Skip to main content

अभय-लेखन

स्त्रीत्वाचे शीलहरण!

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 22/03/2025 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीत्वाचे शीलहरण!
 
स्त्रियाच करिती परस्परांचे 
शीलचारित्र्य हनन मस्त 
मातृत्वाचे वस्त्र फाडणे 
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
 
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना  भान
कुस्करती मग एकमेकींचा 
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
 
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी

मातृत्वाचा शृंगाररस

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 19/10/2024 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
मातृत्वाचा शृंगाररस चंदन चांदणं गोंदण ल्याली नवथर कांती तनू सुकुमार अर्ध मोकळ्या केसावरती माळून गजरा चंद्राकार कुठे निघाली चंचल रमणी थबकत लचकत हरिणी समान सरकत शेला सावरलेला धरत रोखुनी नयन कमान ठुमकत मुरडत गवळण राधा जणू विहरत यमुनाकाठ गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार अर्ध्या उघड्या पाठीवरती भुरुभुरू केसांचे नर्तन नाभी भवती करुनी रिंगण पिंगा खेळतो द्वाड पवन गुलाब जाई मोहित होई रूप गोजिरे पद्मसमान लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम कुणी म्हणाले

साक्षीला दिवस आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 12/08/2024 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षीला दिवस आहे दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो तारतम्य लागले जर हेलकावे खायला भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो - गंगाधर मुटे 'अभय' ====== बारा/आठ/चोवीस

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 23/11/2020 13:08 या दिवशी प्रकाशित केले.

पत्र...

लेखक प. शी. यांनी रविवार, 17/09/2017 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

((तो मला आवडत नाही))

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/08/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो

आयुष्याची गाडी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 28/06/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो

ये तू मैदानात : शेतकरी गीत

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/11/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात

"स्व"....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 22/10/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...