बंगलोरहून जवळच असलेलं शिवानीपल्ली हे गाव माझं विरंगुळ्याचं एक आवडतं ठिकाण. एखाद्या शनिवार-रविवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री जंगलात फेरफटका मारण्याच्या दृष्टीने हे गाव एकदम सोईस्कर. बंगलोरहून कारने ४१ मैलांवरचं देकनीकोट्टा गाठावं, आणखीन चार मैल पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला कार पार्क करावी आणि पायवाटेने रमतगमत पाच मैल चालून शिवानीपल्ली गाठावं.
शिवानीपल्ली गाव वनखात्याच्या राखीव जंगलाला लागूनच आहे. गावाच्या पश्चिमेला सुमारे तीन मैलावर सुमारे तीनशे फूटांचा उतार आहे. या उताराच्या पायथ्याशीच एक मोठ ओढा पायथ्याच्या कडेकडेने वाहत जातो.