवाची (अती) दीर्घकथा इथे प्रकशित झाली होती, त्यावेळी पीडन म्हणजे प्रेम नाही यावर भरपूर चर्चा झालेली आहे. तस्मात, पीडनवृत्ती आदिम आहे म्हणून ती मान्य करण्यात आणि त्यायोगे जस्टीफाय करण्यात अर्थ नाही. I n short, sadism is not a natural condition and if one claims so, it needs correction.

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा Sun, 04/27/2014 - 14:01
The mantis is famous because the female often eats the male during intercourse, the latter being easily overpowered by his mate, but hardwired to proceed with the mating process. The sadistic part is that mantises do not bother to kill their prey before eating them: as soon as the insect embraces the hapless lover, it begins to consume it alive. Although we tend to be less sympathetic towards invertebrates, the brutality of mantis eating habits is noteworthy, and viewed as the creature is viewed as a remorseless killer by many cultures around the world.

In reply to by मारवा

मारवा Sun, 04/27/2014 - 14:08
मला एक सांगा माणसामध्ये द्वेष,हिंसा,क्रोध अशा नकारात्मक प्रवृत्ती आहेत ना ? त्या त्याच्या बीइंग चा पार्ट नाहीत का ? त्यांच अस्तित्व आपण नाकारु शकतो का ? अगदी लहान बालकांमध्ये ज्यांच व्यक्तीमत्व अजुन पुरत विकसीत ही झालेल नाही त्या मध्ये ही या प्रवृत्ती आढळुन येतात यांना नाकारण शक्य आहे काअ ? तसेच वर दिलेल्या प्राणि जगतातील उदाहरणात ही सॅडीझम दिसुन येतो तो ही अनैसर्गिक आहे असे आपणास म्हणायचे आहे का? संस्कृती ने आपले काम ज्या माणसावर सुरु केले नाही त्यात हे आढळत नाही का ? आपणास माहीत आहे का की एके काळी जवळ जवळ संपुर्ण मानवी समाज हा कानीबलीस्ट होता ?

In reply to by मारवा

मारवा Sun, 04/27/2014 - 14:16
विल ड्युरांट याच्या स्टोरी ऑफ सीव्हीलायझेशन च्या पहील्या अवर ओरीएंटल हेरीटेज या पहील्या भागातील पुस्तकाचा हा उतारा बघा यात कानिबालीझम कीती आदिम काळापासुन प्रचलित आहे हे दिसुन येते. याच पुस्तकात विल ड्युरांट दाखवुन देतात की वात्सल्य आदि भावना या कशा हळु हळु नंतर विकसीत होत गेल्या. वात्सल्य ही काही आदिम भावना नव्हती. To all the varied articles of diet that we have enumerated, man added the greatest delicacy of all- his fellowman. Cannibalism was at one time practically universal; it has been found in nearly all primitive tribes, and among such later peoples as the Irish, the Iberians, the Picts, and the eleventh-century Danes. `010217 Among many tribes human flesh was a staple of trade, and funerals were unknown. In the Upper Congo living men, women and children were bought and sold frankly as articles of food; `010218 on the island of New Britain human meat was sold in shops as butcher's meat is sold among ourselves; and in some of the Solomon Islands human victims, preferably women, were fattened for a feast like pigs. `010219 The Fuegians ranked women above dogs because, they said, "dogs taste of otter." In Tahiti an old Polynesian chief explained his diet to Pierre Loti: "The white man, when well roasted, tastes like a ripe banana." The Fijians, however, complained that the flesh of the whites was too salty and tough, and that a European sailor was hardly fit to eat; a Polynesian tasted better. `010220 What was the origin of this practice? There is no surety that the custom arose, as formerly supposed, out of a shortage of other food; if it did, the taste once formed survived the shortage, and became a passionate predilection. `010221 Everywhere among nature peoples blood is regarded as a delicacy- never with horror; even primitive vegetarians take to it with gusto. Human blood is constantly drunk by tribes otherwise kindly and generous; sometimes as medicine, sometimes as a rite or covenant, often in the belief that it will add to the drinker the vital force of the victim. `010222 No shame was felt in preferring human flesh; primitive man seems to have recognized no distinction in morals between eating men and eating other animals. In Melanesia the chief who could treat his friends to a dish of roast man soared in social esteem. "When I have slain an enemy," explained a Brazilian philosopher-chief, "it is surely better to eat him than to let him waste.... The worst is not to be eaten, but to die; if I am killed it is all the same whether my tribal enemy eats me or not. But I could not think of any game that would taste better than he would.... You whites are really too dainty." `010223 Doubtless the custom had certain social advantages. It anticipated Dean Swift's plan for the utilization of superfluous children, and it gave the old an opportunity to die usefully. There is a point of view from which funerals seem an unnecessary extravagance. To Montaigne it appeared more barbarous to torture a man to death under the cover of piety, as was the mode of his time, than to roast and eat him after he was dead. We must respect one another's delusions.

In reply to by मारवा

१) मँटीस इज अ‍ॅन एक्सेप्शन आणि अपवाद नियमच सिद्ध करतो! २) दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर सजीव अस्तित्त्वाशी अजाणता एकरुप आहेत त्यामुळे (मँटीस सोडता) परपीडन करतांना कुणीही दिसत नाही. त्यात पुन्हा, `मादीला आनंद होतो' असं मानणं हा निव्वळ मानवी दृष्टीकोन आहे. अस्तित्वाशी आपणही एकरुपच आहोत पण ते समजण्याची क्षमता (`जाणीवपूर्वक एकरुपता') ही संभावना फक्त माणसात आहे. त्यामुळे चुकीच्या गृहितकामुळे ती संभावना संपेल. Now with this understanding, love is basic & positive whereas sadism is un-natural & negative. Sadism needs correction.

दादा कोंडके Sun, 04/27/2014 - 11:58
यातील १२० डेज ऒफ़ सोडोम वर आधारीत असलेला सिनेमा सालो १२० डेज ओफ़ सोडोम या नावाने पिएर पाउलो पासोलीनी या दिग्दर्शकाने बनविला.
बघायला पाहिजे हा सिनेमा. 'हॉस्टेल' सुद्धा याच थीमवर होता. मागे चीन मध्ये वाघ-सिंहाच्या पिंजर्‍यात जिवंत गाय-बैल सोडून त्यांची शिकार (?) बघण्यासाठी लोकं तिकिट काढून जात. प्रसारमाध्यमातून बोंबाबोंब झाल्यावर ते प्रकरण थांबलं असावं. बाकी, सॅडीझम आणि मॅसोचिझम या मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत आणि प्रत्येकात त्या थोड्या-फार प्रमाणात असतातच या बाबत दुमत असू नये. पण याचं ग्लोरिफिकेशन करू नये याच्याशीही सहमत.

माहितगार Sun, 04/27/2014 - 12:15
आदिम मानवाच्या अगदी शिकारीपूर्व स्थितीचा आपण विचार करू लागतो तेव्हा, ज्याला शिकारीकरता शस्त्र वापरण्याचीही माहिती झाली नसेल, तृणधान्यांचीही ओळख कदाचित झाली नसेल, गवत आणि पाला खाऊ शकत नाही, झाडावर फळे नाहीत किंवा वृक्षराजीपासून दूर जायला लागतय अशी स्थितींमध्ये इतर हिंस्त्र श्वापदांपासून कोणत्याही शस्त्रावाचून स्वतःचा बचाव करणे, त्यांनी मारलेले प्राणी/भक्ष्य इतर अनेक तशाच प्राण्यांशी स्पर्धा करत मिळवणे हे कौशल्य साध्यकरताना स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर पाळीव प्राणी हिंस्र श्वापदांपुढे स्वतःहूनही जाणार नाहीत तर मानवी समूह बनवून त्यांना त्याकडे ढकेलणे अशा काही रणनितींचा वापर करावा लागला असेल. हा फक्त स्वतःचे अन्न मिळवण्याची लढा नाही तर स्वतःचा समूह सुरक्षीत ठेवण्यासाठीही प्रत्येक क्षणी लढावी लागलेली लढाई असणार. मिळवलेल्या अन्नाला इतर प्राण्यांपासून सुरक्षीत ठेऊन स्वतःसाठी पोटभर मिळवण्यासाठी मानवी समूहात आपापसातील चढाओढही होत असणार. या जीवनाच्या चढाओढीत ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स हे ही तत्व मोठ्या प्रमाणावर आमलात आले असेल. इतर हिंस्र प्राण्यांनी केलेली प्रत्येक शिकार त्यांना चकवा देऊन ती मिळवणे ती मिळवताना सामूहीक कृतीच्या वेळी निर्माण करावे लागणारे उन्माद, आणि यश मिळाल्या नंतरचा आनंद हा वेळोवेळी नियमीतपणे साजरा होत असणार. ती जीवनशैली जगतानाची ती किमान गरज असणार. शस्त्रांसहीत शिकार करता येऊ लागल्या नंतर प्रत्येक शिकारीच्या विजयाचा आनंद साजरा केला जात असेल तर नवल नाही. ह्यातील हिंस्रश्वापदा सोबतच्या असंख्य बॅटल्स लूजींग ठरून मानवी समूहांना त्यांचे अनेक सदस्य गमवावेही लागत असणार. (आणि त्या प्रत्येकवेळी (उन्मादाच्या) त्याच नाण्याची विषादाची दुसरी बा़जूही मानव अनुभवत असणार आणि या विषादांच्या भावनांच रुपांतरण कालानुक्रमे अंहीसेच्या इच्छेतही विकसीत झाल असू शकत.) जिथे प्रश्नच प्रत्येक क्षण जगण्याचा जिंकण्याचा आहे तेथे इतर प्राण्याला परपिडा होताना स्वतःची भूक येत्या काही क्षणात भागवली जाईल याचा आनंद होण हा तत्कालीन मानवाकरता कदाचित अपवाद नव्हे नियम असेल का ? (टिपः इथे उद्देश आताच्या मानवाच्या परपिडानंदाच समर्थन असा नाही. केवळ एक शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न मात्र आहे.)

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 12:47
आजच्या काळात लहानमुलांना टोकाची हिंसा पहावयासही मिळू नये अशी सहसा आपली इच्छा असते (मी व्यक्तीशः या बाबतीत आग्रही असतो). मला नसीरुद्दीन शहाच्या चित्रपटातला एक सीन (अंधूक) आठवतो ज्यात तो दोन लहान मुलांना कोणतासा प्राणी मारून खाण्यास देतो/शिकवतो आणि हेच वास्तव आहे आणि हा जीवनाचा संघर्ष तो लढलाच पाहीजे टाईप काही प्रभावी डायलॉग आहे. (कुणाला या चित्रपटाचे नेमके नाव, डायलॉग ठाऊक असल्यास कृपया द्यावा). अर्थात त्यावेळीतरी नसीरुद्दीन च्या तोंडचा डायलॉग मला भावला होता. प्राण्यांची माहिती देणारी बर्‍यापैकी चॅनल्स आहेत त्यातल्या एका कोणत्याश्या लघूपटात एक रानडूकरांच्या कळपातील पिल्लू पाणवठ्यावर पाणी पिता पिता श्वापदाची चाहूल लागताच त्याच्या सोबतचा कळप पुढे निघून जातो पिल्लू मागे राहत, पिल्लाच्या आईला लक्षात आल्या नंतर ती मागे फिरते पोहोचे पोहोचे पर्यंत श्वापदाने ते पिल्लू तिच्या समोर गट्टम केल असतं तीचा चेहरा पडतानाच ती वास्तव स्विकारून कळपाकडे मागे फिरते. त्यात एका खर्‍या खूर्‍या प्राणी (रानडूक्कर) आईच्या चेहर्‍यावरचे दोन्ही भाव दुख्खाचा आणि वस्तुस्थिती स्विकारल्याचा लपत नाहीत. आजच्या काळात आपण आपल्या मुलांना जपतो आदीम मानव आणि त्याची मुलं हे वास्तव प्रत्येक क्षणाला डोळ्या देखत अनुभवत तोंड देतच आणि प्रसंगी जगण्यासाठी स्वतःही त्याच हिंस्रता बाणवत जगली वाढली असली असावीत.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 14:10
मुले आपापल्या पालकांना शिकारींचा आनंद घेताना पाहून स्वतःही आंनद घेण्यात शिकली असणार. घटना घडतानाच आठवतात असे नाही. तर एखादी घटना घडण्याची शक्यता वाटून सुद्धा मनात विचार येतात, खरे तर एखाद्या घटनेच्या प्रसंगी कसे वागावे याची मानसीक पुर्वतयारी हे (बर्‍याचदा इंट्रूजीव्ह) विचार घडवून घेत असतात. संधी अथवा आव्हान समोर आल्यानंतर दुर्लक्षकरणे, गर्भगळीत होणे, पळून जाणे, स्वसंरक्षणाचा सामना करणे ते ऑफेन्सीव्ह स्टान्स घेणे प्रसंगी क्रौर्यासहीत ऑफेन्सीव्ह स्टान्स घेणे हे या घूसखोरी करणार्‍या (इंट्रूजीव्ह) विचारांचा अविभाज्य आणि नैसर्गिक भाग असते. इतर विचारांसोबत क्रौर्यासहीत ऑफेन्सीव्ह स्टान्सचा घूसखोर विचार सुद्धा पर्यायांच्या स्वरूपात सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेळोवेळी कळत नकळत येऊन जातच असतात नव्हे तर त्यातून असणार्‍या रिस्क अ‍ॅव्हर्शन करता मनाची पुर्वतयारी करण्यासाथी ते गरजेचे सुद्धा असतात. एक हिंस्र श्वापद तुमच्या पुढ्यात आहे तुम्हाला गर्भगळीत होणे जमलेले नाहीए माघारीचा पळण्याचा मार्ग उपलब्ध नाहीए त्याने हल्ला आधी हल्ला केला तर तुम्हाला स्वसंरक्षणाचा वेळ सुद्धा मिळणार नाहीए, तुमच्या हातात शस्त्र आहे तुम्ही ऑफेन्सीव्ह वर जाणार की नाही ? इथे काय चांगले काय वाईट हा प्रश्न नाहीए मार्ग काढण्यासाठी लागणार्‍या तुमच्या मनाच्या तयारीचा प्रश्न आहे आणि या संबंधीचे विचार अगदी क्रूरसुद्धा तुम्हाला त्यातील जोखीमांचा (रिस्कची) जाणीव करून देत असतात. तुम्ही अचानक घरात आलाय गॅस बंद आहे गॅसवरील भांड्यातला एक पदार्थ तुम्हाला चाखायचा आहे. तुम्ही डोळे झाकून त्या भांड्याला हात लावाल? बहुधा नाही, कारण बंद गॅसवरील गोष्टही गरम असू शकते त्याचा चटका बसू शकतो हे पुर्वीचे अनुभव आणि घूसखोर विचार/स्वप्ने यांनी तुमच्या मनाची तयारी करून ठेवलेली असते. कोणत्याही ललित कलेचा आस्वाद घेत असताना रौद्र, बीभत्स, भयानक इत्यादी रसांचाही समावेश केला जातो, क्रुरतेच्या बातम्या ऐकतो अथवा टिव्हीवरील एखादी एपीसोड बघतो तेव्हा यातील नको असलेले बाजूला सारावयाचे अनुभव पर्याय आणि कृती आपण नकळत आपण आपल्या मनाला सांगत असतो. म्हणून नकारात्मक विचार घूसखोर पद्धतीने मनात येण स्वागतार्ह आहे जो पर्यंत तुमच मन त्याला अंमलबजावणी योग्य म्हणून स्विकारत नाही. परपिडांनद घेऊ इच्छिणार्‍या स्थिती आणि तशी इच्छा नसलेल्या स्थिती मधला हा फरक नाही की इच्छा नसलेल्या लोकांमध्ये घूसखोर नकारात्मक विचार येतच नाही पण सोबत गॅसवरचे भांडे गरम असू शकते या शक्यते प्रमाणे त्याच्या नावडत्या/नकोशा परिणामांच्या अथवा आवडत्या गोष्टीला दुखवायचे नाही या कल्पनेने ते नाकारले जात असतात. राजे रजवाड्यांचा फावल्या वेळातील उद्योग शिकारीचाच असे. आजही शिकारींचा आनंद घेणारे लोक आढळून येतात. अर्थात माणूस सुसंस्कृत होऊ लागला तसा हा परपिडेचा आनंद शिकार्‍यांकरताही बहुतांश इतर प्राण्यांबद्दल मर्यादीत झाला असावा.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 15:43
या विषयात एकुण उपप्रकार बरेच आहेत, त्यामूळे विश्लेषणा पुर्वीच सरमिसळ आणि निष्कर्श घाईची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात इतर उपप्रकारांकडे वळण्या पुर्वी अक्रौर्य अथवा परपीडा टाळण्याची वृत्ती काही जणांना तेवढीच नैसर्गीक पणे संस्कार न देताही येते का? एक व्यक्ती एका पक्षाला शिकारी साठी मारतीए, त्याच्या सोबतच्या दहा व्यक्ती त्याचा आनंद घेण्याचीच शक्यता जास्त असते का ? मला इजा होऊन दु:ख होऊ शकते तर त्या पक्षालाही इजा होऊन दु:ख होत असणार हि सम-वेदनाही (संवेदनशीलता) अहींसेकडे नेण्यास कारणीभूत होऊ शकते पण इथेही त्या व्यक्तीचा त्या पक्ष्याला होणारी इजा आणि मला होऊ शकणारी इजा याचा मनोव्यापारातील कार्य कारण संबंध विचारात घ्यावा लागतो. अपवादात्मक लोकांच्या मनोव्यापारात हे नैसर्गीकपणे घडते त्यांना त्या पक्षाला शक्य असलेली वेदना स्वतःहून नकोशी होते पण बहुतांश हिंसा टाळणार्‍या लोकांना ह्या संवेदनेची जाणीव होते पण ती इतर कुणीतरी करून दिल्या नंतर हा फरक किरकोळ वाटला तरी प्रत्यक्षात महत्वाचा असावा कारण हि संवेदना बहुतांश लोकांना त्या मर्यादीत क्षेत्रा पर्यंतच होत असू शकते का? कारण याच संवेदनांनी हिंसा टाळण्यासाठी आग्रही पणे शाकाहार घेणारे लोक इतर काही प्रसंगी परपीडेचा आनंदही घेताना दिसून येतात. बर्‍याच प्रसंगी या विरोधाभासांकडे विश्लेषण करताना दुर्लक्ष होत असते का ? आणि शिकार खेळताना आनंद उपभोगणारा राजाच्या मनात इतर प्रसंगी चुकूनही परपीडेचा आनंद घेण्याची इच्छा होत नाही किंवा घेताना दिसत नाही असे होते का? बरेच लोक अहींसेकडे जगा आणि जगू द्या हा प्युअर रॅशनलीझम ते पापपुण्य नर्कातल्या शीक्षांच्या भिती ते पुर्नजन्म नको असणे इतपर्यंत कारणेही असू शकतात. पण सर्वात महत्वाचे पालक किंवा बाजूच्या समाजाच्या वागणूकीतून वेळीच मिळणारे सुयोग्य संस्कार/ सुयोग्य समज हि बहुधा सर्वात प्रभावी घटक ठरत असावी.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 16:13
आता क्रौर्याच्या मुद्याकडे वापस येऊ या. क्रौर्य करणारा प्रत्येक क्रुरतेच्या घटनेत आनंद अनुभवत असेलच असेही नाही. निव्वळ पेशन्स तुटल्या नंतरचे फ्रस्ट्रेशन, बदला या ठिकाणी क्रौर्य करणार्या व्यक्तीचा अनुभव कदाचित अगतीकता संपवण्याचा किंवा रागाचा असू शकेल किंवा रेल्वे इंजीनच्या ड्रायव्हरचा अनूभव खेदाचा दुख्खाचाही असू शकेल किंवा खाटीक खान्यात काम करणार्‍या व्यक्तीला आनंदही नाही दुख्खही नाही अशी बोथट जाणीव सूद्धा असू शकेल का ? तर युद्धात झालेले क्रौर्य केवळ जीवनसंघर्षाचा भाग असल्यामुळे युद्ध उन्माद असूनही आनंद असेलच असेही नाही अशीही स्थिती असू शकते का ? फ्रस्ट्रेशन, बदला यासाठी बर्‍याचदा परपिडानंद नसताच्याही क्रौर्यालाही बर्‍याचदा परपिडानंद या कॅटॅगरीत टाकले जाऊ शकते. इथे परपिडानंदाचा आरोप करणारी व्यक्ती केवळ भावनाविवशतेतून तसे करत असते का शिक्षा अधिक कठोर झाल्यामुळे भावनाविवश व्यक्तींनाही परपिडानंद मिळणार असतो ?

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 16:39
परपिडांनद घेण किंवा न घेण हे माझ्या मते मुख्यत्वे संस्कारसिद्ध आहे, जे संस्कार जाणता अथवा अजाणता पालक आणि आजूबाजूच्या परिसराने दिलेले असतात. एकच सारखा संस्कार देणारी व्यक्ती एका व्यक्तीस संस्कार देण्यास सफल होऊ शकते आणि दुसर्‍या व्यक्तीस संस्कार देण्यास असफल होऊ शकते. असफल होणे हे संस्कार घेणार्‍या व्यक्तीवर असलेल्या इतर विचारांचे, निष्कर्षांचे, प्रभावांचे फलित असू शकते पण असे नकारात्मक फलित येईल म्हणून संस्कार देणे सोडले गेल्यास महत्वाची संधी दवडल्या सारखेही होऊ शकते. पालकांच्या संस्कारातून वाढलेली परपिडानंद न घेणारी व्यक्ती नंतरच्या कालावधीत पिअरप्रेशरने परपिडेचा आनंद उपभोगतानाही आढळू शकते जसे कि रॅगींगचे उदाहरण. रॅगिंगचे रॅकेट चालवणार्‍या एखाद्याला लहाणपणा पासून परपिडानंद असू शकतो म्हणून रॅगींग करणार्‍या प्रत्येकाला लहाणपणापासून परपिडानंद घेण्याची सवय असेलच असेही नाही तो त्या कालावधीत नकारात्मक संस्कारांना मिळालेल्या संधीचा प्रभाव असतो. रॅगींग घेणारी व्यक्ती महाविद्यालयीन जीवनाच्या आधी आणि नंतरही परपीडानंद न अनुभवणारी असू शकते. असच अजून एक उदाहरण व्यक्ती परपिडानंद न घेणारी नाहीए परंतु एखाद्या शत्रुचा पराजय झाला की (तो पराभव स्वतः केला नसला तरीही) परपिडानंद घेताना दिसून येते म्हणजे कमी अधिक प्रमाणात परपिडानंद प्रासंगिक स्वरूपात कुणालाही होऊ शकतो. परपिडानंद प्रासंगिक स्वरूपात कुणालाही होऊ शकतो याच कारण अस की परपिडानंद न होण जेवढ नैसर्गीक असू शकत तेवढच क्वचीत परपिडेने आनंद होणही नैसर्गीकही असू शकत. स्वतः प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परपिडा न दिलेला पण स्वतःच नैराश्य/दु:ख दूरकरणारा परपिडानंद आदर्श नसेल पण मन मोकळ करणारा असू शकतो का हे त्याच्या मर्यादांसहीत लक्षात घेतले पाहीजे कारण या परपिडानंदातून पुढच्या वेळी स्वतः परपिडा देण्याचे समर्थन करण्याची भिती असू शकते.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 17:16
परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही तर ते व्यक्ती व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात. एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती अनुपस्थीत व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल निंदाकरतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते. येथे परनिंदेचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह, रोष आणि असंतोषास बळकटी येत जाते. बऱ्याचदा या सामाजिक असंतोष अथवा असमाधानाच्या परिस्थीतीचा टोकाची भाषा वाढीस लागते. (अंशत संदर्भ: मराठी विकिपीडिया) जर असंतोष समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटातील असेल तर दुसऱ्या गटातील लोकसुद्धा तशाच स्वरूपाच्या पण असमाधान निंदा पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटीच्या स्थितींना पोहोचतो. दोन्ही समूहाचे असे नेते सलेक्टीव्हली दुसऱ्या समूहाच्या नकारात्मक बाजू दाखवण्यात मग्न होतात. परिणामी समूहात परस्पर अविश्वास आणि असुरक्षीततेची भावना घर करते. अफवा पसरतात अथवा पसरवल्या जातात एखाद्या क्षूल्लक कारणावरून ठिणगी पडल्याचा फायदा घेत परस्पर विरोधी गटांना परपिडा दिली जाते. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा फायदा इतरही गुन्हेगार लूटारू आणि इतर हिसंबंधी उठवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे परिस्थितीस बऱ्याचदा गंभीर वळण लागण्याचा संभव असतो. परस्पर विरोधी आक्रोश असलेल्यांना परपिडा देण्याची इच्छा असू शकते पण आनंद येण्याची शक्यता कमी असली तरी पिअर ग्रूप मधील स्वतः प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परपिडा न दिलेल्यास स्वतःच नैराश्य/दु:ख दूरकरणारा परपिडानंद होताना पाहून परपिडा देणारा स्वतःचे परपिडा देणे जस्टीफाय करू लागण्याची शक्यता असते का ? आणि परिस्थितीत केवळ संधी म्हणून लूट करणार्‍यांचा परपिडानंद कशा प्रकारचा असतो याच्या व्यक्ती आणि समूहाच्या मानसशास्त्रीय उकलीची संधी आणि प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. तसे त्या बाबतीतील सामाजिक संस्कार घडणेही होत नसावे. हेच अविश्वास टिकून राहील्यास क्वचीत परिणती जिनोसाईड मध्येही होऊ शकते त्यामुळे अप्रीय घटना घडून गेल्या नंतर काहीच न घडल्याचे डिनायल (दोन किंवा अधिक बाजूंचे) किंवा केवळ आक्रस्ताळा आक्रोश या पेक्षा एकमेकांची बाजू वेळीच समजून घेऊन अविश्वास दूर करण्यास साहाय्यभूत तर्कसुसंगत भूमीका साहाय्यकारी असू शकतात एवढेच या निमीत्ताने नोंदवता येऊ शकते बाकी हा स्वतंत्र चर्चांचा विषय आहे.

अनुप ढेरे Sun, 04/27/2014 - 12:16
प्रत्यक्ष हिंसा बघायला आवडणं हे तुम्ही सेडीझमचं उदाहरण म्हणून दिलं आहे? पण वॉयलंट सिनेमे, टॅरेंटिनोचे काही सिनेमे, अथवा अपोकॅलिप्टो सारखे सिनेमे आवडणं हे पण सेडिझम आहे का? अवांतरः 'होली' या नाटकावर सिनेमा पण आहे. होली याच नावाचा. केतन मेहता नी दिग्दर्शित केलेला. आमिर खानचा पहिला पिच्चर बहुदा,

मारवा Sun, 04/27/2014 - 13:31
सॅडीझम चा अवलंब केला जातो. रॅगिंग करणारे सुशिक्षीत विद्यार्थी सुसंस्कृत व संपन्न घरातील असतात. सर्व्हायव्हल ची अशी कुठलीही निकड त्यांना नसते. निव्वळ सुख (उन्माद) जे सॅडीझम पासुन मिळते त्यासाठी, सत्ता गाजविण्याची उपजत वृत्ती यातुन, तसेच वर दिलेल्या नारसिसिझम (स्व च्या अतिरेकी प्रेमात पडण्यातुन, ) इत्यादीतुन ही याचा अवलंब केला जातो. अबु गरीब मधील अमेरीक्न सैनिकांना निर्वस्त्र/निशस्त्र/निसत्व करुन टाकलेल्या अफगाणिंकडुन कुठल्याही प्रकारची थ्रेट नव्हती. परंतु त्यांना ही शिअर प्ल्रेझर ऑफ सॅडीझम साठी टॉर्चर करण्यात आले यात अपमानित करुन आनंद मिळविणयाचा ही बराच भाग होता. कटटर मुस्लीम धर्मीयात असलेल्या आस्थांना लक्ष्य करुन ही त्यांना टॉर्चर करुन अमेरीकन सैनिकांनी सॅडीझम चा अवलंब केला होता.

मारवा Sun, 04/27/2014 - 13:45
पासोलिनी याच्या सालो १२० डेज ऑफ सोडोम या चित्रपटात प्रतिभाशाली दिग्दर्शक पासोलीनी एक अप्रतिम ट्रीक करतो ती अशी की या सिनेमात शेवटी शेवटी यातील चार मुख्य खलनायक ज्यांनी अतिशय कोवळ्या तरुण तरुणींना पकडुन एका मोट्या प्रासादतुल्य घरात कैद केलेले असते. त्यांच्यावर क्रमाक्रमाने विवीध प्रकारचे अत्याचार करण्यात येतात व त्यांना टोकाचे अपमानित व अत्यंत क्रुर पणे वागविण्यात येते. यातील क्रुरता सिनेमात उत्तरोत्तर वाढत जाते तर अशाच एका प्रसंगात घरासमोरच्या ग्राउंड मध्ये या तरुण तरुणींवर भीषण अत्याचार सुरु होतो व त्यातील चार ही खलनायक पाळीपाळीने एक एक करुन समोरील घरातील खिडकीत एका खुर्चीवर बसुन दुर्बीण घेउन तो सर्व प्रकार अतिशय रस घेउन तल्लीन होउन बघत असतात. ते तो अत्याचार निव्वळ बघण्याचा आनंद घेत असतात .... आणि अचानक एका फ्रेम मध्ये दिग्दर्शक पासोलिनी आपल्याला जाणीवपुर्वक फक्त दुर्बीणीचे दोन वर्तुळ दाखवितो पुर्ण पडदाभरुन आपण प्रेक्षकाला फक्त दुर्बीणीचे दोन वर्तुळ मात्र दिसतात.... पासोलीनी अत्यंत कुशलतेने आपल्यातला सॅडीस्ट दाखवुन देतो....... तो हे सुचवितो की बघा तुम्ही प्रेक्षक जो हा सिनेमा बघतायत .... तुम्ही सुध्हा सॅडीस्ट च आहात... यु आर ऑल्सो एन्जॉयींग टु वॉच जस्ट लाइक दोज व्हिलन्स.... तर अनुप असे सिनेमे पाहणे ज्यात हे कंटेट आहेत हे निश्चीतच सॅडीस्ट वृत्तीचे च एक उदाहरण आहे..

शुचि Sun, 04/27/2014 - 14:22
पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून खटल्यची कुप्रसिद्ध केस, जक्कल - सुतार द्वयीतील , जक्कल हा लहानापणापासूनच sadist प्रवृत्ती दाखवे अशा प्रकारचे ठोस (confirmed )वर्णन , त्याच खटल्यातील माफीचा साक्षीदार मुनवर शहाच्या "आय am not गिल्टी" या पुस्तकात आढळते. निव्वळ मजा/टाईमपास म्हणून हे खून झाल्याचे भयंकर सत्य पुढे आले, तेव्हा आख्खे पुणे या निर्घृण हत्यांमुळे हादरल्याचे स्मरते.

मारवा Sun, 04/27/2014 - 14:36
शुचि अनेक सीरीयल कीलर्स च्या बालपणात डोकावुन बघितले असता ते मोस्टली सॅडीस्टीक बालपणापासुन च असल्याचे आढळुन येते. असे लोक निव्वळ थ्रिल साठी एका अनाकलनीय ऑरगज्मिक नेचर च्या थ्रिल साठी खुन करतात. बाय द वे अति अति अवांतर रामाला तर भोगु दिल ना हो लव कुश ही दाम्पत्य सुखाची च परीणीती होते ना ? ओळी अशा असायला हव्या होत्या का की उर्मिलेला सासरवास, सासु कैकयीने केला लक्ष्मणासारखा भरतार हिने भोगु नाही दिला आपले कवि ग्रेस म्हणतात तस लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी ... तसे.. मला रामायणाची फार खोलात जाउन माहीती नाही हो इतर ही काही बाजु असेल तर जाणुन घ्यायला आवडेल बाकी कवितेचा अर्थ नाही लागला म्हणुन अवांतर केल,,, इतकच

In reply to by मारवा

शुचि Sun, 04/27/2014 - 14:41
मारवा आपण म्हणता तशाही ओळी होउ शकतात. स्वाक्षरीत उधृत केलेल्या धाग्यातून अहिराणी भाषेतील ही ओवी मी सहजच निवडली आहे. :)

प्यारे१ Sun, 04/27/2014 - 14:44
लवकुश ही संतती सुद्धा वनवासातून परत आल्यावरच झालेली आहे. लक्ष्मण उर्मिलेला सुद्धा मूल/ मुलं झाली होती. बाकी चालू द्या.

In reply to by प्यारे१

मारवा Sun, 04/27/2014 - 15:03
सहन करावा लागला कारण लक्ष्मण एकटाच वनवासात रामाबरोबर गेला होता. त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते. मात्र उर्मिलेला ती लक्ष्मणाबरोबर राहत नसल्याने दाम्पत्य सुखाचा अनुभव घेता आला नव्हता. तिच्या या विरहवेदनेवर कवि ग्रेस यांनी अतिशय सुंदर असे मार्मीक भाष्य केलेले आहे. तसे सीतेला कुठे भोगावे लागले ? बहुधा उत्तर रामायणात असेल ते धोबी मॅटर झाल्यानंतर असो यार मी का भरकटतोय कुणास ठाउक

In reply to by मारवा

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 03:47
त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते.
राम्-सीता वनवासात कीमान किती काळ एकत्र होते यावर कवी ग्रेस यांचे काही भाष्य उपलब्ध आहे का ? मी तर म्हणेन फक्त उर्मीलेलाच क्रेडीट ड्यु आहे रामावाचा वनवास आणी रावणा विरोधातील युध्दा विजय मिळवण्यात महत्वाची भुमीका निभावल्याबद्दल. पण बहुदा एक स्त्री म्हणून इतीहासाने तिचावर अन्याव केला असावा.

मारवा Sun, 04/27/2014 - 14:57
त्यातही भारतीय अध्यात्माला तर नाहीच नाही. प्रयोगाद्वारे काढलेले निष्कर्ष, विदा, पुरावे एकीकडे आणि गांधीजी फेम अंतरात्म्याचा आवाज दुसरीकडे जीत तो आखिर तय ही है ! तरी प्रतिवादा चा केविलवाणा प्रयत्न करुन बघतो आपण म्हणता की 1- इतर सजीव अस्तित्त्वाशी अजाणता एकरुप आहेत आपण बहुधा सर्व सजीवांविषयी बोलत आहात. आता माझी एल्सा नावाची कुत्री आणि आमच्या जुन्या लाकडी कपाटात कपारीत दडलेली ३ ते ५ ढेकुणांची फॅमिली हे सर्व मी सजीवात धरले तर चालेल का ? आणि आता एल्सा व हे ढेकुण अस्तित्वाशी अजाणता एकरुप आहेत म्हणजे नेमके काय आहेत ? आणि अस्तित्व म्हणजे नेमक काय व एल्सा/ढेकुण यांचा अस्तित्वाशी नेमका संबध कसा हे आपण आध्यात्मिक जर्गन टाळुन एक्स्प्लेन करु शकता काय ?

In reply to by मारवा

जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, साधी गोष्ट आहे. सर्व सजीवांचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे त्यामुळे ते वृक्षांशी जोडलेले आहेत. वृक्ष पावसाशी जोडलेले आहेत कारण पाण्याशिवाय वृक्ष-वल्ली जगू शकत नाहीत. सगळं पाणी समुद्राशी जोडलेलं आहे आणि पाण्याला बाष्पीभवनासाठी सूर्य हवायं. त्यामुळे सगळे सूर्याशी जोडलेले आहेत. वृक्ष-वल्ली, पीकं; जमीनीशी निगडीत आहेत आणि सजीवांची शरीरधारणा त्यांनी निर्मिलेल्या अन्नावर अवलंबून आहे त्यामुळे आपण जमीनीशी जोडलेलो आहोत. खरं तर शरीर हे अन्नाचं रुपांतरण आहे म्हणून आपण सर्व मृत्तीकेचीच जाणीव असलेली रुपं आहोत. एल्साचं शरीर ज्या अन्नावर अवलंबून आहे ते एकतर जमीनीतनं निर्माण झालंय किंवा मग इतर सजीव, जे तिचं अन्न आहेत, ते धरोत्पन्न अन्नापासून निर्माण झालेत. त्यामुळे एल्सा सुद्धा पृथ्वीशी जोडलेली आहे. एल्सा सजीव आहे त्यामुळे ती वृक्षांशी सुद्धा निगडित आहे. अस्तित्वात सर्वस्वी अनाकलनीय आणि गूढ रितीनं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीशी जोडलेली आहे. अत्यंत व्यापक परिमाणावर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. त्यामुळे स्टीफन हॉकिंग्ज अस्तित्वाला `द ग्रेट डिझाईन' म्हणतो. आता थोडे पुढे जाऊ. या अस्तित्त्वात आपण सगळे परस्परांशी एकाच जाणीवेनं जोडलेलो आहोत जी निराकार आहे. त्यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते; ती तुमच्या भोवती घुटमळत राहाते. अस्तित्त्व एक आहे याचा अर्थ, अस्तित्व एकाच निराकार जाणीवेची अनेक रुपं आहे. त्यामुळे सम-वेदना आणि प्रेम या मूलभूत गोष्टी ठरतात. फरक फक्त इतकाच की एल्सा हे समजू शकत नाही आणि तुम्ही ते समजू शकता. ही एकरुपता समजण्याची संभावना, परपीडन ही मूळ वृत्ती आहे अशी कल्पना करुन घेतली की संपुष्टात येते.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 16:31
दर दोन वर्षांनी स्वतःनेच ठवलेले नियम मॉडणारा होंगिंक्स चे प्रमाण देण्या पेक्षा... देह अन्नाने, अन्न पृथ्विपासुन, प्रुथ्वि जलापासुन, जल अग्नि पासुन, अग्नि वायुपासुन, वायु आकाशापासुन, आकाश आत्म्यापासुन बनते या आशयाचा आपल्या संस्कृतीमधील दिव्य श्लोक तुम्हास माहित नाही काय ?
यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते;
अहो एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तो ढेकुण जाणू शकणार आहे का ? की ढेकणाची चिरडले जाण्याची वेदना तुम्हाला जाणवणार आहे ? काय बोलताय ?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा Sun, 04/27/2014 - 17:09
संजय मला आपले उत्तर पुर्ण कळले असे मी म्हणत नाही परंतु मी समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे असे वाटते. पण माझ्या प्रश्न विचारण्याच्या शैलीची चुक माझ्या लक्षात आली त्यासाठी मी आपली माफी मागतो.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा Tue, 04/29/2014 - 17:38
सर्व सजीवांचं अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे हे वाक्य दुरूस्त करून असं म्हणू या सर्व सजीवांचं अस्तित्व प्राणवायू वर अवलंबून आहे .पण मला वाटते काही प्राणी असे आहेत ज्यांची केमिस्ट्री प्राणवायूवर आधारलेली नाही.( अनारोबिक) ते वृक्षावल्लीशी जीवनचक्रात जोडले आहेत असे कसे म्हणता येईल ?

पण सॅडीझम प्रत्येक वेळी वाईटच असते असे मत बनवने योग्य नाही ... सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. अवांतर : सॅडीझम/मसोचिझमच्या पॉसिटिव्ह अ‍ॅन्गल कडे पाहण्याकरिता "सबमिशन ऑफ एम्मा मार्क" हा चित्रपट आवर्जुन पाहण्यासारखा आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Sun, 04/27/2014 - 15:49
सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही ..
खरच माहित नाही. शुद्ध रॅशनलीस्ट अहींसावादी विचारांना परपिडानंद वाला साथीदार मानवणार नाहीच पण आत्मपिडानंद घेणाराही मानवणार नाही. सबमिसीव्ह आत्मपिडानंद वाला/ली कदाचीत एका मर्यादेपर्यंत परपिडानंद वाल्याची साथ देऊ शकत असेल पण या दोघांचेही मानसिक प्रश्न सोडवण्या पेक्षा त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. या वेगळ्या टोकाच्या विचारांशी सहमत होण्यापुर्वी पुन्हा विचार करण्याची गरज भासेल असे वाटते.

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा Sun, 04/27/2014 - 17:15
प्रसाद मी हा चित्रपट बघितलेला नाही व त्या संदर्भात काही वाचण्यात ही आले नाही. पण तुम्ही कृपया थोड डीटेल सांगु शकता का या विषयी आणि पॉझीटीव्ह म्हणजे कस नेमक थोड विस्तृत विवेचन केल्यास आम्हाला नविन माहीती मिळेल.

In reply to by मारवा

सदर चित्रपट क्षक्षक्ष दर्जाचा असल्याने इथे जास्त लिहिता येणार नाही ... गूगल केल्यास अवश्य सापडेल http://bit.ly/1rHMsWO

शुचि Sun, 04/27/2014 - 15:39
या सर्वांमधील विरोधाभास म्हणजे धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र आणि बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
या वाक्याला केवळ टाळ्या!!

In reply to by शुचि

बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
प्रश्न उपद्रवाचा आहे. जर युगुलाला आनंददायी ठरत असेल तर ते परपीडन होत नाही. त्यामुळे ती परस्पर स्विकृत आहे. इट इज नॉट सॅडिजम.
धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे. मी त्या साधना जस्टीफाय करत नाही पण स्वतःचं शरीरापासून वेगळेपण जाणण्यासाठी त्या सांगितल्या आहेत. थोडक्यात, शरीराला झालेली वेदना `स्व' ला कळते पण त्याला बाधा येत नाही, हा त्या साधना प्रणालींचा हेतू आहे. जाणीवपूर्वक आणि हेतू समजून केलेल्या अशा साधना मॅसोजचिम नाहीत. मला वाटतं मी यावर अधिक उहापोह न करणं योग्य होईल. पण धार्मिक साधना आणि सॅडिजम यांचा वरकरणी संबंध फक्त त्या साधनांचा हेतू न समजल्यानं वाटू शकतो; वास्तविकात सॅडिजम (खरं तर मॅसोचिजम) आणि धार्मिक साधनांचा काहीही संबंध नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि Sun, 04/27/2014 - 16:16
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे.
ओह अन मी समजत होते गालात सळया खुपसून किंवा पाठीला हूक्स लावून टांगून घेणे याकडे लेखकाचा निर्देश होता. मला वाटले मुंबईत,ते एका पायावर उभे रहाणारे साधू अन त्यांचा सडणारा ,पहिला पाय याकडे लेखकाचा निर्देश होता.

मारवा Sun, 04/27/2014 - 17:30
संजय आणि शुचि वरील मर्यादीत जागेत जरी मी जैन धर्मातील एक उदाहरण दिलेले असले तरी जवळ जवळ प्रत्येकच धर्मात मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण केलेले आढळते. स्वपीडन करणे मग ते आत्मसंयमाच्या गोंडस नावाखाली अतिरेकी उपास करणे विवीध प्रकारची तपे (काहीतर अगदीच अतार्कीक अनावश्यक) करुन स्व शरीराला पीडा देणे त्यात गौरव मानणे. शुचि म्हणतात तसे सळया हुक्स खुपसणे, मुसलमानांमध्ये कुठल्यातरी एका दिवशी एक मिरवणुक निघते त्यात स्वतःला अक्षरशः रक्तबंबाळ करुन घेउन कुठल्यातरी शहीद (बहुदा हुसेन नक्की माहीत नाही) पवित्र व्यक्तीची आठवण त्यांनी भोगलेल्या वेदना प्रतिकात्मकतेने भोगुन केली जाते. शंकराचार्यांचे विवेक चुडामणी नावाचे ग्रंथ आहे त्यात अनेक श्लोक शरीर कीती गलिच्छ वाईट आहे हे समजावुन देण्यात च खर्ची केलेली आहेत. त्यामुळे त्याला कायम कसे कठोर वागविणे आवश्यक आहे हे सांगितलेले आहे. ख्रिस्ती धर्मात तर येशु ने तुमच्यासाठी सर्व छळ सोसला हे सतत बिंबविले जाते. नेमकी उदाहरणे आठवत नाहीत पण विवीध धर्माच्या असंख्य परंपरा स्व-शरीरा चा धिक्कार करण्यात त्याला यातना देण्यात काहीतरी श्रेष्ठ धार्मीक आहे असे मानतात. प्रत्येक धर्म हा काही ना काही प्रमाणात सॅडो-मॅसोचिझम चे उद्दात्तीकरण करणारया परंपरा बाळगतो.

In reply to by मारवा

कारण असे प्रतिसाद मला वाचवत देखिल नाहीत. तस्मात, आय वोंट टेक द सब्जेक्ट एनी फरदर.

मारवा Sun, 04/27/2014 - 17:31

मारवा Sun, 04/27/2014 - 17:42
तुलनेने आधुनिक काळात इंटरनेट मुळे अधिक प्रचलित झालेले परस्पर संमतीने स्वीकारलेले व समर्थक ज्याला अ‍ॅज अ लाइफ स्टाइल म्हणतात. ज्यात या आदिम प्रवृत्तींचा सेफ लिमीट्स मध्ये कुशलतेने आनंद मिळविण्यासाठी वापर करण्यात येतो. व अशा बीडीएसएम चा हेतु हा केवळ दैनंदिन लैंगिक आयुष्यातील बोअरडम ( जो हमखास प्रत्येक विवाहा त काही कालावधी नंतर येतो.) त्याला थोडा स्पाइस अप करण्यासाठी वापरला जातो. हा बीडीएसएम चा युज वरील धार्मीक उग्र वापरापेक्षा हेतु प्रक्रीया परीणाम अनेक बाबतीत भिन्न आहे. यातली गंमत अशी आहे की रीलीजीयस बीडीएसएम ला अत्यंत पवित्र गौरवाने बघितले जाते आणि या मॉक बीडीएसएम ला अतिशय काहीतरी विकृत आहे पाश्च्यात्य आहे असे बघितले जाते. मागे एकदा हा गमंत जंमत बीडीएसएम करण जोहर ने त्याच्या एका सिनेमात दाखविला होता ज्यात राणी मुखर्जी आपल्या बोअर्ड सेक्स्युअल लाइफ ला स्पाइस अप करण्यासाठी याचा अवलंब करते नाव नाय आठवत यार पण काहीतरी गंमतीदार प्रसंग होता इतक नक्क्की आठवतय.

In reply to by मारवा

सॅडिजमची किंवा मॅसोचिजमची (निरुपद्रवी असला तरी) आवश्यकता नाही. खरं तर पारस्पारिक अनुबंधात प्रणय उत्तोरत्तर खुलत जातो कारण द कपल डिवेलप्स ग्रोईंग ग्रॅटिट्यूड टोवर्डस इच अदर, असा व्यक्तिगत अनुभव आहे. धर्मातल्या सॅडिजमचं कारण साधनाप्रक्रियेचा हेतू आणि मुळात त्यातला डेलिकेटनेस न समजणं (खरं तर सो कॉल्ड धर्मगुरुंचं संपूर्ण अज्ञान) हा आहे. ज्यांना या प्रक्रियांविषयी रस आहे त्यांनी ओशोंचा The Book of Secrets हा ग्रंथ (कारण तो १२५० पानी आहे) वाचावा.

माहितगार Sun, 04/27/2014 - 18:55
(मागील भागावरून पुढे चालू आधीच्या प्रतिसादांची लांबी बरीच वाढल्याने आपण वेगळ्या धाग्यावरतर पोहोचलो नाही असे वाचकांना वाटू नये म्हणून येथून प्रतिसाद जरा खाली आणला आहे.) ऐतिहासिक काळात योध्यांनी आणि शासकांनी युद्धांच्या दरम्यान आपली जरब बसवण्यासाठी अमानुष अत्याचार केल्याच्या नोंदी पहाण्यास मिळतात, मानवी इतिहासापूर्व काळातील असंख्य प्रसंग हे विस्मरणात देखील गेले असणार तर, इतिहासातील काही स्मृती लोकांच्या मनात अजूनही जाग्याच नाही तर असे अन्याय करणार्‍या मानवी समुहांच्या वंशजांवरही अविश्वास, राग प्रसंगी बदल्याची टोकाची भावनाही आढळून येऊ शकते. योद्धे आणि राज्यकर्त्यांचे इतिहासातील काही क्रौर्य प्रसंग हे परपिडानंदाचे असू शकतात हे वास्तव जसे स्विकारले पाहीजे तसे आजच्या सारखी आधूनिक दळणवळण नसलेल्या काळात दूरच्या प्रदेशांवर सातत्याची देखरेख करणे शक्य नसे त्यामुळे एकदाचीच जरब अथवा दहशत बसवणार्‍या मार्गांवर विसंबण्या शिवाय प्रसंगी प्रत्यवायही राहत नसावा त्यामुळेही ऐतिहासिक काळातील असंख्य शीक्षांचे युद्धातील कारवायांचे स्वरूप अमानुष असे होते. त्यामुळे ऐतिहासिक काळ त्या परिपेक्षात पहाणे अधिक सुसंगत ठरू शकते

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 19:35
कायद्याचे राज्य हि संकल्पना नसलेल्या काळात निती नियमांची आखणी धर्मसंस्थांनी त्यांच्या अखत्यारीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एका स्त्रीला दगड मारण्याची मागणी झाली असता येशु ख्रिस्ताने ज्याने कधीही एकही पाप केले नाही त्यांनीच फक्त दगड मारावेत म्हटल्या नंतर एकही व्यक्ती पुढे आली नाही, काही भारतीय ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचा केलेला निषेध, वर्षाऋतूत चातुर्मासाचे पालन, किंवा बौद्ध आणि जैन धर्माने सांगितलेली अधिक कडक अहिंसा असे परपिडानंद थांबवणारे अपवाद सोडले असता; या धाग्यात म्हटल्याप्रमाणे धर्मसंस्थांनी अनेक नितींमध्ये परपिडानंदाचा आंतर्भावच केलेला आढळतोच सोबतच बर्‍याच ठिकाणी त्याचे अनफेअर, बायस्ड, अर्बीट्ररी असणे जाणवते. एक अंधश्रद्धांमुळे दुसरे पुरुषांच्या भावनांना प्राधान्य देणार्‍या, स्त्रीयांवर लादावयाच्या पिडांना धार्मीक मान्यता देऊन होणारे अप्रत्यक्ष साटेलोटे यामुळे या परपिडांनदांना वेळोवेळी चालवूनच घेतले गेले नाही तर समर्थनही केले जाते. मग जे काही इतिहास काळात झाले असेल त्याची चुक स्विकारून नैतीक जबाबदारी घेणे अद्यापतरी बहुतांश धर्मसंस्थांना झेपलेले नाही. टोकाच्या आत्मपिडनाचा समर्थन अथवा आग्रह हे दुसर्‍या अंगाने शीष्याचे धर्मसंस्थेने अथवा गुरुने केलेले सानंद परपिडन नाही किंवा कसे हे विचारणेही अनेकांच्या मनाला दुखावू शकेल त्यामुळे मी तसे विचारण्याचे टाळतो.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 04/27/2014 - 20:47
कायद्याचे राज्य, मानवाधिकार, मानसशास्त्रीय विश्लेषण आणि समुपदेशन साहाय्य इत्यादी अभिनव संकल्पनांमुळे आधूनिक काळात ऐतिहासिक काळापेक्षा परपिडानंद चे प्रकार आणि घटनांची संख्येची टक्केवारी पहावयास गेल्यास वस्तुतः निश्चित कमी भरेल. आज आपण याची अधिक चर्चा करतो कारण या विषयांबद्दल आपण अधिक जागरूक आहोत. त्याच वेळी सुसंस्कृततेस अभिप्रेत पातळीपासून बरेचसे लाबं आहोत. अजूनही डिनायल्सचे अस्तीत्व आहे. परपिडानंद टाळण्यासाठी लागणार्‍या संस्कारांपासून अद्यापही वंचितता आहे. तर काही ठिकाणी जसे की शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या नितीमुल्यांच्या ठिकाणी असो अथवा कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या अधिकार्‍यांच्या अंगी आवश्यक निती मुल्यांचे अवमुल्यन झाल्या मुळे वरचा माणूस आदर्श असेल तर बाकी सारे आदर्श वागतील ते आदर्श आधारस्तंभ ढासळले आहे याला अंशतः स्वतः समाजही जबाबदार असतोच कारण हे आदर्श आधारस्तंभ समाजानेच उपलब्ध करून द्यावयाचे असतात. इथे लहानवया पासून द्यावयाच्या सुयोग्य संस्कारांची चर्चाही अभिप्रेत आहे. खासकरून एखादे बालवयातील मूल जेव्हा एखाद्या हिंसक घटनेस पाहते अथवा अनुभवते तेव्हा त्या मुलाला बोलते करणे त्याने तो अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे समजून घेणे आणि मग एका बाजूला अयोग्य मार्गाचे त्याच्या मनात समर्थन निर्माण होत नाही आहे अथवा दुसर्‍या बाजूला त्याच्या मनात भिती दहशत अथवा नैराश्य वास करत नाही आहे हे दोन्हीही पाहणे हि पालकांची शिक्षकांची समुपदेशकांची आणि समाजाचीही आवश्यकता आहे. तुम्ही केलेल्या परपिडानंदाला तुमचे आप्तस्वकीय सुद्धा अ‍ॅप्रीसिएट करणार नाहीत हे सांगणारी वाल्याकोळ्याचा पश्चातापाने वाल्मिकी होणारी कथा समाजाला परपिडानंदापासून दूर नेण्याचे उद्दीष्ट साधण्यासाठी उजवी वाटते.

चित्रगुप्त Tue, 04/29/2014 - 11:04
परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. उदाहरणार्थ लहानपणी एकदा माझ्या हातात बासरी पडली. सहज फुंकून बघता निघणारा आवाज बरा वाटला, मग काहीतरी बोटांची चाळवाचाळव करू लागलो, एकदा अचानक कुठल्याश्या गाण्याचे सूर प्रकटले, मग ते मुद्दाम वाजवून बघितले, ते जमले, मग आणखी प्रयत्न केले, तर 'करता येऊ' लागले. रस वाढत गेला, आणि चांगल्यापैकी वाजवू लागलो. हेच चित्रकला, जादू, लंबक, लेखन इ.इ. चे बाबतीत घडले. अर्थात या सर्व गोष्टी समाजमान्य असल्याने उघडपणे करता येत. घरच्यांनी मनाई केली असती, तर एकतर चोरून केले असते, वा सोडून दिले असते, आणि कधीतरी अनुकूल परिस्थिती येताच ते पुन्हा उफाळून आले असते. परपीडनाचे बाबतीत असेच काही होत असेल का?

In reply to by चित्रगुप्त

परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा?
If you look into the deepest, खरं तर निव्वळ जगणं हीच हिंसा आहे! आपल्या अन्नात पीकाची हिंसा आहे, श्वासात सूक्ष्म जिवाणूंची हत्या आहे आणि बोलण्यात शांततेला धक्का आहे. त्यामुळे `मिनीमम डॅमेज टू द इग्झिस्टन्स' हा जगण्याचा (सहजीवनाचा) सर्वोत्तम मार्ग समजला गेलायं. थोडक्यात `जेवढा बाहेर धक्का कमी तितकी आत अविचलता' असं सूत्र आहे. पीडन हा मात्र हेतूपुरस्सर केलेला हिंस्त्रपणा आहे. बासरी शिकणं इतरांना त्रासदायक आहे पण एकदा सुरेख वाजवता आली की त्यात स्वानंद आणि परानंद दोन्हीही आहे. सो द बेसिक प्रिंसिपल प्रिव्हेल्स, तुमच्या वादनाचा हेतू जेंव्हा स्वतःला आनंद मिळावा हा असतो आणि तुम्ही पुरेसे संवेदनाशील असता तेंव्हा प्रॅक्टीस निर्जन ठिकाणी किंवा इतरांना कमीतकमी त्रास होईल अशा पद्धतीनं करता. आणि एकदा सराईतपणे वाजवता येऊ लागलं की मग आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेता. पीडनाची मानसिकता नेमकी विरुद्ध आहे, त्यात संवेदनाशीलतेचा आभाव आहे. दुसर्‍याला दुखावून स्वतः सुखी होऊ अशी मानसिकता आहे. परिस्थिती जरी अनुकूल असली आणि मॅसोचिस्ट व्यक्ती मिळाली तरी अशा क्रियेतून उन्मादा व्यतिरिक्त काहीही निर्माण होत नाही.

In reply to by चित्रगुप्त

मारवा Tue, 04/29/2014 - 12:24
Most of us try to avoid inflicting pain on others. But some people seem to gain pleasure from inflicting pain or watching people suffer without feeling guilt, or remorse. New research just published in the journal Psychological Science suggests that this kind of everyday sadism is real and more common than we might think. Two studies led by psychologist Erin Buckels show that people who score high on a measure of sadism seem to derive pleasure from behaviors that hurt others, and are even willing to expend extra effort to make someone else suffer. “Some find it hard to reconcile sadism with the concept of ‘normal’ psychological functioning, but our findings show that sadistic tendencies among otherwise well-adjusted people must be acknowledged,” says Buckels, a doctoral student at the University of Manitoba who conducted her research while doing her Master’s at the University of British Columbia. She adds: “These people aren’t necessarily serial killers or sexual deviants but they gain some emotional benefit in causing or simply observing others’ suffering.”

In reply to by मारवा

मारवा Tue, 04/29/2014 - 12:38
सॅडीझम आढळतो. याचाच अर्थ असे लोक नक्कीच आपली इछा पुर्ण करण्यासाठी टपुन बसलेल्याच असतात. योग्य संधी मिळताच त्यांच्यातील या प्रवृत्ती उफाळुन येतात. आपल्या पेक्षा कमजोर सावज मिळाल्यावर हा प्रकार होतच असणार पण हे अगदी गुप्त आणि खाजगी पातळीवर होत असल्याने बाहेर येत नसावे जसे लैंगिक बाबतीत बरच काय काय घडत असत पण बाहेर कोणाला एखादा वरकरणी अगदी नॉर्मल दिसणारा माणुस त्याच्या बेडरुम मध्ये नेमक काय करतो हे माहीत पडण्याची शक्यता अगदीच कमी असते त्याप्रमाणे, हे ही माहीत पडण्याची शक्यता अर्थातच कमी असते. पण रॅगिंग ची संधी मिळताच अनुकुल वातावरण मिळताच तसेच रस्त्यावर बघा एखादा चोर पकडला गेल्यास वा एखादा कीरकोळ गुन्ह्यासाठी लोकांच्या ग्रुपच्या तावडीत सापडल्यावर त्याचे भीषण हाल करण्याच्या अनेक घटना भारतात तर फार च मोट्या प्रमाणात आढळतात या केसेस मध्ये तर ज्यांचा काहीच संबध त्या प्रकरणाशी नसतो असे ही येऊन टॉर्चर मध्ये सामील होतात. उदा. हा व्हीडीयो बघा http://www.youtube.com/watch?v=G7F0ULPh9gE

In reply to by मारवा

मारवा Tue, 04/29/2014 - 13:17
मिसळपाव वर अनेक ऑदरवाइज सभ्य सुसंस्कृत शालीन आयडी ज्यांचा पास्ट अतिशय नीट आणि क्लीन होता. ज्यांनी सहसा कधी ट्रोलींग इतर धाग्यांवर केल नव्हत ( जे रेग्युलर राडेबाज होते ते सोडुन द्या) पण असे अनेक नॉर्मल आयडी देखील जे खात्रीपुर्वक सभ्य या वर्गवारीत मोडत होते आणि मोडतात ही ते देखील जेव्हा संजय क्षीरसागरांच्या आध्यात्मिक धाग्यांवर प्रतिसाद देतांना अत्यंत सॅडीस्टीकली प्रतिसाद देत. एक प्रकारच शाब्दीक रॅगिंग सुरु होते. घेराव घालुन जाणीवपुर्वक अतिशय क्रुरतेने त्यांच्यावर हल्ला चढवुन आपल्यातील सॅडीझम चा प्रत्यय अनेक नॉर्मल आय डी नी दिलेला आहे हे आपल्या अतिशय जवळचे उदाहरण च अत्यंत बोलके आहे. आजही त्यांनी असा एखादा आध्यात्मिक विषय घेतला तर त्याची पुनरावृत्ती होइल असे म्हणण्यास वाव आहे.पण माणसामध्ये एम्पाथी हा ही एक भाग असतोच त्याचा प्रत्यय गवि नावाच्या आयडीने ( मी माणुस म्हणुन त्यांना ओळखत नाही म्हणुन आय डी म्हणतो) दिला त्यांनी प्रवाहाच्या अगदी विरोधात जाउन ही क्षीरसागरजींचा जो काय पॉइंट होता तो समजण्याचा प्रयत्न केला तशी दुर्मिळ संवेदनशीलता एम्पाथी दाखविली ( दया या अर्थाने म्हणत नाही कृपया गैरसमज नसावा) तर संजय जींच्या मिसळपाव वरील धाग्याच्या केस मध्ये आपल्याला दोन्ही बाजुंचे विलक्षण दर्शन होते. ही एक उत्कृष्ठ केस स्टडी आहे. तसेच इंटरनेट ट्रोलिंग करणारे हे सॅडीस्ट असण्यासंदर्भात मोठा विदा आपणास इंटरनेट वर च मिळेल. दुसर उदाहरण वर लेखात दिल्याप्रमाणे तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालु आहे यात बेणारे बाईंचा जो अत्यंत हिंस्त्र अशा रीतीने मानसिक छळ केला जातो वरकरणी अगदी साध्या लोकांकडुन नाटकाचे निमीत्त्त घेउन ते तर निव्वळ चकीत करणार आहे तेंडुलकरांनी मानवी मनातला जो अत्यंत सुक्ष्म पदर हिंसेचा परपीडनाचा दाखविलेला आहे त्याला तोड नाही.

चांगला लेख आणि उत्तम प्रतिसाद. सँडीझम जर मानवी प्रवृत्ती असेल तर तिला कमी करावं किंवा असूच नये असे सुचवायचं आहे का ? आणि काही वेळी मानवी मनात असलेल्या भावना उफाळून येतात तेव्हा या प्रेरणा दाबून टाकल्या पाहिजेत असे म्हणावे काय ? उदा. समजा 'अ' नावाच्या व्यक्तीने 'ब' ची फसवणूक केली आहे, अशा वेळी कोणतीही व्यवस्था जर 'अ' ला शिक्षा देऊ शकत नसेल तर ती व्यक्ती व्यक्त होऊ पाहाते अशा वेळी जर एखादा समुह जर 'अ'ला सार्वजनिक ठिकाणी फटके देत असेल (सार्वजनिक ठिकाणी फटके देणे हे चूकच) तर 'अ' ला मिळालेला आनंद मोजायचा की त्याच्यातला सँडीझमची चर्चा केली पाहिजे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शासन ही समजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून केलेली योजना आहे आणि सॅडिझम ही निव्वळ परपीडनातून आनंद मिळवण्याची वृत्ती आहे. फसवणूक करणार्‍याला शासन व्हावं असं वाटणं वेगळं आणि काहीही कारण नसतांना दुसर्‍याला पीडा देण्यातून आनंद मिळवणं वेगळं. The first is punishment & the second, sadism. अर्थात, शासन, पीडनानंदात केंव्हा बदलेल सांगता येत नाही. थोडक्यात, शासन जर झालेल्या नुकसानाच्या भरपाईपर्यंत मर्यादित असेल तर ठीक पण त्यापेक्षा जास्त होऊ लागलं तर सॅडिजम हॅज ओवर टेकन पनीशमंट!

In reply to by अनुप ढेरे

शुचि Tue, 04/29/2014 - 16:40
इस्लामी शासन काळात देण्यात येणारया अनेक प्रकारच्या शिक्षा ज्यात गुन्हेगाराला सरळ साधे मारुन टाकण्यापेक्षा हाल हाल करुन सार्वजनिक रीत्या मारणे यामध्ये तेथील लोकांची सॅडीस्टीक प्रवृत्ती दिसुन येते.
अगदी अगदी!!! मला ते sadistic न वाटता न्यायपूर्णच वाटतं.

In reply to by शुचि

शिक्षेचा हेतू गुन्हेगारात सुधारणा व्हावी असा असायला हवा म्हणून मृत्यूदंडाला विरोध आहे. गुन्हेगारच संपला तर सुधारणा कुणात होणार? म्हणजे ज्याची हत्त्या झाली त्याबद्दल काही करता येत नाही Because the person is dead. आता जे हयात आहेत त्यात तीन प्रकारचे लोक आहेत : एक, मृताशी संबंधित व्यक्ती; त्यांना हानीची भरपाई मिळून सुखानं जगता यावं हे उचित आहे. थोडक्यात, मृत व्यक्ती हयात असती तर त्यांचं जीवनमान जसं चाललं असतं तसं चालावं. (जे गुन्हेगारला फाशी दिल्यानं भावनिकदृष्ट्या साध्य झालं तरी त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचा फायदा होत नाही) दोन, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती; त्यांना दहशत बसते हे खरं असलं तरी फाशीची शिक्षा असून देखिल गुन्हे घडत आहेतच. त्यामुळे तो हेतू देखिल साधला जातो असं म्हणता येणार नाही. तीन, असंबधित लोक; त्यांना फक्त बातमी वाचायचं समाधान मिळतं. आपण जर असंबधित असू तर फाशीच्या शिक्षेनं आपल्याला आनंद होणं हे (सहज लक्षात न येणारं) सॅडिजम आहे.

In reply to by शुचि

पण त्या वस्तुस्थितीचा अनुभव आल्याशिवाय सर्वांशी नातं जुळत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो. मला आहाराविषयी वाद निर्माण करायचा नाही, फक्त हिंसेचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. आपली सांप्रत नाती (निव्वळ) मानसिक आहेत, ती जाणीवेतून निर्माण झालेली नाहीत त्यामुळे तिसर्‍या समूहाला `असंबधित' म्हटलंय. इस्लामी पद्धतीचं वर्णन आणि हेतू मॅसोचिजम आहे आणि त्या अनुषंगानं ती पद्धत न्यायं वाटणं सॅडिजम आहे असा विचार मांडला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 00:09
अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो.
बुद्धाबद्दल काय मत आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि Wed, 04/30/2014 - 00:34
मला तर उलटं वाटतं अतिभावनिक (= संवेदनाशील????) लोकांनाच न्याय्य कायदाव्यवस्थेचे महत्त्व कळेल. ज्यांनी विकृती अनुभवलीच नाहीये त्यांना कळणारच नाही अन ते भूतदया भूतदया करत गुन्हेगारांना पाठीशीच घालत रहाणार. . . . हां आता त्यांनी जोशींच्या टीनेजर मुलाला नग्न करुन, नायलॉनच्या दोरीने फास आवळून मारले असेल ना का, अभ्यंकरांच्या नातीला जाईला नग्न करुन घरभर फिरुन मौल्यवान वस्तू दाखवायला लावून मग मारले असेनाका पण आपले भूतदया दाखविणारे आडवे पडणारच! कारण ...... जाई परत येणार नाही, मुलगा परत येणार नाही, त्यांचे ह्युमिलिएशन मिटणार नाही पण हे बिचारे गुन्हेगार कशाला फासावर लटकवायचे? अन काय विदा आहे की फाशीमुळे गुन्हे कमी झालेले नाहीत याचा? मान्य आहे पूर्ण नामशेष झालेले नाहीत पण कशावरुन कमी झालेले नाहीत?

In reply to by शुचि

आपण काय साधण्याचा प्रयास करतोयं हा आहे. जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला. मी गुन्हेगारीची भलामण करत नाही, संवेदनाशीलता कशी वाढवता येईल याचा विचार व्हावा असा मुद्दा मांडतो. समाजाची संवेदनाशीलता वाढली की गुन्हेगारी आपोआप आवाक्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शुचि Wed, 04/30/2014 - 00:56
जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला.
होय कळतय पण वळत नाहीये :)

In reply to by शुचि

मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." नाऊ जस्ट सी धिस थॉट, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. द वेरी फॅक्ट दॅट वी कॅन सी इज सच अ वंडरफुल फिनॉमिना. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की, वी स्टार्ट फिलींग ग्रॅटिट्यूड टोवर्ड्स अवर पार्टनर्स बॉडी. वॉट अ‍ॅन एक्स्ट्सी इट इज टू बी टुगेदर इन अ स्टार स्टडेड नाईट! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की सारी फ्रॅगरन्सेसची दुनिया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेला मार्दवानं हँडल करायला लागतो. आणि उमजतं की, इट इज अ‍ॅन इनवॅल्युएबल ट्रेजर ऑफ ब्लिस अराऊंड अस. जस्ट टू बी सायलेंट इज सच अ प्लेजर! मग सॅडिजम, मॅसोचिजम, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त गुरुवार, 05/01/2014 - 10:48
@संक्षि: प्रतिसाद आवडला, पण एवढी इंग्रजी वाक्यं कशाला हवीत त्यात? या वाक्यातून जे सांगयचंय, ते व्यक्त करू शकण्याएवढी नक्कीच संपन्न आहे मराठी भाषा. एका भाषेत दुसरी भाषा घुसडणं, हा सुद्धा त्या भाषेच्या सौंदर्याचा, संपन्नतेचा अवमान आहे, आणि एकाअर्थी हिंसकपणा देखील आहे. संपूर्ण प्रतिसाद मराठीचं मार्दव्य, पावित्र्य राखत लिहून तर बघा, या भाषेची अद्भुत किमया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटेल...

In reply to by चित्रगुप्त

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/01/2014 - 11:28
व्यक्त होतांना मला भाषेचा अडसर येत नाही. पण माझ्या लेखी भाषेपेक्षा संवाद आणि त्याचा परिणाम महत्त्वाचायं. लेखवरच्या प्रतिसादांची भाषा संयुक्त आहे त्यामुळे प्रतिसाद देतांना तसं लिहीलंय. बाय द वे, तुमच्यासाठी तीच जादू, मराठीतून: मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." किती दुर्लभ विचार आहे पाहा, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. आपण पाहू शकतो हीच किती विलोभनीय गोष्ट आहे. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की आपण सखीच्या देहाप्रती कृतज्ञ होतो. चांदण्या रात्रीतला सखीसंग म्हणजे जणू स्वर्गच धरेवर उतरतो! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की इतक्या सार्‍या गंधांची, हरक्षणी चित्तप्रसन्न करणारी दुनिया, आपल्याला पूर्वीच कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेशी मार्दवानं वागायला लागतो. आणि उमजतं की, आपल्याला सतत वेढून असणारा तो रेशीमकोष आहे. नुसतं शांत बसणं ही सुद्धा काय ऐयाशी आहे! मग परपीडन, स्वपीडन, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मार्मिक गोडसे Tue, 04/29/2014 - 21:46
अगदी बरोबर. मृत्यूदंडाने अपेक्षीत हेतू साध्य होत नसेल तर निष्कारण एखाद्याचा गिनि पिग करणे कितपत योग्य आहे?

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 17:22
सेडिसम ही कोणती विशिष्ट भावना नसून( विशेषत: खोडसाळ/खोडकर पणाची ) बेसुमार इंटेसिटी आहे. कोनाला तो करायला आवडतो कोनाला सहण करायला आवडत असेल. अथवा याविरुध्द सरां प्रमाने सेडिसम बाबत दिशाभूल व तीव्र तिटकरा व्यक्त करून पुन्हा स्वत:चा सेडिजमच प्रदर्शित करायला पण मान्य मात्र न करायला आवडत असेल. मला स्वत:ला मर्यादित तीव्रतेचा सेडिस्म पसंत आहे. सर्वच बाबतीत.

Pain Fri, 05/02/2014 - 11:06
खासकरुन इंजिनीयरींग आणि मेडीकल मध्य याचे तुलनेने फ़ार जास्त प्रमाण दिसुन येते. म्हणजे जो सर्वात जास्त हुशार अभ्यासु असा एज्युकेटेड क्लास आहे त्यात सॅडीझम तर जास्त च दिसुन येतो. संस्कृतीने चढविलेली शिक्षण संस्काराची पुटे कीते तकलादु असतात ती आय आय टी च्या रॅगिंग च्या घटना बघितल्यावर कळुन येते. बर विशेष म्हणजे येथे आलेला क्लास हा जनरली सर्वच बाबतीत सहसा उच्च असतो आणि त्यातही परत शहरी भागातुन आलेल्यांकडुन ग्रामीण विद्यार्थ्यांची रॅगिंग अधिक तीव्रतेने होत असलेले हे दिसते जनरलायझेशन (सार्वत्रिकीकरण?). संस्कृतीचा, शिक्शणाचा, शहर - खेडेगावात राहण्याचा आणि ही विकृती असण्याचा परस्परांशी काहीही संबध नाही. अमेरीकन सैनिकांनी जे अफ़गाणी कैद्यांवर अत्याचार केले त्यात विशेष म्हणजे काही अमेरीकन महिला सैनिकांचा देखील समावेश होता. या अमेरीकन महीला सैनिंकांनी अतिशय भीषण अशी सॅडीस्टीक प्रवृत्ती पुरुष सहकारयांच्या बरोबरीने दाखविली विषेश म्हणाजे? स्त्रिया कधी काही गुन्हे करत नहीत का? पुन्हा तेच!

या शब्दाचा उगम मार्क्वीस द साद या १८ व्या शतकातील फ़्रेंच सरदार व लेखक याच्या नावावरुन झाला. याचा जन्म तेव्हाच्या एका प्रभावशाली उमराव कुटुंबात झाला. हा सुरुवातीपासुन इतरांना यातना देउन लैंगिक आनंद मिळविण्यात समाधान मानत असे. याला अनेकवेळा वेश्यांशी अत्यंत क्रुरतेने वागल्याच्या कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले. बॅस्टील च्या कुप्रसिद्ध तुरुंगात ही याला टाकण्यात आले होते. तेथे त्याने त्याची अनेक कुप्रसिद्ध पुस्तके लिहीली. त्यात जस्टाइन आणि १२० डेज ओफ़ सॅडोम या बहुचर्चित पुस्तकांचा समावेश आहे.

मतदार यादी घोटाळा आणि कारस्थान

मंदार कात्रे ·

आशु जोग Sat, 04/26/2014 - 12:55
हे पहा https://www.youtube.com/watch?v=n9o-yT048Lg माहितीपूर्ण आहे

केवळ महाराष्ट्रात 64 लाख मतदारांची नावे गायब . म्हणजे एकूण साडेआठ कोटी मतदारांपैकी 8% मतदारांची नावे गायब केली आहेत. यामागे फार मोठे कारस्थान असू शकते ,किंबहुना आहेच ! जरा विचार करा की संपूर्ण देशात जर आशा प्रकारे कारस्थान करून सुमारे 8 ते 10 % मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले असेल, तर सत्ताधारी कोंग्रेस पक्षाची फार मोठी खेळी यामागे आहे.

'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद

चित्रगुप्त ·

चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या लेखाबद्दल लेखकाचा टीव्र णीशेद !!! =)) टीप : छान छान चित्रे टाकून एडिट केलेल्या लेखाचा डोळ्यांनी स्वाद घेतल्यावर आम्चा प्रोटेष्ट मागे घेतला जावू शकतो.

बालगंधर्व Sat, 04/26/2014 - 13:15
खनदन मिसरा हेकाय अहे? अनि तयनचा पुन्याशे कय समबन्दह? मला सदहया चिनचवद जवल अहे. खनदन मिसराचे कहे निशने चिनच्वदला असेल, तर मे पहु शकेन. अनि अचरया पन कोन अहेत, मल सनगाअ..

In reply to by बालगंधर्व

तमुचि भशहा वचुन मिसराककानि चिनचवद महदुन पहळ कधला अहे. भशहा सुद्र्ल्यास विहिचाहर कहरुहु अहसाहा निहिरोप दिलाहा आह्हाह्हाहे. सहमहजहलह ?

शुचि Sat, 04/26/2014 - 17:36
अग्गागा बाजार बाजार उठवलाय!!! काय एकेक चौके लावलेत!!!
(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.
खी: खी: खी:
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
फुटले!!! वाचवा!!

@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/roflmao.gif

असंका Sat, 04/26/2014 - 19:22
मी साधारणपणे आपल्या मतांशी सहमत असल्याची मखलाशी करून विचारू इच्छितो की- आपला वरील लेख हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रकार समजला जाइल का? (कृपया गैरसमज करून घेउ नये. मी नवीन सदस्य आहे. मी इथल्या नियमांचा अभ्यास आधीच केलेला आहे, परंतू तरीही मला हा प्रश्न पडला आहे...)

मनीषा Sat, 04/26/2014 - 20:30
पण मी काय म्हणते ..... सदाशिव पेठ हेच पुणे आणि तेच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र स्थान आहे यात शंका घेण्यासारखे आहेच काय? व्युत्पन्न महर्षि आणि आचार्यांनी ते आधीच सिद्ध केले आहे. आपण फक्तं त्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कधी अनुभूती घेतली आहे का? तुम्ही स्वतः पुण्यात या सदाशिव पेठेत रहा मग तुम्हाला अशी शंका येणारच नाही. आणि जर तुम्ही स्वतः अनुभूती घेऊनही तुम्हाला शंका येते आहे तर तुमच्या विचारधारणेत काहीतरी चूक आहे किंवा ती दिव्य अनूभूती येण्याइतका तुमच्या बुद्धीचा आवाका नाही. तेव्हा मान्यं कराच की सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आहे.

In reply to by आत्मशून्य

बालगंधर्व गुरुवार, 05/01/2014 - 12:08
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

In reply to by बालगंधर्व

चित्रगुप्त गुरुवार, 05/01/2014 - 13:23
सदाशिव पेत बददल तुमज्या पुर्न ना झलेल्या ज्य्या अपेकशा होत्या, तया कोनट्या, हे सामगाल तर आमाली बी कलएल सदासिव पेत बद्डल.

In reply to by बालगंधर्व

आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 04:12

हे वाक्य विडंबन म्हणून लाइक केल्या आहे, कठीण आहे राव. एकाक्षरी प्रतिसादातुन गैरसमज होउ शकतात हे एकवेळ मान्य, पण हे म्हणजे...

सुहास.. Mon, 04/28/2014 - 13:34
ब्ब्बाब्बौ ..............!! अग्गाअयायाया !! बाप्पा रे !! अरे काय डोक हाय का हिरवागार मळा . ऐन्ह उन्हाळ्यात शब्द-पावसाळ्यानी अध्यात्म गारेगार झाल्यागत वाटलं की !! __/\__ लल्लन का भाई जल्लन !! ;)

एस Mon, 04/28/2014 - 19:03
आता घाटपांड्यांच्या ह्या प्रतिसादाचेही कुणीतरी विडंबन करा. (सध्या घाईत आहे म्हणून - आमचा खंबा वाट पाहतोय हो! ;-) )

In reply to by एस

कंजूस गुरुवार, 05/01/2014 - 13:50
बदकांबरोबर पोहलात तर शिकाल केव्हा पाण्यात बुडायचे ,केव्हा चालायचे आणि केव्हा दहा हजार किमी दूर उडत जायचे .खरा स्माट पक्षी .

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 16:15
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.' a

हे वाचायचेच राहिले होते. एका महत्वाच्या विषयाला चित्रगुप्त काकांनी हात घातला आहे. सदाशिव पेठ पुणे ३० हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. काही विद्रोही हेच केंद्र डोंबिवली येथे आहे असा सुर लावताना दिसतात. पण मांजराने डोळे मिटुन दुध प्यायले तरी उजाडायचे रहात नाही.

चित्रगुप्त Sat, 05/03/2014 - 13:03
सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे -- आणि हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. ........ शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आमच्या मच्छराचार्यंनी जनसामान्यांना सहज आकलन होईल अश्या किती सोप्या भाषेत, नेमकेपणाने मांडला आहे, हे बघून कुणालाही कौतूक वाटावे. शेवटी खंडनमिश्रांना देखील हा सिद्धांत मान्य करावाच लागला, हा खंबायत-प्रभाव नसून वैश्विक सत्याचा झालेला विजय होय.

In reply to by चित्रगुप्त

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे नाही.. नाही.. पुणे म्हणजेच सदाशिव पेठ या जगात जे काही आहे ते सदाशिव पेठेत आहेच. सदाशिव पेठेत नाही ते जगातच नाही.

चित्रगुप्त Mon, 05/05/2014 - 10:04
अहो, आम्हाला सदाशिव पेठ नेमकी कुठे आहे, हे सुद्धा ठाऊक नाही, तरीपण 'चि. वि. जोशी बनू पाहाणे' हा फार मोठा सन्मान बहाल केल्याबद्दल दिलसे शुक्रगुजार.

आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्या-फक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री मच्छराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री मच्छराचार्य व खंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या.

पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??

तुमचा अभिषेक ·

In reply to by जेपी

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 11:40
नाहीतर काय, शेवटच्या वाक्यात मोदींचे नाव घेऊनही प्रतिसाद नाही,त्यांचीही लोकप्रियता घसरावी ? माफ करा, पण निवडणूक संपताच कोण ते नेते आता पुढच्या पाच वर्षांनीच तुम्हाला ओळख दाखवू हा जनतेचा अ‍ॅटीट्यूड चांगला नव्हे.

पैसा Sat, 04/26/2014 - 11:31
ते काय असतं? कोण पाकिस्तान? आप्लयाकडे काही प्रॉब्लेम्स आहेत का? पाकिस्तानपेक्षा मोदी हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे हे माहित नाही काय? आणि हिंदी सिनेमावाल्यांसोबत एवढे योगायोग कसे आले हा मोठाच योगायोग नाही का?

In reply to by क्लिंटन

तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 12:18
आयपीएल... जिथे करोडो रुपयांचा चुराडा होतो.. फिक्सिंग सारख्या प्रकरणात जिथे अंडरवर्ल्ड गुंतलेय.. काळा पैसा खेळवायचा जो एक अड्डा झाला आहे.. आपले माननीय राजकारणी राज्याच्या वा देशाच्या इतर प्रश्नांत लक्ष घालण्याऐवजी ज्या क्रिकेट बोर्डाचे पद भूषवण्यात धन्यता मानतात त्या खेळाची एक स्पर्धा, आयपीएल !

मुक्त विहारि Sat, 04/26/2014 - 22:33
म्हणजे, इंडियाके पागल लोग. साला चुतिया बनानेका धंदा. आता गंमत अशी आहे, की भले भले ज्योतीषी पण नक्की कोण जिंकेल आणि किती रन्सने किंवा किती विकेटने, किंवा नक्की कोण टॉस जिंकणार्?किती रन्स बनणार? हे सांगू शकत नाहीत. पण पंटर लोक मात्र, मॅच सुरु व्हायच्या आधीच बॉल टू बॉल सगळे सांगू शकतात, असे ऐकिवात आहे. नक्की खरे की खोटे, हे तो एक दावूदच जाणे.

श्रीगुरुजी Sun, 04/27/2014 - 12:43
आय पी एल वर एक नवीन धागा सुरू करण्याचा विचार होता. पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. त्यामुळे विचार लांबणीवर टाकला.

In reply to by श्रीगुरुजी

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 13:23
१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्‍या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्‍यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.

भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सोडलेय. अर्थात आजच्या तारखेला. कारण हि धरपकड चालूच असते. पण सध्या तरी या दोन देशांमध्ये अमन की आशा क्रिकेटच्या माध्यमातून करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीये. त्या अंतर्गत आपण पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही (आता तिथे कोणीच जात नाही ती गोष्ट निराळी) तसेच ते आपल्याकडे येत नाहीत. ना आपण तटस्थ ठिकाणी त्यांच्याशी खेळतो. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतो तेव्हाच काय ती लढत.