या शब्दाचा उगम मार्क्वीस द साद या १८ व्या शतकातील फ़्रेंच सरदार व लेखक याच्या नावावरुन झाला. याचा जन्म तेव्हाच्या एका प्रभावशाली उमराव कुटुंबात झाला. हा सुरुवातीपासुन इतरांना यातना देउन लैंगिक आनंद मिळविण्यात समाधान मानत असे. याला अनेकवेळा वेश्यांशी अत्यंत क्रुरतेने वागल्याच्या कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले. बॅस्टील च्या कुप्रसिद्ध तुरुंगात ही याला टाकण्यात आले होते. तेथे त्याने त्याची अनेक कुप्रसिद्ध पुस्तके लिहीली. त्यात जस्टाइन आणि १२० डेज ओफ़ सॅडोम या बहुचर्चित पुस्तकांचा समावेश आहे. यातील १२० डेज ऒफ़ सोडोम वर आधारीत असलेला सिनेमा सालो १२० डेज ओफ़ सोडोम या नावाने पिएर पाउलो पासोलीनी या दिग्दर्शकाने बनविला. हा अत्यंत उग्र असा सिनेमा आहे. हा सिनेमा अनेक देशांत अनेक वर्षांसाठी बॅन करण्यात आला होता. मात्र इंटरनेट ने आता हा सहज उपलब्ध झालेला आहे. (कृपया अतिसंवेदनशील व्यक्तींनी हा सिनेमा पाहण्याचे टाळावे यातील उग्रतेने/क्रौर्याने कदाचित काहींना त्रास होउ शकतो म्हणुन ही आग्रहाची नम्र विनंती) तर सॅडीझम या शब्दाचा ऒक्सफ़र्ड डिक्शनरी ने दिलेला अर्थ मला अतिशय अचुक वाटतो तो म्हणजे एन्जॊयमेंट ऒफ़ क्रुएल्टी टु ऒदर्स आणि दुसरा सेक्शुअल परव्हर्ज्न कॅरेक्टराइज्ड बाय धिस यात सॅडीझम च्या दोन्ही महत्वाच्या बाजु कव्हर होतात असे मला वाटते एक म्हणजे लैंगिक संबधातील क्रुरता व इतर प्रकारची (लैंगिक नसलेली क्रुरता). दुसरया अ-लैंगिक क्रुरते चा स्कोप फ़ार वाइड आहे. यावरुन च बनलेला शब्द आहे सॅडीस्ट म्हणजे अशी व्यक्ती जी निरनिराळ्या प्रकारचा क्रुर व्यव्हार इतरांशी करुन आणि त्यामुळे इतरांना होत असलेल्या यातनेने आनंदीत होते.
सॅडीस्ट लोकांनी सामुदायिक रीत्या असा आनंद घेण्याची अनेक उदाहरणे अगदी प्राचीन काळापासुन आहेत. रोम मधील ग्लॅडीएटर च्या स्पर्धांमधुन असे हिंसेचे क्रुरतेचे व्यवस्थित आयोजन च करण्यात येत असे. यात होत असलेली क्रुरता पाहुन.. यातना पाहुन चेकाळणारे प्रेक्षक निश्चीतच सॅडीस्ट होते. कॅलिगुला चा काळ अशा अनेक उदाहरणांनी भरलेला आहे. मध्ययुगीन इस्लामी शासन काळात देण्यात येणारया अनेक प्रकारच्या शिक्षा ज्यात गुन्हेगाराला सरळ साधे मारुन टाकण्यापेक्षा हाल हाल करुन सार्वजनिक रीत्या मारणे यामध्ये तेथील लोकांची सॅडीस्टीक प्रवृत्ती दिसुन येते. उदा. एखाद्याला जमिनीत पुर्णपणे गाडुन केवळ मुंडके बाहेर ठेउन नंतर त्यावर जमलेल्या सर्व लोकांनी दगड मारुन त्याला ठार मारणे ही बहुप्रचलित शिक्षा. यात ही विशेष बाब म्हणजे शासकांना आम लोकांतील या सॅडीस्ट प्रवृत्तीची असलेली पुरेपुर जाण व त्यांना या प्रकारच्या शिक्षेत सहभागी करुन घेउन वा ग्लॅडीएटर सारख्या उदाहरणांत प्रेक्षक बनवुन घेणे, व अशा पद्धतीने या मुळ सॅडीझम च्या वृत्ती ला खतपाणी च घातले जात असे व एक प्रकारे एनकरेज केले जात असे. अर्थात यात ही सत्ताधारयांचे हितसंबंध गुंतलेले असत. ही केवळ प्रातिनीधीक उदाहरणे झाली. मानवी इतिहास अशा अनेक उदाहरणांनी खचाखच भरलेला आहे.
सॅडीझम अगदी लहान मुलांमध्ये ही दिसुन येतो. एकत्र खेळतांना लहान मुल अनेकदा एकमेकाला पनीशमेंट्स देतांना दिसतात. अनेक लहान मुलामध्ये प्राण्यांना मारण्याची यातना देण्याची प्रवृत्ती दिसुन येते. एखाद्या मांजराला पकडुन पाण्यात टाकणे, इ. अनेक प्रकारे लहान मुल असा छळ अतिश्य निरागसपणे करतांना दिसतात. अनेक सीरीयल कीलर च्या हीस्ट्री त अनेकदा त्याच्या बालपणात या सॅडीस्ट वृत्ती ठळकपणे आढळुन आलेल्या आहेत. त्यात त्यांना तर नैतिक ते वगैरेचा ही फ़ारसा सेन्स ही डेव्हलप झालेला नसतो त्यामुळे तर त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. एक गोष्ट तर माझ्या अनेकदा पाहण्यात आलेली आहे एखादी वेडी व्यक्ती असेल तर अशा भिकारी वेड्या व्यक्तीमागे साधारण टीन एजर वा लहान मुलांचा ग्रुप लागतो. आणि ते त्याच्या मागे जाउन जाउन त्याला दगड मारतील कींवा डिवचतील की मग जेणेकरुन तो वेडा संतापाने त्यांच्या मागे धावतो आणि मग या मुलांना अधिकच आनंद येतो. हा प्रकार ही मुल अगदी बोर होइपर्यंत अथवा कोणी मोठ्यांनी आडकाठी आणेपर्यंत करत असतात. मला खात्री आहे आपणापैकी अनेकांनी हा प्रकार भारतात तरी बघितलेला असावा.
धार्मीक संदर्भात सॅडीझम अतिशय ग्लोरीफ़ाइड रीतीने व्यक्त होतो. अनेक धार्मीक साहीत्यात आलेले उदा. गरुड पुराण इ. आलेले नरक यातनांचे वर्णन. अमुक अमुक पाप केल्यास कढईत टाकण्यापासुन च्या व्हरायटी शिक्षा अगदी बारीक सारीक वर्णन देउन केलेल्या आहेत. या वर्णनांतुन सॅडीस्टीक प्रवृत्ती ठळकपणे दिसुन येते. महाभारतातले अनेक प्रसंग बघावेत. सर्वच धर्मांच्या साहीत्यात या सॅडीस्टीक वृत्तीने भरलेले अनेक कंटेट आढळतात. धार्मीक संदर्भात मात्र मॅसोचिझम अधिक आढळतो. मॅसोचिझम मध्ये व्यक्ती स्वत:ला यातना देण्यात आनंद मानते. याला अजुन एका रीतीने एक्स्प्लेन करता येते. मॅसोचिझम इज सॅडीझम टर्न्ड टुवर्ड सेल्फ़ फ़्रॉम ऒदर्स. हा मुबलक प्रमाणात सर्व धर्मात आढळतो. जैन धर्मात हा अनेकदा दिसुन येतो. या धर्मात एक विधी आहे. जो मी स्वत: बघितलेला आहे. जे संन्यासी असतात त्यांच्यासाठी एक केश लोचन विधी असतो. यामध्ये सर्व लोक ज्याचे केस वाढलेले आहेत अशा साधु/साध्वी भोवती जमतात मग त्या साध्वी चे केस हाताने ( कात्री/ब्लेड चा वापर न करता) एक एक करुन उपटले जातात. आणि याने होणारी वेदना त्या साध्वी ने चेहरयावर व्यक करणे अपेक्षीत नसते. आणि हा सोहळा सहसा सार्वजनिक रीत्या च अनेक प्रेक्षकांच्या साक्षीने केला जातो. व असे करणे ही गौरवाची आत्मसंयमाची त्यागाची बाब आहे असे अतिशय अभिमानाने मानले जाते. हे प्रातिनीधीक उदाहरण आहे अनेक धर्मात स्वत:ला यातना देण्याच्या अनेक परंपरा आढळुन येतात. स्वत:ला फ़टके मारणे, रक्त बंबाळ करणे इ. मात्र एरवी जो सॅडीझम वा मॅसोचिझम विकृती च्या व्याख्येत सरळ सरळ टाकला जातो. तो मात्र धार्मीक संदर्भात आला तर विकृती तर दुरच त्याला एखाद्या पवित्र भावनेने बघितले वा मानले जाते.
या उलट लैंगिक संदर्भात मुळ संभोगा च्या वेळी ही सॅडीझम/मॅसोचिझम चा वापर दिसुन येतो. इंटरनेट वर तर या संदर्भात एक स्वतंत्र शाखाच आहे जीला बी.डी.एस.एम. असे म्हटले जाते.याला विरोधक विकृती तर समर्थक एक जीवनशैली म्हणुन संबोधतात. समर्थकांच्या मते दैंनदिन लैंगिक आयुष्यात येणारा कंटाळा घालविण्यासाठी आणि आपल्यातील आदिम प्रवृत्ती ना तॄप्त करण्यासाठी याचा सुरक्षीत एका मर्यादेत फ़ॅन्टसी म्हणुन वापर करण्यात काही गैर नाही. यासाठी विवीध साधने इत्यादींची नेट वर रेलचेल आहे. संभोगा दरम्यान एकमेकांना चावणे दंतक्षत करणे आदि मध्ये ही सुक्ष्म हिंसा दडलेली च असते. तीची डीग्री वाढवल्या वर मग तो ठळक असा सॅडीझम दिसु लागतो. या सर्वांमधील विरोधाभास म्हणजे धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र आणि बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.
तरुण मुलांमध्ये रॅगिंग संदर्भात सॅडीझम अत्यंत तीव्रतेने समोर येतो. रॅगिंग मध्ये अतिशय आक्रमक उघड्या नागड्या स्वरुपात सॅडीस्ट वृत्ती उफ़ाळुन आलेली दिसते. याचे प्रत्ययकारी चित्रण मागे महेश एलकुंचवारांच्या होळी नावाच्या नाटकात वाचले हते. परंतु होळी कीस झाडकी पत्ती असे भयानक रॅगिंग आज च्या तारखेला भारतात अनेक कॊलेजेस मध्ये होताना दिसते. यात विशेष बाब म्हणजे जी उच्च शिक्षण देणारी कॉलेजेस आहेत खासकरुन इंजिनीयरींग आणि मेडीकल मध्य याचे तुलनेने फ़ार जास्त प्रमाण दिसुन येते. म्हणजे जो सर्वात जास्त हुशार अभ्यासु असा एज्युकेटेड क्लास आहे त्यात सॅडीझम तर जास्त च दिसुन येतो. संस्कृतीने चढविलेली शिक्षण संस्काराची पुटे कीते तकलादु असतात ती आय आय टी च्या रॅगिंग च्या घटना बघितल्यावर कळुन येते. बर विशेष म्हणजे येथे आलेला क्लास हा जनरली सर्वच बाबतीत सहसा उच्च असतो आणि त्यातही परत शहरी भागातुन आलेल्यांकडुन ग्रामीण विद्यार्थ्यांची रॅगिंग अधिक तीव्रतेने होत असलेले हे दिसते. यात परेश रावल चा सिनेमा टेबल नं २३ आठवतो.
सॅडीझम कधी कधी अतिशय सुक्ष्म अशा स्वरुपात समोर येतो. विजय तेंडुलकरांच नाटक बघा शांतता ! कोर्ट चालु आहे, यात बेणारे बाइना ज्या असामान्य पद्धतीने टॉर्चर केल जात तो समाजातल्या लोकांच्या मनातला अगदी गाभ्यातला सुक्ष्म सॅडीझम विजय तेंडुलकरांनी उलगडुन दाखविलेला आहे त्याला खरोखर तोड नाही. जे नाटक ते सर्व लोक मिळुन बेणारे बाई बरोबर खेळतात तो तर माणसाच्या या आदिम प्रवृत्तीचा घेतलेला अगदी खोल असा मागोवा आहे.
अबु गरीब च्या तुरुंगात जगाने सॅडीझम चा सर्वोच्च अविष्कार बघितला. अमेरीकन सैनिकांनी जे अफ़गाणी कैद्यांवर अत्याचार केले त्यात विशेष म्हणजे काही अमेरीकन महिला सैनिकांचा देखील समावेश होता. या अमेरीकन महीला सैनिंकांनी अतिशय भीषण अशी सॅडीस्टीक प्रवृत्ती पुरुष सहकारयांच्या बरोबरीने दाखविली. विशेष म्हणजे हे स्त्री पुरुष ऑदरवाइज त्यांच्या कुटुंबात अगदी प्रेमळ वगैरे होते. त्यानंतर ज्या प्रचंड दांभिकतेने या अत्याचारांचे समर्थन केले ते काही काळापुर्वी रीलीज झालेल्या अबु गरीब पेपर्स मध्ये मुळातुन वाचण्यासारख आहे. युध्द कैद्यांवरील अत्याचाराने जागतिक इतिहासाची अनेक पाने भरलेली आहेत.
नेमकी कुठली प्रेरणा असते सॅडीझम मागे ? एक माणुस स्वत:च्या हातात पॉवर आल्यानंतर दुसरया व्यक्तीला यातना देण्यात आनंद का मानतो? माणसाची घडण च अशी आहे का ? संवेदनशीलता, दयाळुपणा च्या बुरख्या मागे संस्काराच्या कंडीशनींग मागे प्रत्येकाच्या आत एक सॅडीस्ट दडुन बसलेला असतो का ? डोक बाहेर काढण्याची वाट बघत ? अनुकुल परीस्थीती येताच व्यक्त होण्यासाठी?
याची सहसा अनेक बाजुने स्पष्टीकरणे दिली जातात एक म्हणजे सॅडीस्टीक व्यक्ती ही त्याच्या बालपणात अशा च कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसेचा शिकार झालेली असते ज्याचा खोलवर परीणाम अशा व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर होत असतो. व अशी व्यक्ती मग पुढे जाउन सॅडीस्ट बनते.
दुसर अस सांगण्यात येत की मुळात या सॅडीझम मागे ही अधिक खोलवर असलेली प्रेरणा ही इतरांवर सत्ता गाजविण्याची असते व त्यांचे पुर्ण नियंत्रण करणे ही असते. व त्यासाठी इतरांना यातना देणे अथवा अपमानित करणे हे त्या मुळ पॉवर प्ले चा एक भाग फ़क्त असतो. अशी व्यक्ती स्वत:त असलेली कमतरता न्युनगंड कुठेतरी दडपुन या मार्गाने स्वत:चे समाधान शोधत असते.
चर्चे च्या माध्यमातुन या विषयाचा खोलवर वेध घ्यायला आवडेल.
वाचने
24829
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकाच जाणीवेनं आपण जोडलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे
In reply to पण आपणच म्हणता की सहवेदनेने by शुचि
अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं
In reply to एकाच जाणीवेनं आपण जोडलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे by संजय क्षीरसागर
मला तर उलटं वाटतं अतिभावनिक (
In reply to एकाच जाणीवेनं आपण जोडलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे by संजय क्षीरसागर
मुद्दा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा नाही
In reply to मला तर उलटं वाटतं अतिभावनिक ( by शुचि
जर गुन्हेगाराला त्याच्या
In reply to मुद्दा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा नाही by संजय क्षीरसागर
कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो?
In reply to जर गुन्हेगाराला त्याच्या by शुचि
(No subject)
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
वा! छान प्रतिसाद.
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
मस्त
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
प्रतिसाद आवडला, पण...
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
माझं दोन्ही भाषांवर एकसारखं प्रभुत्व आहे
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by चित्रगुप्त
व्वा !! सुंदर.
In reply to माझं दोन्ही भाषांवर एकसारखं प्रभुत्व आहे by संजय क्षीरसागर
खरं तर तुमच्या प्रतिसादामुळे
In reply to व्वा !! सुंदर. by चित्रगुप्त
मृत्युदंड नकोच
In reply to हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे by संजय क्षीरसागर
आपणास अनेक भाव भावना आहेत. खोडकरपणा त्यातीलच एक.
खासकरुन इंजिनीयरींग आणि
*नाहीत
In reply to खासकरुन इंजिनीयरींग आणि by Pain