ढग, पाउस, आठवणी आणि भावना...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
25 Feb 2016 - 11:14 am

मन कोरडं कोरडं
नाही पाऊस पडत
जरी जळालं हे रान
नाही मोहर झडत

नियतीच्या दरबारात
आता मागेन मी दाद
आंधळ्या न्यायदेवतेला
आता घालेन मी साद

आले काळेभोर हे ढग
नाही पाऊस हा त्यात
गेले कितीक ऋतू असे
नाही तिची माझी भेट

आता उरल्या आठवांचा
सखे मी घालतो जागर
इवल्याशा मनी माझ्या
दाटे गहिरा भावना सागर

काहीच्या काही कविताकविता

प्रतिक्रिया

निशांत_खाडे's picture

25 Feb 2016 - 11:24 am | निशांत_खाडे

मस्त जमलीये!

यशोधरा's picture

25 Feb 2016 - 11:28 am | यशोधरा

'वर्तमानपत्री' कविता :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2016 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 8:49 pm | विजय पुरोहित

डी.बी.सर सहमत अशासाठी की यात नेहमीचा सगा इफेक्ट दिसला नाही. म्हणजे "तुझ्यासाठी कोसळणारं आभाळ कवेत घेईन" किंवा "आठवण" या कवितांच्या इतके घनव्याकुळ आर्जव यात दिसून येत नाही...
पण असहमत अशासाठी की तरी पण एक स्वतंत्र उत्तम काव्य आहे...
पण सगाजींचा अगदी दिलोजान ओतून दिलेला इफेक्ट दिसला नाही हे पण खरे :(

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 9:03 pm | विजय पुरोहित

यात एक दुःखभरलं गीतकथन आहे जे कदाचित आपण ओळखू शकत नाही...
रचनाकार आणि वाचक यांच्या अनुभव विश्वातला हा फरक आहे... तो फरक संपवणे अवघड असू शकते...

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 11:33 am | विजय पुरोहित

मस्तच सगासाहेब...

कविता काहीच्या काही अजिबात नाही.जमलीये छान.

रातराणी's picture

25 Feb 2016 - 11:48 am | रातराणी

:)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2016 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

सल्लाम!

नाखु's picture

25 Feb 2016 - 12:42 pm | नाखु

केला अट्टाहास

आता उरल्या आठवांचा
सखे मी घालतो जागर
इवल्याशा मनी माझ्या
दाटे गहिरा भावना सागर

कडक सलाम :

स्वगत : कुणाच्याका होईना कोंबड्याने (धन्याशेठ लेखणीला) जाग आली ते बरें झाले.

पैसा's picture

25 Feb 2016 - 12:57 pm | पैसा

सुंदर लिहिली आहेस कविता! तो काहीच्या काही टॅग काढून टाक बघू!

प्रचेतस's picture

25 Feb 2016 - 3:00 pm | प्रचेतस

अप्रतिम.
कसं सुचतं हो गावडे सर तुम्हाला असं छान लिहायला?

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2016 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा

जसे आपणास सु'बोधमधुर प्रतिसाद द्यावयाला जमतात, तसेच!

बरी आठवण आली. तुम्हालाही हाच प्रश्न विचारायचा होता.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2016 - 7:38 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

नाखु's picture

26 Feb 2016 - 9:25 am | नाखु

म्हणजे बुवा अत्ताही स्माईली देऊ शकतात तर !!!

नक्षत्री काकांचा मित्र नाखु

किसन शिंदे's picture

26 Feb 2016 - 9:54 am | किसन शिंदे

=))

कसं काय जमतं हो तुम्हाला असलं स.पेठी बोलणं.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2016 - 10:06 am | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

प्रचेतस's picture

26 Feb 2016 - 10:08 am | प्रचेतस

हम्म.
बेग्स आणल्या काय?

यशोधरा's picture

26 Feb 2016 - 10:09 am | यशोधरा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2016 - 10:16 am | अत्रुप्त आत्मा

आणल्या.

प्रचेतस's picture

26 Feb 2016 - 10:18 am | प्रचेतस

=))

बबन ताम्बे's picture

25 Feb 2016 - 3:05 pm | बबन ताम्बे

.

प्राची अश्विनी's picture

25 Feb 2016 - 5:37 pm | प्राची अश्विनी

अतिशय सुंदर!!!

एक एकटा एकटाच's picture

25 Feb 2016 - 6:16 pm | एक एकटा एकटाच

आवडेश

गावड्यनुं लईच शेंटी झालांव?

चौकटराजा's picture

26 Feb 2016 - 9:06 am | चौकटराजा

कविराज ,
आले काळेभोर हे ढग
नाही पाऊस हा त्यात
गेले कितीक ऋतू असे
नाही तिची माझी भेट

आता उरल्या आठवांचा
सखे मी घालतो जागर
इवल्याशा मनी माझ्या
दाटे गहिरा भावना सागर

एक कडव्यात "तिची" असा उल्लेख आहे तर एका कडव्यात सखे असे 'संबोधन' आहे. मला वाटते आता कवि बरोबर एक सखी आहे व तिला तो आपल्या " तिच्या बद्द्ल सांगतो आहे. हे असेच आहे ना ?? की ती व सखी एकच आहेत ??

सतिश गावडे's picture

26 Feb 2016 - 9:42 am | सतिश गावडे

मला वाटते आता कवि बरोबर एक सखी आहे व तिला तो आपल्या " तिच्या बद्द्ल सांगतो आहे. हे असेच आहे ना ??

नाही.

की ती व सखी एकच आहेत ??

हो.

तुम्ही म्हणताय तसं आताच्या सखीला "मी तिच्या उरलेल्या आठवणींचा जागर घालतो" म्हटलं तर याही सखीची "ती" होऊन जागर घालण्यासाठी अजून जास्त आठवणी मिळतील. ;)

प्रचेतस's picture

26 Feb 2016 - 9:45 am | प्रचेतस

:)

तुम्ही म्हणताय तसं आताच्या सखीला "मी तिच्या उरलेल्या आठवणींचा जागर घालतो" म्हटलं तर याही सखीची "ती" होऊन जागर घालण्यासाठी अजून जास्त आठवणी मिळतील. ;)

=)) एक जागर पे एक और जागर फ्री! फ्री!! फ्री!!!

एकप्रवासी's picture

28 Feb 2016 - 9:28 pm | एकप्रवासी

मस्त वाटली कविता

प्रसाद गोडबोले's picture

29 Mar 2017 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले

वाह वाह !

एकदम अभिजात विरह कविता !

रडवलंस भावा !!