अनोळखी
अनोळखी
पलटून तुला पाहताना
मज अनोळखी तू वाटे,
ती नजर तुझ्या डोळ्यातील
का आपली ना भासे
क्षितिजातल्या धुक्यात
हरवून गेली वाट,
वाटे रिक्त जग सारे
सुनसान ही पायवाट
ते स्वप्न आपले
विरले कसे नि कुठे,
का वाढला हा अबोला
विश्वास का न उरला
चुकलो कुठे ग आपण
राहिली प्रीत का अधुरी,
स्वप्नातले ते सारे
भंगले कसे मनोरे
वळणावर मी तु़झ्या त्या
पाहे वाट अजूनी तुझी,
नि तू सोडुनी गेली अशी
जशी नव्हतीच कधी माझी
- रवि बदलापुरेकर