मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवणी : गुळमट तिखट कडू

मन ·

पैसा Sun, 09/14/2014 - 19:57
लै भारी किस्से रे मनोबा! मजा आली. तुझं पोरगं तुझ्या सवाई होऊ दे असा आशीर्वाद देत्यें. असाच अधून मधून दर्शन देत जा. इतिहासाच्या धाग्यांवर तुझी अनुपस्थिती जाणवते. बाकी मिपावर काय चांगलं विचारशील तर आम्हाला सगळंच चांगलं वाटतं, लेख चांगला नसेल तरी निदान एखादी प्रतिक्रिया तरी चांगली असते. त्यामुळे काय दिसेल तो धागा उघड आणि कर सुरू!

टिवटिव Sun, 09/14/2014 - 21:38
माझा निघालाय :) दिवसभर आरडाओरडा आणि तोडफोड सुरु असते...घरी आई बाबांना सांगायला गेलो..तर मी लहानपणी असाच होतो..हे ऐकायला मिळतं :)

एस Sun, 09/14/2014 - 22:33
मस्त लेख... लहानपणापासूनच आम्हांला वाचायचे भारी वेड. अगदी भेळ खातानाही आमचं लक्ष त्या वर्तमानपत्राच्या तुकड्यावरील मजकुराकडे. मग वाचतावाचता मध्येच भेळीने जागा अडवली की ती खायच्या ऐवजी तशीच थोडीशी बाजूला सरकवायची, पण आधी लग्न वाचनाचे, मग भेळीचे. असंच कुठेतरी वाचलं की तिबेटमध्ये लोक याक नावाच्या बैलासारख्या दिसणार्‍या केसाळ प्राण्याच्या दुधापासून चहा बनवतात. तसेच त्यात याकच्या दुधाचे लोणी टाकून तो जो काही प्रकार बनतो तो आवडीने पितात. झालं, आमच्या डोक्यात याकच्या दुधाचे लोणी टाकून केलेला तो चहा घुसळायला लागला. आता याकच्या दुधाचे लोणी आपल्याकडे कुठले मिळायला? तरीपण नाक्यावरच्या डेअरीवाल्याकडे जाऊन हिम्मत करून तसे विचारूनही आलो. अर्थात अपेक्षित प्रतिसादच मिळाला. पण निदान तो आम्हांला हसला नाही हे पाहून आमला थोडंसं हायसं वाटलं आणि काही झाले तरी लोण्याचा चहा करायचाच असा निश्चय पक्का झाला. चहा करायला नुकताच शिकलो होतो. आई घरी नव्हती. मस्तपैकी बिनदुधाचा चहा टाकला आणि लोणी शोधायला सुरूवात केली. लोणी तर नव्हते, पण तूप सापडले. चांगला चमचा भरून तूप त्या दोन कप चहात टाकले, खंगाळ खंगाळ खंगाळवले. तितक्यात आईसाहेब आल्या. त्यांना आमचा याक ऊर्फ गाईच्या तुपाचा चहा आनंदातिशयाने पेश केला... ... असो. चहाचे पातेले, गाळणी, कपबशा वगैरे सर्व तुपटतुपट भांडी घासल्यानंतरच आमची सुटका झाली. मग पुढच्या आठवड्यात नेहमी चहात साखरच का घालतात, मीठ का घालून पाहू नये, असा जेन्युइन प्रश्न स्वतःला विचारत मिठाचा चहा केला. आणि... . . . माझ्या हातचा चहाच कुणी पीत नाही राव! छ्याः ;-)

In reply to by प्यारे१

एस Mon, 09/15/2014 - 14:34
तो मीच. (तो मी नव्हेच च्या धर्तीवर उलटं वाचावं.) तो धागा आता लेखकाचा राहिला नसून प्रतिसादकांचा झाला आहे. म्हणून अधिक काही बोलण्याला अर्थ नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस Mon, 09/15/2014 - 14:32
तो आमचा बालपणीचा होरा होता. (आमच्याच बालपणीचा असेही कंसात वाचावे.)

In reply to by एस

असंच कुठेतरी वाचलं की तिबेटमध्ये लोक याक नावाच्या बैलासारख्या दिसणार्‍या केसाळ प्राण्याच्या दुधापासून चहा बनवतात. तसेच त्यात याकच्या दुधाचे लोणी टाकून तो जो काही प्रकार बनतो तो आवडीने पितात. तिबेटी चहा चहापत्ती, याकचे लोणी, पाणी आणि मीठ एकत्र घुसळून बनवतात. त्यात साखर टाकत नाही. त्याला बोज्जा, चा सृमा, जा सृब्मा (घुसळलेला चहा) असे म्हणतात.

दिपक.कुवेत Mon, 09/15/2014 - 13:36
मस्त किस्से. त्या स्मॉल वंडरचा मी सुद्धा जबरदस्त फॅन होतो...आजहि आहे. एकहि एपीसोड कधीहि चुकवला नाहि. मला वाटतं तेव्हा ती स्टार प्लस वर संध्याकाळि ०५३० ला लागायची. त्या सीरीयलची मोहिनी एवढि होती कि आईने काहि काम सांगीतलं कि विकिच्या आवाजात ते काम डबल बोलून दाखवायचो कराय्चो मात्र नाहि :D

मदनबाण Mon, 09/15/2014 - 16:51
रम्य त्या आठवणी ! मै तो बचपन सेही लय व्रात्य कार्ट्या रहा हुं ;) सुट्टीत दुपारच्या वेळी लोकांच्या घरच्या कड्या वाजवुन पळुन जाणे हा माझा आवडता उध्योग होता. ;) स्मॉल वंडर तर फारच आवडायचे त्यातला एक एपिसोड अजुनही आठवतोय ज्यात विकीच्या सारखाच एक रशियन मुलगा { बहुतेक त्याच नाव व्लादिमिर असं होत}रॉबर्ट तिच्या बहुतेक शाळेत आणला जातो. तसेच जेमीची मैत्रिण सुद्धा लयं आवडली व्हती, जीव आला होता आपला तिच्यावर ! ;) कोणती ? अर्थात Jessica ;) पण याहुन सगळ्यात जास्त मालिका मला आवडली होती ती नव्याने सुरु झालेल्या सोनी टिव्ही वरची आय ड्रीम ऑफ जिनी ! ती जिनी "जी मालिक" इतक सुरेख म्हणायची, साला आपल्या नशिबात अशी जिनी कधी येणार असं लयं वाटायच त्यावेळेला! ;) 1 बाकी डीडीज कॉमेडी शो कोणाला आठवतोय का ? कोणी पाहिला आहे का ? http://www.youtube.com/watch?v=NBLJ47GtUpw

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

पियू परी Sat, 01/30/2016 - 16:15
मदनबाण.. मोठ्ठा सेम पिंच.. या दोन मालिकांनी वेड लावलं होतं तेव्हा.. आता युट्युबवर या मालिकांचे इंग्रजी व्हर्जन आहेत बहुतेक.. पण मला हिंदीच हवे आहेत. :(

जेपी Mon, 09/15/2014 - 20:00
केल.ते स्मॉल वंडर,डकटेल वाला अंकल स्क्रुज,टेलस्पीन वाला बल्लु,ती जीनी आणी कुणाला आठवत असल्यास SILVER SPOON नावाची बापलेकाची मालीका माझी आवडती मालीका. जाम आठवले.

In reply to by जेपी

आदूबाळ Mon, 09/15/2014 - 21:24
सिल्वर स्पून म्हणजे टकले किडकिडीत श्रीमंत गोरे गृहस्थ आणि त्यांनी दत्तक घेतलेली दोन कृष्णवर्णीय मुलं हीच सीरियल ना? त्यातला धाकटा लय व्रात्य होता असं आठवतंय.

In reply to by आदूबाळ

सखी Tue, 09/16/2014 - 22:24
तुम्ही म्हणताय ती डिफरंट स्ट्रोक्स असावी, मस्त सिरीयल होती विशेष म्हणजे त्यांच्या वडीलांचा रोलही चांगला होता. - दुवा.

सुहास.. Mon, 09/15/2014 - 20:19
मस्त आठवणी ...माझ्या लहाणपणी घरात टिव्ही ला आरामच असायचा ,,,( बंधुराज परीक्षांच्या काळात टिव्ही थेट माळावर टाकुन देत असत, आणि त्यांना टिटोरियल, सहामाही, वार्षिक अश्या परीक्षा होत्या..असो ) पण सुट्टीच्या काळात सोनी वरची " जस्ट मोहोब्बत " ने मस्त मजा आणली होती, एक हॉस्टेल वरुन परत आलेला मुलगा , त्याचा व्हिजन मध्ये येणारा त्याचा मित्र ..साधंच पण वातावरण निर्मीती मात्र मस्त होती सहा जणांच्या घरात मी एकटाच महाभयानक व्रात्य कार्ट होतो..हे ही मला ठासुन आठवतय ...पण तेव्हढा मार ही खाल्ला आहे , डॅड ला चुकुन त्यांच्या तोंडावर " रुस्तम-ए- हिंद " म्हणणारा मी एकटाच बालक असावा ;)

सूड Tue, 09/16/2014 - 23:21
>>" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?" अच्छा, मुलगा झाला तर !! ;) हे वाचता वाचता आमचेही काही उपद्व्याप आठवले. =))))

मन१ Wed, 09/17/2014 - 20:34
सर्व वाचक-प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!

लेखनप्रकार
आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला. व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक.... एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे. उदा:- "मी आज व्यामिश्र खेळलो." "मला आज खूपच उद्बोधक वाटतय." किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे." आज "शाळेत जनरेटा पोचला." . . "शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.

छायाचित्रणकला स्पर्धा २ : मतदान.

संपादक मंडळ ·

चैदजा Sun, 09/14/2014 - 18:33
१. २४ २. २० ३. २३ २४ - आपल्या बाळाल दूध पाजण्याचा आनंद शब्दातित असतो. (माझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे) २० - सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य निर्व्याज आहे. २३ - बहिण भावाच्या नात्यातील आनंद वेगळा सांगायला नको.

रेवती Sun, 09/14/2014 - 19:50
१) २ २) १७ ३) १२ लहान मुलांच्या चित्रातून निवड करणे फार अवघड आहे.

शिद Mon, 09/15/2014 - 02:56
१) १७ २) १२ ३) २० सगळेच फोटो मस्त आहेत व लहान मुलांचे तर अगदी गोड.

मृत्युन्जय Mon, 09/15/2014 - 11:39
मला स्वतःला २३ क्रमांकाचा फोटो प्रचंड आवडतो. पण त्याला मी मत देणे चुकीचे ठरेल. त्यामुळे माझी मते पुढील ३ क्रमांकाना. १. ६ - स्वतःच्या लहानग्याच्या मागे चालण्यातला आनंद अवर्णनीय असतो. त्या आनंदाची तुलनाच नाही. छायाचित्रातली कल्पकता आणि निरागसता यामुळे या छायाचित्राला प्रथम क्रमांक २. १२ - कुठलाही समारंभ हा एक आनंदाच सोहळाच असतो. प्रस्तुत छायाचित्रात आनंदाना मुक्त अविष्कार बघायला मिळतो आहे. शिवाय छायाचित्रातला फोकस याला दुसरा क्रमांक देताना महत्वाचा ठरतो. ३. १७ - निर्भेळ निरागस आनंदाला तोड नाही. तो आनंद मुक्तपणे व्यक्त करण्याला दुसरा पर्याय नाही. योग्य क्षण योग्य प्रकारे कैद केलेला असल्याने तिसरा क्रमांका या छायाचित्राला.

अनुप कोहळे Mon, 09/15/2014 - 14:17
१. २० २. २४ ३. १७ लाहान मुलांचे फोटो खुप गोड येतात. पण निखळ आनंद दर्शवणारी हि तिन चित्रे फारच उत्तम आहेत.

आदूबाळ Mon, 09/15/2014 - 21:22
माझं मतः १. ६ २. मत नाही ३. मत नाही यामुळे मत अवैध ठरू नये अशी आशा...

In reply to by विलासराव

रागाला आवरा, रागाला आवरा, विलासराव ! मंदिराच्या कमिटीत तुमच्या चौथ्या रोलचा प्रश्न चर्चेत आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Fri, 09/19/2014 - 18:57
पहीला हप्ताच अजुन नाही पोचला. तेवढं पहा. तेव्हढं झाल्यावर मंग राग आला आपल्याला तर बोला. काळया पाण्याची शिक्षा भोगीन पण राग येउ देणार नाय. मंदिराच्या कमिटीत तुमच्या चौथ्या रोलचा प्रश्न चर्चेत आहे. सगळं खरय. पन उधारीवर आपला विश्वास नाय.

In reply to by विलासराव

असं करून कसं चालेल ? तुम्ही लोकांना कर्मफळासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायला सांगता, आम्ही तुम्हाला जरा फिनान्शियल वर्ष संपेपर्यंतच कळ काढायला सांगतोय ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Fri, 09/19/2014 - 19:24
असं करून कसं चालेल ? तुम्ही लोकांना कर्मफळासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायला सांगता, आम्ही तुम्हाला जरा फिनान्शियल वर्ष संपेपर्यंतच कळ काढायला सांगतोय ! Lol बरोबर आहे मग हे जे येणे आहे त्याचे बीज मागच्या जन्मात लावलेलेच आहे. आनी आता त्याची फळे मिळायची वेळ आलीय. अध्यात्म म्हणजे रो़कडा अनुभव हेतर तुम्हाला माहीतच असेल ना? बरं हे आपलं मिपामंदीर म्हनुन मी सांभाळुन घेतलय. लवकर काय ते सांगा, नायतर लै ऑफर आहेत आपल्या़कडे . फळ पिकलय पडायच्या आत काढुन घ्यावे लागेल. आता खरडवहीत या नायतर नवीन धागा काढा 'मिपाची अध्यात्ममुक्ती' असा. मंग करु बॅटींग तिकडे. नायतर पैसाताई यायच्या ईकडे समज द्यायला.......मंग त्यांना पण हप्ता द्यावा लागंल. अवांतरः पैसाताईंकडे पैसा तर भरपुर असणार मंग त्यांना कशाचा हप्ता तुम्ही देणार?

In reply to by किसन शिंदे

@(ही छोटू लैच्च गोड ब्वॉ)>>> ++++++++++११११११११११११११११ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मी जितक्या जणांना हा फोटो दाखवला,तितक्या जणांनी अश्याच प्रतिक्रीया दिल्या. मूर्तीमंत आनंद! हॅप्पीनेस ऑफ लाइफ!

पैसा Sun, 09/21/2014 - 17:18
माझे मत व्यनि करत आहे. स्वॅप्सकडून काही टिप्पण्या वाचायला आवडल्या असत्याच!

लेखनविषय:
लेखनप्रकार
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील दुसरं पुष्प, विषय "आनंद" या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकांंचं चित्रं या यादीत टाकायचं रहुन गेलं असेल तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!

प्रोग्रेसिव्ह लेन्सेस सुविधा कि त्रास.

अत्रन्गि पाउस ·

ऋतुराज चित्रे Sun, 09/14/2014 - 13:06
बायफोकल लेन्स वापरताना पुस्तक वाचताना किंवा दूरचे वाचताना मला काहीही त्रास होत नव्हता परंतू डेस्कटॉपवर काम करताना त्रास होत असे. जवळून उडनारा डास अचानक दिसेनासा होइ. नेत्रतज्ञाकडून डोळे तपासून घेतले. त्यांनी प्रोग्रेसिव लेन्स वापरण्यास सांगितले. डोळ्यांना सवय होइपर्यंत त्रास होइल नंतर तुम्ही प्रोग्रेसिवच्या प्रेमात पडाल असे सांगितले. घेतला एकदाचा महागडा प्रोग्रेसिव चष्मा. तंतोतंत तुमचेच अनुभव मला आले. घुबडासारखी मान व डोळे फिरवून घरात चेष्टेचा विषय बनलो होतो. भिक नको पण कूत्र आवर अशी माझी अवस्था झाली होती, करणार काय मारुतिच्या बेंबीत बोट घातले होते. माझ्या डोळ्यांनाच माझी किव आली व त्यांनी नमते घेवून घेतले एकदाचे प्रोग्रेसिवशी जुळवून. आता मला डास दिसूही लागले व मारताही येऊ लागले. पैसे अगदीच वाया गेले नाही ह्याचे समधान वाटले. परंतू सगळेच आलबेल आहे अशातलाही भाग नाही. वर्षभरात जवळचा नंबर बदलला की त्याच प्रोग्रेसिव लेन्समधून फोकल पोइंट जुळवताना थोडे दिवस त्रास होतो. नवीन लेन्स घेइपर्यंत त्रास सहन करवा लागतो. कधी गर्दीत चष्म्याला धक्का लागून नेसल क्लिप दाबल्या गेल्या तरी चष्म्याचा कोन बदलल्यामुळे थोडे दिवस त्रास होतो. फक्त जवळचा व लांबचा नंबर असल्यास दोन्ही दरम्यानचे स्पष्ट दिसत असल्यास प्रोग्रेसिव लेन्स वापरण्याची गरज नाही.

पैसा Sun, 09/14/2014 - 20:57
अजूनतरी फक्त वाचायला चष्मा लागतोय. दोन्ही नंबर्स म्हणजे कटकटच आहे. मग सरळ दोन वेगळे चष्मे वापरलेत तर?

In reply to by पैसा

आशु जोग Mon, 09/15/2014 - 00:49
अजूनतरी फक्त वाचायला चष्मा लागतोय. दोन्ही नंबर्स म्हणजे कटकटच आहे. मग सरळ दोन वेगळे चष्मे वापरलेत तर? मग ड्यूएल सिमचे फायदे कसे मिळतील ;D

In reply to by पैसा

चौकटराजा Tue, 09/16/2014 - 16:19
शौकिन या चित्रपटाचा उत्तरार्ध आला तर त्यात रोल मिळेल. पण अर्र.......तुम्ही अनाहिता च्या मेंबर आहात हे विसरलोच की !

In reply to by पैसा

सामान्यनागरिक Fri, 09/26/2014 - 18:18
त्यातला एक नेहेमी आपण कुठेतरी विसरतो आणि तसेही दोन चष्मे बाळगणे त्रासाचे असते. त्यत दोन सेट बनवावे लागतील. प्रोग्रेसिव काचेबरोबर जुळवुन घेणे जरा त्रासाचे असते. त्यात गाडीचालवतांना जास्तच. उगीच नको रिस्क.

रमेश आठवले Sun, 09/14/2014 - 23:05
मी गेले कैक वर्षे progressive लेन्सेस वापरत आहे. सुरवातीला त्यांना कम्पनीच्या नावावरून varilux असे म्हणत असत. मला दूरचे पाहण्याचा नंबर कमी आहे आणि जवळचा नंबर भरपूर आहे. आधी बाय फोकल वापरत होतो. त्या पेक्षा progressive खूपच जास्त उपयोगी वाटतो. दर एक दोन वर्षांनी चेक करून घेऊन, जरूर तसा नंबर बदल करून घेतो. जिना उतरताना मात्र जरा सावधगिरी बाळगावी लागते.

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2014 - 01:00
मी गेली १४ वर्षे प्रोग्रेसिव्ह लेन्सेस वापरत आहे. चष्मा लावल्यापासून १-२ दिवस रस्त्याने चालताना, जमिनीची पातळी वेगळी दिसल्याने, जरा बाचकल्यासारखे व्हायचे पण २-३ दिवसांतच डोळ्यांनी ह्या फरकाशी मिळतेजुळते घेतले (डॉक्टरांनीही तसे सांगितले होतेच) त्यामुळे नंतर कधी त्रास झाला नाही. एकदा नंबर वाढला आणि पुन्हा एकदा नविन लेन्स लावल्यावर पुन्हा २ दिवस त्रास झाला पण ह्या वेळी कमी झाला. आणि २ दिवसांत पुन्हा डोळ्यांनी जुळवून घेतले. बाकी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा कधीच त्रास झाला नाही. हं! बॅडमिन्टन खेळताना शटल 'मिस' व्हायचे (दोन वेगवेगळ्या फोकल लेंग्थमधून प्रवास केल्याने) पण पुढे गुडघ्यांच्या त्रासामुळे डॉक्टरांनी बॅडमिन्टन खेळायलाच बंदी घातल्याने त्या समस्येवर परस्पर तोडगा निघाला.

रेवती Mon, 09/15/2014 - 02:38
नवर्‍याला तीन चार महिन्यापूर्वीच असे ग्लासेस मिळालेत. तुम्हाला होतोय तसाच त्रास झाला आता बरेच जुळवून घेतले आहे पण एकंदरीतच बायफोकल बरा असे त्याला वाटते.

कंजूस Mon, 09/15/2014 - 07:52
बाइफोकलच वापरा. फक्त स्नूकर बिलीअर्ड खेळणारे मोठ्या फ्रेमचे वापरतात तसे घेतले तर मोठे दृष्य एकाच वेळी पाहता येईल. रोडवरच्या डावीकडच्यासाइन आणि कारचा डैशबोर्ड मान न वळवता फक्त डोळे फिरवून काम होईल.

लांबचा आणि जवळचा असे दोन्ही नंबर निघाले कि प्रोग्रेसिव्ह लेन्सेस वापरा असे सांगतात नव्हे जोरदार समर्थन करतात. २०१० साली मी ते तसे १.५ वर्षे वापरून पहायचा बराच प्रयत्न केला पण ड्रायव्हिंग, laptop वरचे काम (टेबल वर ठेऊन) आणि हातात पुस्तक/पेपर घेऊन वाचणे ह्या दिनचर्येतील गोष्टींसाठी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा त्रास जास्ती झाला..शेवटी जवळचा नंबर नगण्य असल्याने फक्त लांबचा चष्मा करून घेऊन तोच वापरला आता पुन्हा जवळचा आणि लांबचा नंबर अंशत: वाढल्याने त्या प्रोग्रेसिव्ह वापराच्या सल्ल्याला तोंड देतोय... १.

काही प्रश्न (कृ. ह. घेणे)

पगला गजोधर ·

पैसा Sun, 09/14/2014 - 20:43
यांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत भाऊ! किंवा उत्तरे माहित असतात सगळ्यांनाच पण बोलणे अडचणीचे असते.

विलासराव Tue, 09/16/2014 - 20:54
जसे पवित्र नदीत स्नान केल्याने पापे धुतली जातात अशी सर्वसामान्य लोकात श्रद्धा आहे, तशीच आपणच वेळोवेळी भ्रष्ट म्हणून आरोपिलेले, नेते पक्षबदल करून आपल्या पक्षात आल्यावर, त्यांची पापे धुतली जावून पवित्र होतात, अशी काही राजकीय पक्षातील समर्थकांची श्रद्धा असते का ? पवीत्र नदीत नाही तर अंतरंगात डुबकी मारल्याने पापे धुतली जातात. पटत असेल तर डुबकी मारा, नसेल तर नका मारु. बाकी पास.

In reply to by विलासराव

पगला गजोधर Wed, 09/17/2014 - 10:13
"बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।" असं काहीसं तुम्हाला म्हणायचे आहे का हो ? मग असे आत्मपरीक्षण सर्व भक्तांनी, सैनिकांनी, राजे, सेनापती, राव आणि रंक सर्वांनीच केले पाहिजे. आपल्यात आला म्हणजे पवित्र, विकासपुरुष, नाहीतर भ्रष्टाचारी, ढोंगी ?

In reply to by पगला गजोधर

विलासराव Wed, 09/17/2014 - 10:23
"बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।" असं काहीसं तुम्हाला म्हणायचे आहे का हो ? अगदी नेमके. मग असे आत्मपरीक्षण सर्व भक्तांनी, सैनिकांनी, राजे, सेनापती, राव आणि रंक सर्वांनीच केले पाहिजे. आपल्यात आला म्हणजे पवित्र, विकासपुरुष, नाहीतर भ्रष्टाचारी, ढोंगी ? हे माझ्या हातात नाही त्यामुळे पास. बाकी आपली मर्जी.

पगला गजोधर Wed, 09/17/2014 - 10:22
जगदंब... जगदंब !! आता तर उत्तरेकडील पोटनिवडणुकीनंतर तर १६५ खाली आपन तर शेटल व्हणार न्हाय, न्हाय म्हंजी न्हाय. बाकी निवडणूक फॉर्मलीटी हाय, जेवढे उमेदवार देवू तेवढ्या शिटा गावल्याच पाहिज्जे ! असं तर कोनी म्हणत तर नसल ? कोण आहे रे तिकडे !…

वेल्लाभट Wed, 09/17/2014 - 17:28
अभ्यास करून असो, कॉपी करून असो, पेपर फोडून असो किंवा आणखी कुठल्या प्रकारे असो..... पास होईल तो हुशार !

In reply to by वेल्लाभट

पगला गजोधर Wed, 09/17/2014 - 17:53
"अभ्यास करून असो, कॉपी करून असो, पेपर फोडून असो किंवा आणखी कुठल्या प्रकारे असो..... पास होईल तो हुशार !"
त्या ऐवजी "परीक्षा दिल्यानंतर", अभ्यास करून असो, कॉपी करून असो, पेपर फोडून असो किंवा आणखी कुठल्या प्रकारे असो..... पास होईल तो हुशार ! परीक्षा देण्याच्या आधीच, जर मी १६५ मार्कांचे प्रश्न अटेम्ट करणार, त्यात मी १६५ मार्क मिळवणारच आहेत तर मीच मार्कलिस्ट छापून, मीच मॉनीटर म्हणून जाहीर करून नाचण्यासारखे आहे.

काही काळापूर्वी ऐक जाहिरात दिसायची टीव्हीवर, क्रिकेटच्या ऐका सामन्यात ऐक कप्तान हजर आहे व दुसर्या संघाकडून कप्तान जाहीरच होत नाही, बिनकप्तानाची टीम काय जिंकणार ? असा सवाल विचारला जातो आणि मतदान अमुक ऐका पक्षाला कराच असे सांगितले जाते. या विधानसभा निवडणुकीत, तो संघ बिना कप्तानच मैदानात उतरणार असे दिसते ! पूर्वी गणिताच्या पेपरात ऐक प्रश्नप्रकार असायचा, कि अमुक अमुक काम करयाला, तमुक काल लागतो, तर त्याकामाच्या काहीपट काम करायला किती कालावधी लागेल ते सांगा.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट

अमित खोजे ·

छान सिरिज आहे!!! उत्तम लिहिले आहे आपण!!! विलक्षण धाडसी लोकांचा देश आहे अमेरीका!! सतत नव्या कल्पनांना उघडे दरवाजे!!! अप्रतिम लेखमाला होईल, येऊ देत

उपास Sun, 09/14/2014 - 12:06
मालिका छान होईलच.. र्जमलचं तर प्रूफ रिडींग करुन घ्या, वाक्यांचा टोन मधेच सटकतोय असं वाटलं.. दरम्यान, गिरीश कुबेरांच 'हा तेल नावाचा इतिहास आहे..' वाचलं आणि रॉकफेलरच्या ताकदीचा अंदाज आला, जगप्रवर्तक म्हणता येईल असं काम केलय त्याने बर्‍या-बुर्‍या सगळ्याच मार्गांनी अर्थात पण अमेरिकन्स म्हण्ततात तसं, 'He showed results..' पुलेशु..

In reply to by उपास

अमित खोजे Sun, 09/14/2014 - 22:58
'एका तेलियाने' असे गिरीश कुबेरांचे पुस्तक मी वाचले आहे. तेही मराठीमध्येच आहे. गिरीश कुबेरांनी सुंदररीतीने संपूर्ण तेल उद्योग कसा सुरु झाला, त्यामध्ये कसे राजकारण खेळले गेले, यामानी यांनी ते कसे छान सांभाळले, अमेरिकेचे यातील वर्चस्व आणि अरेरावी, इराक इराण मधील युद्धांची कारणे याचे वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला वाटत होते की ही माहिती आपल्या मिपावर यावी. किंवा या पुस्तकाचे परीक्षण लिहून मिपाकरांना याची ओळख करून द्यावी. परंतु हे पुस्तक मराठीमध्येच आहे आणि सर्वांनी ते विकत घेऊन वाचले तरच ती संपूर्ण माहिती कळेल. Eka_Teliyane Eka_Teliyane_2

In reply to by अमित खोजे

विलासराव Tue, 09/16/2014 - 21:12
गिरीश कुबेरांच 'एका तेलीयाने' ,'हा तेल नावाचा इतिहास आहे..' वाचले आणी 'धर्म-अधर्म' ही वाचले. तिसरे पुस्तक वाचुन अमेरीका कोणी घडवली याचा जास्त बोध झाला.

In reply to by विलासराव

प्रसाद१९७१ Wed, 09/17/2014 - 14:14
गिरीश कुबेरांचे जास्त वाचायचे नसते, त्यांचा अमेरीकेला आणि इस्त्रायला ठोकणे हा एकच धंदा असतो. त्यांचा ह्या मध्यपूर्वेत भटकण्याचा खर्च कोणी केला होता विचारा त्यांना एकदा.

आदूबाळ Sun, 09/14/2014 - 12:37
छानच! मला वाटत होतं की vanderbilt चा जीन्सचा व्यवसाय होता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमित खोजे Sun, 09/14/2014 - 22:12
खरे आहे. लेख सुरुवातीला एका काळात लिहिला होता. जसे कि 'जीम फिस्क त्याला पुरून उरतात', 'त्याला यातील फोलपणा लक्षात येतो' पण लेख वाचल्यानंतर तो अगदीच निरस व विकिपीडिया सारखा एका टोन मध्ये वाटला. त्याला गोष्टीचे स्वरूप देण्याच्या नादात थोडा विस्कळीत झाला. प्रुफ रीड (मुद्रितशोधन ? शब्द सुचवाल ?) नक्कीच करून घेईन. चित्रांचे संदर्भ सुद्धा द्यायचे राहिलेत. घाई केली असे वाटतंय. पुढचा लेख जरा शांतपणे लिहून, प्रुफ रीड करून मगच टाकेन.

श्रीरंग_जोशी Sun, 09/14/2014 - 21:43
सदर डॉक्युमेंटरी मी किमान तीन वेळा पाहिली आहे. एक आव्हानात्मक विषय हाती घेतला आहे. सादरीकरण आवडले पण भाषाशैली यांत्रिक वाटली. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

अमित खोजे Sun, 09/14/2014 - 22:35
मलासुद्धा हि डॉक्युमेंटरी एवढी आवडली कि वाचनालयातून तीची DVD आणली आणि दोन वेळा बघितली. त्या DVD चा आता लेख लिहायलासुद्धा उपयोग होत आहे. फक्त मला आता असा प्रश्न पडला आहे कि हि लेखमाला या डॉक्युमेंटरीचे भाषांतर म्हणून लिहू कि अजून जी माहिती संदर्भ शोधताना मिळेल ती -अधिक डॉक्युमेंटरी - अशी माहितीपूर्ण लिहू. मला दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतोय. भाषाशैली सुधारावी लागणार हे तर समजलेच आहे. गोष्टीच्या स्वरुपात लिहिण्याचा प्रयत्न राहील.

In reply to by अमित खोजे

श्रीरंग_जोशी Mon, 09/15/2014 - 06:01
नक्कीच दुसरा पर्याय सा स्वागतार्ह असेल. परंतु त्यात माहितीचा विस्तार नियंत्रीत करणे हे फारच आव्हानात्मक काम असते हे मी स्वानुभावावरून सांगू शकतो :smile: .

मन१ Sun, 09/14/2014 - 23:17
लेखनावर फिदा आहे. पुढच्या धाग्याची हावरटासारखी वाट पहात आहे.

America was not discovered; it was built! अमेरिका सापडली नाही, ती उभारली गेली! हे एक प्रसिद्ध वाक्य मी बऱ्याच वेळेला ऐकले होते. नुकतीच 'The Men Who Built America' ही मालिका History channel वर बघितली. त्यामधील उद्योजकांच्या गोष्टी पाहून आश्चर्य तर वाटलेच परंतु अमेरिकेचा इतिहाससुद्धा समजला आणि वरील वाक्य तर शतशः पटले. या मालिकेमध्ये इतक्या छान तऱ्हेने सर्व उद्योजकांचा इतिहास समजावून दिला होता कि मला तो इतिहास तुमच्या बरोबर वाटून घ्यावा असे न वाटेल तरच नवल. खूप काही शिकण्यासारखे होते. न्यूयॉर्कमध्ये रहात असल्याने कितीतरी वेळा ग्रँड सेन्ट्रलला जाउन आलोय.

सोन्याच्या पोइंटवाला पेन....

फुंटी ·

चौथा कोनाडा Sun, 09/14/2014 - 22:57
क्रियेचर ३डी शिणुमाचा असंल का ह्यो ? पन असं येक वाटून र्‍हायलयं, ह्या लेखातल्या वळी एका-आड-एक लावल्या तं येकदम फाडू दुर्बोध कविता व्हईल. युनिवरशिटीला लावून टाकू.

In reply to by शिद

फुंटी Mon, 09/15/2014 - 12:54
पॉईंट रोखून सगळेच लिहितात हो.बाकी एकंदर पॉईंट तुमच्या लक्षात आलेलाच दिसत नाही ...आपल्या जगण्यात काही पॉईंट आहे का तेही शोधाव मानसान कधी मधी...

विजुभाऊ Mon, 09/15/2014 - 13:18
अरेच्चा. त्या कोणत्यातरी शरदिनी तै बहुतेक गद्द्यात ल्ह्यायला लागल्या की काय? काय च्या काय...... लिटरेचरल डायरीया झाल्यासारख्या एकामागोमाग ओळी खरडून ठेवल्यात.

सुहास.. Mon, 09/15/2014 - 15:11
आधी विमान डोक्यावरंन गेलं ... विषय चांगला नोवडलाय पण अजुन थोडा फुलवायला हवा होता ...झोप आजच नाही ( ते ही त्या सोन्याच्या फांउटन्पेन मुळे की ई. ) की ते स्पष्ट नाही ..

In reply to by सुहास..

फुंटी Mon, 09/15/2014 - 15:39
झोप नव्हती तोवर लिहील ... झोप आल्यावर आणि गाढ झोप लागायच्या आधी एखाद्या गोष्टीने अचानक जाग येते...laptop चालू राहिला म्हणून मला अचानक जाग आली...त्यापूर्वी ग्लानीत समोर आलेल्या प्रतिमा लिहून टाकल्या ..विष्णूनाना ,मी आणि नानासाहेब आणि सोन्याचा point असलेल पेन ...परस्पर संबंध काय ते त्या क्षणी कळल नाही ...आताही नाही...

मदनबाण Mon, 09/15/2014 - 15:47
माणूस मारतो तेव्हा काय निघून जात ?? तसेच मी बेडुक का नाही ? मी गांडुळ का नाही ? मी मुंगी का नाही ? माणुसच का ? असे प्रश्न पडणे देखील चूक नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

सुहास.. Mon, 09/15/2014 - 16:14
अरे रे बाणा !! तुम्ही " मुंगळा होवुन वस्तु पहायला शिकला नाहीत " .....ए जालीम का गालिब , तुने पी ही नंही ;) आजची स्वाक्षरी :- मिपाकर म्हणुन शरमेची गोष्ट

आसिफ Mon, 09/15/2014 - 21:34
लेख वाचुन मला मुक्तपीठीय 'स्वाती ठकार' यांची आठ्वण झाली. तुम्ही सकाळ वर 'स्वाती ठकार' या नावाने प्रतिक्रिया लिहता काय हो ? ठरवुन देखील तशा प्रतिक्रिया लिहता येत नाहीत हो. पशुपथिनाथ...ताठ उभी राहा... आणि इकडे बघ.. काय वाह्यातपणा चालवलाय? तुम्ही कधी साकीनाकाच्या जंगलात गेला आहात का हो? दुपारी ३ वाजता पण किर्र अंधार असतो म्हणे... तिथे जाऊन स्तनातन मंदिराजवळ मिसळ आणि तर्री खायची. पण बरोबर कमीत कमी २३ लोक तरी पाहिजेच. तरीपण तुम्ही ऐकायचं नाही हेच ठरवले असेल.. तर मात्र मला वेगळा उपाय करावा लागेल. मग मात्र मी तुम्हाला टाच दाखवीन.. चालेल ना? चल तर मग.. ~आसिफ.

..विष्णू नाना आणि मला नानासाहेबांकडून सोन्याच्या पोइंट वाला पेन मिळणार आहे...पण नानासाहेबांच्या समाधि भोवती तर शेवाळ आणि घाणीच साम्राज्य झाल आहे...त्यात हे उरळी आणि फुरसुंगी वाले सतत आंदोलन करत असतात... आंदोलन संगठित सत्ता तंत्र या व्यवस्था द्वारा शोषण और अन्याय किए जाने के बोध से उसके खिलाफ पैदा हुआ संगठित और सुनियोजित अथवा स्वतःस्फूर्त सामूहिक संघर्ष है।... क्या जीत मे क्या हार मे, किंचित नही विचलीत मै, संघर्षमे जो भी मिला ये भी सही वो भी सही... सहि रे सही चे प्रयोग भरत ने का बर बंद केले?... सहि करण्यासाठी फाउंटन पेन हवय भो*** ते सुध्दा सोन्याच्या पोईंटचंटचा.. बर झाल त्याला टोपण सापडत नाहिते... मि.पा. वर बरेच जण टोपण नावाने का बरं लिहित असतिल?... असतिल त्याचे दात दिसतिल.... दातावरच्या किटणाला औषध काय?... काय बाई सांगु कस ग सांगु?... समस्त हिंदुस्तानातल्या शेळपट लोचट लाळघोट्या नेभळट आणि लाचार बांधवांचा विजय असो... हे यान एकदा मंगळावर पोचल कि सुटलो रे बाबा... पैजारबुवा,

झोप येत नाही म्हणून खिडकी उघडून बाहेर पाहिलं....समोरच घुबड बसल होत विजेच्या तारेवर....घुबड दिसण शुभशकून म्हणावा की अपशकून या विचारात असतानाच खिळवून ठेवलं त्याने ...त्याच ते मान वाकडी करून पाहण विचित्रच ...त्यात हे पांढर घुबड....थोड्या अंतरावर अजून एक घुबड होत...टेरेस वर चिमण्यांची घरटी ठेवलीत ...आताशा चिमण्या येऊन घरटी करतात .त्या घुबडांच्या मनात तसं काही नसेल ना?

फाइंडिंग माय !!!

सूड ·

In reply to by एस

सस्नेह Sun, 09/14/2014 - 22:56
विस्कळितपणातूनही जे काही पोचायचं ते पोचलं.

In reply to by श्रीरंग_जोशी

सूड Sun, 09/14/2014 - 15:44
नोप!! :) पण काल मुव्ही बघून ही कोंकणीं 'उलय'णारी माय आणि तिच्या घरातली माणसं इतकी आठवली की लिहील्याशिवाय राहावलं नाही.

पैसा Sun, 09/14/2014 - 08:10
लहानपणच्या आठवणी बहुधा अशाच असतात. कोणाचंच पुरतं चित्र आपल्या मनात तयार होत नाही. आणि त्यामुळेच बहुधा नंतर ही अशी अर्धी राहिलेली चित्रं जास्तच चुटपूट लावून जातात.

धन्या Sun, 09/14/2014 - 09:14
सुंदर लिहीलंय. पिच्चरने बोअर मारल्यामुळे मी मोबिलेशी खेळत असताना आणि वल्ली पिच्चर "अंगठ्याचा देव" नसल्यामुळे चक्क झोपा काढत असताना पडद्यावर जे काही चालू होतं ते पाहून तुझ्या डोक्यातही बरंच काही चालू होतं तर. :)

इनिगोय Sun, 09/14/2014 - 19:09
लहानपण हे असंच अनेक तुकड्यांचं बनलेलं मस्त चित्र असतं. छान झालंय. थोडे स्थळकाळाचे तपशील अजून आले असते तर पटकन समजलं असतं. पुढचा सिनेमा पाहिलास की नाही?

स्पा Sun, 09/14/2014 - 21:58
लहानपणातले हे कोलाज अनुभव आवडले,विस्कळीत पणामुळेच प्रभावी वाटलं पण अजुन खुलवता आलं असतं असंवाटताय अवांतर : बाकी ईतका भिकार पिक्चर दिडक्या मोजुन पहायला गेलात त्याबद्दल दंडवत्स !!!!

समीरसूर Wed, 09/17/2014 - 10:04
आवडला. असे बरेच लोकं असतात. जे सतत आठवणीत राहतात, तेवढ त्यांच्याशी थेट संबंध आलेला नसतो. त्यांचं काय होतं हे खूप नंतर कळतं. काहीही झालं तरी वाईट वगैरे वाटत नाही पण आठवणींच्या अगणित धाग्यांपैकी एक तट्टकन तुटतो हे खरं. बाकी 'फाईंडिंग फॅनी' मी पण हौसेने बघायला गेलो होतो. शनिवारचा सिटी प्राईडचा रात्री ९ चा शो. २५० तिकीट. बुकमायशोचे ५६ रुपये वेगळे. टोटल ५५६ रुपये. ६० रुपयांच्या लाह्या!!! आणि पिक्चर अत्यंत भिकार, टुकार...काय चाललंय काहीच कळत नव्हतं. कोण कुठे कशासाठी काय करतंय काहीच पत्ता नाही. पेट्रोल काय संपतं, तिथेच चित्र काय काढतात, तिथेच 'जंगल मे दंगल' काय होते, इकडे डिंपल झाडाखाली पसरते काय, पंकज कपूरला गोळी लागून तो कारमधून तलावात थेट तळाशी काय जातो, त्याचा पत्ता कुणालाच नसतो, मध्येच प्रेतयात्रा काय्...लै म्हणजे लैच उच्छाद! कशाचा कशाला संबंध नाही. सगळं असंबद्ध आणि रटाळ... दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता...

In reply to by समीरसूर

सूड Wed, 09/17/2014 - 11:57
>>दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता... आता कसं बोल्लात!! कधी नव्हे ती दीपिका आवडली. ;) बाकी मुव्हीत असंबद्ध काही वाटलं नाही हो. बाकी परिक्षण लिहीलंत की बोलू, या धाग्यावर ती चर्चा अयोग्य होईल. असो. :)

In reply to by शिद

काउबॉय Wed, 09/17/2014 - 23:31
Being Sirus ने आधीच डोक्याला इतका शॉट लागला होता की हां चित्रपट पहावा हां विचार स्वप्नातही आला न्हवता. आता परिक्षण येउदेच.

नुकताच रीलीज झालेला फाइंडिंग फॅनी चित्रपट आणि त्यावर बरंचसं चांगलं ऐकलं होतं. आता हा चित्रपट बघायचाच हे नक्की केलं. सकाळ सकाळ मल्टिप्लेक्स गाठलं, तिकीट मिळेल की नाही ही शंका होती. पण तिकीट मिळालं तेही अगदी वरच्या रो चं!! राष्ट्रगीत झालं आणि मुव्हि सुरु झाला, दिपीका पदुकोन ने साकारलेल्या अँन्जीने तिच्या सासूला, रोझेलिनाला माय म्हणून हाक मारली आणि मन सपसप मागे गेलं. मागे म्हणजे अगदी बालपणात आणि डोळ्यासमोर आली माय..आता ही माय म्हणजे ईल्डा आत्या आणि बेप्टिस अंकलची आई. माय चा मोठा मुलगा रिचर्ड, संबोधन रिचा!! पण हा रिचर्ड फार कुणाच्या अध्यात मध्यात नाही.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ९

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशियाच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली एक लांबलचक पर्वतराजी आहे. उरल! उरल नदीच्या खोर्‍यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं! उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात.

अँड्राईड अ‍ॅप बनवणारे मिपावर कुणी आहेत का?

मुक्त विहारि ·

धन्या Sun, 09/14/2014 - 17:35
मी एकदा सम आणि विषम संख्या ओळखणारे अ‍ॅप बनवले होते. मात्र व्यावसायिक पातळीवरचे अ‍ॅप बनवून शकेन का याबद्दल साशंक आहे. :) असो या धाग्याच्या निमिताने अँड्रॉईड प्रोग्रामिंगची मदत कुणाकडे मागायची हे कळेल.

In reply to by धन्या

आदूबाळ Tue, 09/16/2014 - 18:43
एक गरीब प्रश्नः सम आणि विषम संख्या ओळखायला अ‍ॅप कशाला लागतं? अ‍ॅप डेव्हलपमेंटचा सराव म्हणून केलं होतं का?

उपास Tue, 09/16/2014 - 17:43
डिझाईन लेव्हल वर आणि टेक्नोलॉजी साठी (उदा. एंग्युलर जे एस, फोन गॅप) मदत करु शकेन, अ‍ॅप डेव्हलप करायला वेळ गाठीशी आहे असे वाटत नाही. डिझाईन रेडी झाले की elance.com, guru.com वा तत्सम ठिकाणांवरुन डेव्हलप करुन घेता येईल. व्यनि केलात तर सविस्तर बोलता येईल. शुभेच्छा!

In reply to by उपास

सुधीर Tue, 09/16/2014 - 20:39
वेब-बेस्ड अ‍ॅप्/सॉफ्टवेअर (पिएचपी-मायएसक्यूअल वा जावा बेस्ड) बनवून देणार्‍या आणि कुठल्या वेबसाईट्स आहेत का? जिथे पुण्या-मुंबईतले डेव्हलपर्स काम करून देऊ शकतील. जेणे करून प्रत्यक्ष भेटून बोलता येईल. मुविंना धाग्यसाठी धन्यवाद!

In reply to by सुधीर

उपास Wed, 09/17/2014 - 20:59
नमस्कार सुधीर, तुम्हाला व्यनि केला आहे.. मुवी, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते कळलं तर पुढे जाता येईल, व्यनि करु शकाल का? विमे, तुम्ही तत्सम काम स्वतः करता काय, भेटावयास आवडेल (समानशीले व्यसनेषु सख्यम..) :)

कठीण समय येता, कोण कामासी येतो? ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे. त्यामुळेच हा धागा प्रपंच. मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे. आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे. आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.

मला माहीत असलेले रामायण

पोटे ·

विजुभाऊ Sun, 09/14/2014 - 00:10
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ Sun, 09/14/2014 - 00:12
>>> रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. विजुभौ नो ऑफेन्स हा. रामायणाच्या अभ्यासकांना वरील प्रतिसादाच्या सत्यासत्यतेविषयी मूळ संदर्भ देण्याची विनंती याठिकाणी आम्ही करत आहोत. वल्ली, बॅटमॅन, मृत्युंजय, विकास कृपया इकडे लक्ष द्या. ;)

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sun, 09/14/2014 - 00:14
इमाम् विरूपाम् असतीम् करालाम् निर्णतोदरीम् | वृद्धाम् भार्याम् अवष्टभ्य न माम् त्वम् बहु मन्यसे|| अद्य इमाम् भक्षयिष्यामि पश्यतः तव मानुषीम् | त्वया सह चरिष्यामि निःसपत्ना यथा सुखम् || इति उक्त्वा मृगशावाक्षीम् अलात सदृश ईक्षणा | अभ्यधावत् सुसंक्रुद्धा महा उल्का रोहिणीम् इव || रामा, तु ह्या विरुप, पोट खपाटीस गेलेल्या वृद्धेसाठी तू मला मान्यता देत नाहीस म्ह्णून तू आज पाहत असतानाच मी ह्या मानुषीला खाऊन टाकेन आणि पत्नीविहिन अशा तुझ्यासोबत सुखाने विचरण करेन. इतके बोलून ही शूर्पणखा जणू एखादी प्रचंड उल्का रोहिणीवर कोसळत आहे तशा प्रकारे हरिणीच्या पिल्लाप्रमाणे डोळे असलेल्या सीतेकडे झेपावली.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sun, 09/14/2014 - 00:16
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, तरी पुढचे देतो ताम् मृत्यु पाश प्रतिमाम् आपतंतीम् महाबलः | विगृह्य रामः कुपितः ततो लक्ष्मणम् अब्रवीत् || क्रूरैः अनार्यैः सौमित्रे परिहासः कथंचन | न कार्यः पश्य वैदेहीम् कथंचित् सौम्य जीवतीम् || इमाम् विरूपाम् असतीम् अतिमत्ताम् महोदरीम् | राक्षसीम् पुरुषव्याघ्र विरूपयितुम् अर्हसि || इति उक्तो लक्ष्मणः तस्याः क्रुद्धो रामस्य पश्यतः | उद्धृत्य खड्गम् चिच्छ्हेद कर्ण नासम् महाबलः || मृत्युपाशाप्रमाणे येणार्‍या राक्षसीला श्रीरामाने हुंकारानेच रोखून लक्ष्मणाला म्हटले, ह्या क्रूर अनार्यांचा कुठल्याही प्रकारे परिहास करता कामा नये, ह्या समयी सीतेचे प्राण कसेबसेच वाचले आहेत तस्मात तू ह्या कुरुप, कुलटा अशा महाउदरीला विद्रुप करणे आवश्यक आहे. कृद्ध रामाचे हे म्हणणे ऐकून लक्ष्मणाने खड्ग उपसून राक्षसीचे कान-नाक कापून टाकले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Sun, 09/14/2014 - 00:18
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) तर विजुभौ, वल्लीच्या पहिल्याच प्रतिसादामध्ये शूर्पणखेनं नेमकं काय केलं म्हणून लक्ष्मणानं तिला शिक्षा दिली असं आलेलं आहे. त्यामुळं >>> केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. हे विजुभौंचे म्हणणे चुकीचे ठरते. असो!

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ Sun, 09/14/2014 - 00:22
अनूप. वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत. क्षणासाठी असे मानूया की शूर्पणखा ही राक्षस होती. तरीही तिने सर्वप्रथम प्रपोज केले आणि त्यात अडथळा येतोय या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली. कोणत्याही भावाला याचा राग येणे नैसर्गीक आहे. लक्ष्मणाने अगोदर काही वाटाघाटी केल्या असत्या किंवा त्याने रावणाला " बघ तुझी बहीण काय म्हणतेय " असे काही बोलणे केले असते तर ते योग्य ठरले असते. एकदम नाक कापणे म्हणजे शुद्ध रानटीपणाचा कळस झाला. हे रावणाच्या कृतीचे समर्थन नाही. पण लक्ष्मणाची चूक दाखवून द्यायची आहे. शीळा झालेल्या अहिल्येचा तथाकथीत उद्धार करणार्‍या रामाने देखील लक्ष्मणाला यावेळेस कोणताच सल्ला दिला नाही. वालीच्या वधाबद्दल रामाला कधीच कोणी दोषी ठरवले नाही पण रामाने वालीला त्याची वैयक्तीक कोणतीच वैरभावना नसतानाही ठार केले तेही झाडा आड दडून भेकडपणे. ही गोष्ट नाकारता येत नाही. राम हा सुद्धा न्यायी वगैरे नसावा. अन्यथा त्याने शंबूकाला कानात शिसे ओतून ठार केले नसते.तळागाळातल्या वर्गाला शिक्षणाचा हक्क नाही हेच रामाने आपल्या कृतीने दाखवून दिले. एका अर्थाने रामायणात सत्याचा जय झाला. शेवटी रामाला स्वतःच्या मुलांना ओळख द्यावी लागली. मात्र त्यासाठी बिचार्‍या निष्पाप सीतेला स्वतःचा अंत करुन घ्यावा लागला. अर्थात शेवटी दुष्ट आणी अन्यायी रामाला स्वतःचा जीवनाचा शेवट हा अत्महत्येने करुन घ्यावा लागला.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ Sun, 09/14/2014 - 00:24
मतं पक्की झालीयेत तुमची. आधी बाण मारुन नंतर वर्तुळं काढताय विजुभाऊ. रामायणाचा एवढा करुण शेवट मधुर भांडारकर ला सुद्धा अपेक्षित नसेल. ;) चालू द्या!

In reply to by विजुभाऊ

कवितानागेश Sun, 09/14/2014 - 00:25
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.>> विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात?? =)) माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे रहातय. शूर्पणखा आली. तिनी लक्ष्मणाची छेड काढली. लक्ष्मण लई चिडला आणि त्यानी काटक्या गोळा करायचे काम सोडून एकदम तिचे नाकच कापलं... विजुभाउ जंगलात फिरत फिरत गेले होते. त्यांनी बाजूच्याच एका झाडाआडून हे सगळं दुष्कृत्य पाहिलं... आणि परत येउन मिपावर झण्झणीत प्रतिक्रिया दिली! (ह. घ्या)

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे Sun, 09/14/2014 - 00:26
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.
हे जनरल विधान आहे का याला काही संदर्भ आहे? रामाने त्या काळच्या न्यायाने जे काही करायचं ते केलं. वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे. त्यामुळे वाली जंटलमन होता हे पटत नाही.

In reply to by अनुप ढेरे

विजुभाऊ Sun, 09/14/2014 - 00:28
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे.
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची. बरं घेतली तर घेतली पण मग समोरासमोर लढाई करायला काय हरकत होती. झाडाआडून कशाला बाण मारायचा? तेही सुग्रीव आणि वाली ची कुस्ती चालू असताना? आय मीन वाली नि:शस्त्र असताना? यात रामाचा जंटलमनपणा कुठे दिसतो? यात कोणत्या सत्याचा जय झालेला दिसतो? अवांतरः एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ Sun, 09/14/2014 - 00:29
>>> एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे. रामानं काय उत्तर दिलं रे वल्ली? प्लिज प्लि एक्दाच डिट्टेलवारी सांग.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sun, 09/14/2014 - 00:30
रामाने वालीला बरीच गुळमुळीत उत्तरे दिली हे मात्र खरेच. नैतिकदृष्ट्या वालीला मारण्याचे कुठल्याच अंगाने समर्थन होऊ शकत नाही. रामान दिलेली काही कारणे १. तू सुग्रीवाच्या हयातीतच त्याच्या पत्नीचा उपभोग घेत आहेच म्हणून तू दंड देण्यास योग्य आहेस. (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष) २. सुग्रीव माझा मित्र आहे आणि तो मला लक्ष्मणासमान आहे शिवाय तो माझी पत्नी परत मिळवून देण्यासाठी मला साहाय्य करणार आहे आणि मी ही त्याला त्याची पत्नी व राज्य परत मिळवून देईन अशी प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञेपासून विचलीत होणे हा क्षत्रियांचा धर्म नव्हे. ३. हे वानरा, तू मनुष्य नव्हेस, पशू (वानर) आहेस . मृगया करणे हे आम्हा क्षत्रियांना सर्वथैव उचित आहे. तू शाखामृग असल्याने तू युद्ध करत असताही अथवा नसताही तुझा वध करणे हे आम्हा क्षत्रियांना योग्यच आहे. इतरही बरीच कारणे रामाने सांगितली आहेत. अर्थात मित्राला राज्य परत मिळवून देऊन त्याचे साहाय्य मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते शिवाय वालीसुद्धा काही परमधार्मिक वैग्रे असा काही नव्हताच.

In reply to by प्रचेतस

आनन्दा Mon, 09/15/2014 - 09:30
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष)
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.

In reply to by आनन्दा

प्रचेतस Mon, 09/15/2014 - 09:37

आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? मायावी राक्षसाचा पाठलाग करताना गुहेत गेलेल्या वालीच्या पाठीमागून रक्ताचा लोंढा वाहात आला तेव्हा वाली मेला असे समजून सुग्रीवाने गुहेचे द्वार धोंडा लावून बंद केले. फक्त तेव्हाच सुग्रीवाला वाली मेलाय असे वाटले होते. त्यानंतर काही काळात वाली द्वार फोडून गुहेबाहेर आल्यावर सत्ताप्राप्तीसाठी सुग्रीवाने दार लावून घेतले असे समजून सुग्रीवाला स्थानभ्रष्ट केले व त्याची पत्नी बळकावली.

In reply to by प्रचेतस

आनन्दा Mon, 09/15/2014 - 10:28
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या पत्नीशी विवाह केला तेव्हा सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते. नपेक्षा असे धाडस तो करूच शकला नसता.

In reply to by धन्या

प्यारे१ Sun, 09/14/2014 - 00:35
>>> धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या मागे लपून नि:शस्त्र द्वंद्वात गुंतलेल्या व्यक्तीवर बाण सोडुन होते? होतं की! त्याला काय? शिवाजीमहाराजांनी अफजलखानाशी 'पंजा लढायला' हवा होता वगैरे मताचा आहेस का काय? =)) वाली अत्यंत सामर्थ्यशाली होता. रावणाला बर्‍याचदा हरवलं देखील होतं.त्यानं रावणाला दक्षिणेत दाबून ठेवला होता. तहानुसार रावणानं वर यायचं नाही आणि वालीनं दक्षिणेत जायचं नाही असा काहीसा प्रकार होता. युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो. अयोध्येला लांब ठेवून, वालीला शासन देऊन, त्याच्याच भावाला गादीवर बसवून, त्याच्याच सैन्याला घेऊन रावणावर चालून जाण्याचा अत्यंत धूर्त कार्यक्रम हुशारीनं रामानं राबवला. (कोलॅटरल डेमेजेस बद्दल सगळे जण सायलेण्ट असतात.) पुढं अंगदाला दूत म्हणून पाठवला. ज्या वालीनं तुला चेपटवला होता त्या वालीला मी मारलाय आणि तरी त्याच्या पोराला अभय देऊन तुझ्याकडं पाठवतोय असा संदेश द्यायचा होता. हनुमानानं बळंच शेपटी जाळून टाईमपास नाही केला. त्यानं अर्धी लंका मानसिकदृष्ट्या खच्ची केली. आमच्याच घरात येऊन एक सेवक आमच्या संपत्तीची एवढी हानी करतो तर त्याचा मालक किती बलवान असेल हे सांगायचं होतं. बाकी रावणाला आधी शाप होता की बळजबरी कुठल्या बाईला हात लावशील तर तुझं डोकं तुकडे होऊन पडेल. सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. ;)

In reply to by प्यारे१

अवतार Sun, 09/14/2014 - 09:50
मग सीतामाईला पुष्पक विमानातून पळवून आणताना रावणाने एअरहोस्टेस ठेवली होती की काय? :)

In reply to by प्यारे१

पोटे Sun, 09/14/2014 - 11:02
ती स्त्री म्हणजे वेदवती.. तिने रावणाला आणखी एक शाप दिलेला होता.. तुला एक मुलगी होईल. ती तुझा नाश करेल. कालांतराने रावणाचे लग्न झाले. रावण अ मंदोदरीला मुलगी झाली. रावणाला शापाचे स्मरण झाले. त्यान्र ती मुलगी पेटीत घातली आणि दूर एका शेतात नेऊन टाकली... तात्पर्य : मंदोदरी ही रामाची सासू होती !

In reply to by पोटे

पोटे Sun, 09/14/2014 - 11:07
http://en.m.wikipedia.org/wiki/Sita

In reply to by प्यारे१

विजुभाऊ Mon, 09/15/2014 - 13:28
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्‍याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो.
हे मग रावणाच्या सीता हरणा बद्द्लही असेच म्हणता येइल

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 13:53
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार म्हणजे युध्दनीतीचा प्रकार होता असं तुम्हाला म्हणायचंय का? युद्धनीतीची ही व्याख्या कुणाची? आयसिस ची का?

In reply to by मेघवेडा

कवितानागेश Mon, 09/15/2014 - 16:26
हेच सांगायचं होतं कधीपासून, पण म्हट्लं, ते धर्म-अधर्म, वाली-सुग्रीव, राम-रावण आपले आपण बघून घेतील! ;)

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे Sun, 09/14/2014 - 00:38
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना.
सुग्रीवाला जर एकट्याला वालीशी लढणं आणि जिंकणं शक्य नव्हतं तर दुसर्‍याची मदत घेण्यात काय चूक आहे?

In reply to by विजुभाऊ

चिगो Tue, 09/16/2014 - 17:23
या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली.
ह्याच्याशी थोडासा असहमत.. शुर्पणखेने सीतेला मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे "अटेंप्ट टू मर्डर" जो "दखलपात्र गुन्हा" आहे. असा गुन्हा जर एखाद्या स्त्रीच्या संदर्भात घडत असेल जी स्वरक्षणास अक्षम आहे, तर त्या परीस्थितीत तिथे उपस्थित दुसरी सक्षम व्यक्ती (पक्षी : राम / लक्ष्मण) शुर्पणखेला अटकाव करु शकतो.. आता लक्ष्मणाने अटकाव करतांना मुद्दामहून तिचे नाक कापले की ते झटापटीत कापल्या गेले, आणि ते कृत्य ग्राह्य मानल्या जाईल का, ह्याकरीता परीस्थितीजन्य पुराव्यांचा पडताळा घेऊन निर्णय घेण्यात येईल.. सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
=)) आणि जरी तिथे सिध्द झालेच की लक्ष्मण गुहेगार होता तरी त्याला शिक्षा देता येणार नाही कारण इतिहासातल्या चुका वर्तमानात दुरुस्त करता येत नाहीत .... अहो आमच्या देशात ४०० वर्षांपुर्वी एक मंदीर पाडण्यात आले , आमच्या आर्किओलॉजिस्टस ने तिथे मंदीर होतेच ह्याचे खणखणीत पुरावे देवुनही आम्ही तिथे मंदीर बांधु शक्त नाहीये , हे झाले ४०० वर्षांपुर्वीच्या अण्यावाचा बाबतीतला किस्सा , ४००० वर्षांपुर्वीचे तर विसरुनच जावा =))

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.
. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख.....तारीख पर तारीख मिलती रही हैं लेकिन इंसाफ नहीं मिला. =)) t

In reply to by चिगो

पैसा Tue, 09/16/2014 - 17:45
मला एक गंमत कळत नाही, लक्ष्मणाने काय शूर्पणखा सीतेला मारीपर्यंत वाट बघायची होती, का तिची मनधरणी करायची होती?

In reply to by पैसा

खटपट्या Tue, 09/16/2014 - 22:14
हो पण नाक कापणे म्हणजे जरा जास्तच झालं बै !! तोंडाला काळं फास्लनित अस्त तरी चाललं अस्त. बिना लग्नाची पोर कसं होणार तिचं ?? कोण घेणार तिला पदरात ?? आं ?

In reply to by खटपट्या

पोटे Tue, 09/16/2014 - 22:35
शुर्पणखा विधवा होती. तिचा नवरा विद्द्युतजिव्हा हा रावणाकडुन चुकुन मरण पावला होता. लक्ष्मण शूर्पणखा विवाह झाला असता तर विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळाले असते

In reply to by पोटे

>>>> लक्ष्मण शूर्पणखा विवाह झाला असता तर विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळाले असते व्वा...! क्या सोच है. लाईक. -दिलीप बिरुटे

In reply to by चिगो

सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.. यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावे

प्रचेतस Sun, 09/14/2014 - 00:41
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
यजुर्वेदीच होते हा शोध कसा लावलात? आणि पुलत्सी नाही तर पुलत्स्य, आणि पुलत्स्य हे आजोबा होते. पुलत्स्यपुत्र विश्रवापासून सुमाली नामक राक्षसकन्या केकसी हिला रावण, शूर्पणखा वैग्रे संतती झाली. आणि आपल्यापेक्षा खालची जातीतील पत्नी असेल तर त्यांचे संतान खालच्या जातीतलेच असेल हा तेव्हा सर्वमान्य दंडक होता. जसे क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री अथवा दासी पासून झालेली संतान म्हणजे सूत. किंवा भीमाचेच उदाहरण घ्या. हिडिंबेपासून झालेला पुत्र घटोत्कच हा क्षत्रिय न समजला जाता राक्षसच समजला जात असे. पौराणिक गोष्टींचे संदर्भ आजच्या काळात लावण्यात काहीच हशील नाही पण तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

प्रसाद१९७१ Sun, 09/14/2014 - 00:42
तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.
सहमत. लबाडपणा करु नयेच, रामानी काय आणि दुसर्‍यानी काय

In reply to by प्रचेतस

विलासराव Mon, 09/15/2014 - 11:10
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.

काळा पहाड Sun, 09/14/2014 - 00:58
एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही. त्या युगातल्या कृत्यांवर सध्याची समाजमान्यता मोजता येणार नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्याचा "चौरंग" केला. सध्या तुम्ही कुणालाही ठार मारणं हा मर्डर ठरतो. तोच न्याय शिवाजी महाराजांना लावता येणार नाही. त्यांचं युग वेगळं होतं आणि त्याचे नियम वेगळे होते. तुम्ही जर दुसर्‍या युगातल्या प्रभृतींची कृत्यांचं समर्थन किंवा त्यावर टीका केली तर त्याला फारसा अर्थ नाही. तस्मात, रामायणाची नैतिक किंवा कायदेशीर दृष्टीनं चिरफाड ही आपण करू शकतो पण सध्याच्या युगाच्या कल्पना या त्या युगाला लागू पडत नाहीत. म्हणूनच वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का हा किंवा असे प्रश्न (सभ्य भाषेत सांगायचं तर) अप्रस्तुत ठरतात.

In reply to by मुक्त विहारि

सुहास.. Mon, 09/15/2014 - 15:08
"एका युगातली कृत्ये दुसर्‍या युगात समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरतीलच असं नाही." >>> मी ही सहमत .. बाकी बर त्या व्यासांनी दोनच महाकाव्ये रचली, आणिक रचली असती तर, पाय-पुसणीपेक्षा जास्त धागे आंजावर निघाले असते ;) थोडेसे विषयाविषयी : जर कुठल्याही मुळ पुस्तकातील , दृश्ये, संदर्भ मानावयची असल्याल इतर पुस्तकांतील ही मानावीत ...

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा Mon, 09/15/2014 - 10:32
अच्छा अच्छा, म्हणजे आर्यांच्या वेळेस पण युरेशियाला युरेशियाच म्हणायचे वाटते. तुम्हाला कसे कळले हो? अभ्यास भलताच दांड्गा हो तुमचा!

In reply to by आनन्दा

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 10:54
तुम्हाला आर्य आले त्या वाटेवर प्रगणकाच्या भूमिकेत एका झाडाच्या ढोलीत बसलेले इतिहासाचार्य ना.ने. दिसले नाहीत वाटतं? भूर्जपत्रांची थप्पी पण होती त्यांच्याजवळ लिहिण्यासाठी.

In reply to by आनन्दा

बाळ गंगाधर टिळक यांच्या 'आर्टीक्ट होम ईन वेदाज' या महाग्रंथाच्या वाचनातून वरील विधान मी केले आहे.टिळकांच्या मते वेदातील बरीच वर्णने आर्टीक्ट सर्कलशी मिळती जुळती आहेत.यावरुन वैदिक लोक थंड प्रदेशातुन भारतात आले, तोच युरेशिया.

In reply to by बॅटमॅन

विलासराव Mon, 09/15/2014 - 11:18
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात. ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).

In reply to by प्रचेतस

विलासराव Mon, 09/15/2014 - 13:21
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?

बॅटमॅन Sun, 09/14/2014 - 14:44
बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे पाहून हहपुवा झाली, तेवढेच वल्लीकडून वरिजिनल रामायणाचे दाखले मिळाल्याने माहितीतही भर पडली.

In reply to by बॅटमॅन

धन्या Sun, 09/14/2014 - 15:30
असेच म्हणतो. आमचा आवडता ब्लॉग खटटा मिठा इथेही आपल्या देव देवतांबद्दल आणि एकंदरीत ईतहासाबद्दल वाचायला असते. रामाबद्दल या लेखात उहापोह झालेल्या मतांवर एक लेख इथे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस Sun, 09/14/2014 - 17:46
आपल्या मताशी सहमत आहेच. पण येथे मात्र रामाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणार्यांऐवजी राम कसा सम्पूर्णत: वाईटच्च होता, लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कान कापून कसा तिच्यावर घोर अन्याय केलाय, या वैफ़ल्यतेतूनच वेदोनारायण सज्जन रावणाने सीताहरण केले, भावाला विजनावासात हाकलून त्याच्या बायकोचा उपभोग घेणार्या वालीला रामाने कसे झाडामागे दडून निर्दयतेने मारले असे सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते. बाकी रामायण हे काल्पनिक आहे असे मी मानतो. इतकी आदर्श परिस्थिति अगदी आदर्श परिस्थितीतही उद्भवू शकणार नाही. :)

In reply to by प्रचेतस

अनुप ढेरे Sun, 09/14/2014 - 18:14
सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते.
हेच म्हणतो. ~२००० वर्षांपूर्वीची माणसं/पात्र घेऊन, त्यांंच्या कृत्यांना आजचे न्याय/अन्यायाचे नियम लाऊन उगाच लोकांच्या प्रेमाच्या/आदराच्या स्थानांवर घाव घातल्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न आहे हा. वल्लींना अभ्यासपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद!

In reply to by अनुप ढेरे

धन्या Sun, 09/14/2014 - 18:33
आणि लोकही २००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या (?) आपल्या प्रेमाच्या/आदराच्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रत्येक कृतीचे "अभ्युथानमधर्मस्य" असे हिरीरीने समर्थन करत आहेत. :)

In reply to by धन्या

हरकाम्या Wed, 09/17/2014 - 00:58
धन्यवाद मि.धन्या. तुमचे मत वाच्ल्यानन्तर मी तुमचा आवडता ब्लॉग अक्षर्शहा वेड्यासारखा पुर्णपणे वाचला. आता रात्रीचे १२.५५ झाले आहेत. तो ब्लॉग वाचल्यानन्तर डोके भणभणुन गेले आहे. डोक्याची पार मन्डई झाली आहे आज रात्री झोप येणार असे वाटत नाही

In reply to by बॅटमॅन

रामायण आणि महाभारताला इतिहास न समजता धार्मिक ग्रंथ समजले जाते तेव्हा अशी गल्लत सुरू होते... आणि मग त्यांच्यापासून काही शिकण्याऐवजी त्यातल्या पात्रांना देवत्व बहाल करून त्यांना सद्गुणाचे पुत़ळे बनवले जाते. देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ? मग चुकाही कश्या योग्यच होत्या हे सिद्ध करायला अजून एखादी पुर्वायुष्यातली किंवा पूर्वजन्मातली कथा शोधून काढली जाते ! एक चूक झाकायला दुसरी, ती झाकायला तिसरी... अशी मालिका निर्माण होते. सर्वात वाईट असे की, यामुळे या दोन सकस ग्रंथांपासून जेवढा बोध घेतला जातो त्यापे़क्षा जास्त भ्रम निर्माण होतो / केला जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Mon, 09/15/2014 - 11:24
देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?
मला तर हेच चुकीचे वाट्ते. देवही चुकत होते आजही चुकतात आनी पुढेही चुकतील. अवांतर विदा मागु नये. पटले तर घ्यावे न पटले तर सोडुन द्यावे. मूळात माझा विद्यावर भरोसाच नाय.

In reply to by विलासराव

"देवत्व दिलेल्या व्यक्तींचे काही कसे चुकणार ?" हा माझा प्रश्न उपरोधिक होता ! जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवत्व दिले जाते तेव्हा त्याच्या पाठीराख्यांना त्या व्यक्तीचे कोणतेही उणे वचन/आचरण तसेच स्विकारायला फार कठीण जाते. आणि मग सत्य स्वीकारण्याऐवजी ते झाकण्यासाठी त्या वचना-/आचरणाचे समर्थन करणार्‍या कथा-कहाण्या रचल्या जातात... असा त्या वादाचा अर्थ आहे. देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील. याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्‍या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्‍या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्‍या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्‍या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्‍हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्‍यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इए

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Mon, 09/15/2014 - 15:30
देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्‍या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्‍या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल ह्याचसाठी देवाचा उपयोग केला पाहजे, आपल्यातले चांगले गुण विकसीत करण्यासाठी. त्यांच्यातले आदर्श गुण अंगी बाणवण्यासाठी. बाकी चालु द्या.

जेपी Sun, 09/14/2014 - 17:10
काथ्या नीट कुटला नायतर दोर नीट नाय होणार,मंडळी जरा व्यवस्थित कुटा.मंडळ आभारी राहिल नायतर काथ्या उचलला जाणार नाही .नुस्कान होईल.

या मानवी मनाला ऐनवेळी ब्लॉक करणार्‍या (किंवा वेळोवेळी पिडणार्‍या) अत्यंत बेसिक संकल्पनांची निर्वैयक्तिक शहानिशा होऊ शकेल. रामायणाकडे उच्च कोटीच्या नैतिकतेचा एक व्यापक लेखाजोखा इतक्या सिमीत दृष्टीनं पाहिल्यास चर्चा विधायक होईल. पब्लिकनं पात्रांना (ऑलरेडी बहाल झालेलं) देवत्व बाजूला ठेवून, (उगीच सेंटी होण्यापेक्षा); `स्थल-काल निरपेक्ष असे रोजच्या जगण्याला उपयोगी, नैतिक फंडाज मिळू शकतील काय?' अशी चर्चा केल्यास ती सर्वांना उपयोगी होईल. बाय द वे, माझ्या तिथल्या प्रतिसादात `रामायण घडण्याची पूर्वभूमिका' (रावणाचा स्टँड) नमूद केली होती. सं.मं.नं जर (अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी) नवीन पोस्ट काढलीच आहे तर, तो भाग इथे पुनर्प्रकाशित करावा अशी विनंती करतो. कारण रावणाची भूमिका समजल्याशिवाय चर्चा वन वे होईल. इट विल बी मिसिंग द बेसिक स्टार्ट पॉइंट.

मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा-नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात. अर्थात, इतकी उघड गोष्ट समजायला, साधी सारासार विचारसरणी पुरेशी आहे. जर हिटलर जिंकला असता तर तो वंदनीय ठरला असता आणि रावण जिंकला असता तर गदिमांनी `गीत रावण' लिहीलं असतं, देवघरात रावणाचे फोटो असते. त्यामुळे इतिहासावरुन `जेते म्हणजे प्रामाणिक आणि पराभूत म्हणजे अप्रामाणिक' असा निर्णय म्हणजे केवळ बाळबोध विचारसरणी ठरते. मी वेरिफाय करत नाही, पण या निमित्तानं, रामायणाचा दुसरा एक भाग सांगितला जातो, तो केवळ गंमत म्हणून उधृत करतो. अर्थात, उपरोल्लेखित मुद्याशी त्याचा संबंध आहेच, त्यामुळे (सुज्ञांना) तो अ‍ॅप्रिशियेट होईल. रावण अत्यंत प्रभावी आणि बलशाली राजा होता, स्वतः शिवभक्त असल्यानं शिवधनुष्याला प्रत्यंचा तर तो सहज लावू शकत होता. हि वॉज ऑलरेडी अ किंग, इतकंच काय स्वयंवरासाठी, स्वतःच्या फ्लाइटनं तो लंकेहून वेळेपूर्वीच हजर होता! जनकाच्या मनात मात्र सीतेनं रावणाला वरु नये असं होतं, पण ओपन फोरम असल्यामुळे त्याचा फुल नाईलाज झाला होता. जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला! इन द मीन टाईम, रावणाला वेळेवर हजर नसलेला स्पर्धक म्हणून डिबार करुन, रामानं सीता जिंकली! हा सरासर अन्याय झाला पण रावणाला बोलायला चान्सच राहिला नाही. तस्मात, त्यानं सीता हरणाचा घाट घातला...आणि पुढे रामायण घडलं! आता अशा परिस्थितीत रावण जिंकला असता तर पब्लिकनं रावणाला देव केला असता. थोडक्यात, इतिहासाची पानं उलटून निर्णय करणार्‍या निर्बुद्ध विचारसरणीला, `जो जिंकला तो सत्य' वाटणं स्वाभाविक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Sun, 09/14/2014 - 20:11
रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.

In reply to by प्रचेतस

दिनेश सायगल Sun, 09/14/2014 - 21:33
केवळ एवढेच नव्हे तर श्री पोटे यांच्या मनोरंजक अशा रामकथेच्या धाग्यावर सन्माननीय सदस्य श्री क्षीरसागर यांना इतर चर्चा करायची आहे. त्यांनी नैतिकता, निर्बुद्धता वैग्रेबद्दल चर्चा करण्यासाठी दुसरा धागा काढावा, किंवा संपादक मंडळींनी त्यांना तसा स्वतंत्र धागा काढून द्यावा ही विनंती.

In reply to by प्रचेतस

रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने ...
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे. पण रामायण हा निव्वळ कल्पनाविलास असेल तर तो वाल्मिकींचा कॅथर्सिस आहे. ते दाऊदनं साने गुरुजींच्या रोलमधे जाऊन श्यामची आई लिहीण्यासारखं आहे. आणि त्यामुळे इतकी पराकोटीची नैतिकता जगण्याला दिशा देऊ शकत नाही. पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल पण साधं सरळ आयुष्य जगणार्‍या सामान्यानं त्याप्रती नतमस्तक होण्यात हशील नाही.
तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी. कोणत्याही गाजलेल्या स्टोरीमधे एक गोष्ट आवर्जून उल्लेखनीय असते ती म्हणजे प्रत्येक पात्राच्या कृत्याला त्याच्या दृष्टीनं समर्थन असतं. नाही तर ती पात्र योजनाच कुचकामी ठरते. रावणानं काहीही कारण नसतांना सीता हायजॅक केली म्हटल्यावर स्टोरीत दमच राहात नाही. मग रामानं फुल आणि कशीही बॅटींग केली (आणि यदाकदाचित त्याचा बोल्ड जरी गेला) तरी तो आऊटच होणार नाही. ____________________________ सं.मं नं माझा तिथला प्रतिसाद पुनर्प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Mon, 09/15/2014 - 08:56
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे.
रामायण हे काल्पनिक आहे हे तुम्हाला मान्य आहे पण वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला हा शोध आपण कुठून लावलात? वाल्या कोळी हीच मूळात हरदासी दंतकथा आहे. रामायणाची सुरुवातच वाल्मिकी निषादाने मारलेल्या क्रौञ्च नराच्या मृत्युमुळे आलेल्या खिन्नतेपासून करतात. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः । यत् क्रौञ्चमिथुनादेकं अवधीः काममोहितम् || त्यामुळे आपल्या "पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल" ह्या म्हणण्यात काहीच हशील नाही
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी
आहे की. रावणाचा स्त्रीलंपटपणा हीच 'त्याची' समर्थनीय बाजू आहे. अर्थात ती समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वाल्मिकी रामायण मात्र वाचावे लागेल.

In reply to by प्रचेतस

थोडक्यात, रामाला देवत्व बहाल करण्यात अर्थ नाही, एक कोटी जप वगैरे केल्यावर राम दिसणार नाही, रामाचा धावा करणार्‍या सेवकाचं काहीही वक्र होऊ शकतं, बिजेपीचा राममंदिराचा अजेंडा जनतेची दिशाभूल करणारा ठरतो. ___________________ बाय द वे, धाग्याचा नक्की हेतू काय आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 11:16
म्हटला तर नाही. अर्थात ज्याचा त्याचा देव. पण मग असे प्रश्न बाकी धर्मियांना का विचारले जात नाहीत?

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Mon, 09/15/2014 - 11:19
आपल्या मताशी सहमत आहे. धाग्याचा हेतू म्हणजे पोटेंसारख्या ट्रोलांच्या मुद्द्यांतील हवा काढून घेणं हा आहे. रच्याकने रामायण अवश्य वाचा एकदा. अतिशय रसाळ आहे आणि खूप छान.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो Tue, 09/16/2014 - 17:47
जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला!
ह्यावरुन काही शंका : १. रावणाची स्वतःची "माहिती संकलन आणि प्रसारण" यंत्रणा नव्हती का? म्हणजे त्याच्या राज्यात आग लागल्याची अफवा ऐकल्यावर तिचं "क्रॉस व्हेरीफिकेशन" त्याने का केलं नाही? रावण अफवांवर सहजासहजी विश्वास ठेवून घिसडघाई करत लंकेला परत जाण्याइतका हलक्या कानाचा होता का? २. लंकेत अग्नीशमन व्यवस्था नव्हती का? ३. आग लागल्याची बातमी ऐकून स्वतः रावणाला लंकेला परत यावं लागलं, ह्याचा अर्थ लंकेत "सेकंड लाईन ऑफ लिडरशिप" नव्हती का? प्रजाहितदक्ष वगैरे ठीक आहे, पण काही कारणास्तव जर मुख्य अधिकारी व्यक्तीला जर राज्यातून बाहेर जावे लागले, तर त्याच्या अनुपस्थितीत राज्याची काळजी घ्यायला कुणीच जबाबदार व्यक्ती नसणे, हा त्याच्याद्वारे स्थापित केलेल्या यंत्रणेचा दोष नाही का? ४. रावणाचा "डिलीगेशन ऑफ पॉवर" वर विश्वास नव्हता का?

In reply to by चिगो

कोणत्याही कथेत पात्रांचा रोल आणि वागणूक जस्टीफाय करता आली म्हणजे झालं. डोंट टेक इट सिरियस, स्टोरीज आर आयदर एंजॉइड ऑर नॉट, दॅट्स ऑल! रावणाला खुन्नस येण्यासाठी असं काही तरी घडलं असेल तर त्याचा रोल आणि सीताहरणाचा मुख्य प्लॉट दोन्ही जस्टीफाय होतात. आणि द लॉजिक फिट्स. मी सुरुवातीलाच म्हटलंय, आय डोंट वेरिफाय. खरं तर एनीथिंग कॅन बी अ‍ॅडेड टू अ स्टोरी अँड अ स्टोरी कॅन बी इंप्रोवाइज्ड ऑल्सो.

काउबॉय Sun, 09/14/2014 - 21:54
मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा- नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात.
कौरव जिंकले असते तर शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच. म्हणून सर्व काही जेते ठरवतात ते प्रचलित होतेच असे नाही. याचे भान हवे. पण इश्वराची ओळखच त्याच्या विजय कथातुन केली जात असल्याने शिरोमणिञ्चि जेतेच बायबल लिहतात हे रडगाणे नेहमीचे आहे

In reply to by संजय क्षीरसागर

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 01:33
कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच असती. इकडून तिकडून ढापून आणि सांगितलं असतं की शकुनी हा देवाचा शेवटचा प्रेषित होता इत्यादी..

In reply to by काळा पहाड

पण मी बॉयच्या या,
शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच.
(ओरिजिनल) शकुनीमामाच्या `कपॅसिटीबद्दल' प्रश्नाला उत्तर दिलंय

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Mon, 09/15/2014 - 14:18
एक तर पराभूतांची प्रेरणा कोण वाचणार? असे म्हणायचे नाहीतर जेत्यांनी सगळ अन एकतर्फी लिहलय म्हणत ओरड करायची.... ! मग कोणाचे म्हणने प्रमाण ठरवायचे असे आपले मत आहे ? फक्त तुमचे ?

In reply to by काउबॉय

संदर्भासहित वाचत जा, एकदम एक्साइट होण्यात अर्थ नाही, मुद्दा हुकतो. शकुनी गीता सांगायला केपेबल नव्हता असा तुमचा मुद्दा होता. आणि मी लिहीलंय `जर कौरव जिंकले असते तर (सध्याच्या) गीतेला अर्थच राहिला नसता.' जेते इतिहास लिहीतात ही उघड गोष्ट आहे त्यामुळे कौरव निंद्य आहेत. ते जिंकले असते तर पांडव निंद्य ठरले असते. आणि कदाचित, शकुनीचे ते `डावपेच' आणि कृष्णाची ती `कारस्थानं' असा लेखाजोखा झाला असता.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Mon, 09/15/2014 - 16:36
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलंच असतं की! :) मुद्दा मुळात जिंकणारे का जिंकले आणि हरणारे का हरले हा असू शकतो का? पूर्वी म्हणे खर्‍याची बाजू घेणारे जिंकायचे नि आता युगधर्मानुसार स्खलनशील समाजात खोट्याची बाजू घेणारे जिंकून बजबजपुरी माजणार आहे.

In reply to by प्यारे१

सुहास.. Mon, 09/15/2014 - 16:41
मुद्दा मुळात जिंकणारे का जिंकले आणि हरणारे का हरले हा असू शकतो का? >> काल परवा चान-चान , दवणीय वाक्य वाचण्यात आहे " बुध्दीबळाच्या पटावर काळे जिंकोत वा पांढरे , खेळ संपला की सगळ्यांना धरुन एकाच बॉक्स मध्ये कोंबण्यात येते " ;)

पैसा Mon, 09/15/2014 - 08:43
कृपया एवढ्या गंभीर धाग्यावर महाभारताची चर्चा करून ट्रोलिंग करू नये.

In reply to by पैसा

काउबॉय Mon, 09/15/2014 - 14:59
पण हे ट्रोलिंग नव्हे. मुद्दा इतकाच होता शिरोमणिच्या दाव्यानुसार जर की दोन्ही बाजूमधे चुकाकरणारे घटक सामाविष्ट आहेत तर एकाच(बहुतांश जेते) बाजुला चांगली का मानले जाउन त्या व्यक्तिरेखांचा उदो उदो केला जातो अथवा त्याबाजुविरोधी टिका का सहन केलि जात नाही याचा उहापोह त्यात आहे.

In reply to by काउबॉय

पैसा Mon, 09/15/2014 - 15:10
पण आपल्या मिपाच्या महान परंपरेनुसार मुद्दा तेवढ्यावर थांबत नाही, तर बहुतेकवेळा भलत्याच विषयावर गाडी सुरू होते! त्यामुळे जर कोणाला महाभारतातील व्यक्तिरेखांबद्दल डिटेलमधे काथ्या कुटायला असेल तर स्वतंत्र धागा काढून अवश्य कुटावा! स्वागत आहेच!

विटेकर Mon, 09/15/2014 - 10:22
रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्ये आहेत आणि राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय महापुरुष ! या महाकाव्यांनी आणि महापुरुषांनी भारतालाच नव्हे संपूर्ण आशियाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या लायकीच असून देखील अशा महपुरुषांवर राळ उडवत आहोत याची जाणीव इथे आपल्या तथाकथित ज्ञान पाजळणार्‍या किती महाभागांना आहे? अशा प्रकारची टिंगल करुन आपण अनेकांच्या श्रद्धास्थांनांना पाय लावत आहोत इतपत संवेदनशीलता अजून जागी आहे का ? की तालिबानी राज्य आहे ? आम्ही म्हणतोतेच खरे ? ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले , त्यांच्याच अस्तित्वावर शंका घेताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही हे कशाचे द्योतक आहे ? कसला "माज" आहे हा ? की आम्ही शाब्दिक कोलांटउड्या मारुन आणि शब्दांची तोड-फोड करुन आमचे हीन मनोरंजन करण्यासाठी काहीही पणाला लावू? आपला बाप हा आपला विश्वास असतो , तिथे कोणी पुरावा मागत नाही. अस्तु , मिसाळ पाव सारख्या अभिरुची संपन्न संकेतस्थळावर असे धागे निघत असतील तर एकूणच समाजाची वैचारिक पातळी घसरली आहे आणि " मनोरंजनासाठी काय पण " सुरु साहे असे खेदाने म्हणावे वाटते.

In reply to by विटेकर

बाळ सप्रे Mon, 09/15/2014 - 12:45
ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले
म्हणजे नक्की काय हो?? ही महाकाव्ये नसती तर जग चाललेच नसते काय?? आणि हे उंदीर मारण्याच्या विभागात वगैरे पु लं चे उदा. आजकाल फारच अस्थानी वापरायला लागलेत!! जिथे तिथे लिहिणार्‍याचा अधिकार काढायचा.. मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन.. आणि भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या आणि दुसर्‍यांना तालिबानी वगैरे ठरवुन मोकळे!!

In reply to by बाळ सप्रे

विटेकर Mon, 09/15/2014 - 12:58
म्हणजे नक्की काय हो??
-
मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन..
या विषयावार असली अश्लाघ्य चर्चाच होऊ शकत नाही. कसले बोडक्याचे मुद्दे ? -
भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या
कुणाच्या भावना नाजूक ? करोडो भारतीयांच्या श्रद्धा अशा सार्वजनिक ठिकाणी पायाखाली घातल्या तर आम्ही हातावर हात थेऊन बसावे का ? असल्या प्रवृत्तीना तालिबान म्हणावे की महात्मे ? -(संपादित)

In reply to by विटेकर

सुहास.. Mon, 09/15/2014 - 15:22
रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्ये आहेत आणि राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय महापुरुष ! या महाकाव्यांनी आणि महापुरुषांनी भारतालाच नव्हे संपूर्ण आशियाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. >>> महा काव्याला महा काव्येच ठेवावीत ना मग ! दिशा त्या काळात असेल ...आता कशी काय लागु होते ? उदा. मदिराप्राशन आणि मासांहार ( आठवा बळी आणी यज्ञ सस्कांर ) , किंवा धुत खेळण हे त्या वेळी लागु होते , आताच्या युगात काय ?? आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या लायकीच असून देखील अशा महपुरुषांवर राळ उडवत आहोत याची जाणीव इथे आपल्या तथाकथित ज्ञान पाजळणार्‍या किती महाभागांना आहे? >> मालक , हे वाक्य कोणासाठी आहे ? आणि तशी लायकी ठरविणारे आपण कोण ....जर कुठे श्रध्दास्थांनावर चार प्रश्न ( ते ही सभ्य भाषेत ) विचारले तर बाप काढल्यासारख अंगावर येवुन भागेल का ? आणि त्या पुलंच्या डायलॉग ची किती वेळा कॉपी तरी करणार .. वीट आला च्यायला !! ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झाले , त्यांच्याच अस्तित्वावर शंका घेताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही हे कशाचे द्योतक आहे ? कसला "माज" आहे हा ? की आम्ही शाब्दिक कोलांटउड्या मारुन आणि शब्दांची तोड-फोड करुन आमचे हीन मनोरंजन करण्यासाठी काहीही पणाला लावू? >>> जरा दोन चार उदाहरणे मिळतील का पुण्य पराक्रमावर ??

In reply to by सुहास..

प्यारे१ Mon, 09/15/2014 - 15:25
>>> त्या पुलंच्या डायलॉग ची किती वेळा कॉपी तरी करणार .. वीट आला च्यायला !! हो ना. पण खरंच नवे डायलॉग मिळत नाहीत. मिळाले तरी पुलंच्या एवढे फेमस होत नाहीत. नवीन लेखकांच्या प्रतिभाक्षमतेवर शंका येण्याइतपत वाईट परिस्थिती आली आहे हो! :-/

In reply to by प्यारे१

सुहास.. Mon, 09/15/2014 - 15:29
नवीन लेखकांच्या प्रतिभाक्षमतेवर शंका येण्याइतपत वाईट परिस्थिती आली आहे हो! >> आले का नवलेखकांविषयी दांभिकता घेवुन ...तरी म्हटंल विभिषणाचा उल्लेख कसा आला नाही अजुन ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ Mon, 09/15/2014 - 15:33
>>> आले का नवलेखकांविषयी दांभिकता घेवुन ...तरी म्हटंल विभिषणाचा उल्लेख कसा आला नाही अजुन नेमका अर्थ काय म्हणायचा ह्या वाक्याचा? -गोंधळ उडालेला

मृत्युन्जय Mon, 09/15/2014 - 11:22
आयला रामायणाच्या धाग्यावर महाभारत झाले किंवा असे म्हणुया की रामायणाच्या धाग्याचे काश्मीर झाले. ;) माझा रामायणाबद्दलचा दृष्टीकोन थोडासा असा आहे: १. राम नावाचा एक अतिशय सत्शील, सज्जन, विनम्र पुरुष होउन गेला. हा अतिशय गुणवान प्रजाहितदक्ष आणि शूर राजा होता. प्रजेची याने स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. याची समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था दृष्ट लागण्यासारखी सुरेखे होती त्यामुळे याच्याकाळात सुरक्षितता आणि सुबत्ता होती २. रामाचे जनमानसातील आणि परिवारातील स्थान वादातीत आदरणीय होते. शिवाय त्याच्या शौर्यामुळे त्यात एक प्रकारचा दरारा होता. याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली भाऊ नेहमी याची सावली बनुन राहिला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. त्यात त्याचा अजुन एक भरत नावाचा भाऊ ( हाही तसा शूरच होता) अतिशय निस्पृह आणि गुणी होता. आयुष्यभर हा रामाच्या अर्ध्या वचनात राहिला. या तिघांचा शत्रुघ्न हा त्यामानाने कमी प्रकाशझोतात राहिलेला शूर भाऊदेखील सर्वांशी गुण्यागोविंदाने वागल्याने हे चारही भाऊ एकोप्याने राहिले. त्यांनी जबाबदार्‍या योग्यप्रकारे वाटुन घेतल्याने अयोध्येत सुराज्य आले. ३. रामराज्यात ज्ञानी आणी विद्वान लोकांचा योग्य सत्कार झाला आणि शौर्याचा आदर केला गेला. यस्य राजा तथा प्रजा या न्यायाने सत्यप्रियता, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, विनम्रता या गुणांचा उत्कर्ष होउन एक आदर्श समाज तयार झाला. ४. सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणुन लोक रामाला देवासमान मानायला लागले (किंबहुना तो देव होताही) ५. मानवी रुपाला अनुसरुन रामातही काही दुर्गुन होते. पण ते बहुजनहिताय बहुजनसुखाय असल्याने त्याच्या दुर्गुणांवर त्याच्या सद्गुणांनी मात केली आणि त्याच्या चुका त्यामानाने कमी महत्वाच्या ठरल्या. ६. रामाने सुर्पणखेचा केलेला अपमान अनाठायी होता. पण त्याला येउ घातलेल्या संकटाची एक सुप्त किनार होती. राक्षसांना एकदाची योग्य अद्दल घडवल्यास त्याच्या अनुपस्थितीत सीतेला त्रास होणार नाही अशी एक आशा होती. त्यामुळेच त्याने शुर्पणखेचे कान नाक कापण्याची शिक्षा दिली. ७. वालीचा वध (हत्या ?? ) नक्कीच अन्याय्य होता. हेच कृत्य कृष्णाने अगदी बिनदिक्कत केले असते आणि त्याच्या या कृत्याला आपण आक्षेपही घेतला नसता. पण राम सद्गुणांचा पुतळा होता. त्याच्याकडुन अत्त्युच्च दर्जाच्या नैतिक वागणुकीची अपेक्षा असल्याने त्याचे कृत्य खटकते. ज्या परिस्थितीत राम अडकला होता त्यात त्याला मदतीची गरज होती. परत फिरुन अयोध्येची मदत घेणे जमणार नव्हते. तेवढा वेळही नव्हता आणि त्यात वचनभंगाची शक्यताही होती. शिवाय अश्या परिस्थितीत तो परतता त्यात त्याच्या शौर्याची मानखंडना होती. तस्मात दक्षिणेकडील राजांची मदत घेणे अनिवार्य होते. त्यावेळेस किष्किंधेचे एकमेव राज्य त्याला मदत करु शकण्यास समर्थ होते. किष्किंधेने त्यापुर्वीही लंकेचा पराभव केला होता. राम आणि लक्ष्मण असे दोघेचजण त्यावेळेस पत्नीच्या सुटकेसाठी मदत घेण्यास वालीकडे गेले असते तर त्यांना मदत मिळण्याची शक्यता कमी होती. याचकांसाठी कोणी इतके मोठे युद्ध करत नाही. अश्यावेळेस राम नावाच्या राजाने एक राजकारणी जे करेल (जे त्याच्यासारख्या उच्च नितीमत्तेच्या माणसाकडुन अपेक्षित नाही असे काही लोकांना वाटेल) तेच केले. किष्किंधेच्या सिंहासनाच्या वादातील दोन भावांपैकी दुबळ्याची बाजु घेउन समर्थ माणसाला मारले. वालीचे सामर्थ्य लक्षात घेता समोरासमोरील युद्ध कदाचित निष्फळ ठरले असते किंवा त्यात खुप वेळ गेला असता. शिवाय राजाच्या मदतील सैन्य येता रामाचे कार्य अपुर्ण राहिले असते. हे लक्षात घेता त्याला आणी नगरजनांना अवधी न देता वालीला संपवणे अनिवार्य ठरले. रामाने मागुन बाण मारुन तेच साध्य केले. नंतर त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला जो अर्थातच फसला. यात एकच गोष्ट बरोबर साधली गेली ती ही की धाकट्या भावाची बायकि अन्याय्य पद्धतीने बळकावुन तिच्याबरोबर संसार थाटणार्‍या एका शक्तिशाली राजाचा नि:पात झाला. ८. एक गुणी आणि प्रजाहितदक्ष राजा असुनही राम प्रचलित समाजव्यवस्थेला आणि पुरुषी मानसन्मानाच्या अयोग्य कल्पनांना बळी पडला. सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला. यामुळे त्याच्या देवत्वाला उणेपण आले. ९. शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात. तर वचनप्रियता, प्रामाणिकपणा, सुरा़ज्य, विद्वत्त्ता आणि शक्तीस्थानी असलेली विनम्रता या गुणांमुळे रामाची कारकीर्द उजळुन निघते. रामाच्या चूकांमुळे काही योग्य / अयोग्य व्यक्तींचे नुकसान झाले तर त्याच्या कारकीर्दीमुळे एका समाजाचे, एका पिढीचा किंबाहुन पुढील कित्येक पिढ्यांचा उद्धार झाला. सामाजिक सुबत्ता, सुरक्षा आणि सुशासन यांमुळे रामाने त्याच्या कारकीर्दीत जाणते / अजाणतेपणी किंवा काळाच्या नियमांनुसार जे वैयक्तिक अपराध केले ते त्यामुळे क्षम्य ठरतात असे माझे मत आहे. ते अपराध नाहित असे मी मानत नाही. त्याच्यामुळे त्याला उणेपण येत नाही असेही माझे म्हणणे नाही. पण व्यापक हिताचा विचार करता तो तरीही आदरणीय आणि अनुकरणीय पुरुष आणि देव होम्ह/ आहे असे म्हणण्यास जागा आहे,

In reply to by मृत्युन्जय

पैसा Mon, 09/15/2014 - 11:37
वाल्मिकी रामायण रावण वधाबरोबर संपते. संपूर्ण उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असे बहुतांश मत आहे. त्यामुळे शंबूक वध आणि सीता त्याग या दोन्हीला मूळ वाल्मिकी रामायणात काही आधार नाही. (याचा विचार करता सीतेचे अग्निदिव्य सुद्धा मूळ रामायणात नाही.) कदाचित उत्तरकांड फार नंतर म्हणजे बौद्धकालात लिहिले गेले असावे. *आंतरजालावर पुढील माहिती मिळते.
इस समय देश में वाल्मीकि रामायण की जो भी पांडुलिपियाँ मिलती हैं वह सब की सब दो मुख्य प्रतियों से निकली हैं। एक हैं बंग देश में मिलने वाली प्रति जिसके अन्दर बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध ६ कांड हैं और कूल सर्ग ५५७ और श्लोक संख्या १९७९३ हैं जबकि दूसरी प्रति बम्बई प्रान्त से मिलती हैं जिसमें बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध इन ६ कांड के अलावा एक और उत्तर कांड हैं, कूल सर्ग ६५० और श्लोक संख्या २२४५२८ हैं।
http://aryasamajmandirpune.blogspot.in/2013/11/blog-post_30.html

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Mon, 09/15/2014 - 13:09
सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला.
कसूर केली का ते माहीत नाही. रामाला दोष देता आला असता जर त्याने दुसरे लग्न केले असते तर. पण तसे त्याने केले नाही. तो कायम एकपत्नीच राहिला. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो त्याग ठरतो आणि शेवटी तत्कालिन समाजव्यवस्था श्रेश्ठ असतेच. त्यामुळे बाकी सहमत.
शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात.
शूर्पणखा प्रकरणात रामाची चूक काय ते मला अजूनही कळलेले नाही. स्वतःच्या पराक्रमावर विश्वास ठेउन त्याने राक्षसांची जाणून्बुजून खोड काढली असे माझे मत आहे. आणि खरदूषणप्रमुख १४००० राक्षसांच्या वधाने ते सिद्ध देखील होते.

In reply to by मृत्युन्जय

साध्या शब्दातले परिस्थितीचे परखड वर्णन आवडले ! वैचारीक, आर्थिक, सामाजीक अथवा राजकीय फायद्यांसाठी नाही तर तर कधी कधी केवळ वैयक्तीक वरचढपणा (इगो) सिद्ध करण्यासाठी साधे सत्य प्रचंड गुंतागुंतीचे करणे ही मानवी मनाची एक मोठी ताकद आणि दौर्बल्य राहीले आहे...

In reply to by मृत्युन्जय

मदनबाण Mon, 09/15/2014 - 16:20
याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली भाऊ नेहमी याची सावली बनुन राहिला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. रामाच्या मागे सीता अरण्यात गेली,त्या बरोबर लक्ष्मण सुद्धा गेला. बुंधु प्रेमाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हेच ! त्याचा त्याग फार मोठा आहे, कारण रामा बरोबर निदान सीता माता तरी सहवासा करीत जवळ होती परंतु उर्मीलेला राज्यात ठेवुन वनात ब्रम्हचर्ये ने राहताना त्याने कोणत्याही परस्त्रीचा मोह धरला नाही. माझ्या एका ऐकीव कथे नुसार अयोध्येला परत आल्यावर सभेत लक्ष्मण हसायला लागला त्यावर हनुमानाने प्रश्न केल्यावर त्याने आता निद्रादेवीला जवळ बोलवले आहे ती येत असल्याने त्याला हसु आले.वनवासा पासुन युद्धा पर्यंत {इंद्रजित /मेघनाद} याने मुर्च्छित केल्याचा काळ सोडता त्याने कुठेही झोप घेतली नव्हती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

सस्नेह Mon, 09/15/2014 - 15:47
सदर धागा व प्रतिसाद वाचले तर राम, रावण, वाली, सुग्रीव अँड रामायण कंपनी युध्द बिद्ध बाजूला ठेवून इथे येऊन पॉपकॉर्न घेऊन बसतील

In reply to by सस्नेह

कवितानागेश Mon, 09/15/2014 - 16:59
=)) मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? या सगळ्या कथा एकत्र करुन, त्यांचा मीन काढून मला कुणीतरी वाल्मिकींना नक्की काय सांगायचं होतं ते सांगेल का? मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै....

In reply to by कवितानागेश

मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै.... कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)

In reply to by कवितानागेश

मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे ! (विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )

In reply to by सस्नेह

अरे तुम्हाला अजून दिसले नाही ते ?! त्यांनी आमच्या बरोबर पहिल्या रांगेत बसून प्रत्येकी तीनतीन पॉपकॉर्न आणि क्ष्क्ष्क्ष चे डबे संपवले देखील ! ;) =))

सूड Mon, 09/15/2014 - 16:45
नुसत्या काळ्या आणि पांढर्‍या छटा असलेल्या रामायणात शष्प इंटरेस्ट नाही. त्यात गोष्ट एक तर अत्यंत चांगली असते किंवा अत्यंत वाईट. लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.

In reply to by सूड

पैसा Mon, 09/15/2014 - 18:56
लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.
या दोन्ही गोष्टी वाल्मिकीनी लिहिलेल्या मूळ रामायणात नाहीत. नंतर कधीतरी घुसडण्यात आल्या. जसं कृष्णाच्या मूळ चरित्रात राधा हे पात्र नाहीच तसंच.

In reply to by पैसा

कवितानागेश Mon, 09/15/2014 - 22:26
मला वाटतं की "राजा दशरथाला राम नावाचा मुलगा होता आणि त्यानी रावण नावाच्या एका राजाला मारलं", इतकीच गोष्ट "खरी" असावी. बाकी सगळंच रामायण प्रक्षिप्त आहे. ;)

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 17:33
हा मुद्दा जरी राळ उडवायच्या साठी काढला असला तरी एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. राम हा ईश्वर (god) नव्हता, तो तथाकथितरित्या देव (deity) सुद्धा नव्हता. तो अवतार होता. त्यामुळेच ना त्याला सुपरनॅचरल शक्ती होत्या ना तो मानवी भाव भावनांपासून अलिप्त होता. अवतार ही संपूर्ण पणे मानवी संकल्पना असून आपण ईश्वराचे गुणांची अभिव्यक्ती अवताररुपी व्यक्तीत पहात असतो. त्याच्याकडून चुका होणं साहजिक आहे. त्याला राग आणि लोभ असणं सुद्धा साहजिक आहे. त्यामुळे रामानं चुका करणं म्हणजे हिंदू धर्माला कमीपणा येत नाही. या राळ उडवण्याचा मूळ हेतू हिंदू धर्मावर बाण मारण्याचा आहे हे जर लक्षात घेतलं तर अशा इतर धर्मियांच्या किंवा हिंदू धर्मातल्या दुखावलेल्या पंथातल्या लोकांच्या मतांना फार महत्व द्यायचं कारण उरत नाही.

In reply to by काळा पहाड

आनन्दा Mon, 09/15/2014 - 17:52
जबरी.. मे पण हेच्च म्हणतो. देव न मानणार्‍यांची गोष्टच वेगळी. राम हा देव होता. परंतु अंगी देवत्व असून देखील त्याने कधी आपल्या मानवी मर्यादा उल्लंघन केल्या नाहीत. आपण हे कधी शिकणार तोच जाणे.

वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्‍यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ? ( एकुणच चर्चेचा सूर पहाता , एकटा वल्ली वगळता कोणीही वाल्मिकी रामयण वाचले असेल असे वाटत नाही . पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण | तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी || बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहे कधी रामकृष्णावर चिखल फेक करा , कधी वारी गणेशोत्सव बंद करा असला प्रचार , तर कधी मोदींना शिव्या तर कधी ब्राह्मण ब्राह्मणेतर पोलरायझेशन हे असले उद्योग चालुच रहाणार, शिवाय व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र असल्याने मिपा त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यताही नाही .... , पण ब्यॅटमॅन ह्यांचा ही एक प्रतिसाद वाचुन धक्का बसला , ब्यॅटा तु वाचले आहेस कारे रामायण ? आपल्याला जे रामायण माहीत आहे त्यातला बराचसा भाग प्रक्षिप्त आहे हे तुझ्या निदर्शनास आले आहे काय ? की तुही टीव्ही सीरीयल पाहुन कमेन्ट टाकली आहेस ?) असो. श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन झाली , आता बुध्द , महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स वगैरेंना घेवुया का राउंडात ? *biggrin* जाऊंन द्या ... दुसर्‍यांच्या श्रध्दास्थानांवर अश्लाघ्य आरोप करणे आणि चिखलफेक करणे ही आमची ( आमची म्हणजे इथे उजव्या कोपर्‍यात दोन माणसांचा फोटो लावलाय ना त्यांना मानणार्‍यांची) संस्कृती नव्हे .
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोगु निश्च‌ित। जाण माझा।।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सवेर्श्वर पूजनाचे ||
'जे धर्मस्थापनेचे नर| हे ईश्‍वराचे अवतार| झाले आहेत पुढे होणार| देणे ईश्‍वराचे|'
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं लो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो| भूतां परस्परें जडो| मैत्र जीवाचें ||

एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति ।

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे Tue, 09/16/2014 - 18:13
ंमोदीना शिव्या घातल्या की शिव्या देणारा हिंदु द्वेष्टा ठरतो ! ज्ञानात भर पडली !

In reply to by प्रसाद गोडबोले

विजुभाऊ Tue, 09/16/2014 - 18:53
वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्‍यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ?
प्रगो काका ( अर्थात गिरीजा काकू ) मी वाल्मिकी रामायण , भुषुंडी रामायण ( तेच ते काक भुषुंडीने लिहीलेले) आणि तुलसी रामायण वाचलेले आहे. सातारच्या काळाराम मंदीरात त्यावर श्रीकृष्णशास्त्री जोशींची बरीच प्रवचने देखील ऐकली आहेत.
बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहे
एखाद्या गोष्टीच्या वाईटपणाबद्दल टीका केली की तो हिंदूद्वेष होतो हे कशावरून? जे वाईट आहे ते वाईटच की. यात मिपाने कारवाई करण्याचा काय प्रश्न येतो. वाईट गोष्टीबद्दल बोलले नाही याचा अर्थ त्या नसतात असे नाही. चिघळलेली जखम झाकली म्हणून वेदना व्हायच्या बंद होत नाहीत. ( माताय काय भयानक खंग्री वाक्य गवसलय) बाकी काय बोलू . असो. तुमच्याच शब्दात सांगायचे तर व्हर्बल***** करून काय उपयोग.

In reply to by विजुभाऊ

चांगले काय अन वाईट काय ह्याची चर्चा निवांतपणे करुच हो आधी तुम्ही रामायण वाचले आहे का ते तरी सांगा ... आणि नसेल वाचले तर प्रांजळपणे कबुल तरी करा की ऐकीव ज्ञानावर बडबड करत आहात ते ... ( पण एकुणच तुमच्याशी केलेल्या पुर्वचर्चां वरुन तुम्ही पॅव्हेलियन मधे (किंव्वा टीव्हीसमोर) बसुन सचिन कसा चुकला अन ऑऊट झाला ह्यावर चर्चा करणार्‍यातले आहात असा एक अंदाज बांधलेला आहे , आता वरील प्रश्नाला तुम्ही जर का " होय मी वाल्मिकी रामायण वाचले आहे आणी म्हणुनच त्याच्याविषयी बोलत आहे" असे उत्तर दिलेत तर मत बदलावे लागेल . ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे Tue, 09/16/2014 - 19:57
रामाच्या भक्तानी तरी संपुर्ण रामायण वाचलेले असते का? आणि रामाच्या एखाद्या कृतीबद्दल शंका विचारली की लगेच त्याला मात्र विचारायचे.. तू संपुर्ण रामायण वाचले आहेस का ?

In reply to by पोटे

कसं आहे की इथे राम आहे म्हणुन तुम्ही त्याच्या कृती बद्दल असल्या शंका काढु शकता कारण १०८ वेळा अंगावर थुंकले तरी अजिबात न रागवता गोदावरीत उतरुन स्नान करणार्‍या एकनाथांची परंपरा सांगणारे सौजन्यशील हिंदु इथे आहेत . एकदा इतर धर्माच्या श्रध्दास्थाबद्दल असली शंका काढुन पहा .... होऊन जाऊदे एकदा हा सुर्य अन हा जयद्रथ !! अभ्यास नसेल तर गप्प रहाणे हे उगाच वटवट करण्यापेक्षा फार सोप्पे असते , एकदा प्रयोग तरी करुन पहा राव ! अवांतर : ह्या इथेच , मिपा वर , ज्ताला मी अहिंसेचा समर्थक धर्म समजत होतो त्या धर्माच्या अनुयायाने मला धमकी दिल्याचा किस्सा आठवला , ( शिवाय नुकतेच त्या धर्मात हिंसेला परवानगी असल्याचे कळाले आहे. )

In reply to by प्रसाद गोडबोले

विलासराव Tue, 09/16/2014 - 22:33
श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन झाली , आता बुध्द , महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स वगैरेंना घेवुया का राउंडात ? रामायण वाचलेले नाही. बुद्धाबद्द्ल थोडेसे वाचले आहे. महावीर , येशु, कंन्फुशीयस, कार्ल मार्क्स यांच्याबद्द्ल विशेष वाचन नाही. सबब बुद्धाला माफी द्यावी.......अर्थातच सगळ्यांना दिलीत तरी हरकत नाहीच म्हणा.

In reply to by विलासराव

काळा पहाड Tue, 09/16/2014 - 23:50
बुध्द - भारताला अहिंसेच्या चुकीच्या दिशेने घेवून जाणारा. भारतानं याच्यामुळेच क्षात्रवृत्तीचा त्याग केला महावीर - फारसं काही माहिती नाहिये येशु - समर्थकांनी आणि चर्चनंच विचारांची हत्या केली. स्वतः बिचारा सूळावर चढला आणि पोप आणि र्चचेलोक कर्मकांडात (संत बनवणं, बाटवाबाटावी, सोन्याचा येशू बनवून अर्पण करणं वगैरे) गोष्टीत मग्न आहेत. लहान मुलांवर फादर लोकांनी केलेल्या असॉल्टचे खटले जगात गाजतायतच. कंन्फुशीयस - लईच कन्फ्युज्ड व्हता राव. मोट्टी मोट्टी वाक्यं लिवून गेला. कार्ल मार्क्स - चुकीचं तत्वज्ञान, चुकीचा प्रयोग्

In reply to by काळा पहाड

पोटे Wed, 09/17/2014 - 07:34
बुद्धाच्या अहिंसेने भारताची वाट लागली हा सावरकरवाद्यांचा खोडसाळ मुद्दा आहे. सावरकर ज्या अंदमानात होते ते अंदमान बौद्ध जपान्यांनीच जिंकुन भारताला दिलं हे महान सत्य मात्र हे लोक विसरतात. :) दुसर्‍या धर्मात अहिंसा आहे म्हणुन आमची क्षात्रवृत्ती झिजली असा आक्रोश यांनी करणं हे म्हणजे बाकीच्यानी नसबंदी केली म्हणुन आम्हाला पोरं होत नाहीत असे म्हणण्यासारखेच नाही का ?

In reply to by पोटे

काळा पहाड Wed, 09/17/2014 - 10:31
१. सावर्करवादी कुठे आले? हा माझा मुद्दा आहे आणि मी सावर्करवादी नाही. मी फारसे सावर्कर वाचलेले पण नाहीत. तेव्हा उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला नको. २. जेव्हा भारताला बाहेर जावून जगावर हिंसक विजय गाजवायची गरज होती, तेव्हा भारतात अहिंसेचे गोडवे गायले जात होते. अशोकासारख्या पराक्रमी राजाला बौद्ध बनवून त्याचा पराक्रम बौद्धांनी संपवून टाकला. ३. क्षात्रवृत्ती झिजली नाही पण समाजाचा एक वर्ग अशा वेळी अहिंसेच्या मार्गावर चालत होता ज्या वेळी मुसलमान बाहेरून भारतावर हल्ले करत होते. बाकी मुसलमानांनी कन्व्हर्जन साठी सर्वात जास्त बौद्धांनाच टार्गेट केलं होतं हे तुम्हाला माहीत असेलच. ४. जपानी बौद्ध होते पण दुसर्‍या महायुद्धात सर्वात जास्त अत्याचार जपाननंच केले होते. तुम्हाला नक्की कशाबद्दल अभिमान आहे हे एकदा ठरवा. बाकी तुम्ही रामावर टीका करू शकता पण बुद्धावर केली तर तुम्हाला चालत नाही. एखादी दुखरी नस दाबली जातिये वाटतं?

In reply to by काळा पहाड

विलासराव Wed, 09/17/2014 - 09:03
बुध्द - भारताला अहिंसेच्या चुकीच्या दिशेने घेवून जाणारा. भारतानं याच्यामुळेच क्षात्रवृत्तीचा त्याग केला कालाय तस्मै नमः !!!!!!!

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा Wed, 09/17/2014 - 09:29
जेव्हा संपादकीय काम असेल तेव्हा संपादक मंडळ आयडी वापरण्यात येईल. जे प्रतिसाद माझ्या आयडीने प्रकाशित होतात ते माझे वैयक्तिक असतात. आणि यात तुम्हाला समज कुठे दिसली ब्वा? मी तर लोकांना विनंती केली आहे! :D

बाळ सप्रे Tue, 09/16/2014 - 18:39
धर्मातल्या, जुन्या ग्रंथातल्या काही खटकणार्‍या गोष्टी दाखवल्या की हा एक पवित्रा सर्वसाधारणपणे दिसून येतो की "ते ओरी़जिनल धर्मात/ ग्रंथात नाहीच्चे" "ते नंतर घुसडण्यात आलयं " जसं काही लाखो/हजारो वर्षांपूर्वीचा बेसलाईन यांच्याकडे उपलब्ध आहे.. आणि जगात बाकीचे सगळे घुसडलेले व्हर्जन ऐकतात/ वाचतात!!

(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.) ________________________________________________________ आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु. सीता ही भूमीकन्या होती. ________________ वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ? दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ?