तू वादळी समुद्र
मी एक लाट छोटी
मिटते जरी तुझ्यात
येतेच नाव ओठी
तू तेज:पुंज तारा
रात्री नभात येसी
मी एक रातराणी
फुलले तुझ्याचसाठी
तू सूर्य अग्निगोल
मी शांत तृप्त धरती
फिरते यूगे यूगे का
वेडावुनी सभोती
तू मेघ पावसळी
झरसी असा तूफान
मी एक वेल रानी
गाते तुझेच् गान
तू गंध पारिजात
मी लाजरी पहाट
येते तुझ्याचसाठी
भेदूनी काळरात
तू सावळा मुरारी
निर्जीव बासरी मी
देता तू श्वास हलके
घेते तुझ्या लकेरी
चैतन्य तू जीवाचे
तू श्वास अंतरीचे
तू भास या मनाचे
तू एक स्वप्न माझे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4045
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. आवडली कविता.
+1
In reply to छान. आवडली कविता. by यसवायजी
खूप सुंदर शब्द व सुंदर भावार्थ!
मस्त
छान कविता
संपूर्ण कविताच सुंदर आहे. मला
फारच सुंदर कविता.
सुंन्दर..........!
सुंदर
छान
तू सावळा मुरारी
आहा!
सुंदर!
फारच छान काव्य.
मस्तं !