Skip to main content

ओव्या

Published on बुधवार, 30/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 10006

केंद्र परिघाचं नातं

Published on बुधवार, 30/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे) वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते. तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6499

९० डिग्री साऊथ - १

Published on बुधवार, 30/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
http://www.misalpav.com/node/27879 http://www.misalpav.com/node/27873 http://www.misalpav.com/node/27868 http://www.misalpav.com/node/27860 http://www.misalpav.com/node/27855 http://www.misalpav.com/node/27840 http://www.misalpav.com/node/27825 http://www.misalpav.com/node/27813 http://www.misalpav.com/node/27804 http://www.misalpav.com/node/27784 http://www.misalpav.com/node/27774 http://www.misalpav.com/node/27767 http://www.misalpav.com/node/27751 ______________________________________________________________________________ अनादी अनंत काळापासून माणसाला अज्ञात प्रदेशाचं आकर्षण राहीलं आहे.

याद्या 9051

तुती, कैर्‍या आणि संत्री

Published on बुधवार, 30/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो. ९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11700

माझी बायको-पोलर डिसॉर्डर

Published on बुधवार, 30/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
डिस्क्लेमर- मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो . तर माझ्या बायको-पोलर डिसॉर्डर ची कथा एकुणात अशी आहे - वयाच्या २० व्या वर्षी आम्ही सर्वप्रथम प्रेमात पडलो. इतरांप्रमाणेच आम्हालाही ती इन्द्राची परी वगैरे वाटू लागली. मग तिच्या भावाकडून "प्रसाद" खाल्ला तरीही काही ती मनातून जाईना !मग आम्हाला मनोवैद्यकाकडे धाडण्यात आले. त्याची औषधे घेवुन जरा सुस्थितीत आलो तर पुन्हा एका चंचलेशी नेत्रपल्लवी सुरू झाली!

याद्या 18664

अतृप्ती-एक जीवन संघर्ष!

Published on बुधवार, 30/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
त्याच काय झालं माहित आहे का??? एक होता अतृप्त ...लहानपणापासूनच... नावानिशी,नावाप्रमाणे---अतृप्त गाणं असो..खाणं असो..की गाडी मागून धावत जाणं असो अजिब्बात थांबायचं नाही. हीच त्याची खूण! अरे..अरे..अडवा या पोराला त्याची आयो..मागे ओरडत यायची पण..तो कुठला थांबतोय?
लेखनविषय:

याद्या 2808
काव्यरस

रायआवळ्याचे सरबत

Published on मंगळवार, 29/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
sarbat साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी. कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे. उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली.

याद्या 9222

विविधतेतील एकटा

Published on मंगळवार, 29/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
" तुम्हाला हिंदी येते? " " येते तुटकी फुटकी " " कोकणी येते? " " नाही " " अहिरणी " " अं? " " गोंडी? " " नाही " " तेलगु? " " नाही " " तुळु " " ही कुठली भाषा? " " तमिळ " " नाही " " ओरिया " " नाही " " बांग्ला " " नाही हो नाही " " भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? " " वाटते ना! " " कसची? " " इंग्लिश नाही येत ना त्याची! "
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2529

हिरव्या मिरच्यांचा ठेचा

Published on मंगळवार, 29/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल. साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे . कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत.. 1 एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात . मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता अ

याद्या 20182

शिवानीपल्लीचा काळा चित्ता

Published on मंगळवार, 29/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
बंगलोरहून जवळच असलेलं शिवानीपल्ली हे गाव माझं विरंगुळ्याचं एक आवडतं ठिकाण. एखाद्या शनिवार-रविवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री जंगलात फेरफटका मारण्याच्या दृष्टीने हे गाव एकदम सोईस्कर. बंगलोरहून कारने ४१ मैलांवरचं देकनीकोट्टा गाठावं, आणखीन चार मैल पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला कार पार्क करावी आणि पायवाटेने रमतगमत पाच मैल चालून शिवानीपल्ली गाठावं. शिवानीपल्ली गाव वनखात्याच्या राखीव जंगलाला लागूनच आहे. गावाच्या पश्चिमेला सुमारे तीन मैलावर सुमारे तीनशे फूटांचा उतार आहे. या उताराच्या पायथ्याशीच एक मोठ ओढा पायथ्याच्या कडेकडेने वाहत जातो.
लेखनविषय:

याद्या 13687