माझी कविता

प्रेम रंग

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
12 Mar 2018 - 12:36 am

प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

प्रेम रंग

रंगते मी नेहमीच
तुझ्या रंगांमध्ये
हसते मी नेहमीच
तुझ्या हसण्यामध्ये

खरंच खूप सोपी नसत
दुसऱ्यान मध्ये रंगण
तुझ्या साठी केलंय मी
माझं सोपी जगणं

तुझ्या माझ्यातले रंग
अशेच नेहमी उमलु दे
तुझ माझ प्रेम
कायमच मनी बहरूदे

रंगताना मला तुझी
साथ असुदे
चुकली जरी वाट माझी
तरी हाथी हाथ असुदे....

कविता माझीप्रेम कवितामाझी कविताकविताप्रेमकाव्य

नव्या वादळी नाव हाकारतो

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Feb 2018 - 11:39 am

कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा
फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो
निळी पेटती रेष रेखीत गगनी
अनामिक उल्केस बोलावितो

भणाणून आवर्त झोंबे शिडांसी
सुकाणू दिशाहीन कैसे फिरे
पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा
कुणाला न ठाऊक कोठे विरे

जिभा अंध:कारास फुटती हजारो
तशी गाज ह्या सागराची उठे
रोरावती मत्त लाटा अनादि
किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे

उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा
उद्याच्याच सूर्यास मी जाणतो
तमाची तमा नाही आता जराही
नव्या वादळी नाव हाकारतो

माझी कविताकविता

मातृभाषा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 12:19 am

तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.

तुझ्यात इतका जीव का गुंतावा?

तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....

शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीसंस्कृतीवाङ्मयकविताभाषासाहित्यिकसमाज

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
17 Feb 2018 - 4:23 am

*****************
अजून एका स्वांतञ्यासाठी....!!
*************************
मातीची महती
गात.
तुक्याचे अभंग घोकत.
रक्ताचं पाणी करतं
नुसता घाम गाळत राहूनचं
रान हिरवं गार करायचं
पण
मातीचं तरी मोल
असत का आमच्या जिण्याला

तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही
नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू
नाही
तरी या देशाचा शेतकरीराजा
अाहे असं समजून
हा देश क्रषीप्रधान अाहे
म्हणून नुसत्या टिरी बडवून
का घ्यायच्या?

माझी कवितामुक्त कविताकविता

सोनरंग

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
12 Feb 2018 - 9:04 pm

मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली
क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली

वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला
सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला

सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा
कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा

हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी
कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी

माझी कविताकविता

सर्वसामान्य आणि राजकारणी!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
9 Feb 2018 - 9:31 am

सर्वसामान्य जनता भावूक असते
राजकारण्यांना ती मुभा नसते..

समोर होणारा अपघात बघूनही
चाकरमानी पळतात..
लेटमार्कच्या भिती पुढे हृदय गहाण ठेवतात!
त्यांच्या असहाय्यतेचे कौतुक होते...
राजकारण्यांच्या उशीराचे वाभाडे निघते...

हृदयशून्य... भावनाहीन...
राजकारणी असतात...
जणूकाही त्यांच्याकडे मनं नसतात!

निवडून दिलंय तुम्हाला...
तुमच्या प्रत्येक क्षणावर हक्क...
कराच तुम्ही चूक...
अपमानाचा चाबूक तुमच्यावर!

माझी कविता

डू-आयडीज् खूप दिसतात इथे, परतुनी येती "नाना"विध रूपे

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
3 Feb 2018 - 5:46 am

डू-आयडीज् खूप दिसतात इथे
परतुनी येती "नाना"विध रूपे

स्कोअर सेटल होतात इथे
ट्रोलिंग जणू हक्कच असे

कंपू करून पीडतात इथे
पिंक टाकणे हेच ध्येय असे

अजेंडा घेऊन येतात इथे
काडी सारून नामानिराळे कसे

विवादास्पद विषय प्रिय असे
धागा पेटवून मजा बघती कसे

अनेकानेक आयडीज् तयार असे
एक उडाला तरी चिंता नसे

मतामतांचा गलबला इथे
मज जैसे सज्जन थोडेच असे

कविता माझीमाझी कविताकवितामुक्तकविडंबन

चारोळी

Swapnaa's picture
Swapnaa in जे न देखे रवी...
1 Feb 2018 - 10:43 am

चारोळी

चंद्रप्रकाश चोहीकडे
चंचल चांदणे,
चंद्रकोर चित्तचोरते
चंद्रमा चमचमते..

कवी - स्वप्ना

माझी कविताचारोळ्या

नवखेच सखे फसतात इथे

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
23 Jan 2018 - 11:14 am

वृत्त - तोटक

अदमास पुन्हा चुकतात इथे
वनवास नवे मिळतात इथे

अवघे जगणे जगणे बनते
मिथके सगळी जुळतात इथे

रुसणे स्मरता हसणे स्फुरते
अलवार सुखे कळतात इथे

वळणे कळता सरती वलये
नवखेच सखे फसतात इथे

हलकेच पुन्हा जवळीक नवी
सुमने कवळी फुलतात इथे

विरहास नवे सहवास हवे
हळवे क्षण ते स्मरतात इथे

भुतकाळ जरा विसरू म्हणता
इतिहास नवे रचतात इथे

© विशाल वि. कुलकर्णी

माझी कविताकवितागझल

एका अनावर कैफात

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Dec 2017 - 10:42 am

एका अनावर कैफात लिहिली होती
ती कविता

नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण
थोडी खरीही वाटली
ती कविता

नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा
जास्तच खरी वाटली
ती कविता

माझी कविताकवितामुक्तक