Skip to main content

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 25/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.

चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 25/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.

मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या.

वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- स्थौण नृसिंहाचे हे अप्रतिम शिल्प बघून होताच आपली दशावतार लेण्याची सफर संपते. आता पुढची सफर आहे ती लेणी क्र. १४ अर्थात "रावण की खाई" ची --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- रावण की खाई अर्थात लेणी क्र. १४. ही आहे दशावतार लेणीच्या शेजारीच. पण त्याप्रमाणे दुमजली मात्र नाही.

वंशवेल

लेखक सुब्बु यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही .

रेडीओ

लेखक मालविका यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराल

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई, भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही ----पगला गजोधर

'सकाळ' मधे येणारे फोटो

लेखक यदुनाथ यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात. जसे १. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो - राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा - सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो - ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो - परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना - सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो २. नेहमी येणारे फोटो - ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो - पुलावरील नक्शीचे ग्रिल - पवार कुटुबिय असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...

परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 24/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.