Skip to main content

आपण यांना पाहिलंत का ?

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 11/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?

पोरं vs मुलं

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 11/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे. 'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ८

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 11/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील बहुतेक सर्व राज्यांवर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या या देशात निसर्गाचे अनेक अविष्कार पाहण्यास मिळतात. अनेक उत्तुंग पर्वतराजी, शेकडो मैलांचा सागरकिनारा, रखरखीत वाळवंट, सदाहरीत जंगले आणि अतिवृष्टीचे प्रदेश अशी निसर्गाची अनेक रुपं इथे अनुभवण्यास मिळतात. भारतीय उपखंडाचा मुकुटमणी म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील प्राचीन काळात झालेल्या घर्षणामुळे हिमालयाची निर्मीती झाली.

तीनों बन्दर बापू के (रसग्रहण)

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बापू के भी ताऊ निकले तीनों बन्दर बापू के! सरल सूत्र उलझाऊ निकले तीनों बन्दर बापू के! सचमुच जीवनदानी निकले तीनों बन्दर बापू के! ग्यानी निकले, ध्यानी निकले तीनों बन्दर बापू के! जल-थल-गगन-बिहारी निकले तीनों बन्दर बापू के! लीला के गिरधारी निकले तीनों बन्दर बापू के! सर्वोदय के नटवरलाल फैला दुनिया भर में जाल अभी जियेंगे ये सौ साल ढाई घर घोड़े की चाल मत पूछो तुम इनका हाल सर्वोदय के नटवरलाल लम्बी उमर मिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! दिल की कली खिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! बूढ़े हैं फिर भी जवान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! परम चतुर हैं, अति सुजान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर

कोकोनट राईस (थेंगाई सादम)

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी तांदळाचा शिजवलेला भात (शिळा भात असल्यास तो ही चालेल) १ वाटी खवलेला ओला नारळ (प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्तं घ्यावे) १/२ टीस्पून मोहरी १ टीस्पून उडदाची डाळ १ टीस्पून चणाडाळ १ टेस्पून काजू २-३ लाल सुक्या मिरच्या तोडून १ हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्ता १/४ टीस्पून हिंग मीठ चवीनुसार . पाकृ: पातेल्यात २ टेस्पून खोबरेल तेल ग

कार्यालयातून मिपा कसे हाताळावे ? काही प्रश्न…

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर कधीही आणि कोणत्याही वेळी लॉगीन केल्यास (विशेषतः कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ) कमीत कमी २० विद्वान/विदुषी ऑनलाईन असतातच. ह्यातले साधारण ५० टक्के जरी समजा स्वतःचा व्यवसाय करत असले किंवा त्या दिवशी सुट्टी असली असे समजूया………. तरीही ह्यात काही असे अर्क नक्कीच असणार जे त्यांच्या कार्यालयातून मिपा पाहत असणार( नव्हे पाहतातच ). मला नेहमी ह्या गोष्टीचे अप्रूप वाटत आलंय की कोणकोणत्या प्रकारे हे सगळे लोक्स मिपा पाहत किवा वाचत असतील?

. . फाळणी होणार का...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट ब्रिटनची फाळणी होणार का... बीबीसी Will David Cameron resign? . सध्याच्या घडामोडी पाहता ग्रेट ब्रिटनचे काय होणार असा प्रश्न आहे ? स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटनचा एक प्रांत आहे.

आदिकैलास ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - १४

लेखक खुशि यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अठरावा दिवस: एक दिवस आधी आल्यामुळे आज धारचुल्यातच आरामाचा मुक्काम. पहाटे उठण्याची घाई नव्हती, पाठीवर सॅक घेऊन चालायचेही नव्हते. सारे आरामात आवरून ९-३० वाजता नाश्ता करून नेपाळला गेलो. म्हणजे भारत-नेपाळ यांना जोडणारा कालीमैय्यावरील झुलता पूल पार करून नेपाळच्या धारचुला येथे गेलो. नेपाळी धारचुला गरीब दिसला, व्यापारीही फारसे उत्साही वाटले नाहीत. बाजारात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खूप होत्या, पण त्यांची गॅरंटी नसते. कुठल्याही वस्तूची किंमत विचारली की ते सांगत अमुक इंडियन रुपीज्. कारण नेपाळी रुपयाची किंमत भारतीय रुपयापेक्षा कमी आहे.

झी-जिंदगी

लेखक कविता१९७८ यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले.

तंत्रदर्शन्-भाग२

लेखक शरद यांनी बुधवार, 10/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्र भाग २. भारतातील तंत्रविकास आजच्या भागात आपण भारतात तंत्राचा विकास किंवा प्रसार कसा झाला ते पाहू. तंत्र ही सज्ञा तन् (विस्तारणे, वृद्धी करणे) या धातूवरून आली आहे. वैदिक कालात यज्ञ हा एकच धर्म होता व अर्चनेचे साधन होते. जनसामान्यांच्या अर्चनेच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जास्त विधींची गरज होती व तंत्राने त्याला वाव दिला. पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे स्त्रीसृजनतेचा पगडा जनांवर होताच. तो भागही तंत्रात सामावला गेला. पण तेथे जाण्याआधी आपण यज्ञसंस्थेतील तंत्र पथम पाहू यज्ञवेदीला यज्ञ(अग्नि)चिती म्हणतात. यज्ञचितीची आकृती व संबंधित फळ यां बाबत शूल्बसूत्रांमध्ये माहिती मिळते.