हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये. परंतु कधी कधी विडंबन करण्याच्या उत्साहाच्या भरात विडंबक नकळत मूळ कवीच्या भावनेला ठेच पोहचवू शकतात. माझ्याकडून असा प्रमाद झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी जाहीरपणे सांगू इच्छितो कि या साऱ्या विडंबनांमागे कोणाचा अनादर करण्याचा, कोणाला कमी लेखण्याचा वा कोणताही वाईट उद्देश अजिबात नव्हता, नाही व इथून पुढेही नसेल. हे सर्व फक्त मनोरंजन या एका हेतूवरच आधारित आहे. तरी पण कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. सगळे जण असेच लिहीत रहा व आपल्या प्रतिभेला आपापल्या परीने लेखणीतून व्यक्त करत रहा.
तर ।। गुरु महिमा ।। पुढे सुरु. या विडंबनामध्ये विडंबक आणि मूळ समोरासमोर उभे ठाकले आहेत. विडंबनासाठी आधार घेतलेले गाणे : काल रातीला सपान पडलं
विडंबन | मूळ गाणे |
---|---|
काल रातीला सपान पडलं सपनात आले कवी न कवी नि लै धुतले अन जालावरती टीका बघुनी स्थिती झाली अशी, वेडीपिशी
|
काल रातीला सपान पडलं सपनात आला तुमी न बाई मी बडबडले अन गालावरती खुणा बघुनी आता सांगू कशी, बोलू कशी
|
प्रतिक्रिया
11 Dec 2017 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार
जमलय विडंबन,
मनी वसे ते स्वप्नी दिसे...
पैजारबुवा,
11 Dec 2017 - 10:07 am | गबाळ्या
दस्तुरखुद्द पैजार बुवांची पाठीवर थाप! वाहवा! कौतुकाने आम्ही पावन झालो.
अहो मला खरेच आपण जरा जास्तच खेचले असे वाटले.
11 Dec 2017 - 11:15 pm | babu b
छान
11 Dec 2017 - 11:22 pm | गबाळ्या
बाबू , आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.