टाकटोकावली

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
3 Mar 2016 - 10:06 am

अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा
वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे
भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे
सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची
हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी
शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी

निवडणुकीचा ‘संकल्प’

खिरापत
जागर
जागरण

मैदानी ठेवा पाउल जरा ! खेळू नको लांबून बरा !
नोकरशाही कशी नासवे ! पुसा, बघा नेत्री आसवे !

संघटनाची रेटारेटी ! गवश्यांची भेटा भेटी !
देवेंद्रा नकोत बाता नकोत नाणी ! धीर दिलासा,शाश्वत पाणी !

तोंडाळां आवरा बेलगामी !नको फुकाची अम्हा सलामी
नको एक दिसाचे राजेपण अन पाच वर्षाची गुलामी !

दरबार

कविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीभयानकहास्यकवितामुक्तकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Mar 2016 - 10:28 am | प्रचेतस

:)

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 10:40 am | सतिश गावडे

एकोणिसाव्या शतकापुर्वीचं मराठी काव्य वाचल्यासारखे वाटले.

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 11:05 am | बोका-ए-आझम

शरुआत्याकडून आलेली वाटतेय. बाकी कविता मस्त.

यशोधरा's picture

3 Mar 2016 - 12:49 pm | यशोधरा

भारी!!

कवि मनाचा's picture

3 Mar 2016 - 4:20 pm | कवि मनाचा

मस्त आहे.

गणेशा's picture

5 Mar 2016 - 4:00 pm | गणेशा

छान आहे कविता

अभ्या..'s picture

5 Mar 2016 - 4:52 pm | अभ्या..

अतर्क्य, अगम्य, अगेन क्रिप्टीक नाखुन्स.
झेपले नाही. :(

नाखु's picture

5 Mar 2016 - 5:04 pm | नाखु

खाली संदर्भ लिंका दिल्यात त्या बघाव्यात ही विनंती..

( सा सं ला निरोप टाकला होता संदर्भ म्हणून टाका) अजून काहीच झाले नाही. संपादक मंडळ या व्यनीवर टाकला होता.

अनुक्रमणिका, अवांतर, उपसंहार, संदर्भ, पुरवणी, लिंका, क्लिपा, पिना, सुया हे असले काही बघायची सवय नाही.
जे काय ते डायरेक्ट धाग्यात. विदाऊट क्रिप्टीक. तरच वाचतो बघा. ;)

एका हादग्याच्या गाण्याशी नाद खुळल्यासारखा - जुळल्यासारखा वाटतोय.