मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ 26/02/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे 26/02/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान 26/02/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण 27/02/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी 08/03/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड

आकाश खोत ·

पर्णिका 16/03/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली. आमेर जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत. राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते.

राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

आकाश खोत ·

आकाश खोत 04/03/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल. प्याज कचोरी जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले.

दरम्यान

जव्हेरगंज ·

चित्रदर्शी वर्णन. मला देखील कधी कधी अगदी असेच वाटते. >> शांततेशिवाय दुसरं काही मला सापडतच नाही. इतकी घनदाट शांतता बधीर करून सोडते. अगदी असेच होते. परंतु मला त्याबद्दल वैज्ञानिक कुतूहल देखील वाटते. यावरून मला खरेतर डीप स्पेस किती भयंकर असू शकतो मानवी मनांसाठी असा नेहमी प्रश्न पडतो. तुम्हाला एक सुचवतो. तुमच्या लेखातली फीलिंग पकडून ठेवा. काही दिवस अशीच. आणि कृपया three body problem या मालिकेतली तीनही पुस्तकं वाचा. नाही वाचलीत तरी किमान त्यांची ऑडिओ बूक ऐका. किंवा विस्तृत जिस्ट तरी ऐका. विशेषतः तिसरे पुस्तक. ही पुस्तके चढत्या क्रमाने नशीली आहेत. यानंतर काही दिवस तुम्हला खरोखर झपाटल्य सारखे होउन जाइल. कदाचित प्रचंड भीती देखील वाटेल पण एकदा त्या कल्पनेला थोडासा वेळ देऊन पाहा. कोणती कल्पना तर डार्क फॉरेस्टची. एकूण मला तुमचे लेखन आवडले, आवर्जून लिहित जा. असा स्वर या फोरमवर सापडणे दुर्मिळ आहे. मी वाचेन.

गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय? चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा. झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार. मला घाम फुटतो.

राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

आकाश खोत ·

आकाश खोत 22/02/2026 - 18:08
मला हा लेख "भटकंती" सदरात टाकायचा होता, पण भटकंतीवर क्लिक केल्यावर "Access Denied" असा एरर आला. यासंदर्भात कोणाला काही माहित असल्यास सांगावे.

जुइ 23/02/2026 - 02:57
अशा ठिकाणी किती खर्च येऊ शकतो ही माहिती देत आहात हे चांगले केले. फोटो तेवढे अधिक टाकावेत.

मस्त सुरुवात!! पाचव्या प्रचि मधला तो महाल डोंगरातुन उगवुन बाहेर आल्यासारखा वाटतोय. :) मी मागच्या वर्षी सहकुटूंब राजस्थान ला गेलो होतो. पण आठाव्ड्यात पूर्ण होण्यासारखी ही जागा नाहीच. त्यामुळे जयपूर, जोधपूर करुन जैसलमेर केले आणि तिथुन दिल्ली आणि पुणे. त्यामुळे कुनो, उदयपूर ,नाथ द्वारा, चित्तोड गढ, माऊंट अबु सगळे राहीलेच आहे. चित्र भरपूर टाका आणि येउंद्या पटापट पुढचे भाग.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आकाश खोत 24/02/2026 - 09:51
आम्ही तिथे ८ दिवस फिरलो तरीही भरपुर काही शिल्लक आहे. त्यामुळेच आम्हीही "कव्हर" करत सुटायची गडबड न करता जिथे जाऊ ते व्यवस्थित बघायचं ठरवुन फिरलो. 

२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता. ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली. जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती. मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो.

खाडीवरचे दिवस!!

राजेंद्र मेहेंदळे ·

कांदा लिंबू 21/02/2026 - 16:22
व्वा! काय मस्त लिहिलंय! अगदी चित्रदर्शी! त्या नदीच्या प्रवाहासारखेच सतत वाहते निवेदन! अजून अश्याच आठवणी येऊ द्या. - (पोहता न येणारा) कांदा लिंबू

गामा पैलवान 22/02/2026 - 01:00
राजेंद्र मेहेंदळे, मस्तं आठवणी आहेत. मुंबईच्या आसपास केवळ कल्याण, डोंबिवली व मुंबरा इथेच उघड्यावर पोहलं जातं. इतरत्र ऐकलं नाही. उघड्यावर नैसर्गिक वातावरणांत पोहोण्यात जी मजा आहे ती बंदिस्त तरणतलावांत नाही. केवळ पायाने पोहणाऱ्या विवेकास दंडवत. मला उंचावरून पाण्यांत उडी वा सूर मारणाऱ्यांबद्दल अतीव आदर आहे. मला व्यवस्थित पोहता येतं, पण मी कधीच सूरबिर मारू शकलो नाही. चष्म्याचा नंबर प्रचंड असल्याने चष्मा काढल्यावर सगळं धूसर दिसतं. मग ओळखीची जागाही अनोळखी होते. आणि चष्मा लावून पोहणे अशक्य. डोळ्यांवरनं पडला तर गेलाच. जी जागा नीट दिसंत नाही तिथे उडी आजीबात मारायची नाही हा स्वत:वर घालून घेतलेला नियम. त्यामुळे मी नेहमी पाण्यात सावकाश उतरणे अनिवार्य. यावरून माझी काही लोकांनी टिंगलही केली आहे. पण सुरक्षा प्रथम हे ब्रीद असल्याने उड्याबिड्या रद्द. अवांतर : या लेखाची आठवण झाली : https://www.maayboli.com/node/42452 आ.न., -गा.पै.

रामचंद्र 22/02/2026 - 01:42
जबरदस्त! मस्तच, आणि एका अर्थाने हे म्हणजे तिथल्या स्थानिक इतिहासाचं काही प्रमाणात दस्तऐवजीकरण.

सोत्रि 22/02/2026 - 07:46
एक नंबर!! माझ्या लहानपणी गावाकडे, घाटावर, विहीरीत पोहायला शिकावं लागायचं. मुलगा ४-५ वर्षांचा झाला की वडीलच मुलाला विहीरीत ढकलून द्यायचे आणि मुलाला पोहायला शिकण्यावाचून पर्यायच नसायचा. माझ्या अनुभवांची आठवण झाली हा लेख वाचताना. - (पट्टीचा पोहणारा ) सोकाजी

प्रचेतस 23/02/2026 - 10:59
एकदम जबरदस्त लेखन. आता कल्याणची खाडी सुद्धा पोहण्यासारखी राहिली नाही. काळे पाणी आहे नुसते. तुमचे वर्णन वाचून माझ्या पोहण्याच्या दिवसांची आठवण झाली. इकडे पवनेत कधी बुडी मारली नाही पण नाशिकला रामकुंडात, गांधी तलावात आणि कर्‍हाडला संगमावर नदीत पोहोण्याचा आनंद लुटला आहे. अर्थात तुमच्यासारखा पट्टीचा पोहणारा मी नव्हे. अवांतरः कल्याणात सुभाष मैदानाच्या कडेला रिक्रिएशन व्यायामशाळेच्या वर आत्याचे घर होते. आत्याचे यजमान महाराष्ट्र वेटलिफ्टिंङ असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि रिक्रिएशनचे सर्वेसर्वा. त्यामुळॅ कल्याणातल्या बर्‍याच आठवणी आहेत.

@गा पै-- या मुलीला(बाईला म्हणायला पाहिजे खरेतर--) आणि त्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो. आमच्या घरापासुन हाकेच्या अंतरावर राहत. तिच्या वडीलांनी बर्‍याच लोकांना पोहायला शिकविले. त्यांच्याच एका विद्यार्थ्याबरोबर/कडुन मी शिकलो. मी पोहायला लागलो तोवर ते पोहण्यातुन निवृत्त झाले होते. (आठवले काकांच्या प्रसंगामुळे असेल) @प्रचेतस- जोशी सरांबद्दल आपण बोललो होतो मागे एका कट्ट्याला. पुढचा लेख "रिक्रिएशनचे दिवस" असणारे

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गामा पैलवान 23/02/2026 - 14:20
राजेंद्र मेहेंदळे,
त्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो
वाटलंच मला. तुमच्या लेखातली काही नावं त्या लेखातही सापडली. त्या काळी त्या भागातलं कल्याण अगदीच चिमुकली वस्ती होती. माझं आजोळ शंकरराव चौकापाशी आणि मी राहायला ठाण्यात. त्यामुळे फक्त रेलवे स्थानक, शिवाजी चौक, थोडाफार आगरा रोड वगैरे भाग परिचित आहेत. खाडीवर कधी जाणं झालंच नाही. आ.न., -गा.पै.

याला पाण्यापासून धोका आहे असे सांगितल्या मुळे पट्टीचे मासेमार असेल्याला आमच्या आज्याने आम्हाला लहानपणी पोहायला शिकवले नाही. नंतर मग स्वतः होऊनच प्रयत्न केल्याने पोहता येते. मात्र त्याचा राग अजूनही मी कधी कधी आज्यावर काढतो (खेळीत) त्यामुळे माझ्या चिरंजीवना मी वयाच्या पहिल्या वर्षीच पाण्यात उतरवलं. आता या खेपेस त्याला नीट पोहायला येईल. पोहण्यासारखा आनंद नाही. हा lekh

याला पाण्यापासून धोका आहे असे सांगितल्या मुळे पट्टीचे मासेमार असेल्याला आमच्या आज्याने आम्हाला लहानपणी पोहायला शिकवले नाही. नंतर मग स्वतः होऊनच प्रयत्न केल्याने पोहता येते. मात्र त्याचा राग अजूनही मी कधी कधी आज्यावर काढतो (खेळीत) त्यामुळे माझ्या चिरंजीवना मी वयाच्या पहिल्या वर्षीच पाण्यात उतरवलं. आता या खेपेस त्याला नीट पोहायला येईल. पोहण्यासारखा आनंद नाही. हा लेख आवडला हे वे सां न ल.

आमचे गाव भिमानदीच्या काठी. दोन अडीच किलोमीटर लांबीचा किनारा आणी बर्‍यापैकी रूंद आणी खोल नदीपात्र.पावसाळी नदी तरीही फेब्रुवारीपर्यंत पाणी असायचे. मित्राची लिंबाची बाग,बागेत विहीर.मित्राचे वडील साहेबांच्या सैन्यात सुभेदार, सेवानिवृत्त व हायस्कूल मधे गणिताचे शिक्षक नंतर हेडमास्तर ही झाले.धिप्पाड,गोळीबंद कमावलेली शरीरयष्टी करडी शिस्त आणी बेदरकार स्वभाव. जिवंत साप हातात घेउन जमीनीवर आपटायचे. वयाच्या सहा,सातव्या वर्षापासून त्यांच्या बागेत पडीक असायचो. नवव्या वर्षी मित्राच्या वडिलांनीच विहिरीत ढकलून दिले. नाक तोंडात भरपूर पाणी गेले. तळ गाठायच्या आगोदरच बखुटीला धरून वर काढले. दुसर्‍याच दिवसापासून कमरेला पांगरीच्या वाळलेल्या लाकडाचा पेटा बांधून विहिरीत स्वताच उतरलो. एका आठवड्यात कमरेचा पेटा सुटला व पोहायला शिकलो. गावात शंकराच्या मंदिरात मोठे चौकोनी कुंड. चारी बाजूला पडवीवजा खोल्या. जुने दगडी बांधकाम ,पडवीच्या छतावरून कुडांत उड्या मारणे,सूर मारणे,पाठीवर हातपायाचे मुटकुळे करून उडी मारणे अशा अनेक कला बरोबरच्या वरिष्ठ पोहोचलेल्या मित्रांनी शिकवले.(फुकट शिकवणी) आता,अस्मादिकांची पावले नदीकडे वाळाली. पोहायला येत होते.आळीतल्या लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर आली होती. पेटा नव्हता मग डालडाचा डबा सिलबंद केला आणी तो पोरांच्या कमरेला बांधून पोहायला शिकवले. मोठ्या भावाचा किवां वडिलांचा पायजमा फ्लोटर म्हणून वापरण्याची क्लुप्ती कुणीतरी शिकवली. पायजम्याची तिन्ही ओपनिंग सुतळीने घट्ट बांधून ओल्या पायजम्यात तोंडाने हवा भरून फुगवाची आणी दोन्ही पाय व्यवस्थित फुगले की मग ते पोटाखाली घ्यायचे. पोहणारा फुलपाखरू बनायचा. असे त्या वेळचे (१९६२-६३) अनेक इम्प्रोवाईज्ड स्वीमिंग फ्लोटर्स. पावसाळ्यात नदीला खुप पुर यायचा. नदीकाठी मोठा वड ( आजही आहे पण माझ्या सारखाच शिनियर झालाय) आणी सात चिंचाची मोठी झाडे ( झाडे गेली तीथे सिमेंटचे जंगल बनले आहे). पुराच्या पाण्याने त्यांना वेढा घातला म्हणजे मोठी मुले खुप लांबून पोहत यायची. थेट दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावर निघायची. पुढे ही कला आमच्या पिढीला हस्तांतरीत झाली. लहानपण थरारक होते. ना मोबाईल, ना टि व्ही.... आजही तरणतलावात पाठीवर हातपाय न हलवता आर्धा आर्धा तास पडून राहू शकतो. (नातवंड आणी सोसायटीतील लहान मुलांना आता शिकवतो.) आमच्या गावात एका पेक्षा एक पोहणारे महाग्रू आहेत. जेन झी व अल्फा मात्र या कले पासून वंचित आहे आणी राहणार.चास कमानच्या धरणाने पाणी आडवले असल्याने पूर येत नाही.नदीपात्रात जेमतेमच पाणी असते. लेख आवडला हे वेगळे सांगणे नकोच.

खटपट्या 23/02/2026 - 21:57
यावरून एक खूप जुनी गोष्ट आठवली, ठाण्यात कोलशेत रोड ला त्याकाळी सण्डोज नावाची कंपनी होती (आता तीचे नाव नोवार्टीस झाले आहे) त्या कंपनितले काही परदेशी अधिकारी कारखान्यात आले होते. कंपनिच्या मागच्या बाजूने पुढे गेल्यावर खाडी लागते. तिला वसई खाडी म्हणतात पण ती ठाण्यातच होती /आहे. तर हे परदेशी अधिकारी तिथे पोचले तेव्हा तिथे काही स्थानिक कोळी तरुण खाडीत पोहत असताना दिसले. ते तरुण पलीकडच्या तिरावर होते. अधिकार्‍यानी त्याना सहज हात करुन बोलावले. त्यातील सात ते आठ तरुण सरळ उडी मारुन खाडी पार करुन ऐलतिरावर आले. परदेशी अधिकारी इतके इम्प्रेस झाले की त्या सर्व तरुणांना त्यानी सण्डोज कंपनि मधे कामगार म्हणून भरती करुन घेतले. अशा रीती ने स्थानिक जनतेचा परदेशी कंपनिवर काही कारणास्तव राग होता तो ही नाहीसा झाला. त्यातील बरेच लोक आता निव्रुत्त झाले आहेत.

गामा पैलवान 23/02/2026 - 22:23
राजेंद्र मेहेंदळे,
माझे आजोळ तलावपाळीला ठाण्यात आणि मी रहायला कल्याणात--एकदम उलट---आहे की नाही गंमत?
होय तर. गंमत आहेच. तलावपाळीवर कुठेशी आलं तुमचं आजोळ? तरणतलावापाशी असेल तर आपण दोघे एकमेकांच्या आजोळी पोहायला शिकलो. आ.न., -गा.पै.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गामा पैलवान 24/02/2026 - 19:22
मी पोहायला शिकलो तो तरणतलाव लालबागेतंच आहे. आपण परस्परमातुलग्रामतरणशिक्षासंबंधी जाहलो. म्हणजे एकमेकांच्या आजोळी पोहावयास शिकलो. -गा.पै.

सौंदाळा 24/02/2026 - 17:43
खाडीत पोहायला शिकणे म्हणजे डेंजर काम आहे. मी ६-७ वर्षाचा असताना टीव्ही बघून पलंगावरुन कार्पेटवर उड्या मारुन पोहण्याची अ‍ॅक्शन करायचो त्यामुळे मोठ्या अपेक्षेने वडीलांनी मला आणि पाण्याला घाबरत असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीला महापालीकेच्या जलतरण तलावावर नेले. (बहीण एक-दोनदा बीचवर गेलो होतो तेव्हा पाण्याला पाय लावायला पण घाबरत होती.) पण खरोखर पोहायची वेळ आली तेव्हा माझी तंतरली. रडून धिंगाणा आणि नंतर ताप त्यामुळे कसाबसा दोन-तीनदाच गेलो. उलट बहिण मात्र आठवड्यातच छान पोहायला शिकली. त्यानंतर एकदम २५ व्या वर्षी कामचलावू पोहायला शिकलो. ते अजून पण पोहतो कसेबसे ५० मीटर!! पण अगदीच काही न येण्यापेक्शा बरे. तेवढेच कुठे रिसोर्टवर वगैरे गेलो की बायकोसमोर (स्वतःच्या) शायनिंग मारता येते आणि तिला चिडवता येते की कोकणात राहून पण पोहायला शिकली नाहीस म्हणून. त्यामानाने खाडीत पोहणारे म्हणजे भारीच नुकतीच बेरीज / वजाबाकी शिकलेल्यासमोर इंटेग्रेशन करणारा विद्यार्थी :)

कालच एक जुना मित्र बरेच दिवसांनी भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात गप्पा खाडीवर पोहण्याकडे वळल्या. आणि झरकन सगळ्या आठवणी एक एक करून डोळ्यापुढे नाचू लागल्या. मी गोष्ट सांगतोय साधारण ९० ते २००० या काळातील. कल्याणात जरी इमारती बांधायचे पेव फुटले होते तरी अजूनही कुठेकुठे कौलारू घरे होती. रस्त्यावर रिक्षांबरोबर टांगेही चालत होते. पारनाका ,दूधनाका, बाजारपेठ टिळक चौक, अहिल्याबाई चौक इतक्या भागात चालत फिरता येत होते आणि दैनंदिन गरजा भागत होत्या. पण कल्याणात फिरायला जाण्यासारखी ठिकाणे दोनच. खाडी किंवा रेतीबंदर आणि सुभाष मैदान. आता खाडी म्हणजे कल्याणची उल्हास नदी.

सी पी बेरार सर्किट

गवि ·

कंजूस 18/02/2026 - 16:09
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज 'बीबीला' जावं लागणार आहे. आपली 'जीआइपी'. तिकडे जास्ती {लोकल} गाड्या असतात. बीबी... म्हणजे Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI) त्यांचे लघुरूप BB. आताची वेस्टर्न रेल्वे. जीआइपी...Great Indian Peninsula Railway. आताची सेंट्रल रेल्वे.

विजुभाऊ 18/02/2026 - 16:54
सी पी म्हणजे सेन्ट्रल प्रोव्हिन्स ( ज्याला आपण आज मध्य प्रदेश म्हणतो) आणि यु पी म्हणजे युनायटेट प्रोव्हिन्स अशी नावे होती. बेरार म्हणजे वर्‍हाड

गवि 18/02/2026 - 17:03
ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर भारतातल्या लोकांना ब्रिटनचं नागरिकत्व घेण्याचा चॉईस देणं अशक्यच होतं कारण भारतातल्या लहान राज्याइतका त्यांचा देश होता. पण गोवा हे राज्य (पोर्तुगीज काळात) आकाराने लहान होतं. ते सोडून जाताना आणि त्यानंतर पोर्तुगालने गोवा राज्यात १९६० सालापूर्वी जन्म झाल्याचा पुरावा सादर करणाऱ्या गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगालचं नागरिकत्व देऊ केलं होतं. अनेकांनी शाळा सोडल्याचे दाखले सादर करून, आणि कदाचित नसलेले तयार करून देखील, ते नागरिकत्व घेतलं आणि युरोपात स्थायिक झाले. मी असे काही लोक बघितले आहेत.

In reply to by गवि

चावटमेला 18/02/2026 - 17:17
हो. ह्यांतील बरेचसे लोक hospitality धंद्यांत आहेत. लंडन मध्ये ,विशेषतः हिथ्रो विमानतळाजवळील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधे बव्हंशी मॅनेजर, वेटर हे गोवन पाहिले आहेत जे पोर्तुगाल चे नागरिकत्व घेवून आले आहेत. कदाचित इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांना ह्या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात. शिवाय ह्या धंद्यांत पंजाबी विरुद्ध गोवन लॉबीचे राजकारण जोरात चालते असे एका housemate कडून ऐकले. खेदाची बाब म्हणजे भारतात वाढून, शिकून सुद्धा ह्या लोकांना भारताबाबत काडीचेही ममत्व नाही. आम्ही भारतीय नाही तर गोवन आहोत असे अगदी ठासून सांगतात.

In reply to by गवि

खटपट्या 18/02/2026 - 21:34
१९६० च्या आधी जन्म, ही अट अजुनही आहे का? कारण माझा एक मित्र, जो १९६० च्या नंतर जन्माला आला आहे त्याने पोर्तूगाल चे नागरीकत्व घेतले आहे. त्याचा जन्म गोव्याचा.

In reply to by खटपट्या

चावटमेला 18/02/2026 - 22:07
कंपनीतील एका सहकार्‍याच्या मते जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्यांच्यापैकी कुणीही पोर्तुगीज अमदानीतील गोव्यात जन्मले असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करून पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. त्याच्या बायकोला मिळाले. मी एक यूट्युब विडिओ पाहिला होता त्यानुसार दरवर्षी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यात गोव्याचा नंबर पहिला आहे, अगदी पंजाब आणि गुजरातच्याही आधी. असो, उगाच चांगला धागा भरकटू नये म्हणून आवरते घेतो.

चावटमेला 18/02/2026 - 17:07
मी शाळेत असताना २५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते. पुढे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, आणि काही वर्षांनी तेलंगाणा अशी चार राज्यांची भर पडली. अलीकडेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश झाले, आणि दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली चे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश केला.

In reply to by चावटमेला

गवि 18/02/2026 - 17:12
त्या दादरा नगर हवेलीची पण एक गंमत आहे. त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

In reply to by गवि

त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.
हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चेतन 19/02/2026 - 12:54
केरळमध्ये माहे नावाचे एक गाव आहे जे पांडिचेरीचा भाग आहे. याचे कारण हा फ्रेन्च वसाहतिचा भाग होता. तो अजुनही स्वस्त दारुसाठि तसाच ठेवला असावा.

सौंदाळा 18/02/2026 - 17:27
हे पहिल्यांदाच ऐकले रच्याकने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील महाविद्यालये पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत यायची वाटतं पुर्वी.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 18/02/2026 - 17:50
कॉलेजे अजूनही मुंबई विद्यापीठाखालीच येतात. रत्नागिरीत त्यांचे उपकेंद्र पण आहे. दहावी बारावी मात्र पापुमं कोल्हापूर डिव्हिजनखाली येत असावी. पुन्हा चुभुदेघे..

In reply to by गवि

पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ७ जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दहावी, बारावी साठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड ह्या जिल्ह्यात मुंबई विभाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभाग आहे.

अरे वा. मस्त विषय. मला इतिहासाची आवड आहे आणि निदान नकाशा उघडून बघितला नाही तर इतिहास समजणार नाही असे मला तरी वाटते त्यामुळे भूगोलातील इतर संकल्पना (भूखंडमंच/ टुंड्रा प्रदेश वगैरे अजिबात आवडत नसल्या तरी) नकाशा बघायला खूप आवडते. त्यामुळे जमेल तितकी भर टाकेन. पाँडेचेरी (आताचे पुद्दुचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील पाँडेचेरी शहर चेन्नईच्या दक्षिणेला आहे. पण त्याबरोबरच त्या केंद्रशासित प्रदेशात इतर काही प्रदेश आहेत ते पाँडेचेरीला संलग्न नाहीत. ते प्रदेश आहेत- यानम (जे आंध्र प्रदेशात पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे), कराईकल (जे तामिळनाडूत पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे) आणि माहे (जे केरळमध्ये पाँडेचेरीचे इन्क्लेव्ह आहे). ही तीनही ठिकाणे लहान बंदरांची ठिकाणे आहेत. भारतात युरोपिअनांचे राज्य स्थापित झाले त्यावेळेस बंदरांवर नियंत्रण असणे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने फ्रेंचांनी ही तीन ठिकाणे ताब्यात घेतली असावीत. कलकत्त्याजवळ चंद्रनगर म्हणून एक ठिकाण आहे. ते पण फ्रेंचांच्या ताब्यात होते. १९५० मध्ये तिथे सार्वमत घेतले गेले आणि ते ठिकाण भारतात विलीन झाले. जसे पाँडेचेरीमध्ये यानम, माहे, कराईकल ही ठिकाणे लांब आहेत त्याप्रमाणेच गोव्यापासून दिव आणि दमण ही ठिकाणे पण बरीच लांब- गुजरातजवळ आहेत. पण ती ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्यामुळे १९६१ मध्ये गोवा मुक्ती झाली तेव्हा गोवा-दिव-दमण हा केंद्रशासित प्रदेश झाला. सीपी-बेरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार. बेरार म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग. विदर्भाचा पूर्वेकडचा भाग मध्य भारत या राज्यात होता तर पश्चिमेकडचा भाग सीपी-बेरारमध्ये. १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्य स्थापन झाले तेव्हा सीपी-बेरारमधील बेरार म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मध्य भारतात असलेला पूर्व विदर्भ (नागपूर वगैरे) मुंबई प्रांतात सामील केले गेले. उरलेले सीपी, मध्य भारत तसेच विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून मध्य प्रदेश हे राज्य निर्माण करण्यात आले. आता कर्नाटकात बॉम्बे कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक हे भाग दिसतात. ते कुठून आले? तर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली तेव्हा हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले आणि उरलेला भाग- गुलबर्गा, रायचूर, यादगीर वगैरे कर्नाटकात (तेव्हाच्या म्हैसूर राज्यात) विलीन करण्यात आला- तो हैद्राबाद कर्नाटक. तसेच मुंबई राज्यातून उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) तसेच बेळगाव वगैरे भाग कर्नाटकात विलीन करण्यात आला- तो बॉम्बे कर्नाटक. लिहिण्यासारखे बरेच काही आहे. नंतर कधीतरी लिहेन.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि 18/02/2026 - 17:58
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती. डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले. जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि मुंबईची तुंबई झाली, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुबईत महाराष्ट्र नाही वगैरे गोष्टींपासून आमचा बचाव झाला असता. सुबोधजी खरे साहेब सुशेगात होऊन 'चील' म्हंटले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 19/02/2026 - 09:47
क्विलॉन (आताचे कनन्नोर) तपशिलात त्रुटी क्विलॉन म्हणजे कोल्लम हे कोची च्या दक्षिणेस आहे तर कनन्नोर म्हणजे आताचे कण्णूर हे कोची च्या उत्तरेस आहे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जर ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले नसते आणि ते डॅनिश लोकांच्या ताब्यातच राहिले असते तर आज भारताचा भाग असले असते का?

In reply to by अनामिक सदस्य

झाले असते. फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे नंतरच्या काळात भारतात सामील झालीच. तसेच कधीना कधी अंदमानचेही झाले असते.

स्वधर्म 18/02/2026 - 18:11
आजही भारतातील विमानांच्या बॉडीवर व्ही टी - नंबर लिहिलेला असतो. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी आहे असे समजले होते. इंग्रजांचे राज्य जाऊन किती वर्षे झाली, पण आपण आपल्या विमानांना अजून व्हीटी असे नोंदवतो हे समजायला कठीण आहे.

In reply to by स्वधर्म

गवि 19/02/2026 - 09:47
VT बदलले पाहिजे हे तात्विकदृष्ट्या रास्त पण रजिस्ट्रेशन बदलणे आणि इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या विमानांचे, टप्प्याटप्प्याने, हे प्रचंड किचकट आणि खर्चिक काम आहे. त्यातही ही फक्त नंबर प्लेट किंवा शेपट्या नव्याने रंगवण्यापुरती साधी प्रक्रिया नसून असंख्य ठिकाणी त्याची तांत्रिक एन्ट्री देखील असते. त्यात विमान वाहतुकीची वेळापत्रक दृष्टीने महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. ही खूप जुन्या काळापासून जागतिक पातळीवर एस्टॅब्लिश झालेली पद्धत बदलून BH किंवा तत्सम बदल करणे वाटते तितके सोपे नाही. म्हणून ते तहकूब आहे. VT याच अक्षरांचा भारतीय इतिहासातील गौरवास्पद असा फुल फॉर्म शोधणे हा अधिक स्मार्ट उपाय ठरेल. उदा. BMC, बॉम्बे शब्द बदलला तरी बृहन्मुंबई वापरून शॉर्टफॉर्म तसाच ठेवता येतो तत्सम. किंवा VJTI सारखं. व्हिक्टोरिया ज्युबिली ऐवजी वीरमाता जिजाबाई.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि संस्थानेही होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिश भारताला. त्यानंतर एकेक करून संस्थाने भारतात विलीन झाली. पंजाबमधील अशा संस्थानांचे १९४८ मध्ये पेप्सू म्हणून राज्य स्थापन केले गेले होते. पेप्सू म्हणजे पतियाळा अ‍ॅन्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. त्या राज्याची राजधानी पतियाळा होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्या पतियाळाच्या संस्थानिकांच्या कुटुंबातील. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पेप्सू ही राज्ये होती. खालील नकाशात दिसेल की त्यावेळेस पेप्सू आणि हिमाचल प्रदेश हे एकसलग भाग नव्हते तसेच पेप्सूमध्येही पंजाबचा एक भाग 'एन्क्लेव्ह' म्हणून होता. Punjab (नकाशाचा संदर्भः विकीपीडीया) मग नंतरच्या काळात पेप्सू पंजाबमध्ये विलीन करण्यात आले आणि काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधींनी १९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा हे राज्य वेगळे केले.

रेल्वेचे एकुण १८ झोन आहेत. त्यान्ची नावे खालीलप्रमाणे १. मध्य रेल्वे (CR): मुंबई २. पश्चिम रेल्वे (WR): मुंबई ३. उत्तर रेल्वे (NR): दिल्ली ४. दक्षिण रेल्वे (SR): चेन्नई ५. पूर्व रेल्वे (ER): कोलकाता ६. दक्षिण पूर्व रेल्वे (SER): कोलकाता ७. उत्तर पूर्व रेल्वे (NER): गोरखपूर ८. ईशान्य सीमा रेल्वे (NFR): गुवाहाटी ९. दक्षिण मध्य रेल्वे (SCR): सिकंदराबाद १०. पूर्व मध्य रेल्वे (ECR): हाजीपूर ११. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR): जयपूर १२. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR): हुबळी १३. उत्तर मध्य रेल्वे (NCR): अलाहाबाद (प्रयागराज) १४. पश्चिम मध्य रेल्वे (WCR): जबलपूर १५. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR): बिलासपूर १६. पूर्व किनारी रेल्वे (ECoR): भुवनेश्वर १७. कोलकाता मेट्रो (MR): कोलकाता १८. दक्षिण कोस्ट रेल्वे (SCoR): विशाखापट्टणम (१८ वा झोन) ह्यातील मध्य रेल्वे हा झोन पाहिला तर मुखालय मुंबई (छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) हा झोन महाराष्ट्राचा बराचसा भाग, कर्नाटकचा उत्तर पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व्यापतो. त्यातही चर्चगेट ते बडोदा/वडोदरा हा मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत. मराठवाड्यातला काही भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात. कोकण रेल्वेची हद्द सुरु होते रोहा (जिल्हा रायगड) ह्या स्थानकानंतर. ठाणे जिल्ह्यातील उत्तरकोकणाचा भाग पश्चिम रेल्वेत, मुंबई ते रोहा (पनवेल मार्गे) मध्य रेल्वेत आणि रोहा नंतर कोकण रेल्वे. कागदावरील महसुली जिल्हे, राज्ये आणि रेल्वेची हद्द ह्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी आहेत. तुघलकाबाद हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दिल्लीजवळ, आजूबाजूला सगळीकडे उत्तर रेल्वेचे साम्राज्य, पण तुघलकाबाद मधील विद्युत लोको शेड हि पश्चिम मध्य रेल्वे (मुख्यालय: जबलपूर) ह्यांच्या अख्यतारीत.

In reply to by अनिकेत वैद्य

एकतर रेल्वे हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचींत न ठेवता फक्त केंद्र सूचीत आहे त्यामुळे राज्यांना आपल्या राज्यांतर्गत रेल्वे मार्ग विकसित करता येत नाहीत. असे का मला ठाऊक नाही. एकूण भारतीय रेल्वे ही प्रचंड अकार्यक्षम, अजागळ आणि जनतेच्या प्रचंड गैरसोयीची गोष्ट आहे. ती मॉडर्नाईज करणे एवढे विलंब लावणारे प्रकरण आहे की बस्स. डेक्कन भागात रेल्वेचे जाळे अजिबात पसलेले नाही याला केवळ भूगोल कारणीभूत आहे का?

सुबोध खरे 18/02/2026 - 20:04
आमच्या लहानपणी कोकणातील जिल्हे म्हणजे मुंबई आणि ठाकुर असे होते म्हणजे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी. १९७८ च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करायचे ठरले तेंव्हा हे कोकणचे जिल्हे "ठाकुरसि" होणार होते म्हणजे ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग . पण श्री अंतुले यांनी तेवढ्यात मखलाशी करून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड केले त्यामुळे हे ठारारसि झाले ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि आता पालघर जिल्हा वेगळा होऊन पाठारारसि झालंय

स्वातंत्र्यानंतरचे मद्रास राज्य म्हणजे एक अजब प्रकार होता. आताच्या कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा (मंगलोर वगैरे), सध्याच्या केरळमधील उत्तरेकडील मलबार भाग (कासारगोड, कोझिकोडे, मल्लापुरम वगैरे), कन्याकुमारी वगळता सध्याचे पूर्ण तामिळनाडू राज्य आणि तेलंगण वगळता सध्याचा आंध्र प्रदेश एवढा मोठा भाग त्या राज्यात येत होता. सध्या केरळमध्ये असलेले मध्य भागातील कोचीन आणि दक्षिण भागातील त्रावणकोर (तिरूवनंतपुरम वगैरे) यांचे कोचीन-त्रावणकोर हे वेगळे राज्य होते. सध्या कर्नाटकात असलेले कूर्ग हे सुंदर ठिकाण वेगळे राज्य होते. तर सध्या कर्नाटकात असलेला उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) आणि बेळगाव वगैरे उत्तर पश्चिमेकडील भाग मुंबई राज्यात होते. तर कर्नाटकात उत्तर पूर्वेकडील गुलबर्गा, बीदर, रायचूर आणि बेल्लारी सुध्दा हे भाग हैद्राबाद राज्यात होते. सध्या कर्नाटकात असलेले इतर भाग त्यावेळेस म्हैसूर राज्यात होते. १२ वर्षांपूर्वी तेलंगणची स्थापना होण्यापूर्वी दक्षिण भारतात चार (आणि आता पाच) राज्ये दिसतात त्यापेक्षा पूर्ण दक्षिण भारताचा भूगोल पूर्ण वेगळा होता हे आणि मद्रास राज्य किती विलक्षण गुंतागुंतीचे होते हे पुढील नकाशावरून समजेलच. Madras पोट्टी श्रीरामूलूंचा उपोषणात मृत्यू झाल्यानंतर १९५३ मध्ये मद्रास राज्यातील तेलुगु भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश हे राज्य स्थापन करण्यात आले. त्यात कोस्टल आंध्र (विजयवाडा, विशाखापट्टणम वगैरे) आणि रायलसीमा (नेल्लोर, कडप्पा, कुर्नूल वगैरे) भागांचा समावेश केला गेला. तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती कुर्नूल. वर म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारी त्यावेळेस मद्रास राज्यात नव्हते तर ते कोचीन-त्रावणकोर या राज्यात होते. त्या राज्यात मल्याळम भाषा प्रमुख होती तर कन्याकुमारी होते तामिळ भाषिक. म्हणून कन्याकुमारीचे तामिळचे प्रभुत्व असलेल्या मद्रास राज्यात विलीनीकरण करावे म्हणून कन्याकुमारीत निदर्शने झाली. ही गोष्ट १९५५ मधील. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात लढणारे दोन प्रमुख समाजवादी पक्ष होते- जयप्रकाश नारायणांचा समाजवादी पक्ष आणि आचार्य कॄपलानींचा किसान मजदूर प्रजा पक्ष. दोन्ही पक्षांनी बर्‍यापैकी मते घेतली पण काँग्रेसविरोधी मते विभागली गेल्याने त्यांना निवडणुक जिंकणे सोडाच जागाही बर्‍याच कमी मिळाल्या. म्हणून १९५२ मध्ये निवडणुक संपल्यावर या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले आणि प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेस कोचीन-त्रावणकोरचे मुख्यमंत्री होते या प्रजा समाजवादी पक्षाचे वासुदेवन नायर (बहुदा). तर कन्याकुमारीचे मद्रास राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून जी निदर्शने झाली होती त्यावर या वासुदेवन नायर यांच्या सरकारने गोळीबार केला आणि त्यात काही लोक मारले गेले. मग आपल्याच लोकांवर आपले सरकार गोळीबार कसा करू शकते या मुद्द्यावरून राम मनोहर लोहिया या प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी परिवारात पडलेल्या शेकडो फुटींपैकी ही पहिली फूट होती. त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली त्यात बरेच बदल केले गेले. एक तर मद्रास राज्यातून मलबार जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तो मलबार जिल्हा तसेच कोचीन-त्रावणकोर राज्य यांचे विलीनीकरण झाले आणि नवे केरळ हे राज्य बनले. त्याचवेळेस कन्याकुमारीला मद्रास राज्यात जोडण्यात आले. तसेच मुंबई राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव वगैरे भाग, हैद्राबाद राज्यातील तेलंगण हा तेलुगू भाषिक भाग वगळता गुलबर्गा, रायचूर वगैरे भाग, कूर्ग यांचे म्हैसूर राज्यात विलीनीकरण करण्यात आले. आता आपण ज्याला कर्नाटक म्हणतो त्याला तेव्हा म्हैसूर राज्य म्हणायचे. कर्नाटक हे नाव १९७० च्या दशकात दिले गेले. त्याप्रमाणेच हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करून राज्याची नवी राजधानी झाली हैद्राबाद. आणि हे सगळे भाग जाऊन उरलेला भाग राहिला मद्रास राज्यात. त्या राज्याचे नाव १९७० च्या दशकात तामिळनाडू असे केले गेले.

गवि 18/02/2026 - 20:59
काही कायदे देखील पूर्ण राज्य कव्हर न करता एका विशिष्ट भागापुरते लागू होतात. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा पूर्वी मुंबई, महाराष्ट्रातला काही भाग आणि गुजरातचा काही भाग, या एरियात लागू होता. बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणत असत, त्या भागात बहुधा. आताही तो गुजरातमध्ये वेगळ्या नावाने लागू आहे. महाराष्ट्रात या कायद्यात मुंबई आणि काही जिल्हे त्यात कव्हर होतात. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोंकण. मराठवाडा आणि विदर्भाला तो लागू होत नाही. वकिलांनी खात्री करून द्यावी.

मनो 18/02/2026 - 21:21
गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण असे कोकणचे दोनच भाग ब्रिटिश राज्यात होते. त्यांचा उगम त्याहूनही मागे म्हणजे इसवी १५५० सुमारास आहे. नगरच्या निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण याला मोगल निजामशाही तळकोकण म्हणत. त्यात मुंबई, चौल, जंजिरा, अलिबाग इत्यादी सर्व भाग येई. दुसरा भाग म्हणजे आदिलशाही तळकोकण. त्यात तुम्ही म्हणता तो सर्व भाग येई, थेट गोव्याच्या पलीकडे कारवार पर्यंत. शहाजहान बादशहाने निजामशाही घेतली आणि औरंगझेबाने आदिलशाही, यात पन्नास वर्षे मध्ये गेली. हा भाग असा दोन तुकड्यात विभाजित होण्याचाही आधी आणि काही काळ नंतरही यात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. भौगोलिक दुर्गमतेमुळे ऐन मुसलमानी बहामनी राज्यातही ती कशीबशी टिकून राहिली. सूर्यराव सुर्वे, चंद्रराव मोरे, पालवणीचे दळवी, वेंगुर्ला आणि वाडीचे सावंत भोसले, यांची मुळे याहूनही खोलवर जातात. यांच्यावर आपली सत्ता बसवण्यासाठी बहामनी महमूद गवान इत्यादी लोकांनी कोकणात स्वाऱ्याही केल्या. विशाळगडचा दर्गा मला वाटते असल्याच एक आक्रमकाचा आहे. मुळात शिवाजी महाराजांचे आणि मोगलांचे वैर होण्याचे आद्य कारण म्हणजे निजामशाही तळकोकण, कारण यातील कल्याण, रायरी हा जुना निजामशाही तळकोकणाचा भाग निजामशाहीचे नवे मालक मोगलांना मिळायला हवा, परंतु आदिलशाही आणि मोगल यांच्या भांडणात शिवाजी महाराज हा भाग आपल्या राज्यात सामील करून बसले होते. कोकणचे भौगोलिक दुर्गमत्व आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी आपल्या राज्यात सामील केलेला हा पहिला प्रदेश. तुमच्या भूगोलात इतका मोठा इतिहास दडलेला आहे!

In reply to by मनो

गामा पैलवान 18/02/2026 - 23:29
मनो, भूगोलातल्या इतिहासावरनं आठवलं की शंभूपुत्र शाहूमहाराज आपलं राज्य जेफनापट्टण म्हणजे आजचा जाफना इथवर मानीत असंत. तसं असेल तर ते मोठं रोचक तथ्य ठरावं. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रचेतस

रूमशान म्हणजे रोम किंवा सिरिया असे दोन्ही प्रदेश हे होऊ शकतात. पण भारतीयांना इस्तंबूल हेच युरोपातले मोठे शहर वाटत होते का? कुणीतरी मला मागे रूमशान इस्तंबूलच असे सांगितले होते त्यामुळे माझा गोंधळ झाला. विषय होता की शिवशंभू नंतर तेव्हड्या प्रचंड महत्त्वाकांक्षेचे त्या घरात कुणी जन्मले नाही असा. तेव्हा शाहू महाराजांना इस्तंबूल देखील जिंकून घ्यायचे होते असे कुणीतरी मला सांगितले. रेडिट वर की कोरा वर ते आठवत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 12:29
इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया (बायझन्टाईन साम्राज्यातले कॉस्न्टेन्टिनोपल) असेही इकडे म्हटले जात असे. मराठेशाही किंबहुना मुघलकाळात देखील तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य बलाढ्य होते. इतके की मुघल बादशहांना सुद्धा आपल्या बादशहापदासाठी तुर्की खलिफाची मान्यता असणे भाग्याचे आणि जरुरीचे वाटत असे.

In reply to by प्रचेतस

अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा आहे की जुन्या भारतीयांची भौगोलिक समज काय होती उर्वरीत जगाबद्दल? म्हणजे त्यांना मंगोलिया चीन बद्दल माहीत होते का? मराठे मादागास्कर वगैरे पर्यंत गेले होते असे अलीकडे समोर येत आहे. मात्र तेव्हा भारतीयांची युरोपबद्दल काय समज होती. सिकंदर तर खूपच पूर्वी येऊन गेला त्यामुळे भारतीयांना ग्रीस वगैरे प्रदेश ऐकून तरी ठाऊक असणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलेच असेल ना. अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत! https://www.davidrumsey.com/ १५५४ च्या आसपासचा Pirî Reis याचा एक अटलास माझा absolute favorite आहे! त्या वेळेस या माणसाचे एकुण भौगोलिक ज्ञान पाहून मी चाटच पडलो होतो त्याने एवढा प्रचंड अ‍ॅक्युरेट नकाशा बनवला होता तेही अनेक नकाशांचे आणि लोकांचे ज्ञान गोळा करून.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 12:47
अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी व्यापार होत असे. अलेक्झांडरमुळे इंडो बॅक्ट्रियन राज्ये इकडे होतीच. सेल्युकस निकेटरची मुलगी चंद्रगुप्ताला पत्नी म्हणून दिलेली होती. मात्र प्रवासी भारतीयांना लिहिण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे वृत्तांत फारसे उपलब्ध नाहीत. मात्र पेरीप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये त्याबद्द्ल विपुल प्रमाणात आलेले आहे. रोमन इतिहासकार प्लिनीने तर भारतीय आयातीच्या बदल्यात रोमनांच्या सुवर्णनाण्यांचा ओघ भारतात वाहात असल्याबद्द्ल चिंता व्यक्त केली होती. बाकी मंगोलिया, चीन्बद्द्ल तर पूर्वीपासून माहिती होतेच. चीनशी बराच व्यापार होता. मंगोल टोळीवाल्यांनी तर जवळपास १/४ भूभागावर राज्य केले. चोळांनी इंडोनेशिया, मलेशिया इत्यादींशी आपल्या सीमा भिडवल्या होत्या. तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमाराची दहशत खुद्द मस्कतच्या अरबांनी घेतली होती (यावर आजच मिपाकर बॅटमॅनने एक लेख लिहिला आहे) मात्र आपल्या प्रवाश्यांनी केलेली परदेशातील प्रवासांची वर्णने फारशी नाहीत.
अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!
याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दोहो बाजुन व्यापार चालू असल्याने आपल्याला आणी युरोपियनांना एकमेकांविषयी भरपुर माहीती होती. भृगकच्छ, शुर्पारक, कलीयान, माहीम, चेउल (सेमुल्ला) ही प्रमुख बंदरे. यातून सर्वदुर व्यापारी संपर्क असल्याने भौगोलीक माहीतिचीही देवाण घेवाण होत असणारच... (रॉटरडॅम इथल्या नावीक संग्रहात एका कार्टोग्राफरने १६१९ मधे काढलेला कोकणचा नकाशा ठेवलाय तिथे ही बंदरे स्पष्ट दाखवली माझ्याकडे त्याचा फोटो आहे पण मोबाईल मधे आहे. इथे कसा द्यायचा माहीत नाही)

१. पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला नाही. २. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा की नगर? ३. खानदेश नेमका कुठे आहे? आणि नाशिक पश्चिम महाराष्ट्रात घ्यावे का? ४. माणदेश आणि पश्चिम वेगळा करायचा का? ५. मावळ नेमका भाग कुठला? ६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? ७. कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे. ८. कोल्हापूर, सांगली यांना दक्षिण महाराष्ट्र का म्हणत नाहीत? की बेळगाव आणि त्या भागाला म्हणायचे? ९. कारवार बिदर वगैरे हे अलभ्य मराठी प्रदेश यांना काय म्हणावं?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

म्हणजे नेमके काय? माझ्या मते, घाट उतरल्यावर जो तुलनेने समतल प्रदेश लागतो त्याला तळकोकण म्हणतात. का दक्षिण कोकणाला तळकोकण म्हणतात?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 18/02/2026 - 23:49
मला वाटते कोंकणातील कोअर भाग. म्हणजे रायगडच्या दक्षिणेचा, याला म्हणत असावेत. किंवा ते कोंकण जे घाटांच्या उताराच्याही खाली समुद्रसपाटीवर प्रॉपर वसलेलं आहे, ते.. असाही अर्थ असू शकेल. उदा. आंबाघाट येथील गावे, साखरपा येईपर्यंत तळकोकणात मोजत नसतील पण रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड, कुणकेश्वर हे त्यात येत असेल. नेमके माहीत नाही तिकडे लहानपण गेले असले तरी. मी त्याचा अर्थ कुडाळ देवगड सावंतवाडी असा घेत आलोय.

In reply to by गवि

इथे डोंगर आणि टेकड्या संपून बर्‍यापैकी समुद्रसपाटीचा किंवा थोडा उंच पठारी प्रदेश सुरु होतो म्हणून याला तळकोकण म्हणत असावेत कारण घाट उतरल्यावर आपण तळावरच जाणार.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खटपट्या 19/02/2026 - 01:30
पालघर पासुन गोव्याच्या सिमेपर्यंत कोकण आहे, तळकोकण म्हणजे दक्षिणेकडचे कोकण - चिपळूण पासून खाली तळकोकण म्हणण्यास हरकत नाही, पण तळकोकणाची काही सिमा नाही. जसे साउथ मुंबई. पश्चिम महाराष्ट्राबाबत नेहमीच गोंधळ आहे. कारण खरे तर महाराष्ट्राच्या पष्चिमेला कोकण येतो पण त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाहीत. असो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विजुभाऊ 19/02/2026 - 10:40
जावळीत जावळी नावाचे गावच नाहिय्ये, दुसरे म्हणजे पुणे शहर हे हवेली तालुक्यात येते. डेक्कन मात्र भांबुर्डेमधे यते

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस 19/02/2026 - 11:34
जावळी हे नाव गावावरुन नव्हे तर तेथील घनदाट जंगलावरुन आले आहे. झाडांची इतकी दाटी जशी झाडांची जाळीच जणू ते जावळी.

In reply to by विजुभाऊ

आहे. महाबळेश्वर पायथ्याच्या दरे खोर्‍यात जावळी गाव आहे. कुंभरोशी वरुन दरे कडे जाताना रस्त्यावर हे गाव आहे. पुर्वी एक असेल पण सध्या दोन वाड्या आहेत. थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.
मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्‍यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्‍यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवथर इथुन थोडे वरच्या बाजुला सह्याद्रीच्या अगदी पायथ्याला चेरावडी म्हणून गाव आहे (१.५ किमी). त्या गावाच्या पुढे अगदी डोंगर तळात मोर्‍यांचा वाडा आहे... अगदी आत जंगलात असल्याने चटकन सापडत नाही आणी आता फक्त काहीच अवशेष उरलेत. सह्यमाथ्यावरच्या कुंड गावातून खाली खुटे नावाची घाटवाट उतरते तेव्हा ह्या वाड्यावरुन वाट जाते. अम्ही खुटे घाट वाट ट्रेक केलेला तेव्हा हा वाडा बघीतलेला.. तसा अजुन एक मोर्‍यांचा वाडा आहे.. कोयना धरण क्षेत्रात उचाट नावाचे एक गाव आहे त्या गावाच्या पुढे निरपजी म्हणून मोर्‍यांचे कुलदैवत आणी देवराई आहे, तिथेही मोर्‍यांचा वाड्याचे अवशेष आहेत...

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस 19/02/2026 - 11:30
५. मावळ नेमका भाग कुठला?
मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्‍यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्‍यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्‍यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?
बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.
कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.
कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 19/02/2026 - 12:06
तळकोकण म्हणजे सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा. येथे मालवणी भाषा हि जास्त बोलली जाते. रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण डोंगराळ आहे . पोलादपूर सोडल्यावर कशेडी घाट चालू होतो तेथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो तेथपासून हा जिल्हा बराचसा डोंगर आणि माथ्यावरील सडा असाच दिसतो ते खारे पाटण पर्यंत . तेथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो त्यातील बराचसा भाग हा सपाटीचा आहे. हा महाराष्ट्रात कोकणच्या नकाशात दक्षिणेकडचा तळाकडचा भाग म्हणून याला तळकोकण म्हणतात. रत्नागिरी लांजा राजापूर हा भाग सहसा तळकोकणात धरला जात नाही. येथे संगमेश्वरी बोली ( मराठीची एक बोली) बोलली जाते.

In reply to by प्रचेतस

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद. धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज. आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही. तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे. इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

In reply to by गवि

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सुबोध खरे 20/02/2026 - 12:04
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद. यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती. यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले. मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/02/2026 - 00:04
यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात. इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा. सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे. खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल. Ceuta या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता. इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टिनटिन 19/02/2026 - 11:58
ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

खटपट्या 19/02/2026 - 01:33
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

In reply to by खटपट्या

नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे. नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

कांदा लिंबू 19/02/2026 - 11:45
जिल्हाकेंद्र - जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते. सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे. तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे. आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला. २०१४ पूर्वीची स्थिती - जिल्हा -- राजधानी पूर्व गोदावरी -- काकिनाडा पश्चिम गोदावरी -- एलुरु कृष्णा -- मछलीपट्टणम मेदक -- संगारेड्डी प्रकाशम -- ओंगोल

In reply to by कांदा लिंबू

प्रकाशम -- ओंगोल
या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक. लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता. तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 22/02/2026 - 16:19
अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची. m

In reply to by अभ्या..

गवि 22/02/2026 - 17:50
ऑ??? मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो. - (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि ता.क. गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

In reply to by गवि

अभ्या.. 22/02/2026 - 17:59
Locality Name : Tamdalage ( तांदलगे ) Taluka Name : Shirol District : Kolhapur State : Maharashtra Region : Desh or Paschim Maharashtra Division : Pune Language : Marathi and Kannada Current Time 05:55 PM Date: Sunday , Feb 22,2026 (IST) Time zone: IST (UTC+5:30) Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level Telephone Code / Std Code: 02322 . मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

In reply to by गवि

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे. गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.
मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल. १. येडे * २. कवठे * ३. ३२ शिराळा ४. म्हैसाळ (एम) ५. करोली (टी) ६. शिंदेवाडी (एच) ७. रामपूरवाडी (द्विरूक्ती) ८. अलकूड (एम) ९. अग्रण धुळगाव कर्नाटकी नावे : आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. 22/02/2026 - 20:27
जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही. चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे. दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

कंजूस 19/02/2026 - 11:58
माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. १९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.

आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

बाई माझी कंबर लचकली..

आजी ·

छानच विषय, आणि फिजिओ घेउन तुमची कंबरदुखी थांबली हे वाचुन फारच आनंद झाला. नशीब , तुमची फिजिओ ही कायरो प्रॅक्टीशनर नाही. तो एक भयानक अनुभव आहे. कंबरदुखीसाठी आम्ही एका फिजिओ कम कायरो कम कम कम...अशा बाईकडे गेलो. तिकडे तिने वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम तर करुन घेतलेच आणि बक्कळ फी सुद्धा घेतली पण "मी भारतातील २० का ३० का ४० कायरो पैकी एक आहे" असे म्हणुन "मान सैल सोडा/ हात सैल सोडा/पाय सैल सोडा ,जबडा सैल सोडा" असे म्हणत म्हणत ईतके अवयव पिळले आणि असे काही पिळले की मूळची कंबरदुखी बाजुला राहुन नवीन नवीन अवयव दुखायला लागले. ते सेशन घेउन आल्यावर जिम मध्ये १ तास व्यायाम केल्यावर जसा थकवा येतो तसेच वाटते आणि झोपण्याशिवाय दुसरे काही करण्याची ईच्छा होत नाही. या पेक्षा सक्तमजुरी परवडली.

चित्रगुप्त 19/02/2026 - 05:45
आर्‍अ‍ॅच्।च्।आआ.. अरेच्चा. लॅपटॉपीवर ( उशीवर, गादीवर, चादरीवर प्रमाणे) टाईपताना 'क्याप्स्लॉक' का काय म्हणतात ते उघडे होते, त्यामुळे 'अरेच्चा' हे आर्‍अ‍ॅच्।च्।आआ' असे लिहिले गेले. आणि प्रतिसादाचे शीर्षक काय लिहीले होते ते मी 'वयोमाना'मुळे विसरलो, त्यामुळे ते तसेच राहु दिले. -- ते कसे ओळखायचे हे कुणी सांगू शकेल का ? (सध्या मिपावर हुशार हुशार आयायटीयनांचा वावर आहे, त्यापैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल असे वाटते.) असो. नमनालाच पाच उनित वीज घालवून आता पुढचे लिहीतो. आजी, तुम्ही लई म्हणजे लईच खुसखुषीत लिहीता ब्वॉ. (खुसखुशीत' ऐवजी 'खुसखुषीत' जास्त मजेशीर वाटते) तुमच्या त्या इंग्रजी स्पेलिंगांच्या गमती, एमाराय, "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे" वगैरेंमुळे तर "कयामत से मेरी जां कम नही हो" असेच म्हणावे लागेल. मस्त. असेच लिहीत रहा.

सुबोध खरे 19/02/2026 - 10:04
काही वर्षांपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण ( तेंव्हा वय वर्षे ७५) माझ्या दवाखान्यात सुनेबरोबर आली होती. जाता जाता मला म्हणाली अरे डॉक्टर ( आईची मैत्रीण असल्याने मला अगदी लहानपणापासून ओळखते म्हणून अरे) आजकाल मधून मधून माझे गुढघे आणि कंबर दुखतात. मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही घरात फिरून एक गोष्ट तपासून पहा - ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू आजही चालू आहे का? दोन मिनिटे विचार करून त्या म्हणाल्या अरे हो इतकं जुनं अगदी घड्याळ सुद्धा चालू नाही. मग मी त्यांना म्हणालो मावशी, ७५ वर्षे काम करून तुमचं शरीर झिजलं आहे. तेंव्हा असं थोडं फार चालायचंच. ७५ व्य वर्षी तुम्ही उत्तम चालत्या फिरत्या आहात याचा आनंद मानायचा कि दुःख हे तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकर लिहून गेले आहेत. जगायचं कसं ? कण्हत कण्हत का गाणं म्हणत? त्यावर त्या हसून म्हणाल्या-- बरोबर आहे तुझं!

सौंदाळा 19/02/2026 - 19:13
माझी आई काही वर्षांपूर्वी अगदी याच टप्प्यांमधून गेली होती. पण नंतर फिजिओथेरपीने दुखण्याला उतार पडला. आता बसून खूप वेळ प्रवास केला तर अजून त्रास होतो. त्यामुळे आईनेच लेख लिहिला असे वाटले.

हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?

भारत-म्यानमार फाळणी

केदार भिडे ·

मस्त लेख. याविषयी काहीही माहिती नव्हते. हे सॅम डॅरलिंपल विलिअम डॅरलिंपलचे कोणी नातेवाईक आहेत का? विलिअम डॅरलिंपलनी ब्रिटीश भारतावर लिहिलेले अ‍ॅनार्की हे पुस्तक मस्त आहे.

आफ्रिकेमध्ये म्यानमार मध्ये किंवा इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापारा निमित्त किंवा अन्य काही कारणांनी गेलेले भारतीय युद्धामुळे यादवीमुळे परत आले, कित्येक गेले मात्र त्यांच्या कुणाच्या स्टोरी फारशा मांडल्या गेलेल्या नाहीत. रंगून मंडाले सिलोन हे शब्द ब्रिटिश साम्राज्याची छाप भारतावरून जसजशी भेटली तसतसे गायब झाले. मेरे पिया गये रंगून किया है वहा से टेलीफोन अशी गाणी एके काळी भारतात लोकप्रिय होती. साऱ्या भारतीय उपखंडातील आणि दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियन सारखा प्रयोग करावा असे काही जुन्या विचारवंतांच्याही मनात येत असे एकेकाळी मात्र असे युनिफिकेशनचे विचार आता कोणीही करत नाही

वासुदेव बळवंत फडकेंना एडनला कारावासात ठेवले गेले होते आणि त्यांचा मृत्यू तिथेच झाला.
मुळातच त्या वातावरणातून आल्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा यशस्वी ठरले तर नवल ते काय. मारवाडी लोकांबद्दलही असे म्हणता येईल.
सहमत. मारवाड भागात वाळवंट असल्याने तिथे राहून काही होणार्‍यातले नव्हते. त्यामुळे मारवाडी लोकं तिथून बाहेर पडून सगळीकडे पसरले. अगदी बंगाल आणि आसामातही मारवाडी लोक सापडतात. आणि ही गोष्ट आजची नाही तर बरीच जुनी आहे. बंगालमधे जगत सेठ ही उपाधी असलेले प्रचंड श्रीमंत (अगदी दिल्लीच्या बादशाहला पैसे कर्जाऊ देणारे) पिढीजात मारवाडी सावकार होते. फर्रूखसिय्यर बादशाहला त्यांनी सत्तेवर यायला मदत केली होती म्हणून त्याने त्यांना जगत सेठ ही उपाधी दिली होती. मारवाडी लोकांना ते राहायचे तिथली प्रतिकूल परिस्थिती हे बाहेर पडण्यासाठी हातपाय मारायला कारण झाले असे म्हणता येईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/02/2026 - 08:55
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/02/2026 - 08:58

सोत्रि 15/02/2026 - 09:02
>> एवढे होऊनही कितीतरी भारतीय मलेशियात राहिले…. स्वतंत्र मलेशियात नंतर भारतीय लोक आणखीनच बाहेर फेकले गेले, बहुतेक चुकून मलेशिया टाइपलं गेलंय, संपादकांना सांगून तेवढं दुरूस्त करून घ्या! बाकी लेख उत्तम, शेवटचा परिच्छेद एकदम मस्त! - (मलेशिया कर्मभूमी असलेला) सोकाजी

चौथा कोनाडा 19/02/2026 - 17:38
माहितीपुर्ण इतिहास... या बद्दल कधी वाचण्यात आले नव्हते ... जिज्ञासाही वाटली नवह्ती !
म्यानमारमधील भारतीय एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आजचा म्यानमार तत्कालीन ब्रिटिश वसाहतवादी आक्रमणात सापडला आणि तेव्हापासून ब्रिटिश भारताचा एक प्रांत झाला. त्यामुळेच भारतीयांची मुक्त ये-जा सुरु झाली. भारतातील लोकांना म्यानमारमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ती म्यानमारमधील वाढत्या तांदूळ उत्पादनामुळे. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे तिथून पुरवल्या जाणाऱ्या तांदुळावर परिणाम झाला. त्यामुळे तांदूळ उत्पादनासाठी नव्या प्रदेशाच्या शोधात ब्रिटिश होतेच. त्यातूनच म्यानमारमध्ये तांदूळ लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील शेतात कामगार म्हणून जाण्यासाठी भारतीयांनी सुरुवात केली, त्यात बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र येथील लोकांचा मुख्य समावेश होता. त्याकाळी बंगाल-बिहार येथील लोकांना जमिनीमार्गे म्यानमार मध्ये जाणे शक्य होते आणि समुद्रमार्गे जायचे तर चेन्नई येथून रंगूनला जाता येई त्यामुळे वरील प्रदेशातील कामगारांची संख्या जास्ती राहिली. यातूनच तामिळनाडू मधील चेट्टीयार जातीतील लोकांनी आपला बँकिंग व्यवसाय थाटला. त्यातूनच इंडियन ओव्हरसिज बँक आणि इंडियन बँक यांची स्थापना झाली. १९३१ साली १.४ करोड लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये १० लाखाहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. म्यानमारमध्ये त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात बंगाली, तामिळ आणि तेलगू यांची संख्या अधिक असून १५ हजार पंजाबी बोलणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. म्यानमारमधील तत्कालीन अर्थव्यवस्थेत अगदी मजुरांपासून वरिष्ठ पदांपर्यंत भारतीय लोक प्रस्थापित झालेले होते.
खुपच रोचक माहिती ! धन्यवाद !

खटपट्या 20/02/2026 - 03:24
स्थलांतरित लोक - हा परीच्छेद जास्त आवडला. आणि बर्‍याच अंशी सहमत आहे. रच्याकने - अभिनेत्री हेलन ही काही अपरीहार्य कारणास्तव रंगून पासून चालत भारतात आली असे ती एका मुलाखतीत म्हणाली. कदाचीत मोठ्या स्थलांतराच्या वेळेस हे झाले असावे.

In reply to by खटपट्या

खटपट्या 20/02/2026 - 03:28
नेटवर सर्च करता ती दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमणापासून वाचण्यासाठी चालत आली अशी माहीती मिळाली. Yes, the legendary Hindi cinema actress and dancer Helen (Helen Ann Richardson) walked from Burma (now Myanmar) to India as a young child to escape the Japanese occupation during World War II. Here are the details of her journey: The Trek: Following the death of her father during the war, Helen, her mother, and her brother trekked for months from Rangoon (now Yangon) to Dibrugarh in Assam, India, in 1943. Hardships: They traveled through forests and hundreds of villages, often starving and penniless, with Helen and her mother reduced to nearly "skeletons" by the time they reached India. Survival: They were helped occasionally by British soldiers who treated their blistered feet and provided food. Aftermath: After arriving in Assam, they later moved to Calcutta (now Kolkata), where her brother unfortunately passed away from smallpox

लिओ 17/04/2026 - 22:32

ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या फाळणी उल्लेखात तुम्ही सविस्तर लिखाण केले आहेत. यात तुम्ही आखाताचा सुध्दा उल्लेख केलात.

या कालखंडात एक लहान घटना भारतात घडली

भारतात IMA ( Indian Military Academy ) ची स्थापना झाली
IMA ची पहिलि तुकडी १९३५ साली बाहेर पडली, या तुकडीला "The Pioneers" म्हणुन ओळखले गेले. या "The Pioneers" तुकडीचे ३ कॅडेटनी पुढे जाऊन ३ वेगवेगळ्या देशांच्या लष्कराचे सरसेनापती पद भुषवुन त्या देशांच्या लष्कराचे नेतृत्व केले.

१ भारत- फिल्ड मार्शल सॅम माणैकशॅ
२ बर्मा - स्मिथ ड्युन
३. पाकिस्तान - मोहम्मद मुसा खान

एकमेव योगायोग

वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.

भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....

नागनिका ·

सोत्रि 12/02/2026 - 13:06
उत्तम आणि समयोचित (एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर) लेख!
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात.
_/!\_ - ('कोहम्'चा प्रवासी) सोकाजी

हा अत्यंत चुकीचा दावा आहे. बहुतेक भारतीयांना अलीकडे असे वाटत आहे की पाश्चात त्यांनी फक्त मटेरियल गोष्टींमध्ये आनंद शोधला आहे परंतु हे एका विवक्षित न्यूनगंडातून मांडले जाणारे अत्यंत उथळ असत्य. युरोपात अनेक ठिकाणी जुन्या मॉनेस्टरीज आहेत जिथे ऐहिक सुखांचा पूर्ण त्याग करून लोक अध्यात्म साधना करतात. पाश्चा त्यांनी एक प्रश्न सोडवले का तर सोडवले आणि त्यातून त्यांना आज उत्तम जीवनशैली मिळालेली आहे. एखाद्या खेडेगावात राहणारे युरोपियन कुटुंब आणि भारतात अगदी मोठ्या शहरात देखील राहणारे भारतीय कुटुंब यांच्यामध्ये युरोपियन कुटुंब हे जास्त सुखी आणि समाधानी आहे. शिवाय युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे. ला ग्रांडे बेलेजझा हा सोरिंतीनोचा चित्रपट पहा. त्यामधली नन म्हणते की मी दारिद्र्याचे व्रत घेतले आहे. एक फार सुंदर प्रसंग या चित्रपटात आहे. एका धन दांडग्या माणसाच्या घरात ही नन मुक्कामाला थांबलेली असते मात्र सुख सुखासीन बेडवरती न झोपता ती तिच्या सवयीने खाली फरशीवरच झोपते. पहाटे बाहेर बाल्कनीत येते तेव्हा तिथे बाल्कनीत अनेक फ्लेमिंगो उतरलेले असतात. काल झालेल्या रात्री झालेल्या अत्यंत lavish डिनर मध्ये उरलेले अन्नपदार्थ हे फ्लेमिंगो खात असतात. आणि ही नन एक हळुवार फुंकर घालते आणि हे फ्लेमिंगो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. ॲनी बेझंट त्यांनी भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली असे आम्ही शाळेत वाचले होते. यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही धर्मांच्या शिकवणुकीचा तौलनिक अभ्यास करणारी माणसे असावेत. पाश्चात्य तत्त्वज्ञ लोकांमध्ये तुम्ही म्हणता तशी मांडणी अजिबात दिसत नाही त्यामुळे तुमचे आकलन उथळ आहे एवढेच नमूद करू इच्छितो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि 12/02/2026 - 13:55
युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे.
जस्ट फॉर क्युरियोसिटी, कोणकोणते धर्म यात येतात की युरोपियन धर्म असा एक धर्म म्हणता आहात? - (क्युरियस) सोकाजी

In reply to by सोत्रि

जेव्हा आपण 'युरोपियन धर्म' म्हणतो, तेव्हा त्यात प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे विविध पंथ (कॅथोलिक, ऑर्थोडॉक्स इ.) येतात, कारण तिथल्या मॉनेस्टरीज किंवा मठांची परंपरा याच धर्माशी घट्ट जोडलेली आहे. (सेंट बेनेडिक्ट यांनी स्थापन केलेले मठ. येथील भिक्षूगरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकतेची शपथ घेतात, मी जिथे राहतो तिथून जवळच असा एक मोठा मठ आहे जिथे आजही अतिशय साधेपणाने जीवन घालवणारे लोक आहेत.) ऑर्थोडॉक्स यांच्यात उदाहरण ग्रीसमधील माउंट अ‍ॅथोस. सेंट फ्रान्सिस सारख्या लोकांनी तर होली पॉवर्टी सारखी तत्वे मांडून आयुष्यभर त्यांचा प्रसार केला. मात्र, ख्रिस्ती धर्माच्या आधीही युरोपमध्ये स्टोईक (Stoic) किंवा पायथागोरियन यांसारखे विचारप्रवाह होते, जे ऐहिक सुखांपेक्षा संयम आणि साधेपणाला जास्त महत्त्व देत असत. थोडक्यात सांगायचे तर, युरोपीय संस्कृतीत केवळ एका धर्माचा प्रभाव नसून, ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून ही 'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही. (धर्माचे ओरिजिन हा टेक्निकल मुद्दा इथे अपेक्षित नाही. नाहीतर ख्रिस्ती धर्म हा इस्रायली धर्म होईल. हेच बौद्ध धर्माच्य बाबतीत आहे. आज बौद्ध प्रामुख्याने पौर्वात्य देशांतला प्रबल धर्म आहे)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नागनिका 12/02/2026 - 14:51
एका सिनेमाच्या एखाद्या प्रसंगावरून तुम्ही युरोपिय धर्माची तळी उचलत आहात? Annie Besant या भारतीय धर्मावरून प्रभावित होऊन त्यांनी फिलोसॉफीकल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचे प्रेरणा स्थान मूळ देशाच्या संस्कृतीशी नवते. Stoic पंथ वेद्निर्मिती नंतर सहस्रोवर्षानंतरचा आहे. तोपर्यंत वेदातील ज्ञान जवळ जवळ सर्व जगामध्ये पसरले होते. असो.. वैयक्तिक टिप्पणी करून ' झिरो सिव्हिक सेन्स' ट्रेंड तुम्ही फारच गांभीर्याने घेतलेला दिसतोय.

In reply to by नागनिका

>> पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. असे लिहिताना मात्र आपण एकदम ऑब्जेक्टिविटीची परिसीमाच गाठली आहे जणू. मी कुठल्यही धर्माची तळी वगैरे उचलत नाही. वेदांमधे फक्त ज्ञान आहे हा एक खूप मोठा गैरसमज अनेक लोक करून घेतात. वेदांमधील साधारण ९०% ते ९५% भाग हा कर्मकांडाचा आहे ज्यात सगळ्या भौतिक सुखांच्या याचना आणि गरजांसाठी केलेले यज्ञयाग मंत्रे कथा आणि असेच भरताड आहे. येस. इंद्रियसुखे. ऐहिक सुखे. केवळ ठराविक भाग निवडून ९५ टक्के भाग मात्र सोयीस्कर दुर्ल़क्षित करून तुम्ही काय वेगळे करत आहात? साधारणतः उर्वरित भागात आधिभैतिक प्रश्नांचा वेध घेतला आहे. शिवाय त्यातही मुळात केवळ आणि केवळ एत्तदेशियांच्या इन्जिनियसपणातून हे ज्ञान डिस्कस झाले असा फारच गोड गैरसमज करून घेतलेला दिसतो. मुळात आर्य पुरुष इथे कुठून आले? ज्याप्रमाणे अल्केमी या गोष्टींनी आयुर्वेदात रससिद्धांत वगैरे गोष्टी इन्ट्रोड्यूस झाल्या त्याच प्रमाणे वेद असोत किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञान, ज्ञान हे कोलॅब करून आणि कल्पना एक्सेंज करून विकसित झालेले असते. बाकी आपण केवळ न्यूनगंडात्मक आणि मुख्य म्हणजे अज्ञानमूलक आत्मस्तुतीतच मग्न राहणार असाला तर जो जो वांछील तो ते लाहो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विवेकपटाईत 13/02/2026 - 10:15
उत्तम लेख. स्वामी दयानंद यांची संपूर्ण विचारधारा विज्ञान निष्ठ होती. वेदांची विकृत व्याख्या करणाऱ्यांवर त्यांनी चपराक लावली. देशांत शुद्धी आंदोलन सुरू केले. शिक्षण संस्था उघडल्या. आज आर्य समाजाच्या १५०००० शाळा आणि कॉलेजेस आहेत. शेकडो गुरुकुल ही आहेत. याशिवाय स्वामी दयानंद चे शिष्य स्वामी रामदेव यांनी तर नवीन शिक्षा बोर्ड स्थापित केला आहे. आजच्या घटकाला पाचशेच्या जवळ शाळा भारती शिक्षा बोर्ड शी संबंधित झालेल्या आहेत. पुढील पाच-सात वर्षात ही संख्या काही हजारांवर जाईल. .बाकी अण्णा तुम्ही ही इतरांप्रमाणे निश्चित न्यूनगंडाने पछाडलेले आहात. ऋग्वेद तुम्ही वाचलेला नाही. बाकी आयुर्वेद पूर्णतः विज्ञान निष्ठा आहे. आज आयुर्वेदातील अनेक औषधी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर रिसर्च द्वारा प्रमाणेच झालेल्या आहेत. आजच्या घटकाला देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा जिथे सेल पासून ऍनिमल ट्रायल्स ची पूर्ण सुविधा आहे एका आयुर्वेदिक कंपनी जवळ आहे. असो. बाकी स्वामी दयानंद त्याकाळचे सर्वात मोठे प्रगतिशील आणि पुरोगामी व्यक्तित्व होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि 12/02/2026 - 17:04
ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून
धन्यवाद! हीच क्युरीयासिटी होती.
'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही.
ह्याबद्दल जरा वेगळं मत आहे माझं. कॅपिटलिझम आणि त्यावर आधारित सध्याची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांनी जगावर लादलेली इकॉनॉमिकल चौकट आहे. ज्याच मूळ भोगवाद किंवा इंद्रियसुखांची लोलुपता हे आहे. जगात कोणी समाधानी असता कामा नये हा या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. जर सगळे समाधानी झाले, कन्टेन्डेड झाले, तर उत्पादन कसं चालू राहणार आणी वाढणार आणी मग प्रचंड नफा कसा मिळणार? म्हणून 'अधिकचा हव्यास' सतत असेल अशी इकॉनॉमिकल चौकट राबवली आहे. त्या आत्यंतिक नफ्यातून येणार्‍या अफाट आणि अमर्याद पैशामुळे, इंद्रियसुखांची परीसीमा गाठण्याचा हव्यास वाढत जातोय. एप्स्टीन हे उघड झालेलं फक्त एक प्रकरण. पण म्हणून हे फक्त पाश्चिमात्य देशांतच होतंय का? तर नाही, जिथे जिथे अफाट आणि अमर्याद पैसा आहे तिथे तिथे हे आहेच. भारतीय तत्वज्ञानात, आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनशास्त्रांनी, सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पातळीवर केला आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानात 'त्याग आणि शिस्तीची' तत्व (उदा. होली पॉवर्टी सारखी) आहेत त्यांच्यामागे भारतीय तत्वज्ञानाइतका सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पारमार्थिक विचार नाहीयेय. हेच पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो असण्याचं कारण आहे. सुदैवाने आपला भारतीय तत्वज्ञानाचा वारसा हा पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा परिपक्व आहे. मी ह्या लेखातल्या फक्त ह्या गाभ्याशी सहमत आहे.
भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते.
हा तुमच्या आक्षेपाचा अजून एक बेस आहे की नाही ते माहिती नाही पण असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे. भावनिक होऊन अशी आत्यंतिक मतं मांडली जातात हे मान्य असल्याने मी पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा लेखातील काही काही मतं 'विथ पिंच ऑफ सॉल्ट' घेतली होती. - (संतुलित) सोकाजी

Bhakti 12/02/2026 - 14:05
वेदांकडे चला स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन _/\_
एपिस्टन फाईलचे अनेक रील, त्याची माहिती एकामागून एक पाहिली.ते पाहताना अक्षरशः भडभडून ओकून द्यावं वाटल. जग हॆ सैतान प्रवृत्तीने भरलेलेच आहे. सत्ता, पैसा, व्यभिचार याने बरबटलेले आहे.तरीही या जगात आपल्याला जगायचं आहे. मी पण त्या दिवशी "ज्ञानयोग" पुस्तक वाचले .तेव्हा कुठे शांत झाले ... अशा वेळी मला वेदांत, अद्वैत यांचा खूप आधार होतो.विवेकानंद यांच्या भाषेतलं वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे.जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.

In reply to by Bhakti

एपस्टिनचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून एका वर्षाने म्हणजे साधारणः २०२० च्या आसपास पासून मी त्याच्या मागावर होतो. फॉर सो मेनी ऑदर रीजन्स. खूप मोठा रॅबिट होल आहे हा. आता वरती आले आहे हे फक्त केवळ वरवरचे अर्धवट सत्य आहे असे मला वाटते. त्याच्या फाइलस (एकूण संख्या चाळीस लाख) मधल्या काही फाइल्सची सर्वच्या सर्व पानेच्या पाने रिडॅक्ट केलेली आहेत म्हणजे अक्षरश: एकही शब्द खुला नाही. यावर कधीतरी विस्ताराने लिहिण्याचा विचार आहे मात्र वेळे अभावी ते कधी शक्य होईल कुणास ठाऊक.

In reply to by Bhakti

तो गुन्हेगार होता हे कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे त्याच्या अनैतिक कृत्याचे मी कोणतेही समर्थन करत नाही. मला फक्त इतकेच म्हणाय्चे होते की यात सर्व बाजूंचे लोक गुंतले आहेत त्यामुळे निष्पक्ष सत्य कधीही बाहेर येणार नाही.

In reply to by Bhakti

सोत्रि 12/02/2026 - 17:10
भक्तीतै, वेलकम बॅक!
वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे, जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.
हा बाउन्सर डोक्यावरून गेला. - (विचारात पडलेला) सोकाजी

In reply to by Bhakti

Bhakti 15/02/2026 - 09:53
अजून एक सांगायचं राहिल. एपिस्टिन फाईलमधली काही नाव बिल गेटस, स्टीफन हौकिंग!!!! बापरे एके काळी कदाचित आतापर्यन्त जे अनेकांचे आदर्श होते... त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. त्यामुळे हॆ प्रकरण "अंधश्रद्धा"ने घेरलेले आहे ही चर्चा आहे. आदर्श कोणालाच मानायचं नाही (ती भक्तगिरी असतें )आपली विचार क्षमता वाढवत न्यायची, हॆ आधीच ठरवलं होतं. अशा मोठ्या लोकांची नाव वाचून जे ठरवलं त्याला अजून बळकटी मिळाली.

In reply to by Bhakti

मी पुन्हा सांगतो आहे. एकूण फाइल्स ची संख्या चाळीस लाखांहून जास्त आहे. त्यात अनेक ईमेल्स, अगदी त्याच्या संग्रहातले न्यूजपेपर आर्टिकल वगैरे सगळेच आहे. केवळ त्याचे ईमेल्स वगैरे नाहीत. एपस्टाइन हा फिज़िक्सचा प्रोफेसर देखील होता. त्याने फिज़िक्स शिकवले होते. श्रीमंत झाल्यावर त्यांने त्याच्या बेटावर अनेक शास्त्रज्ञांना चर्चांना निमंत्रित केले होते. त्यातल्या कित्येकांना तो काय काळे धंदे करत होता हे माहीत असणे हे गृहीत धरू नका. स्टीफन हॉकिंग बरोबर एक गुंडाने फोटो काढला म्हणजे हॉकिंग गुंड ठरत नाहीत. स्टीफन हॉकिंग यांनी कोणतेही अत्याचार केले आहेत असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. >> त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती. स्टीफन हॉकिंग यांचे नाव आले आहे आणि त्यांचे फोटो असले म्हणजे ते गुन्हेगारच आहेत असा अर्थ काढणे अजिबात योग्य नाही. मी अगदी मोदींच्या चारित्र्यहननाचा देखील विरोध करतो. माझे आणि त्यांचे किती पटते हे सगळ्यांना ठाऊक आहेच मात्र त्यांना ठरकी म्हणणे, किंवा त्यांना देशद्रोही ठरवणे याला माझा विरोध आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

https://www.theguardian.com/us-news/2024/jan/05/prince-andrew-clinton-hawking-what-do-the-epstein-documents-say-about-key-people या मधे स्पष्ट सांगितले आहे की हॉकिंग यांच्यावर जी राळ उडत आहे ती पूर्णपणे बेसलेस आहे. पासिंग उल्लेख आले की गुन्हेगार ठरवावे ही कसली मनोवृत्ती आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 15/02/2026 - 13:30
तरी मी अजून मोठी नाव लिहायचं टाळलं आहे. स्टीफन हॉकिंग तिथे असल्यामुळे अंधश्रद्धा या प्रकरणाशी जोडली जाण्याची जास्त शक्यता मला वाटत आहे. adrenochrome हार्वेस्टिंग करून लहान मुलाचा बळी दिला जातं असावा असा अनेकांनी दावा केलाय. कशाला ही अंधश्रद्धा??अमाप सत्ता "उपभोगायला" मिळावी म्हणून..
तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती.
माझ्याकडून अशा अपेक्षा नका करू. आणि मला माहितेय या शंका करोडो लोकांच्या आहेत, केवळ माझ्या नाही.

In reply to by Bhakti

कॉमी 16/02/2026 - 11:59
करोडो लोकांना असल्या म्हणजे त्या व्हॅलीड शंका आहेत असे नव्हे. हे ॲड्रेनोक्रॉम वैगेरे अत्यंत बॉटम ऑफ द बॅरल अर्थात अत्यंत बेसलेस अफवा आहेत.

In reply to by Bhakti

एपस्टिन फाईल्स हा प्रकार विशेष फॉलो करत नाहीये. मात्र एपस्टिन फाईल्समध्ये जे काही आहे हे धक्कादायक असले तरी नवीन नसावे. आणि भारतातही असे प्रकार होत नाहीत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे मंडळींच्या उपस्त्रिया, नाटकशाळा वगैरे असायच्याच. त्यांना लग्नाच्या बायकोचे स्थान थोडीच होते? ठेवलेल्या बायका सोडून त्यांची फार किंमत केली जात होती असे वाटत नाही. ती जुनी गोष्ट झाली म्हणून समजा सोडून दिली. पण आताच्या काळातही असे प्रकार चालत नाहीत असे आहे का? भारतातील एका मोठ्या बी-स्कूलमध्ये चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी असेल तर प्लेसमेंट कमिटीमधल्याबरोबर झोपावे लागेल अशी मागणी प्लेसमेंट कमिटीतील कोणत्या मुलाने केली किंवा अशी चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी म्हणून मुली झोपायला पुढे झाल्या असे दोन्ही बाजूंने चालणारे परस्परांना सहकार्य करणारे प्रकार झाल्याचे रेडिट आणि कोरावर कालपरवा वाचले. असले प्रकार पूर्वीही होत असले तरी नाकासमोर चालणार्‍या माझ्यासारख्याच्या ते लक्षात आले नसावेत. आपल्यासारख्यांना हे सगळे धक्कादायक वाटले तरी sex sells is a fact. मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये सेल्समध्ये क्लाएंटबरोबर बसून दारू प्यायली आणि मुलगी असेल तर दुसरे काही प्रकार केले तर मग कंपनीला जास्त बिझनेस आणता येतो आणि जास्त बिझनेस आणला की कॉर्पोरेट शिडी अधिक वेगाने चढता येते. दिसायला चांगली आणि ढिले कॅरॅक्टर असेल तर अशा मुली अशा ठिकाणी भरपूर प्रगती करतात. अर्थात भरपूर प्रगती झालेल्या सगळ्या तशाच असतात असे मला नक्कीच म्हणायचे नाही पण असे करणार्‍यांची भरपूर प्रगती होते हे पण तितकेच खरे. या सगळ्या गोष्टी सगळीकडे पडद्याआड चालूच असतील- केवळ एपस्टिन फाईलने ते बिंग फोडले म्हणून ते उघड झाले इतकेच. शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच असतात. तेव्हा या बाबतीत भारतीय लोक फार वेगळे असतील असे वाटत नाही. एपस्टिन फाईलमुळे पाश्चिमात्य लोक भोगवादात बुडलेले पण भारतीयांची सद्सदविवेकबुध्दी जागृत असते असे काही असेल असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 15/02/2026 - 13:40
नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर भारतीय लोकांचीच मक्तेदारी नाही. अर्थात भारतातही हॆ प्रकार घडतात, काही तरी उजेडातही येत नाही. आसाराम आणि त्याच्या भक्तांचा किळसवाणा प्रकार कोणीच विसरले नाही. पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.

In reply to by Bhakti

पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही. कोणी कसला आधार घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. त्याविषयी इतरांना काही आक्षेप असायचे कारण नाही.पण हा मुद्दा जरा वेगळा आहे. मुद्दा हा की एपस्टिन फाईल्सच्या निमित्ताने पाश्चिमात्य (लोक/संस्कृती/तत्वज्ञान) भोगवादात बुडलेले आहे त्यापेक्षा भारतीय तत्वज्ञान अधिक चांगले आणि चुकीचे प्रकार करण्यापूर्वी भारतीय मन शंभरदा विचार करते आणि आपला त्यागवाद अधिक श्रेष्ठ आहे या दाव्यावर सगळी चर्चा आहे. कोणी कोणता मार्ग जोखाळावा याच्याशी त्याचा संबंध नाही.

विजुभाऊ 12/02/2026 - 15:16
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का?

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 12/02/2026 - 17:19
धर्म हा कुठल्यारती एका विचारसरणीवर (Dogma) आधारलेल्या संप्रदायाचं किंवा पंथाचं (Cult) दुकान असतं. दुकान चालवायचं म्हणजे गिर्‍हाइकं आकर्षित करावी लागतात. परलोकात सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असं हे दाखवलेलं गाजर असतं, मार्केटींग गिमीक. :=)) बोला, तुम्हाला काय हवय, रंभा उर्वशी की ७२ हूर?

😜

- (अधार्मिक) सोकाजी

In reply to by विजुभाऊ

मूकवाचक 13/02/2026 - 09:52
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात - आत्मिक आनंदाच्या तुलनेत कमी प्रतीचे मानत असतील, सरसकट पाप मानत नाहीत. परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. - अशा गोष्टींचा जेमेतेम बुद्धीमत्ता आणि सरासरीपेक्षा कमी विवेकबुद्धी असलेल्या लोकांवरच प्रभाव पडतो. उदा: अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल अशा पद्धतीने, ओरबाडून आज भोगले नाहीस, तर ते पुण्यकर्म ठरेल आणि परलोकात त्याचे बक्षिस मिळेल अशी लालूच दाखवणे. हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते.

In reply to by मूकवाचक

सुबोध खरे 14/02/2026 - 19:18
"एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते". कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे. म्हणजेच धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे. माणूस आयुष्यात शेवटी अशा एका टप्प्यावर येतो कि त्याला ऐहिक सुखे किंवा भोग यातील रस संपतो. (अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत होते असे नाही). विशेषतः स्वतःला दुर्धर आजार झाला किंवा स्वतःच्या गाडी जवळच्या माणसाचा मृत्यू/ दुर्धर रोग झाल्यास अशा वेळेस माणसाला धर्मच नव्हे तर कर्मकांडे सुद्धा मानसिक बळ देतात. त्यामुळे तरुणपणी धर्म आणि कर्मकांडे यांच्यावर प्रच्छन्न टीका करणारी माणसे सुद्धा शेवटी त्यांच्या आहारी जाताना दिसतात. एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत. मी आमच्या आई आणि वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर कोणतेही संस्कार ना करणारा असलो तरी मी सहसा कुणाच्या धार्मिकतेवर टीका करत नाही. कारण शेवटी माणसाला कोणती गोष्ट मानसिक आधार देऊ शकते हे सांगणे कठीण आहे मग ती कितीही पोकळ असली तरी.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 14/02/2026 - 20:24
कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे.
क्रूरतेचं मूळ अनेकदा अत्यंत कट्टर विचारसरणीत असतं ती धार्मिक असो वा राजकीय. जेव्हा एखादी विचारधारा स्वतःला “एकमेव सत्य” मानते आणि विरोधकांना अमानुष ठरवते, तेव्हा हिंसा सुलभ होते. इतिहास असंही दाखवतो की धर्मप्रेरित व्यक्तींनी महान मानवतावादी कार्यही केलं आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्थांनी मानवी हक्कांची जपणूकही केली आहे. म्हणून प्रश्न “कोण जास्त क्रूर?” असा नसून, “कट्टरता, सत्तेची लालसा आणि मानवीकरणाचा अभाव कुठे निर्माण होतो?” हा अधिक मूलभूत प्रश्न आहे.
कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे.
समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात. . बाकी उरलेला प्रतिसाद धर्म किंवा तत्वज्ञानापेक्षा मानसिक जपणूक किंवा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आहे.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 16/02/2026 - 19:58
"समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात." मूलभूत गल्लत आहे. एक हुकूमशहा आणि अक्खी विचारसरणी यात कम्युनिस्टांनी आपल्याच लोकांचे केवळ क्रांतीच्या विरोधात असल्याच्या संशयावरून कोट्यवधी लोकांचे शिरकाण केले आणि क्रांती साठी रक्त सांडणे यात काहीही चूक नाही असेच हे लोक मानतात. किंबहुना ते अपरिहार्य आहे असेच मानणारी हि शुद्ध हलकट जमात आहे. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/02/2026 - 17:52
इतिहासात काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही, हत्या आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाले हेही सत्य आहे. पण एखाद्या विचारसरणीचे सर्व अनुयायी “शुद्ध हलकट जमात” आहेत असे म्हणणे योग्य ठरत नाही. सैधांतिक मांडणी आणि त्याची अंमलबजावणी ह्यातील दरी हेही एक कारण असले तरी स्टालिन, माओ किंवा पॉल पॉट ह्यांच्या उदाहरणातही त्यातील अपराधांची जबाबदारी त्या राजवटींवर आणि नेत्यांवरच येते. पण संपूर्ण विचारसरणीचे सर्व अनुयायी एकसारखे आहेत असे म्हणणे वस्तुस्थितीशी जुळत नाही. कोणत्याही विचारसरणीचे मूल्यमापन करताना तिची तत्त्वे, तिची अंमलबजावणी, आणि त्या काळातील राजकीय-सामाजिक संदर्भ वेगळे करून पाहणे अधिक न्याय्य ठरते. तुमच्या मते "आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे जर शुध्द हलकट जमातीचे असतील" तर ह्या विधानाचा पुन्हा विचार करुन बघा. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही. निरपराध आदीवासी दोन्ही बाजूंनी नाडले आणि मारले गेले होते. अनेक आदिवासी भागांमध्ये जमीन, जंगल हक्क, विस्थापन, शोषण यांसारख्या प्रश्नांमुळे असंतोष वाढला. त्या पार्श्वभूमीवर काहींनी माओवादी चळवळीला पाठिंबा दिला. पण त्यामुळे निरपराधांवरील हिंसा योग्य ठरत नाही. पण ह्यातील ज्यांना पश्चाताप व्हायला हवा असे वाटते त्यांना शासन करतानाही कित्येक निरपराध आदीवासींचा बळी गेला आहे. त्याच वेळी, त्या प्रदेशांतील सामाजिक-आर्थिक समस्या आणि राज्याच्या धोरणांचाही विचार करणे आवश्यक ठरते. हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन कोणत्याही बाजूने झाले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/02/2026 - 20:02
काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये कोणत्या कम्युनिस्ट राजवटीत असं झालेलं नाही ते सांगा. आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे हलकट नाही तर दुसरं काय म्हणायचं हे आपणच सांगा सरकारने, सरकारचे, सरकारसाठी असलेले लोक म्हणजे कम्युनिझम अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

मूकवाचक 16/02/2026 - 11:04
तथाकथित निधर्मी लोक आणि त्यांचे निधर्मगुरू कट्टरपणा आणि क्रौर्य या बाबतीत तसूभरही कमी नाहीत. धार्मिक गुरू किंवा संस्था यांची चांगली बाजू हेतूपुरस्सर बघायचीच नाही, मात्र त्या संबंधातले भ्रष्टाचाराचे उदाहरण सापडले की आकाशपाताळ एक करायचे अशी वैचारिक फॅशन रूढ झाली आहे. तथाकथित समाजवादी, समतावादी, पुरोगामी वगैरेंना तोच मापदंड लावला जात नाही. असो. फरक एकाच बाबतीत आहे - पुरोगामी, समाजवादी लोक परलोकात काहीतरी मिळेल अशी लालूच दाखवत नाहीत. इहलोकातच आपल्या कामगिरीची बक्षिसी (राष्टीय/ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पैसा/ शिष्यवृत्त्या(!), आपल्या पाळीव माध्यमांमधून प्रतिष्ठा मिळवून देणे वगैरे) मिळेल अशी भक्कम 'इकोसिस्टीम' त्यांनी उभी केलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो.
अरे वाह, तुलनात्मक डेटा असेल इतिहास असेल तर वाचायला आवडेल.
एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत.
अरे वाह, एका अनुभवाने धार्मिक झाला म्हणायचा माणूस. वाचावे ते नवलच. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू 17/02/2026 - 13:45
धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. @सुबोध खरे, आपले विचार, व्यासंग व अनुभव यांचा आदर आहे तथापि, या बाबतीत मी सहमत होण्याइतका माझ्याकडे डेटा नाही. माझ्या समजुतीनुसार एक समाज म्हणून धर्मांध असो वा निधर्मी असो, खरा हिंदू कधीही क्रूर असू शकत नाहीत. हं बाकी, इतर काही पंथीय लोक क्रूरपणाची परिसीमा गाठतात याच्या घटनांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त 16/02/2026 - 20:43
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का? मुळात व्यापक अर्थाने 'भोग' ही मनुष्यप्राण्याच्या अगदी मूलभूत गरजांपैकी एक आहेसे दिसते.

कॉमी 12/02/2026 - 16:21
Epstein फाईल्स मध्ये नसलेल्या गोष्टी किंवा बादरायणी संबंध लाऊन अचाट दावे सध्या नेटवर पसरले आहेत. आपण काळजी घ्यावी. तुम्ही दिलेले उदाहरण घ्या. मेलमध्ये कॅनिबल हा शब्द आला म्हणजे एपस्टीन मानवी ऑर्गनचे बुफे भरून जेवायचा असा अर्थ होत नाही. त्या मेल्समध्ये casual मेल पण आहेत. उगाच शब्द त्यात आला म्हणजे काही गुन्हा घडला असे नाही. बाकी लेख अत्यंत एकसुरी वाटला. ह्यात मांडण्यासारख्या अनेक दुसऱ्या बाजू आहेत. पश्चिमी कसे खराब आणि आपण कसे हुच्च ह्याच्या अगदी विरोधी मत मांडणारा लेख सुद्धा सहज पाडता येईल.

अकिलिज 13/02/2026 - 19:23
चौकात लाल सिग्नल लावा. एक भारतात लावा. एक युरोपात लावा. फरक डोळ्यांनी बघा. कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार कसे व्यवस्थित करते. ते बघा. टोलच्या रांगात सगळे कसे व्यवस्थित लायनीत जातात. एकमेकांना कसे घूसू देतात. बघा मजा. लहान मुलांना कानफटवणे हे ज्यांच्या अंगवळणी पडले आहे त्यांना पेशन्सने बोलणे कसे शिकवणार. भारतवर्षाचा अभिमान जरूर वाटावा. पण जे चूक आहे ते मान्य तर करायला शिका.

एकदा खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून मी ट्रेकला जात होतो. जागा नसल्याने दोन सीटच्या गॅप मध्ये उभा होतो, एक कला अध्यात्म, धर्म, देव ह्याबद्दल दुसऱ्या काकाना सांगत होते, अतिशय मंत्रमुग्ध वातावरण होते, अर्ध्या एका तासाने त्या काकानी हातातली शेंगा खाऊन उरलेली टरफल्यांची पिशवी खिडीकी बाहेर टाकली.

स्वधर्म 13/02/2026 - 23:21
नागनिका जी, आपले चिंतन वाचले. लहानपणी मला आणि बहुतांश लोकांना आपण म्हणता तसेच वाटत आले आहे. शरीराच्या पलिकडे असलेल्या स्व व अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन भारतीय तत्वज्ञानात आहे, हे मान्य. पण जाण आल्यावर हळू हळू भारतीय संस्कृतीबाबतचा तथाकथीत अभिमान गळून पडला. इथे लिहिलेले विचार भाबडे आहेत की धूर्त आहेत असा प्रश्न पडला. त्यामुळे मनात आलेले काही प्रश्न आपल्यासमोर ठेवत आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते ते वाचायला आवडेल. १. भारतीय संस्कृती प्राचीन आहे त्यामुळे ती जास्त प्रगत असायला हवी होती. तसे काही सध्या आढळून येते का? आपला समाज जगातील इतर समाजांच्या तुलनेत अधिक सुखी समाधानी आहे का? भारताचा आनंद निर्देशांक जगात तळाला का असावा? २. भारतीय मनाची बैठक समरसतावादी आहे, समतावादी नाही. नेता अचानक गेल्यानंतर त्या पक्षातील सर्वात लायक माणसाला कधीच संधी मिळत नाही. नेत्यालाही ती विशिष्ट घराण्यातले असल्यामुळेच मिळाली होती. कितीही गैरप्रकार समोर आले तरी लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. उलट लोक असेच होणार हे मानून पुढे गेले. ही कसली महान संस्कृती? सर्व नागरीक समान आहेत असे मानणारी लोकशाही भारतात का रूजू शकली नसावी? ३. आर्थिक विषमता व वर्गाधारीत शोषण सर्वच समाजात आढळून येते. अधिक क्षमता असलेले लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ समाज गट तयार करतातच. पण 'जात' ही फक्त आणि फक्त जन्माधारीत संकल्पना फक्त दक्षिण पूर्व आशियातच का आढळून येत असावी? आपल्याच रक्तामासाच्या बांधवांचे केवळ जातीआधारित शोषण जगात इतर कुठेही नाही. तसेच स्त्रियांना जरूर देवी बनवून देव्हार्‍यात बसवले गेले पण तिला समान मानले का नसावे, तिचे शोषण हजारो वर्षे का झाले असावे? ४. भारतीय संस्कृतीतले सगळेच संत बंडखोर होते. त्यांचा तत्कालीन समाजाने छळच केला व नंतर त्यांची पूजा केली. हे अगदी ज्ञानेश्वरांपासून र धों कर्वे, महात्मा फुले यांच्यापर्यंत हे असेच आहे. एवढे सांस्कृतीक संचित असलेल्या भारतीय समाजाला चांगले काय हे वेळीच का ओळखता आले नसावे? ४. चांगल्या संस्कृतीचा सर्वात मोठा मानक न्याय असावा. पण भारतीय समाजात नेहमीच न्याय का नसावा? अगदी मर्यादा पुरूषोत्तम राम हाही न्यायासाठी नाही तर वडीलांच्या इच्छेचा मान म्हणून वनवासाला गेला. न्याय महत्वाचा असता तर त्याने वडीलांच्या इच्छेपेक्षा त्यांना तत्कालीन न्याय्य काय हे सांगायला हवे होते. सीतेशी राम जसा वागला (अग्नीपरिक्षा), तसे आजच्या काळात कोणी वागले तर तो माणूस वंदनीय ठरेल काय? न्यायापेक्षा वडीलधारे, परंपरा काय म्हणते हेच इथे का महत्वाचे आहे? न्यायासाठी भांडणारे आयुष्य खर्च करतात, पुस्तके लिहितात. आपल्या समाजात न्याय मुळीच सहज नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना सुखी समाधानी आयुष्य लाभते असे वाटत नाही. संघर्ष अटळ का?

In reply to by स्वधर्म

जेन झी शी बोलल्यावर मला एक लक्षात आले की या मुलांना खूप फ्रस्ट्रेशन आहे. पण त्यांना त्यांचा राग कुठेच काढता येत नाही. या मुलांना जगात काय चाललं आहे हे सगळी कडे दिसत असते. प्रगत समाजांत आपल्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बरोबर जगात अनेक जण सहज PDA करतात मात्र भारतीय मुलांना आपल्या प्रियकर प्रेयसी यांना स्पर्शही करता येत नाही. या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून त्यांच्यात अनेक न्यूनगंड तयार होतात आणि ते आपली व्यवस्था ही एक 'संस्कृती' असून कशी 'त्यांच्याहून' भारी आहे वगैरे जस्टिफिकेशन देत राहतात. मग त्यांना भूतकाळातून हे आधिभौतिकाचे तुकडे काढून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत राहण्याचा एक विचित्र न्यूनगंडात्मक छंद लागतो. प्रत्यक्षात बिचाऱ्याची बत्तीशीपर्यंत जातीबाहेर सोडाच जाती अंतर्गत देखील लग्ने होत नाहीत. जेन झी मुलाना आजकाल एका कसल्या तरी सनातन धर्माचे वेड लागले आहे. प्रत्यक्षात तो धर्म काय आहे आणि तो कशाशी खायचा हे त्यांना कळत नाही. कारण पदोपदी रोजच्या जगण्यात आणि त्या उदात्त आधिभौतिक प्रिंसिप्लस मधे नेहमीच टोकाची विसंगती दिसत राहते. एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात. मात्र त्या सनातन धर्माचे या आत्ताच्या जगातले ऐहिक मॅनिफिस्टेशन मात्र कसे वर येतात तर कॅफे मधे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे. कुठं कालिदास वगैरची उदबत्ती लावताय दोस्तांनो? अधिभौतिकाची आणि ज्ञानमार्गाची प्रचंड मोठी परंपरा असूनही आज सगळी कर्मकांडे प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात कंठाळी पद्धतीने सेलेब्रेट केले जातात. प्रत्येक देवस्थानाला अद्वैत लांबच राहिले, द्वैतही सोडा एकदम अंधश्रद्धेच्या आसपास जाणारी अनेक कर्मकांडेच मोठी करायचा छंद जडला आहे. एकेकाळी फक्त गणपती असणारा आज प्रत्येक गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. यात कुठेही मला ज्ञानमार्गाचा मोठेपणा दिसत नाहीच तर बहुतेक समाजाला केवळ ट्रांसॅक्शनल कर्मकांडातच गुंतून पडायचे आहे असे स्पष्ट दिसते. एकूण दिलको बेहलाने के लिए ये वेदांत अच्छा है असेच आहे बहुतेकांचे. ९९ टक्के लोक काही का करेनात, लिंचिंग वगैरे का करेनात आपण मात्र चार दोन सूक्ते काढून काहीतरी वैश्विक गफ्फा हाणत राहायच्या.

In reply to by स्वधर्म

सोत्रि 14/02/2026 - 07:17
स्वधर्म, तुमचा प्रश्न नागनिका यांना आहे आणि त्या/ते उत्तर देतीलंच. पण, मी माझं मत सांगण्यास तुमची हरकत नसावी हे गृहीत धरून माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. लेखातून मी इंटरप्रीट केलेला गाभा असा आहे की: कॅपीटलीस्ट पाश्चात्य देशांमधे भौतिक चंगळवादाचे प्रस्थ प्रचंड आहे; एपस्टीन प्रकरण त्यासाठी बॅकड्रॉप/वानगी म्हणून. अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन जे भारतीय तत्वज्ञानात आहे ते पाश्चात्य तत्वज्ञानात तितकं मुलभूत आणि सखोल नाहीयेय. त्यामुळे भौतिक चंगळवादातून बाहेर का पडायचे किंवा त्यापलीकडे काही आहे हेच माहिती होत नसल्याने अधिकाअधिक भौतिक चंगळवाद हेच धेय्य बहुतांशी पाश्चात्य देशांमधे आहे. सुदैवाने, सखोल भारतीय तत्वज्ञानामुळे आपल्याला एक दिशा किंवा मार्ग उपलब्ध आहे अधिभौतिकाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही 'भारतीय संस्कृती' हा मुद्दा सामाजिक अंगाने मांडताय, जो योग्य आहे आपल्यजागी, पण तो ह्या धाग्याचा विषय नाही, माझ्या आकलनानुसार. (डिस्क्लेमरः आधिच्या प्रतिसादात म्हटलं तसं धाग्याच्या फक्त ह्या गाभ्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.) - (मत मांडण्याचा अधिकार जपणारा) सोकाजी

In reply to by स्वधर्म

नागनिका 14/02/2026 - 09:09
स्वधर्मजी विस्तृत प्रतिसादाबद्दल आपले आभार ! संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. पण संस्कृती जितकी flexible तितकी लवकर रुजते, विस्तारते आणि टिकते ही. ज्या संस्कृती एकाच एका गोष्टीला चिकटून असतात, काळाप्रमाणे बदलत नाहीत त्या लोप पावतात.( उदा. सुमेरिअन, रोमन इ.) त्याचप्रमाणे न्यायाच्या संकल्पन बदलत जातात. पण व्याख्या तीच राहते. द्वापारात नियोग न्याय्य होता. पण सध्या नाही. तसेच त्रेतायुगात काही गोष्टी सामान्य होत्या, ज्याचे आज अप्रूप वाटते. द्वापारात राजपरिवारातील व्यक्ती ब्रह्मचारी असण्याचे प्रमाण नगण्यच होते. म्हणून भीष्माचे राजत्याग करून ब्रह्मचारी राहणे काहीतरी अद्भुत वाटले त्या लोकांना. तुमच्या तिसर्या मुद्याशी मी सहमत आहे. ककारण तोच तर विरोधाभास आहे. जे ज्ञान , संस्कृती पूर्वजांनी दिली त्याचा विसर पडला व भौतिक चंगळवाद सोकावला. त्यामुळे किंबहुना अज्ञानामुळे अशी परिस्थिती आहे. ( वरील काही प्रतिसादात सिग्नल, टरफले अशी काही उदाहरणे दिली आहेत. त्यालाही हेच म्हणणे लागू होते. चांगले वागणे म्हणजे काय ते माहित असते, पण ते का वागायचे हे माहित नसल्याने अशी कृती होते. सगळ्याचे मूळ अज्ञान आहे.) बाकी सोकाजींना धन्यवाद. त्यांनी लेखाचा गाभा योग्य सांगितला.

In reply to by नागनिका

स्वधर्म 15/02/2026 - 03:17
नागनिका जी, धन्यवाद, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रतिसादात नाहीत. >> संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. इथे आपल्या बोलण्यात विरोधाभास आहे. आपण रोमन, सुमेरियन वगैरे संस्कृती बदलल्या नाहीत म्हणून नष्ट झाल्या अशी उदाहरणे देत आहात, पण वैदिक संस्कृती (अपौरुषीय वेद, गीता इ.) रोमन, सुमेरियन संस्कृतीपेक्षाही प्राचीन आहे. ती कुठे बदलली? तुम्ही तर त्याच न बदललेल्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगत आहात ना? उलट पाश्चात्यांनी जुन्या रोमन वगैरे संस्कृती लवचिकपणे सोडून दिल्या व नवे विचार (रिनायसन्स इ.) बदल घडवले. त्यामुळे त्यांनी अधिक चांगल्या संस्कृती विकसित केल्या असा निष्कर्ष निघतो व म्हणून त्यांची संस्कृती श्रेष्ठ ठरत नाही का? तुंम्ही दिलेले नियोगाचे उदाहरण (अपत्यप्राप्ती कशी करावी?) हे न्यायाच्या बाबतीत मुळीच महत्वाचे वाटत नाही. एकतर ते पुराणातले उदाहरण आहे, इतिहासातले नाही. दुसरे म्हणजे कुणालातरी ब्रम्हचर्य अप्रूप वाटणे वगैरे मुळीच महत्वाचे नाही. न्यायाच्या बाबतीत सर्वांना एकाच गुन्ह्याला समान शिक्षा अपेक्षित आहे. ते भारतात कधीही नव्हते. कारण गीतेत सांगितलेले वर्णाश्रम व वर्णधर्म जे हजारो वर्षे समाज पाळत आला. या एका गोष्टीने भारताचं इतकं नुकसान केलं की आपण मागासच राहिलो व अजूनही आहोत. त्याचा कसला अभिमान बाळगायचा? >> सगळ्याचे मूळ अज्ञान आहे. हजारो वर्ष इतके महान ज्ञान उपलब्ध असूनही बहुसंख्य भारतीय समाज अज्ञानी असेल तर आपण ज्याला ज्ञान म्हणता ते ज्ञान तरी कसं म्हणायचं? @सोकाजी लेखाचा मूळ गाभा एपस्टीन सारखे लोक पाश्चात्य समाजात निर्माण होतात पण भारतीय समाजात तसे होत नाही कारण "... भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते ." असा आहे. पण हे खरे नाही कारण आपल्याकडे प्रज्वल रेवण्णा प्रकरण घडले जे तुम्हाला आठवत असेलच. त्याला निवडून द्या असे आवाहन गंगापुत्र, सनातन संस्कृतीपूजक महानेत्याने त्याच्या मतदारसंघात सभा घेताना केले होते. त्याच्यावर शेकडो स्त्रियांचे शोषण करून व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा आरोप सिध्दही झाला होता. त्याला शिक्षा झाली आहे. दुवा: https://www.bbc.co.uk/news/articles/c87edydwpv7o हा आपल्याकडचा एपस्टीनच नव्हे तर काय? असे अनेक असतील पण आपल्याकडे थोरामोठ्यांच्या भानगडी उजेडात येत नाहीत. आपण पाश्चात्य समाजात एपस्टीन घडतो त्याल्या घृणास्पद समजत आहात पण पाश्चात्य समाजात अनेकांना आपली पदे, संपत्ती एपस्टीन प्रकरणात नांव आल्यामुळे सोडावी लागली व त्यांना शिक्षा मिळाली. आपल्याकडे मात्र ज्यांचे नांव आले त्यांना अजून तरी काहीही झालेले नाही या वास्तवाकडे संपूर्ण डोळेझाक करत आहात. हा भेदभाव हेच तथाकथित सनातन संस्कृतीच्या अनुयायांचे मुख्य लक्षण आहे हे सिध्द होतंय. @हणमंत आण्णा शंकर यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने नागनिकाजी आपले आकलन न आवडणार्‍या वास्तवापेक्षा लहानपणापासून सांगितल्या गेलेल्या भावनिक अभिमानाने प्रेरित तर नाही ना, याचा विचार करावा ही विनंती. वरती हणमंत आण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे "...एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात." असे तुमचे झालेले नाही ना?

मला एक प्रश्न नेहमी पडतो. सध्याच्या काळातील पाश्चिमात्य तत्वज्ञ आपलेच तत्वज्ञान अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. वेन डायर, बॉब प्रॉक्टर, एकहार्ट टोली वगैरे बोलतात तेव्हा कुठेतरी जाणवते की निदान तेवढ्यापुरते तरी ते आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत. नॉर्मन व्हिन्सेंट पील हे तर ख्रिस्ती धर्मगुरूच होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात बायबलचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. त्याप्रमाणेच नेव्हिल गॉडर्ड यांच्या बोलण्यात आणि लिखाणातही जिससचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. मात्र इतरांच्या बोलण्यात/लिहिण्यात जिसस किंवा ख्रिस्ती धर्माचा उल्लेख क्वचितच येतो. तसेच ते कुठेतरी आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत पण अधिक सुलभ पद्धतीने असे जाणवते. उगीच कसलाही अभिमान नाही (ज्याला मी उपहासाने वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो), हे जग म्हणजे सगळी माया आहे, त्यात गुरफटून जाऊ नका आणि आपले चित्त प्रभूचरणी लीन ठेवा म्हणजे भवसागर तरून जाल वगैरे दिसायला भारदस्त दिसणारी पण त्यातून नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणारी भाषा वापरत नाहीत. उलट काय करणे अपेक्षित आहे हे अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. हे असे का होत असावे? दुसरे म्हणजे नॉर्मन व्हिन्सेंट पील किंवा नेव्हिल गॉडर्ड अगदी बायबलमधील भाषा बोलत जरी असले तरी ते जे काही बोलतात ते मला तरी नक्कीच पटते. बायबलमध्ये मला माहित नसलेल्या पण अनेकांना आक्षेप असलेल्या काही गोष्टी असतील त्याविषयी मला काहीच भाष्य करता येणार नाही कारण त्या गोष्टी माहित नाहीत. मात्र अगदी बायबलमध्ये जरी सकारात्मक विचारांविषयी काही उल्लेख असतील तर माझ्या 'सहिष्णू' हिंदू आणि भारतीय मनाला ते अजिबात खटकत नाही. तस्मात वेदांमध्ये किंवा भारतीय तत्वज्ञानात चांगल्या गोष्टी आहेत हे मान्य केले तरी मात्र भारतीय तत्वज्ञानातच सगळे काही आहे आणि इतर ठिकाणी भुसा भरला आहे अशी परिस्थिती कदाचित नसावी. दुसरे म्हणजे भारतीय तत्वज्ञान महान आहे असा दावा करणार्‍यांपैकी किती जणांंनी त्याचा खरोखरच अभ्यास केलेला असतो हा प्रश्नही पडतो. आणि आपले तत्वज्ञान पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा करायचा असेल तर दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. असे दावे करणार्‍या किती जणांनी तो खरोखरच केलेला असतो हा पण प्रश्न पडतो. ही एक जनरल गोष्ट लिहित आहे- इथल्या चर्चेतील कोणालाही उद्देशून ते नाही तेव्हा अकारण गैरसमज नसावा. भारतीय तत्वज्ञान म्हटले की आम्हीच काय ते श्रेष्ठ आणि इतरांना काही कळत नाही या गृहितकापासून सुरवात करून मग आपल्या गृहितकाला अनुसरून असलेली तेवढीच वाक्ये उचलणारे लोक वैयक्तिक चर्चेत बघितले आहेत. माझी जी काही थोड्याफार लोकांशी याविषयी चर्चा केली आहे त्या मर्यादीत सॅम्पल सेटवर आधारीत विधान आहे. ते सर्वांना लागू पडेल असा माझा अजिबात दावा नाही. असे लोक अर्थातच मिपावर नाहीत आणि त्यापैकी बरेच आता या जगातही नाहीत त्यामुळे त्यांना इथे चर्चेत बोलावता येणार नाही. पण अशा अ‍ॅप्रोचमधून वृथा अभिमान निर्माण होणे आणि आपलीच कॉलर ताठ करणे सोडून फार काही साध्य होते असे वाटत नाही. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन. आता आपण आपल्या भारतीय सखोल चिंतनाकडे वळूया. तत्त्वज्ञानामध्ये भारताकडे आता सांगण्यासारखं काय आहे? काहीच नाही. इथे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे आजही तत्त्वज्ञान मांडता येते याचा भारतीयांना विसर पडला आहे. आणि दुसरा मुद्दा आमच्याकडे ऑलरेडी सगळेच आहे अशी आत्मस्तुती करण्याचा जडलेला रोग. महाराष्ट्र पुरते बोलायचे तर गुलाबराव महाराज किंवा वाई मध्ये असलेली प्रज्ञशाळा अशा प्रकारचे प्रयत्न दिसतात. पूर्णवाद किंवा अविभक्त आत्मवाद या गोष्टी मागच्या शतकात मांडलेल्या दिसतात. मात्र त्या काही नोवेल गोष्टी नव्हत्या आणि त्यांना समकालीनत्व तर नव्हतेच नव्हते. पुन्हा या सगळ्या गोष्टी मेटा फिजिकल किंवा मेटामटा फिजिकल असल्याने वितंड घालायची आवड असणाऱ्या वादप्रवण भारतीयांना एवढेच जमले आहे. अमर्त्य सेन यांनी वादाळू भारतीयांवर एक पुस्तक लिहिले आहे परंतु त्यातून शालीतून जोडेच मारलेले आहेत अनेक लोकांना ते कौतुकपर पुस्तक वाटते. मात्र साहित्य असो किंवा राजकारण जर्मन तत्वज्ञांनी संपूर्ण जग उलथापालथ केले. अलीकडे मी अनेक तत्त्वज्ञांचे लेक्चर्स असतो आणि मार्कूस यांची लेक्चरे सध्या माझी अत्यंत आवडती आहेत. त्यात त्यांनी मांडलेला जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत किंवा नव नव वास्तववाद हे खूप महत्त्वाचे सिद्धांत असून त्याचा एकूण समाजावर किंवा वैज्ञानिक प्रगतीवर किंवा अतिवैज्ञानिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. यातील जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत आपल्या जग मिथ्या आहे या सिद्धांत यापेक्षा वेगळा आहे कृपया त्यांची गल्लत करून घेऊ नका. नाहीतर पुन्हा आत्मवस्तुतीचे एक रान तुम्हाला मोकळे झाल्यासारखे वाटेल. मात्र अशा दर्जाचे काम मला भारतातील कुठल्याही तत्त्वज्ञाने मग ते आध्यात्मिक क्षेत्रातून असो किंवा अकादमी क्षेत्रातून असो मांडल्याचे दिसत नाही. मग समृद्ध ज्ञानमार्गी परंपरा असलेल्या भारतामध्ये एवढे स्टॅगनेशन का आले आहे? याचे कारण भारत सामाजिक प्रश्नांमध्ये एवढा गुरफटून गेलेला आहे की कोणताही पंथ जात पाहत वगैरे न पाहता जन्माला येणारी बुद्धिमत्ता ही आयुष्यभर त्याच गोष्टींशी झुंजण्यात खर्ची होते. आणि त्यातूनही काही उरलंच तर ते आत्मस्तुती किंवा भारतीय अध्यात्माने आणि धर्मांनी तत्त्वज्ञानाच्या बुरख्या आडून घालून दिलेली कर्मकांडे करण्यातच खर्च होतात. चंद्र सूर्यकुमार यांचे म्हणणे मला पटते. यात पुन्हा भारतीयांना जडलेली व्हॅलीडेशनची सवय द्रुगोचरच होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन.
धन्यवाद. मार्कस गॅब्रिएल यांच्याविषयी माहित नव्हते. त्यांचे पण व्हिडिओ बघतोच. मी आतापर्यंत अभारतीय तत्वज्ञांपैकी जास्त करून अमेरिकन तत्वज्ञ फॉलो करत आलो आहे (अपवाद फक्त एकहार्ट टोली- ते पण मुळचे जर्मनीचे). मार्कस गॅब्रिएल यांच्याच पिढीतील अमेरिकन गॅब्रिएल (गॅब्रिएला?) उर्फ गॅबी बर्नस्टीनची पुस्तके आणि व्हिडिओ पण आवडतात. बाकी वेन डायर, नॉर्मन व्हिन्सेंट पील, लुईज हे, नेव्हिल गॉडर्ड, इस्थर-जेरी हिक्स वगैरे माझे अगदी ऑल टाईम फेव्हरेट आहेत. धन्यवाद.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वर म्हटल्याप्रमाणे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील, नेव्हिल गॉडर्ड यांची पुस्तके/व्हिडिओ मला आवडतात. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी केवळ बायबलमधील आहेत आणि आपल्या कोणत्या स्त्रोतात नाहीत म्हणून पटल्या तरी ते नाकारणे मला तरी आवडत नाहीत. उदाहरणार्थः १. Isaiah 41:10 – “Fear thou not; for I am with thee…” याची मला फारशी गरज पडते असे नाही पण अक्कलकोट स्वामींचे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे वचन किती वेगळे आहे? २. Romans 12:2 – “Be ye transformed by the renewing of your mind…” विचार बदला- आयुष्य बदलेल हे केवळ बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून नाकारायचे का? ३. Proverbs 23:7 – “For as he thinketh in his heart, so is he.”- जसा विचार कराल तसे बनाल हा कॉमन सेन्स नाही का? बायबलमध्ये लिहिले म्हणून तो कॉमन सेन्स नाकारायचा? ४. Matthew 21:22 – “And all things, whatsoever ye shall ask in prayer, believing, ye shall receive.”, Mark 11:24 - “Therefore I say unto you, What things soever ye desire, when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them.” अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही. तरीही हे तत्वतः पटते. ५. Matthew 21:21 - “…If ye have faith, and doubt not… if ye shall say unto this mountain, Be thou removed… it shall be done.” Luke 17:6 - “If ye had faith as a grain of mustard seed, ye might say unto this sycamine tree, Be thou plucked up by the root… and it should obey you.” - आपल्याकडे मुकं करोति वाचालम... पेक्षा हे वेगळे आहे असे मला तरी वाटत नाही. (स्पष्टीकरणः ही सगळी वचने मला तोंडपाठ आहेत असे नक्कीच नाही. अशाप्रकारचे वर उल्लेख केलेल्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये वाचले होते ते आठवले आणि मग नक्की वचन कोणते, ते बायबलमधील कोणत्या पुस्तकात आहे वगैरे चॅटजीपीटीला विचारले). तेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हे नक्कीच- त्यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हा अ‍ॅटिट्यूड थोडा संक्षींप्रमाणे वाटतो. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 14/02/2026 - 16:24
अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही.
चंसुकु तुम्ही वर कोट केलेली वचनं म्हणात असाल तर, भगवत गीता ही सगळी वचनं कव्हर करते.
मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडेच आहेत, आपल्याकडे चांगल्याच गोष्टी आहेत आणि आपल्याकडेच चांगल्या गोष्टी आहेत
असंं न म्हणता, त्यांच्याकडेही चांगल्या गोष्टी आहेत असं म्हणणं जास्त सयुक्तिक असेल, पण चांगल्याच आहेत असं म्हणता येत नाही. माझ्या दृष्टीने त्याची कारणमिमांसा देतो, जरा शब्दबंबाळ असेल पण भावना समजून घ्या अशी विनंती. पाश्चिमात्य तत्वज्ञ प्रामुख्याने भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याबद्दल (पर्सनल डेवलपमेंट) बोलतात. ज्यामुळे ते स्पष्टीकरण आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेटेबल होऊन सोपे वाटते आणि समजते. उदाहरणार्थ नॉर्मन व्हिन्सेंट पील यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं.
  • The Power of Positive Thinking
  • True Joy of Positive Living: An Autobiography
  • You Can If You Think You Can
  • Positive Thinking Every Day: An Inspiration for Each Day of the Year
  • A Guide to Confident Living
  • Six Attitudes for Winners
  • Confidence
  • Reaching Your Potential
नेव्हिल गॉडर्ड यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं
  • Your Faith is Your Fortune
  • The Power of Awareness
  • Feeling Is the Secret
  • The Power of Imagination: The Neville Goddard Treasury
  • Relax More, Try Less: The Easy Path to Abundance
  • The Wealth Mindset: Understanding the Mental Path to Wealth
  • Imagination Creates Reality
पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
अगदी सहज शक्य आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकू- लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वगैरे हे सांगतात. ते अधिक रिलेटेबल वाटत असावे.
शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे- ते शब्दात व्यक्त करता येणार नाही हे अगदी १००% मान्य. पण मग अशी अनुभूती ज्यांना खरोखरच होत असेल ते लोक 'आमचेच काय ते सगळे चांगले आणि इतरांकडे भुसा भरला आहे' असा अ‍ॅटिट्यूड ठेवतील का? माझ्या मर्यादित सॅम्पल सेटमध्ये मी ज्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांच्या आर्ग्युमेंटची सुरवातच भारतीय तत्वज्ञान श्रेष्ठ किंवा पाश्चिमात्यांच्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ इथपासून झालेली बघितलेली आहे. असेलही. अजिबात नाकारत नाही. पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे. अभ्यासाअंती जे अनुमान निघायला हवे तेच प्रिमाईस म्हणून वापरले तर कसे चालेल? माझे अशा बहुसंख्य लोकांशी पटत नाही ते त्या कारणाने. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 14/02/2026 - 19:17
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही
नक्कीच! भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे हे सगळं आणि तत्सम तत्वज्ञान जोपर्यंत ध्यानमार्गाने प्रत्यक्ष अनुभवत नाही तोपर्यंत कळणं, उलगडणं कठीण आहे. ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी
हे इंद्रियजन्य असं असायला हवं कारण पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही.
तुम्ही कशाच्या शोधात आहात (seeking) त्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन' वगैरे ह्या संदर्भात शोधत असाल तर ते time and space ह्या मितीतच आहे. जर शोध 'beyond time and space' च्या उलगड्याचा असेल तरच भारतिय तत्वज्ञान रिलेटेबल वाटेल. स्वानुभवाचं उदाहरण देतो, मी विपश्यना ध्यानमार्गावर जाण्याआधि इस्कॉनच्या गीता सेशन्सला जायचो. एका बौद्धिक लेवलपर्यंत गोष्टी कळत होत्या, समज येत होती पण आकलन अथवा उअलगडा होत नव्हता. म्हणजे, रागावर ताबा ठेवा, कामावर (इंद्रियांवर) विजय मिळवा, कुठल्याही परिस्थिरतीत समअवस्थेत रहा. उपदेश म्हणून हे पटत होतं. पण म्हणजे त्यासाठी नेमकं काय करा ? त्यासाठीचा मार्ग, तंत्र, एक्झॅक्ट प्रकिया हे काही त्या सेशन्समधे नव्हतं. सगळं कृष्णावर सोपवा आणि निष्काम कर्म करा, तो सगळा भवसागर पार करून नेण्यास समर्थ आहे, भक्ती करा, नामस्मरण, कीर्तन करा हे असं सगळं असायच. पण दुसरा काही योग्य मार्ग माहिती नसल्याने त्यातच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, उलगडा होत नव्हता तरीही. पण विपश्यना ध्यानमार्गाची माहिती झाल्यावर, त्या मार्गावर चालल्यावर गीतेतल्या श्लोकांचे अर्थ वाचताना साकार होऊन आपोआप उलगडायला लागले (आणि विपश्यना ही अप्लाईड गीता आहे हे कळलं). त्यामुळे ते रिलेटेबल वाटणं हे काय शोधता आहात त्यावर अवलंबून आहे.
पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे.
अर्थातच! विपश्यना धानप्रणालीची उपयुक्तता कळल्यावर ती इतकी मुलभूत कशी आणि इतर तत्वज्ञानात त्याच्या रिलेटेड, जवळ जाणारं काही आहे का हे अभ्यासण्यासाठी मी बहुतेक सगळ्या धानप्रणालींचा (इनर इंजीनियरिंग, सुदर्शन क्रिया, ट्रान्स्डेंटल मेडिटेशन, ओशोंच डायनॅमिक मेडीटेशन, ब्रम्हकुमारी राजयोग, सहज योग, एखार्ट टोल्लींच Present Moment मेडीटेशन, Landmark Forum, Natural Language Processing (NLP)) अवलंब करून बघितला. त्याने जो तुलनात्मक अभ्यास झाला त्यावरच माझी जी मतं आहेत ही बेतलेली आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
प्रश्न हा की एकहार्ट टोलींसारखे अभारतीय लोक तीच गोष्ट सोप्या भाषेत सांगतात पण आपलेच लोक शाब्दिक अवडंबरात का अडकतात?
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
तसे नसावे. वेन डायर अनेकदा हायर सेल्फ चा उल्लेख करतात. Your sacred self हे त्यांचे पुस्तकच आहे. त्यात लिहिलेले beyond time and space असेच आहे. वर म्हटल्याप्रमाणे असे पाश्चिमात्य तत्वज्ञ बोलतात किंवा लिहितात तेव्हा ते आपलेच तत्वज्ञान मांडत असतात हे जाणवते. पण ते विनाकारण जडजंबाल नसल्याने आणि नक्की काय करायचे हे सांगितले असल्याने अधिक रिलेटेबल वाटते. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या (म्हणजे भारतीय) लोकांना याविषयी बोलायला लागल्यावर नक्की काय करायचे या प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा आपली भारतीय संस्कृती किती महान, आपले तत्वज्ञान किती महान असले अभिमान लगेच चावतात. त्यामुळे मग आपोआप वेदकालीन जंगलात भटकणे सुरू होते. त्यापेक्षा मग सिधी बात नो बकवास असा अ‍ॅप्रोच असलेले वेन डायर, एकहार्ट टोली, नेव्हिल गॉडर्ड हे मला तरी अधिक भावतात.

नेहरूंचे सचिव एम.ओ.मथाईंचे Reminiscences of the Nehru Age हे पुस्तक आहे. मला वाटते ते भारतात मिळत नाही. ते पुस्तक मी अमेरिकेतील विद्यापीठाच्या ग्रंथालयातून वाचले होते. त्यात एक उल्लेख होता. आंतरजालावर त्या पुस्तकाचे पी.डी.एफ अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यात आपले दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही उल्लेख आहेत. राधाकृष्णन हे मोठे तत्वज्ञ होते आणि भारतीय तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता हे तर सर्वमान्य आहे. १९५२ ते १९६२ या काळात राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती असताना राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्याकाळी सुरवातीला पदांची हायरारकी- राष्ट्रपती- पंतप्रधान यानंतर तिसर्‍या क्रमांकावर उपराष्ट्रपती होते. तेव्हा राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे आग्रह धरला होता की हायरारकी राष्ट्रपती-उपराष्ट्रपती-पंतप्रधान अशी हवी. म्हणजे थोडक्यात मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे असा त्यांचा आग्रह होता. इतकेच नाही तर त्यावेळेस सुरवातीला राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनाच हवाई दलाची विमाने वापरायचा अधिकार होता. तो अधिकार उपराष्ट्रपतींनाही- म्हणजे स्वतःला मिळाला पाहिजे असा आग्रह राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे धरला होता. हे दोन्ही आग्रह नेहरूंनी मान्य केले. १९५७ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परत राष्ट्रपती पदाची निवडणुक होती तेव्हा राधाकृष्णन यांना राष्ट्रपती व्हायचे होते पण तेव्हाही उपराष्ट्रपती पदावर समाधान मानावे लागले म्हणून ते रूसून बसले होते. तेव्हा नेहरूंनी तुम्हाला पुढच्या वेळेस राष्ट्रपती करू असे आश्वासन दिले. हा सगळा विरोधाभास वाटत नाही का? एकीकडे भारतीय तत्वज्ञान beyond body and time जाते पण त्याचवेळेस मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे, पहिल्या क्रमांकाचे पद मिळाले नाही म्हणून रुसून बसायचे, मला हवाईदलाची विमाने वापरायला मिळाली पाहिजेत हा आग्रह धरायचा हे काही समजले नाही. त्यापेक्षा- हो मला श्रीमंत व्हायचे आहे म्हणून मला लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वापरायचा आहे आणि त्यासाठी गरजेचे असेल इतके आध्यात्म मी वापरेन असा अ‍ॅप्रोच असलेले बॉब प्रॉक्टर अधिक श्रेष्ठ नाहीत का? निदान जगासमोर दाखवायला दोन वेगळे चेहरे तरी नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 15/02/2026 - 10:05
चंसुकु, ५०% सहमती ५०% असहमती. डिटेलमधे प्रतिसाद लिहीतो पण २-३ दिवसांनी, लॅान्ग विकेंड आहे, ट्रीपवर आहे. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

जरूर. वाट बघत आहे. ५०% असहमती कशामुळे असावी? याविषयी माझा अंदाज असा की तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्तीने ऐहिक सुख नाकारावेच असे काही नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला वाटते की ऐहिक सुख नाकारू नये ही अपेक्षा ठीक आहे पण एखादी गोष्ट मिळाली किंवा मिळाली नाही तरी त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही फरक पडला नाही पाहिजे- शेवटी beyond body and time हा अनुभव अधिक महत्वाचा नाही का? तेव्हा एखादी गोष्ट (अमुक एका क्रमांकाचे पद आणि त्या पदाला नसलेले अधिकार) आपल्याला मिळाली पाहिजे हा आग्रह जर धरला गेला असेल तर मग त्या व्यक्तीला ती गोष्ट हवी आहे असाच अर्थ होतो- तस्मात मिळाली किंवा मिळाली नाही तरी काहीही फरक पडत नाही अशी परिस्थिती नसावी. दुसरे म्हणजे beyond body and time असा अनुभव जेन्युईनली आलेले किती लोक असतील? फार नसावेत. पृथ्वीवरील बहुसंख्य लोक मी, माझे पैसे, माझे मानमरातब, माझी गाडीघोडा वगैरेंमध्येच गुरफटलेले असतात. समजा आपल्याकडे beyond body and time वर बरेच काही असेल पण ९९% लोक ज्या स्थितीत असतात त्यांच्यासाठी काहीच नाही का? काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे याविषयी लिहित नाहीये. काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे त्याविषयी जी पुस्तके/भाषणे आताच्या काळात असतात त्याविषयी लिहित आहे. की मग परत भवसागर तरून जायला प्रभूचरणी लीन व्हा अशी दिसायला भारदस्त दिसणारी पण कसलाही अर्थबोध न होणारी तीच भाषा?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास असणे आणि ते तत्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणणे यात काहीच फरक नाही का ? हे 'एखादा माणूस डॉकटर असतो ततरी तो व्यसनी कसा, तो आजारी का पडतो, तो जंक फूड का खातो' असे विचारण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख श्रीमान योगी किंवा उपभोगशून्य स्वामी असा केला जातो किंवा भगवान श्रीराम यांचा मर्यादा पुरुषोत्तम असा उल्लेख होतो त्यामागे या व्यक्तींचे प्रत्यक्ष वर्तन तपासले जाते अभ्यास नाही. एवढे लांब कशाला जा मनमोहन सिंग साहेब जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्री होते तेंव्हा भारताने कशा पद्धतीने तेलरोखे उभारून ठेवले होते हे सगळ्यांना माहिती आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

यात एक मोठा फरक आहे. तुम्ही मांडलेली इतर उदाहरणे करायच्या गोष्टी आहेत तर अध्यात्म - तत्वज्ञान या अनुभवायचा गोष्टी आहेत. एखादी गोष्ट करायची कशी हे स्वतः न करता इतरांना उत्तम प्रकारे शिकवता येऊ शकते. रमाकांत आचरेकरांनी सचिन घडवला. ते एक उत्तम शिक्षक होते पण सचिनप्रमाणे त्यांनी शतके ठोकली होती का? पण जर एखादी गोष्ट अनुभवायची असेल तर ती इतरांना सांगण्यापूर्वी स्वतः न अनुभवता कशी सांगता येईल हे समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 15/02/2026 - 16:42
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतचा वाङमयचौर्‍याचा खटला अत्यंत प्रसिध्द आहे. जदुनाथ सिन्हा यांच्या डॉक्टरेटसाठीच्या प्रबंधातील ११० परिच्छेद जसे च्या तसे राधाकृष्णन यांनी आपल्या 'इंडीयन फिलॉसॉफी भाग २' या पुस्तकात वापरले असा खटला १९२८ साली गाजला होता. त्यात अखेर दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या बाहेर तडजोड केली. राधाकृष्णन हे बडे प्रस्थ होते तर सिन्हा हे विद्यार्थी होते. अशा परिस्थितीत जर राधाकृष्णन यांना न्यायालयाबाहेर तडजोड करावी लागली असेल तर ते त्यांच्या इंटीग्रिटीवर पुरेसे प्रकाश टाकणारे आहे. त्यांनी आपल्या मुलींची लग्नेही बालवयात केली होती असे वाचले होते. एकूण ते पुस्तके आदर्शांवर लिहीत होते तरी आचरण अजिबात तसे नव्हते असे म्हणावे लागते. अशा व्यक्तीचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवसच शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे खूप फॉरवर्ड्स वाचले आहेत. पण आपल्या समाजात बोलण्याला आचरणापेक्षा जास्त महत्व आहे हे वारंवार दिसते.

चित्रगुप्त 16/02/2026 - 20:19
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते .
फक्त दोनचार दिवस 'क्राईम पॅट्रॉल' चे काही भाग बघा. भारतातल्या सर्वसाधारण, अगदी निरुपद्रवी वाटणार्‍या व्यक्ती देखील किती अमानुष, भयंकर गुन्हे करत असतात, याचे आश्चर्य वाटेल. थोड्याफार फरकाने जगभरातल्या मनुष्यप्राण्याचे अंतरंग सारखेच असल्याचे आढळून येते.

कांदा लिंबू 16/02/2026 - 22:26
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते. . कोणतेही कुकर्म करताना हिंदू मन शंभर वेळा विचार करते. असं म्हणायला हवं. बातम्यांतून, आजूबाजूच्या सामाजिक वर्तनातून दिसणारे अपवाद वगळा. "सर्वे संतु सुखिनः, सर्वे संतु निरामया" व "जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||" असं म्हणणारे हिंदू संस्कृती आणि "काफिरांना संधी मिळताच ठार मारा, त्यांची संपत्ती लुटा, स्वर्गप्राप्ती होईल" असं म्हणणारी परकीय संस्कृती यापैकी काय खरोखर श्रेष्ठ असणार हे निश्चितपणे ठरवता येत नसेल त्यांच्याकडून अध्यात्म,भोग, त्याग इत्यादी वरच्या मताची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे ?

काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे.