या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!
काव्यरस
- Read more about या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली.
"या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता.
आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर.
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं...
दूरवरून आलेल्या या पोस्ट्स एकटक
माझ्याकडे पाहू लागतात
यापैकी कुठल्या पोस्टचा
मी टारगेट अॉडिअन्स असेन?
असेनच का?
कसकसल्या आठवणी देतात मला या पोस्ट्स.
जसं की मी चाललोय भर संध्याकाळी
उपनगरीय स्टेशनातून बाहेर
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होत