पहिली चाचणी
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी,
अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी,
कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात,
पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !!
डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी,
लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी,
ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी,
विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.