Skip to main content

......आणि आमची पितरं जेवली.

लेखक भिंगरी
Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १

Published on शुक्रवार, 19/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी. पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती.

गाढव ऐकेना, गाढव समजेना

Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।
काव्यरस

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

लेखक अजय जोशी
Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा
काव्यरस

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही.

तंत्रदर्शन-३

लेखक शरद
Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
तंत्र आणि लोकायत तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे. खरे म्हणजे लोकायत या आपल्या ग्रंथांत श्री देविप्रसाद यांनी या दोघांमधील जो संबंध दाखवला आहे त्यावरचे माझे मत येथे मांडले आहे. प्रथम श्री. देविप्रसाद काय म्हणतात ते बघू; तंत्राचे साध्य बघू व नंतर मला श्री. देविप्रसाद यांचे मत का पटत नाही ते बघू. श्री. देविप्रसाद हे कम्युनिस्ट विचारसरणीचे विचारवंत. त्यामुळे त्यांचा वर्गविद्रोह हा आवडीचा विषय. त्यांना लोकायत दर्शन हे भारतातील आदी जमातीचे व तंत्रही त्यांचेच अशी मांडणी करावयाची आहे.

पोकळी

Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले

पोळी पापडी चाट

Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो. chat 1 साहित्यः अ. पापडी साठि: १. शीळ्या पोळ्या - ४ ते ५ २. तळण्यासाठि तेल ब. चटण्या: १.

ह्ये वागनं बरं नव्हं

Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वाग