तू वादळी समुद्र
मी एक लाट छोटी
मिटते जरी तुझ्यात
येतेच नाव ओठी
तू तेज:पुंज तारा
रात्री नभात येसी
मी एक रातराणी
फुलले तुझ्याचसाठी
तू सूर्य अग्निगोल
मी शांत तृप्त धरती
फिरते यूगे यूगे का
वेडावुनी सभोती
तू मेघ पावसळी
झरसी असा तूफान
मी एक वेल रानी
गाते तुझेच् गान
तू गंध पारिजात
मी लाजरी पहाट
येते तुझ्याचसाठी
भेदूनी काळरात
तू सावळा मुरारी
निर्जीव बासरी मी
देता तू श्वास हलके
घेते तुझ्या लकेरी
चैतन्य तू जीवाचे
तू श्वास अंतरीचे
तू भास या मनाचे
तू एक स्वप्न माझे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4080
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. आवडली कविता.
छान. आवडली कविता.
+1
In reply to छान. आवडली कविता. by यसवायजी
+1
खूप सुंदर शब्द व सुंदर भावार्थ!
अभिनंदन,
खूप सुंदर शब्द व सुंदर भावार्थ!
नेहमी प्रमाणे ही कविता ही खूप आवडली.
मस्त
हे फारच छान
छान कविता
आवडली. :)
संपूर्ण कविताच सुंदर आहे. मला
संपूर्ण कविताच सुंदर आहे. मला आवडलेले कडवे -
तू गंध पारिजात
मी लाजरी पहाट
येते तुझ्याचसाठी
भेदूनी काळरात
फारच सुंदर कविता.
फारच सुंदर कविता.
सुंन्दर..........!
सुंन्दर..........!
ओळि ओळिला सलाम आहे.
अत्रुप्त अपला गुलाम आहे!
सुंदर
सुंदर रचना
छान
ही कविता : हा सागरी किनार्याच्या चालीवर नीट बसतेय.
तू सावळा मुरारी
क्या बात!
आहा!
आहा! :)
सुंदर!
फार सुंदर कविता
फारच छान काव्य.
फारच छान काव्य.
मस्तं !
मस्तं !