मोठ्ठाल्ले रस्ते..
ट्राफिकले हसते ..
ढोरं बसते..
नागपुरात..
डी पी ची हिरवळ
नागनाल्याचा चिखल
उन्हाळ्यात तळमळ
नागपुरात
नागपुरीचा थाट
हिंदी बम्बाट
इंग्लिशलेबी वाट
नागपुरात
के सी पार्कचा पोहा
पहाटे चारले चहा
उधारीच वाहा
नागपुरात
माहोल पोट्टे
रिकामचोट्टे
संत्र्याचे कट्टे
नागपुरात
मिहानची भरारी
लफडे भारी
दिल्लीची वारी
नागपुरात
बी इ करी
बेरोजगारी
पुण्याची वारी
नागपुरात
मस्तीत चित्त
पाहुणचार मस्त
फॅमिली संग
नागपुरात
---------------------------------------------
बम्बाट = भरपूर .
विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे..