फाइंडिंग माय !!!
नुकताच रीलीज झालेला फाइंडिंग फॅनी चित्रपट आणि त्यावर बरंचसं चांगलं ऐकलं होतं. आता हा चित्रपट बघायचाच हे नक्की केलं. सकाळ सकाळ मल्टिप्लेक्स गाठलं, तिकीट मिळेल की नाही ही शंका होती. पण तिकीट मिळालं तेही अगदी वरच्या रो चं!!
राष्ट्रगीत झालं आणि मुव्हि सुरु झाला, दिपीका पदुकोन ने साकारलेल्या अँन्जीने तिच्या सासूला, रोझेलिनाला माय म्हणून हाक मारली आणि मन सपसप मागे गेलं. मागे म्हणजे अगदी बालपणात आणि डोळ्यासमोर आली माय..आता ही माय म्हणजे ईल्डा आत्या आणि बेप्टिस अंकलची आई. माय चा मोठा मुलगा रिचर्ड, संबोधन रिचा!! पण हा रिचर्ड फार कुणाच्या अध्यात मध्यात नाही. बेप्टिस आणि ईल्डा तेवढं लोकांच्यात मिळून मिसळून असत. बॅप्टिस्टचंही संबोधन बेप्टिस. ईल्डाआत्या ही एकच तिचं उच्चारी आणि कागदोपत्री नाव एकच बाळगून होती.
तर ही माय म्हणजे चार साडेचार फूटाच्या आत बाहेरची उंची, एक डोळा थोडा तिरळा आणि त्याने थोडं कमी दिसत असे म्हणून वेगळंच मान वाकडी करुन बघण्याची लकब आणि आजूबाजूंच्या तीन चाळींमध्ये कोणाकडे काय चाल्लंय याची इत्यंभूत माहीती!! गोवा कर्नाटका बॉर्डरवरची कोकणी घरी बोलण्यात. तिला कन्नड पण बर्यापैकी येत असे. मराठी बोलण्यावर या दोन्ही बोलींची छाप पडलेलं बोलणं. मला आठवतं तेव्हा पासून मायने कधी स्वयंपाक केलाय किंवा त्याचा कधी तिच्या बोलण्यात उल्लेख आलाय असं दिसलं नाही. आधी पप्पा, म्हणजे तिचे यजमान नोकरी करुन घर सांभाळत असत आणि नंतर सून आली तशी ती जबाबदारी सूनेची झाली.
मायची खास ओळख म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलांना मालीश करणं, आंघोळ घालणं वैगरे करायला अगदी घरचंच कोणी असल्यासारखं आवर्जून जाणं!! मायने मालीश केली म्हटल्यावर मूल नंतर काटक होणारच असा लोकांचाही समज, त्यामुळे मायने आवर्जून आलेलं सगळ्यांना चालत असे!! पण कधीकधी याबाबतीत माय जरा जास्तच धाडसी होत असे. आमच्या घरातलाच प्रसंग म्हणजे, भाऊ लहान असताना माय त्याचं सगळं करुन घरी निघून गेली आणि नंतर पाह्यलं तर उजव्या पायावर चटका लागल्यासारखं काहीतरी दिसत होतं. नंतर कळलं की धूप घालून धुरी देताना, मायच्या हातूनच ते झालं होतं. लक्षात नाही आलं की कसं सांगावं म्हणून गप्प बसली देव जाणे पण हे कळल्यावर इल्डा आत्या तिला किती बडबडली होती ते ऐकलेलं होतं.
मायची आणखी एक ओळख म्हणजे तिची तपकिरीची डबी, आणि मायच कशाला पप्पांचंही तपकिरीशिवाय पान हलत नसे. माय आणि पप्पा दोघांपैकी कोणीही एक का आजूबाजूला येईना तपकिरीचा एक विशिष्ट दर्प, वास काहीही म्हणा जाणवत असे.
मीपण 'म्हणे' अगदी तीनसवातीन वर्षाचा होईस्तवर रिचर्ड अंकलसोबत सकाळ सकाळ 'कॉफी आणि पोळी' खायला मायच्या घरी जात असे. पुढे रिचर्ड अंकलची बायको, आयरिन आली आणि त्या घरात मी जाणं सोडलं ते जवळजवळ कायमचंच. नंतर दहावीचा निकाल, बारावीचा निकाल असं काही असलं की पेढे द्यायला तेवढं जाणं होई. बेप्टिस अंकल केव्हाच वेगळा झाला होता, त्यामुळे अशी काही बातमी ऐकली की रिचर्ड अंकल तेवढा असे. आयरिन आंटीला काही घेणं देणं आहे का नाही ते कळतच नसे. वर्षासहामहिन्यांनी माहेरी आली की आमच्या घरी पण हजेरी लावणार्या इल्डा आत्याचं येणं जाणं पण जवळपास कमी झालं होतं. नंतर कधी काळी माय वारल्याची पण बातमी आली.
माय ची माझ्यापुरती ओळख इतकीच!! बेप्टिस अंकल , इल्डा आत्याशी त्यामानाने जास्त बोलणं चालणं, गप्पा वैगरे झालेल्या. पण आज चित्रपटातल्या पहिल्या पाचेक मिनीटात अँजीने रोझेलिनाला मारलेली माय ही हाक; ह्या माय आणि तिच्या सबंध कुटुंबाशी संबंध असलेल्या ज्या काही आठवणी दडलेल्या होत्या त्या पुन्हा वर आणून गेली. फार दु:ख म्हणता येणार नाही, माय तर गेलीच म्हणा पण आता इतक्या लांब आल्यावर ह्या बाकीच्या हयात व्यक्ती पुन्हा भेटतील का आणि भेटले तरी आम्ही एकमेकांना ओळखू तरी का असे नसते प्रश्न उगाचच उभे राह्यले. माय हयात असेपर्यंत आमच्या घरी पोच होणारा ख्रिसमसचा केक आणि इतर काही पदार्थ हूरहूर लावून गेले म्हणता येणार नाही, पण मनात काहीतरी हललं एवढं मात्र खरं!!
*अत्यंत विस्कळीत लिहीलंय हे मलाही पटतंय. आता विचारच इतके सैरभर आले की तो विस्कळीतपणा लिखाणात पण उतरला.
वाचने
4663
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
आता विचारच इतके सैरभर आले की
In reply to आता विचारच इतके सैरभर आले की by यशोधरा
+१
In reply to +१ by एस
+2
आवडलं
In reply to आवडलं by श्रीरंग_जोशी
नोप!! पण काल मुव्ही बघून ही
आवडल.
आवडल !!!
अजिबात काही समजले नाही....
छान लिहिलंय
सुंदर लिहीलंय.
In reply to सुंदर लिहीलंय. by धन्या
+१
लिखाणात विस्कळितपणा व्यवस्थित जाणवतोय
लहानपण हे असंच अनेक
लहानपणातले हे कोलाज अनुभव
In reply to लहानपणातले हे कोलाज अनुभव by स्पा
वरील अवांतराशी १००% सहमत.
सुंदर लेखन,
चांगल लिहिलय.
छान लिहिलय
लेख छान
In reply to लेख छान by समीरसूर
>>दीपिका सही दिसली पण! काय
In reply to >>दीपिका सही दिसली पण! काय by सूड
कधी नव्हे ती दीपिका आवडली.
In reply to लेख छान by समीरसूर
समीरसूर, ह्या सिनेमावर
In reply to समीरसूर, ह्या सिनेमावर by शिद
+1 परिक्षण हवेच