सृजनाचा व्यायाम
- डॉ. सुधीर रा. देवरे
- डॉ. सुधीर रा. देवरे
वळ उजवीकडे
अजून एकदा उजवीकडे
अजून एकदा
अजून एकदा
अजून एकदा
थोडा सरळ झालं मागे वळून बघ डावीकडे व उजवीकडे
परत उजवीकडे वळून अजून एकदा एक छोटीशी गिरकी
ये सरळ चालत
अजून एक गिरकी हे डावीकडून मग उजवीकडून अजून एकदा उजवीकडून
मग समोर बघ काय दिसतय
झाली का सिद्धीमंत्राची पूर्वतयारी
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती.
हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )
ऐका दीपांनो तुमची कहाणी.
कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’
‘काय झाले?’
‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’
एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे.
"साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली?
"बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो.
"गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला.
"गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात."
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.)
बनपाव की करवंट्या.......?
त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो.
"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला.
अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते.
"आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो.
"मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे.
"ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी.
#टिचभर_गोष्ट
देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा
निरंजन प्रधान -वाट अदमासे चाळीस
आई लहानपणीच वारली -बाबा मुबई न पा मध्ये finance Department मध्ये नुकतेच वारलेले
निरंजन साधारण बुद्धिमत्तेचा -पण खूप देखणा -अभिनयाची आवड -नाटकात काम करायचा
पण फारसा चमकला नाही -तरी त्या व्यवसायाशी निगडित कलाकाराशी जवळीक असलेला
नाटक या व्यतिरिक्त त्याला अध्यात्म व गूढशक्ती या बद्दल आकर्षण होते
दादर ला वडिलोपार्जित flat
थोडेफार सेव्हिंग वरचे व्याज नाईट मिळाली तर मिळणारे पैसे यावर जगत होता
त्याला छान छाकीचे विलासी जीवन व सुंदर स्त्रिया यांचा सहवास आवडायचा
*
१२ला टॉपर लिस्ट मध्ये आल्या मुळे तिचा सत्कार आयोजित केला होता
संगीता व किरण हे बाल मित्र
१२ वि पर्यंत एकाच महाविद्यालयात ते शिकत होते
संगीता प्रचंड बुद्धिमान मुलगी होती
अक्युमन ची दैवी देणगी तिला लाभली होती
ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती
किरण मास्क-या होता
कुठून कुठून तो माझे मजेचे प्रकार शोधात असे
त्याच्याशी गप्पा मारताना संगीता भान हरपून जात असे
संगीताला किरण खूप आवडायचा रुबाबदार स्नार्ट तरुण होता
पण तिला कधी त्याच्या बद्दल तसे वाटे काही वेळा मैत्री वाटे
या बाबत मात्र ती कायम गोंधळलेले असे