एका प्रोफाईल लॉगीनने समोर दिसतात असंख्य मने
चांगुलपणाचे पुतळे ,आदर्श आभासी व्यक्तिमत्त्वे ,
सद्वर्तनी ,भावूक ,अंतरंगाला हमखास हात घालणारीच स्टेटस
त्यावर सहमतीचे लोणी ,
आदर्श विचारांनी ओथंबून वाहणाऱ्या आदर्श पोस्ट
त्यावर तसल्याच गुळमुळीत कमेंटची पखरण
आदर्श फेसबुक जीवन ,रेडी टू सर्व्ह ....
प्रेमाचे समुद्र ,उमाळ्याचे नद ...
हळुवार ,सेन्सेटिव ,अलगद चालणारी
इनबॉक्स मधली खलबत
दुसरीकडे बुरखेधाऱ्यांचे राडे,
अतृप्त इच्छांच्या तारेवर उलटी लटकलेली मने
चाळीशीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ...
संभ्रमात आहे फेसबुक ....
झुगारावी सो कॉल्ड संस्कृती ....
की मिरवाव भाऊराया ,ताई म्हणून....
लोगिन ने वाढ
खूपच छान आहे कविता.
In reply to खूपच छान आहे कविता. by कवितानागेश
मैथली लिपी ही वेगळी आहे, ही
कविता आवडली.
आजच्या परीस्थीतीचं यथार्थ
अतिरंजीत...
आवडले
उद्या, गांधी जयंती!