झोप येत नाही म्हणून खिडकी उघडून बाहेर पाहिलं....समोरच घुबड बसल होत विजेच्या तारेवर....घुबड दिसण शुभशकून म्हणावा की अपशकून या विचारात असतानाच खिळवून ठेवलं त्याने ...त्याच ते मान वाकडी करून पाहण विचित्रच ...त्यात हे पांढर घुबड....थोड्या अंतरावर अजून एक घुबड होत...टेरेस वर चिमण्यांची घरटी ठेवलीत ...आताशा चिमण्या येऊन घरटी करतात .त्या घुबडांच्या मनात तसं काही नसेल ना? दोघानाही थोडावेळ न्याहाळले ...लक्षण ठीक दिसत नव्हती.रेकी करावी तशी उडताहेत ....रात्री एक वेगळी दुनिया जागी असते....माळावर मांजर उंदराचा पाठलाग करत धुडगूस घालत ...घरभर पाली फिरतात कीटक शोधत ....कुत्री केकाटतात ,रडतात ....साला कुत्री रडली की म्हणे कुणीतरी टपकतो ...आजूबाजूला कुणी वेटिंग वर आहे का हेही मनातल्या मनात तपासून झालय...स्वतःच्या जगण्याची खात्री करून ...त्यात आज ही घुबड बेरकी मोहिमेवर...बाहेर जाऊन कानोसा घ्यावा या शिकारी जगाचा ...टेबलफ्यान खाटखुट करत वारा देतोय...वैताग नुसता...वारा नको रे तुझा पण आवाज आवर...झोपू दे मला....सात टीप टोप ,एक मारी,,एक केळ गेलं पोटात...आवाज देतोय समुद्र...उगाच अस्वस्थ करून टाकते मेघना ...एवढ अस्वस्थ करणार का लिहितेस ग बाई?? चांगल काही लिही ना शांत झोप येईल अस...कुदळ घेऊन खोद्ल्यागत वाटत मनाला...मी म्हणजे आहे तरी कोण ??माणूस मारतो तेव्हा काय निघून जात ?? अदृश्यच असत ना ते ?? मग मी पण अदृश्यच.....असलं बरळण म्हणजे मानसोपचाराची गरज अस म्हणेल कुणी....म्हणेनात ..तरी ज्ञानेश्वराला २१ व्या वर्षी समाधी घ्यावीशी का वाटली असेल ??जगण्यातला फोलपणा कळला म्हणून?? पोर काढून लोकसंख्या फुगवायला करोडो आहेत...आपल अस्तित्वच त्या अदृश्य शक्तीत आहे मग हाय काय न नाय काय....विचार किती पटापट सरकतात ....झोप आली ...विष्णू नाना आणि मला नानासाहेबांकडून सोन्याच्या पोइंट वाला पेन मिळणार आहे...
वाचन संख्या
4887
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
???
कळल नाही
क्रियेचर ३डी शिणुमाचा असंल का
पेनाचा पॉईंट जाऊदे पण ह्या
पॉईंट रोखून सगळेच लिहितात हो
In reply to पेनाचा पॉईंट जाऊदे पण ह्या by शिद
अरेच्चा. त्या कोणत्यातरी
बरोब्बर ओळखलत
In reply to अरेच्चा. त्या कोणत्यातरी by विजुभाऊ
When appetite of subconscious mind is poorly managed
लिखाणाचा संबंध लेखकाच्या
In reply to When appetite of subconscious mind is poorly managed by काउबॉय
सहमत आहे
In reply to लिखाणाचा संबंध लेखकाच्या by फुंटी
"विषयामध्ये गती नसते तेव्हा
"विषयामध्ये आसक्ती नसते
In reply to "विषयामध्ये गती नसते तेव्हा by आदूबाळ
हेही तितकंच खरं.
In reply to "विषयामध्ये आसक्ती नसते by फुंटी
व पु काळे आठवले.
In reply to "विषयामध्ये आसक्ती नसते by फुंटी
आधी विमान डोक्यावरंन गेलं ...
झोप नव्हती तोवर लिहील ... झोप
In reply to आधी विमान डोक्यावरंन गेलं ... by सुहास..
माणूस मारतो तेव्हा काय निघून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टअरे रे बाणा !! तुम्ही "
In reply to माणूस मारतो तेव्हा काय निघून by मदनबाण
लेख वाचुन मला मुक्तपीठीय
स्तनातन मंदिराजवळ
In reply to लेख वाचुन मला मुक्तपीठीय by आसिफ
हा हा हा...!
In reply to स्तनातन मंदिराजवळ by टवाळ कार्टा
जबरा....
सोन्या कितवीत आहे हो?
...फारच विनोदी बुवा तुम्ही ..
In reply to सोन्या कितवीत आहे हो? by अन्या दातार