माझी कविता

ती त्सुनामी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 10:13 am

सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते
मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते
गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते
व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते
आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते

प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले उधळून जाते
साचले सांडून जाते
घडविले उखडून जाते
वेचले विखरून जाते
मांडले मोडून जाते

....ती त्सुनामी विप्लवी
पण केवढे शिकवून जाते !

माझी कविताकवितामुक्तक

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
20 Nov 2017 - 3:12 pm

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे
….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे
….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे
….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे
...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे
…शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे
…फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
…वास्तवाला तोलणारे यंत्र आहे
… प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे
…अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...

....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

.....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे

माझी कविताकवितामुक्तक

नवी मैत्री

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
9 Nov 2017 - 12:22 am

मी ही कविता माझा नवीन झालेल्या मैत्रिणीवर केली आहे. तुमाला ही कविता कशी वाटली ही कंमेंट देउन जरूर सांगा.

नवी मैत्री

कविता माझीमाझी कविताकविता

उजाडताना उल्कांचे व्रण

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Oct 2017 - 10:25 am

शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले
भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले

कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब
मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले

शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो
शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले

पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी
उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले

माझी कविताकवितामुक्तक

जरी अज्ञात देशाचा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Oct 2017 - 11:22 am

जरी अज्ञात देशाचा
किनारा गाठला होता
तरी वारा शिडामधला
जरा खंतावला होता

दूरवरचे दिवे तिथले
झळाळून पेटले होते
तरी अंधार हटवादी
जरा रेंगाळला होता

वितळत्या चंद्रबिंबाने
दशदिशा भारल्या होत्या
तरी त्या चांदरातीचा
कवडसा गोठला होता

माझी कविताकविता

नशिब

mr.pandit's picture
mr.pandit in जे न देखे रवी...
17 Oct 2017 - 11:19 am

नशिबाच काय घेऊन बसलात हो
ते कधी साथ देत तर कधी नाही
मनगटात ताकद हवी खर तर
नाहितर् राजयोग पण कामाचा नाही

परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो
कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो
कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता
नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता

हिच सवय मग अंगवळणी पडत जाते
अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते
थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही
प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी?

माझी कवितामुक्त कविताकवितामुक्तक

नवी मैत्री

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
13 Oct 2017 - 12:10 am

नवी मैत्री

नवी मैत्री आहे
पण आहे खूप सुंदर
कुठे ही असलो तरी
कुणीच कोणाला देऊ नका अंतर....

आपलं ते गोड़ गुपित
एकमेकींना सहज पणे बोलून गेलो
तुझे तेच माझे म्हणत
एकमेकींमध्ये रमत गेलो...

नवीन आहे आपली मैत्री
तरी जपतोय आपण फुलासारखी
कायमच एकमेकींना साथ देऊ
एकमेकींच्या आनंदासाठी.

तृप्ती समीर टिल्लू
http://www.truptiskavita.com

कविता माझीमाझी कविताकविता

रमलखुणांची भाषा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:44 am

जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू

दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या
हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या

खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी

ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा

ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....

माझी कवितामुक्तक

अत्तर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Sep 2017 - 1:10 am

कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!

शिवकन्या

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वनामांडणीसंस्कृती

मोरया

रवि बदलापूरेकर's picture
रवि बदलापूरेकर in जे न देखे रवी...
31 Aug 2017 - 10:01 pm

मोरया
मोरया मोरया
ओमकारा मोरया
मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया

भरली सुखाची ओंजळ
बाप्पा तुझ्या आगमनाने,
जाहलो मी धन्य
देवा तुझ्या दर्शनाने

तू गजराज, तूच गणनायक
तू विघ्नहर, तूच विनायक,
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता
मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू

दिसे सारे ब्रह्मांड तूज नयनी
वसे चारीधाम तूझ्याच चरणी,
चराचरातील रूप तुझे
देई भक्तांना दर्शन आपुले

चुका भक्तांच्या घेई तू उदरा
येता शरण देई तूच आसरा,
धरी तू छताची सुख सावली
अशी तू माझी माय माउली

माझी कविताकविता