Skip to main content

स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स

लेखक काळा पहाड यांनी सोमवार, 22/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्‍या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो. स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी. उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो.

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू...

बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ भाग -१

लेखक विअर्ड विक्स यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ लेख वाचण्यापूर्वी आगाऊ (पूर्वीच्या या अर्थाने ,तसा मी सरळ माणूस आहे) सूचना १. गणेशाचा मोदकाशी संबंध ,बासुंदी कुठून आली असे प्रश्न विचारू नये. २. शीर्षक पाहून पाककृती सदरातील लेख इथे का टाकला असा प्रश्न विचारला तर आपल्यास रुचेल असे उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नये. ३. हा लेख एका दुर्गाडू ने लिहिला असल्याने गणेश दर्शना व्यतिरिक्त अवांतर का लिहिले असा प्रश्न विचारण्याआधी आपण मिपावर किती अवांतर प्रतिसाद दिले आहेत याची उजळणी करावी. ४.

शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

लेखक एस यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता - हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे. निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता.

कृष्ण की राधा?

लेखक भिंगरी यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल स्त्री भृणहत्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे.स्त्रीला समाजात सन्माननीय स्थान मिळावे या साठी सगळ्यांचीच खटपट चालली आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत हल्ली एक मुलगी असलेले पालक सुद्धा दुसऱ्या अपत्याची वाट न पाहता मुलीला उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात, (समाजातील हा बदल नक्कीच लक्षवेधक आहे.) तर दुसऱ्या बाजूला पाहतो मुलगा होण्याची वाट पाहण्यात, संगोपन करण्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही मुली जन्माला घातल्या जातात.(शेवटास मुलगा होतो कि नाही देव जाणे.) जास्त मुली असणाऱ्या मातेला उगाच अपराधी वाटत असे.

आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रतिसाद दात्या मिपाकारांन कोटीकोटी धन्यवाद. माननीय संपादकांनी आरंभीच इशारा देऊन संभाव्य धोक्याची हवाच काढून टाकली. आपली दर्दभरी कहाणी सांगून लोकांना मानसिकरीत्या छळणे आणि काहीतरी आर्थिक मदत मिळवणे हा माझा उद्देश नव्हताच मुळात. या लेख मालेत माझ्यावर हा प्रसंग का ओढवला, त्यात माझ्या चुका, नशिबाचा भाग ह्याची पूर्ण पार्श्वभूमी, सद्यस्थिती आणि भविष्यातली वाटचाल लिहिणार आहे. त्याचबरोबर सर्व मिपाकर मंडळींनी जो उस्फुर्त आणि भरभरून प्रतिसाद व सल्ले दिले, काही प्रश्न टाकले त्याबद्दल पण लिहिणार आहे.

"हमें तुमसे प्यार कितना.."

लेखक अन्नू यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.

एक रात्र फुटपाथवरील

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.

एक रात्र फुटपाथवरील

पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “...

पुस्तक : सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू !

लेखक डांबरट यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मेनन : संरक्षण मंत्री की परराष्ट्र मंत्री ! (माझ्या अभ्यासाप्रमाणे परराष्ट्राचा मंत्री) आजचा म.टा. मधला सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू या पुस्तकावरचा लेख वाचला. हे पुस्तक मूलतः मेनन यांनी लिहिलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सामान्यतः आपल्याला या लेखाच्या नावावरून वाटतं की,कोण्या संरक्षण मंत्र्याने हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे फार काहीतरी खळबळजनक खुलासे असणार.कारण सध्या राजकारणी, किवा तथाकथित नोकरशहा यांनी पुस्तकातून स्फोट करायचा धडाका लावलाय. पण तसे नाही. कारण मेनन सध्या हयात नाहीत. पण राहून राहून कोणाला न कोणाला नेहरू घराण्याबद्दल उमाळा येत असतो.

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: कलियुगातील समुद्र मंथन

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 21/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात? बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो. मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे. बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल.