भयंकररस:२
आमच्या भागातला नामचीन गुंड
दारी माझ्या येई मते मागण्या
दगडी चेहरा तयाचा तो
सौजन्याने नुसता थबथबलेला
शुभ्र पांढरे तसेच कपडे
मागे कार्यकर्त्यांचा मेळा जमलेला
हात विनयाने की जोडलेले अन्
आवाजात उसना आपलेपणा आनलेला
जरी सोंग छान सारे अगदी वठलेले
मग्रुरी अन् माजोरीपणा न
डोळ्यांतला गेलेला
बोलणे-चालणे-अविर्भाव जरी आकर्षक
त्याचे
अजूनही वाटे तरी भयानक ते सारे मला