प्रकटन

सूर जाणिले कोणी

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
28 Dec 2019 - 9:23 am

खाली दिलेल्या लिंकवर जे गाणे आहे त्यावर काहीतरी खरडलंय.
https://youtu.be/kWOXZmIIrSo

प्रकटनविचारसंगीत

जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
18 Dec 2019 - 2:23 pm

आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.

कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.

प्रकटनविचारसंगीतधर्मइतिहासप्रेमकाव्य

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
12 Dec 2019 - 7:01 pm

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

प्रकटनविचारलेखअनुभवसमाजजीवनमानतंत्रप्रवास

त्रिपात्री आणि एक अंकी नाटक....?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Dec 2019 - 10:42 pm

खालील नाटक हे तद्दन काल्पनिक आहे. केवळ टाइमपास म्हणून लिहिले आहे. ह्या नाटकात कुठल्याही प्रकारचे विचारमंथन नाही. त्यामुळे, खूप विचार करणार्यांनी पुढील नाटक वाचले नाही तर फारच उत्तम.

ज्यांनी वाचले आहे, त्यांच्यासाठी....ह्या नाटकाला योग्य ते शीर्षक द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. ...

...........

प्रकटनविचारनाट्य

कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

avichougule's picture
avichougule in जनातलं, मनातलं
2 Dec 2019 - 10:56 pm

### कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९ ###

खूप दिवसानंतर लिहायचा योग आला आहे निमित्त आहे कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

मागच्या वर्षी ट्रायथलॉन झाल्या बरोबर ठरवलं होत की पुढच्या वर्षी परत नक्की करायचं, कारण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता, हो हो सोहळाच. मग काय एप्रिल मध्ये ट्रायथलॉन ची तारीख आली आणि लगोलग आम्ही सगळे मित्रपरिवाराने नोंदणी केली.

प्रकटनमांडणी

आशय - भाग ६

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
2 Dec 2019 - 9:04 am

भाग 5

माझा संतापाने तिळपापड झाला. चहा प्यायच्या टेबलवर मी त्याला झाप झाप झापला. तो देखील मला सॉरी म्हणाला. तो म्हणाला की रात्री तूच माझ्या जवळ येऊन झोपलास, मला वाटले तुला सवय आहे याची, आणि नकळत माझ्या हातून तसे घडून गेले.
मी देखील त्याला वॉर्निंग देऊन विषय संपवला.>>>>>

प्रकटनसमाजजीवनमान

चाळ तशीच आहे.

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
29 Nov 2019 - 6:35 pm

चाळ तशीच आहे.

आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच.

१०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही.

पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात.

प्रकटनवावर

स्फुट : अनुभव

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
29 Nov 2019 - 2:26 pm

बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!!

प्रकटनविचारजीवनमान

सुखवार्ता

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
22 Nov 2019 - 4:49 pm

समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय

प्रकटनवावर