प्रोग्रेसिव्ह लेन्सेस सुविधा कि त्रास.
लांबचा आणि जवळचा असे दोन्ही नंबर निघाले कि प्रोग्रेसिव्ह लेन्सेस वापरा असे सांगतात नव्हे जोरदार समर्थन करतात.
२०१० साली मी ते तसे १.५ वर्षे वापरून पहायचा बराच प्रयत्न केला पण ड्रायव्हिंग, laptop वरचे काम (टेबल वर ठेऊन) आणि हातात पुस्तक/पेपर घेऊन वाचणे ह्या दिनचर्येतील गोष्टींसाठी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा त्रास जास्ती झाला..शेवटी जवळचा नंबर नगण्य असल्याने फक्त लांबचा चष्मा करून घेऊन तोच वापरला
आता पुन्हा जवळचा आणि लांबचा नंबर अंशत: वाढल्याने त्या प्रोग्रेसिव्ह वापराच्या सल्ल्याला तोंड देतोय...
१. आपण एखाद्या ठिकाणी 'बघत' असतांना मानेची हालचाल आणि डोळ्यांची हालचाल ह्यांचे संगनमत करून फोकस करत असतो
२. मानेला रग लागल्यास डोळ्यांची हालचाल करून लक्ष विचलित होऊ देत नाही 'फोकस' जात नाही.
३. मान आणि डोळे एकाच ठिकाणी फारवेळ अजिबात नं हलवता आपण वागू शकत नाही.
---------- आणि इथेच माझा झोल सुरु होतोय ..ज्या लेन्स्वरील प्रत्येक बिंदूचा फोकल पोइंत वेगवेगळा आहे त्यामुळे एखाद्या कोनात (उदा ड्रायव्हिंग करतांना) बघत असतांना जर थोडे लक्ष विचलित झाले किंवा मानेची किंवा डोळ्यांची थोडीही हालचाल झाली तर सर्वस्वी वेगळा फोकस निर्माण होतो आणि धूसरता वाढते ...म्हणजे पुन्हा नव्याने मान डोळे ह्यांची हालचाल करून सोयीस्कर फोकल पोइंत निवडून योग्य पोइंत मिळाला कि तिथेच 'statue'अवस्थेत बसून राहायचे
हा फक्त माझा अनुभव आहे...कि मी कुठे चुकतो.....का प्रोग्रेसीव्ह लेन्स हाच एक घोळ आहे ...
बर हा प्रकार तसा महागडा असल्याने 'करून पाहू नाहीतर दुसरे बघू' म्हणायची सोय नाही...
मिपा अध्वर्युंचे काय अनुभव/सल्ले/मत आहे ???
वाचने
6866
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मला डास दिसूही
अरे बापरे
In reply to अरे बापरे by पैसा
...
मग ड्यूएल सिमचे फायदे कसे मिळतील ;DIn reply to अरे बापरे by पैसा
तर ...
In reply to अरे बापरे by पैसा
दोन चष्मे म्हणजे कटकट असते हो !
प्रोग्रेसिव्ह लेन्सचा माझ्या
माझा अनुभव
सुरुवातीला जरा त्रास होतो.
नवर्याला तीन चार
बाइफोकलच वापरा. फक्त स्नूकर
मी पण प्रोग्रेसिव्हचा नाद
तेच केल