Skip to main content

तू

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 27/04/2014 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
तू वादळी समुद्र मी एक लाट छोटी मिटते जरी तुझ्यात येतेच नाव ओठी     तू तेज:पुंज तारा     रात्री नभात येसी     मी एक रातराणी      फुलले तुझ्याचसाठी तू सूर्य अग्निगोल मी शांत तृप्त धरती फिरते यूगे यूगे का वेडावुनी सभोती     तू मेघ पावसळी     झरसी असा तूफान     मी एक वेल रानी       गाते तुझेच् गान तू गंध पारिजात मी लाजरी पहाट येते तुझ्याचसाठी  भेदूनी काळरात  तू सावळा मुरारी   निर्जीव बासरी मी   देता तू श्वास हलके    घेते तुझ्या लकेरी चैतन्य तू जीवाचे तू श्वास अंतरीचे तू भास या मनाचे तू एक स्वप्न माझे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4045
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

तू सावळा मुरारी निर्जीव बासरी मी देता तू श्वास हलके घेते तुझ्या लकेरी
हे फारच छान

सुंन्दर..........! ओळि ओळिला सलाम आहे. अत्रुप्त अपला गुलाम आहे!

सुंदर रचना

ही कविता : हा सागरी किनार्‍याच्या चालीवर नीट बसतेय.

तू सावळा मुरारी निर्जीव बासरी मी देता तू श्वास हलके घेते तुझ्या लकेरी
क्या बात!

आहा! :)