......आणि आमची पितरं जेवली.
.
पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर......
माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत.
ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले
.त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.
मिसळपाव


