देवा...

Primary tabs

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जे न देखे रवी...
28 Jan 2016 - 10:59 pm

देवा आता तुला स्वरक्षणार्थ माणसांचा आधार घ्यावा लागतोय

दर्शनालाही तूझ्या आता घेराव घालावा लागतोय

ऐकले होते आहेत सर्व प्राणी तुझ्यासाठी समसमान

भावाचाच तु भुकेला फक्त बाकी सर्व कस्पटासमान

पण आजकाल तुलाही सोन्याचा नैवेद्य लागतोय

दर्शनालाही तुझ्या आता घेराव घालावा लागतोय

रांगेत भक्त भोळा तुला तासनतास शोधतोय

विचारतोय कोण या भोळ्या भाविकाला

तुलाही आजकाल बुवाबाजीचा गोतावळा लागतोय

असशील खरा देव तु तर स्वत: पटवुन दे

तुलाही का रे आजकाल दांभिकतेचा मेळावा लागतोय

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

28 Jan 2016 - 11:14 pm | सतिश गावडे

ओ ताई असलं काही लिहू नका हो. तुम्हा आस्तिक लोकांनी असं काही लिहील्यावर नास्तिक लोकांनी वाद कुणाशी आणि कशावरून घालायचा?