रॉबिन विलियम्स

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
12 Aug 2019 - 12:56 pm

२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती.
हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

* तो अल्लादिन (जुना) मधल्या जिनी चा आवाज होता, या साठी ऑडिशन करतांना त्यांच्याकडे १६ तासांचं मटेरियल तयार झालं आणि चित्रपटात ठिकठिकाणी घेतलंय.

* आज कमल हसन ज्या चाची ४२० साठी प्रसिद्ध आहे तो याच्याच 'मिसेस डाउटफायर' वर बेतला होता.

* तो जुमानजीचा ऍलन पॅरिश होता, ज्याने माझं बालपण समृद्ध केलंय.

* त्याला बॅटमॅन मधला जोकर फार आवडत होता आणि तो करायला मिळावा अशी त्याची मनापासून इच्छा होती. पण दुर्दैवाने पहिल्यांदा तो रोल जॅक निकोल्सन ने मिळवला आणि नंतर रिडलर चा जिम कॅरी ने.

त्याचे हसवण्याचे काही किस्से फेमस होते.

सुपरमॅन वाला ख्रिस्तोफर रिव्हस याचा शाळेपासूनचा मित्र त्याचा अपघात झाल्यावर याने त्याच्या उपचाराचा पूर्ण खर्च तर केलाच पण, या बरोबर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा वेष, विचित्र मुखवटा घालून जायचा आणि रशियन भाषेत बोलून रीव्ह्सला हसवायचा.

स्टिव्हन स्पीलबर्ग त्याचा असाच एक जिगरी मित्र. १९९३ मध्ये स्पीलबर्ग शिंडलर्स लिस्ट बनवत होता, या चित्रपटासोबात रॉबिन विल्यम्सचा वेगळाच ऋणानुबंध होता. शिंडलर्स लिस्ट पहिला कि अजूनही अंगावर काटा येतो, तर तेव्हा तो बनवतांना किती ताण येत असेल याचा विचार न केलेला बरा. पण चित्रपटाच्या क्रू मेंबर्स ना या ताणातून बाहेर काढण्यासाठी स्प्लिबर्ग मग रॉबिन विल्यम्सला फोन करायचा आणि तो फोन स्पीकर वर टाकून तो जीनी च्या आवाजात तिथल्या क्रू ला हसऊन ताण हलका करायचा.

इराक युद्धाचा तो विरोधक होता, तरीही तिथे जाऊन अमेरिकन फौजांचं मनोरंजन करून त्यांचं धैर्य राखण्यात तो कायम आघाडीवर होता.

अख्या आयुष्यभर सगळ्यांना हसवत सगळ्यांचं दुःख दूर करणाऱ्या रॉबिन विल्यम्सचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंट मध्ये सापडला आणि कारण दिलं गेलं नैराश्याने आत्महत्या. नियती क्रूर थट्टा करते ती अशी.

संदर्भ : IMDB

कलानाट्यइतिहासआस्वादअनुभवसंदर्भप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

खास करून त्याने गुड विल हंटिंग मधे जी भूमिका केली होती ती पाहता हा व्यक्ती कोणत्याही कारणाने आत्महत्या करेल ह्यावर विश्वासच बसणे कठिण, न्हवे धक्काच होता.

अवांतर:- का काय माहीत पण मला त्याला सतत सर्दी झाली आहे असा भास व्हायचा.

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2019 - 9:59 pm | कानडाऊ योगेशु

अवांतर:- का काय माहीत पण मला त्याला सतत सर्दी झाली आहे असा भास व्हायचा.

त्याच्या नाकाच्या ठेवणीमुळे वाटत असावे.जीवन ह्या नटाचेही नाक तसेच होते.