लेखकमाहितगारयांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
लेखकमाहितगारयांनी सोमवार, 25/04/2022 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ?
झाडाला फुले लागल्यावर
की
कोकीळेने कुहू कुहू केल्यावर
की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?
लेखकमाहितगारयांनी रविवार, 29/03/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस
*
देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही
तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते?
पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर
शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास
तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या
चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस?
भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली
परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?
लेखकमाहितगारयांनी रविवार, 16/02/2020 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही
गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही
शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली
नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही
अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता
संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना?
हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती
झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती?
देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी
अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ?
भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती
मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती
क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई
भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई
परप्रेमा
लेखकसोन्या बागलाणकरयांनी बुधवार, 08/05/2019 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामि धागे घेऊन (का) येतात
एकएक हट्टी जिलबी
जिद्दीने पाडून ठेवतात,
प्रत्येक जिलबीमध्ये
अनेक बिनबुडाचे मुद्दे
मनोरंजन म्हणून ठेवून जातात...
स्वामि धागे घेऊन येतात
अलंकारिक वाक्ये भिरकावून
केवळ डोकेदुखी देऊन
मिपाकरांच्या डोक्यात जातात
ट्रोलबाजी करून
मजा बघत अज्ञाताच्या अंधारात
गुडूप होतात......
(दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात....
- हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण