✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवाळी अंक २०१५: आवाहन

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 23:23  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर हो, गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने "लेखन करा" ऑप्शनखाली (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित कॉपी पेस्ट करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील. यावर्षी विडंबने आणि कथा यावर भर असावा अशी सर्वसाधारण कल्पना आहे. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने - विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, अन्यत्र पूर्वप्रकाशित असलेले साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट शोकांतिका असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : १५/१०/२०१५ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! साहित्य स्वीकारल्याची पोच २५/१०/२०१५ पर्यंत दिली जाईल. त्यानंतर अस्वीकृत साहित्य तुम्ही इतरत्र प्रसिद्ध करू शकता. मात्र दिवाळी अंकासाठी म्हणून पाठवलेले साहित्य आधीच किंवा दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यानंतर ३ महिनेपर्यंत अन्य संस्थळावर प्रसिद्ध करू नये ही विनंती. ५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण दीड महिना आहे. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद! -----------------------------
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
. . -----------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
106403 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

मी पयला... देणार देनार..

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/04/2015 - 00:09 नवीन
मी पयला... देणार देनार..
  • Log in or register to post comments

फक्त मान मिळेल बर हो गुर्जी.

अन्या दातार
Fri, 09/04/2015 - 01:59 नवीन
फक्त मान मिळेल बर हो गुर्जी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुरुजींना गुढगा पण हवाय का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 09/06/2015 - 09:23 नवीन
गुरुजींना गुढगा पण हवाय का मानेबरोबर? =)) रच्याकने गुरुजींचं दिवाळीभावंविश्वं कधी येणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हलकट चिमण....................

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/03/2015 - 16:29 नवीन
हलकट चिमण............................दू दू दू दू दू दू दू दू दू Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

गुर्जीला जवळपास महिन्यानंतर

प्रचेतस
Sat, 10/03/2015 - 17:19 नवीन
गुर्जीला जवळपास महिन्यानंतर अठवण आलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उगी दुसर्‍याला दिर्घद्वेषी

अभ्या..
Sat, 10/03/2015 - 17:23 नवीन
उगी दुसर्‍याला दिर्घद्वेषी म्हणून नावे ठेवत्तात. दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुद गुर्जी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Sat, 10/03/2015 - 17:25 नवीन
=)) गुर्जी रॉक्स....चिमण शॉक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अन्या दातारने हे गाणे शिकवल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 18:30 नवीन
अन्या दातारने हे गाणे शिकवल मला. रुणुझुणु रुणुझुणे रे "भ्रम"रा!! चालुद्या तुमचं निरर्थक बिनबुडी अत्मरंजन. भ्रमवाद etc etc.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी ;)

बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 00:16 नवीन
खी खी खी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हा नवीन बोका दिसतोय.

बोका-ए-आझम
Sun, 10/04/2015 - 00:49 नवीन
कुण्या मांजरीने भाव दिला नाही की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नक्की प्रयत्न करु

यमन
Fri, 09/04/2015 - 12:01 नवीन
नक्की प्रयत्न करु..
  • Log in or register to post comments

अंकाच्या

मी-सौरभ
Fri, 09/04/2015 - 12:30 नवीन
तयारीसाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अनुवाद ?

मितान
Fri, 09/04/2015 - 12:46 नवीन
अनुवाद ?
  • Log in or register to post comments

व्हय व्हय!

पैसा
Fri, 09/04/2015 - 12:54 नवीन
पण ते कॉपीराईट वगैरे सांभाळावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

सूचना वजा विनंती

अमृत
Fri, 09/04/2015 - 14:21 नवीन
प्रति लेखक एकच लेख ग्राह्य धरावा ही विनंती. अंकासाठी शुभेछा व प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

खरंच एकच लेख पाठवता येऊ शकतो

रातराणी
गुरुवार, 10/15/2015 - 22:50 नवीन
खरंच एकच लेख पाठवता येऊ शकतो का? समजा एक कथा, एक कविता पाठवायची असेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

पाठवू शकता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/15/2015 - 22:53 नवीन
स्वागत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

धन्यवाद सर!

रातराणी
गुरुवार, 10/15/2015 - 22:59 नवीन
धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंकाची वाट पाहत आहे.

सौंदाळा
Fri, 09/04/2015 - 15:00 नवीन
दिवाळी अंकाची वाट पाहत आहे. लेखक व अंक (मुखपृष्ठ, बाकी फॉर्मटींग, एडीटींग) तयार करणार्‍या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. किती मेहनत करावी लागत असेल याची कल्पना आहे.
  • Log in or register to post comments

विडंबन तर आताच रेड़ी आहे पण ते

स्वामी संकेतानंद
Fri, 09/04/2015 - 17:38 नवीन
विडंबन तर आताच रेड़ी आहे पण ते नाही पाठवणार. :P कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

जवळपास सवा महिना आधी

सूड
Fri, 09/04/2015 - 20:58 नवीन
जवळपास सवा महिना आधी सांगितल्याबद्दल धन्स. बघू काही जमतं का!!
  • Log in or register to post comments

यावर्षीचा देखिल दिवाळी अंक

मनीषा
Sat, 09/05/2015 - 20:12 नवीन
यावर्षीचा देखिल दिवाळी अंक चांगलाच होईल याची खात्री आहे. अंकासाठी योगदान देणार्‍या सर्वांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नक्की सहभागी होणार :) :)

सुहास झेले
Sun, 09/06/2015 - 08:52 नवीन
नक्की सहभागी होणार :) :)
  • Log in or register to post comments

इच्छुक...

जव्हेरगंज
गुरुवार, 09/17/2015 - 10:27 नवीन
इच्छुक... रच्याकने, - दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. कुठे भेटेल हा आयडी?
  • Log in or register to post comments

इथे

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/17/2015 - 10:33 नवीन
दिवाळी अंक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मंडळी कुठपर्यंत आलंय लेखन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/02/2015 - 17:04 नवीन
दिवाळी अजून दुर आहे. दिनांक १५ म्हणजे अजून भरपूर अवकाश आहे, असं करु नका. लिहिते राहा. लेखनाची वाट पाहतोय. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दिवाळी अंकाची वाट बघत आहे...

मुक्त विहारि
Fri, 10/02/2015 - 17:11 नवीन
इति लेखनसीमा
  • Log in or register to post comments

सदस्यलोक्स दिवाळी जवळ यायला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 10:00 नवीन
सदस्यलोक्स दिवाळी जवळ यायला लागली. चला पटापटा लिखाण पाठवा :)!!!
  • Log in or register to post comments

अवश्य लिखाण केल्या जाइल. पण

द-बाहुबली
Sat, 10/03/2015 - 17:35 नवीन
अवश्य लिखाण केल्या जाइल. पण ते छापल्या ज्याइल काय ?
  • Log in or register to post comments

अशी शंका तरी आपल्या मनात का

प्यारे१
Sat, 10/03/2015 - 18:06 नवीन
अशी शंका तरी आपल्या मनात का बरे आली बरे बाहुबली???? आपण लिहावे अशी नरम आपलं नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

शंका आल्यी कारण माझे

द-बाहुबली
Sat, 10/03/2015 - 18:13 नवीन
शंका आल्यी कारण माझे शुध्दलिखान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्ही पाठवा. शुद्धलेखनाचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 18:31 नवीन
तुम्ही पाठवा. शुद्धलेखनाचं पाहु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

ज्यांनी पाठवलं त्यांच्यासाठी

समीर_happy go lucky
Sat, 10/03/2015 - 18:42 नवीन
ज्यांनी पाठवलं त्यांच्यासाठी काही acknowledgement मेल हा प्रकार नसतो का?? कि "मिळालं ब्वा, विचार होतोय" या टाईप काही
  • Log in or register to post comments

इमेल वर पाठवलं असाल तर इमेल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 18:47 नवीन
इमेल वर पाठवलं असाल तर इमेल चेक होईपर्यंत कसं अ‍ॅक्नो. मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

पोच देण्याची व्यवस्था करण्यात

सस्नेह
Fri, 10/09/2015 - 21:37 नवीन
पोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

तो acceptance किंवा

समीर_happy go lucky
Sat, 10/03/2015 - 18:53 नवीन
तो acceptance किंवा rejectance चा वेगळा हो पण फक्त मिळाल्याचा नसतो का?? [मी फक्त चौकशी कास्रतो आहे, का कोण जाणे पण मला वाटतंय कि तुम्ही "जाब" समजताय]
  • Log in or register to post comments

मी चौकशीचं उत्तर देतोय. जाब

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 19:23 नवीन
मी चौकशीचं उत्तर देतोय. जाब कशाला समजेन मी? जाब वाटला असता तर उत्तर द्यायच्या भानगडीत सुद्धा पडलो नसतो :). मेल आला असेल तर मेल चा अ‍ॅक्सेस असणारे लोक्स उत्तर देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

मला एक पाकृ पाठवायची आहे,

रेवती
Sun, 10/04/2015 - 01:18 नवीन
मला एक पाकृ पाठवायची आहे, फराळाची! दिवाळीआधी इतक्या लवकर कसं काय करून ठेवायचं? कृती आधी पाठवून फोटू नंतर पाठवायला हरकत नाही पण मग जरासे बदल असले तर करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments

तू दे

सस्नेह
Sun, 10/04/2015 - 07:17 नवीन
रेवाक्काच्या पाकृसाठी जागा राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे. सरानु वाचताव नव्हं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

काय चेष्टा करता का तै! जर

रेवती
Sun, 10/04/2015 - 07:48 नवीन
काय चेष्टा करता का तै! जर नियम असेल तर पदार्थ दोनदा करणार.......आधी दिवाळी अंकासाठी व नंतर फराळासाचा जिन्नस म्हणून. पण हा प्रश्न सगळ्या पाकृवाल्यांना येणार असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

विडंबन मध्ये कविता/गाणे यांचे

नीलमोहर
Wed, 10/07/2015 - 11:18 नवीन
विडंबन मध्ये कविता/गाणे यांचे विडंबन चालणार आहे ना?
  • Log in or register to post comments

हो

सस्नेह
Wed, 10/07/2015 - 11:22 नवीन
अर्थात ! शक्यतो मूळ गाणे / कविता परिचित असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

उद्या अखेरची तारीख !

सस्नेह
Wed, 10/14/2015 - 20:35 नवीन
उद्या अखेरची तारीख ! लोक्सहो, त्वरा करा...
  • Log in or register to post comments

साधारण कधीपर्यंत प्रकाशित

जव्हेरगंज
Wed, 10/14/2015 - 21:16 नवीन
साधारण कधीपर्यंत प्रकाशित होणार आहे हा दिवाळी अंक?
  • Log in or register to post comments

मुदतवाढ

संपादक मंडळ
गुरुवार, 10/15/2015 - 09:23 नवीन
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

सूड
गुरुवार, 10/15/2015 - 19:48 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ

मुदतवाढ

स्वाती दिनेश
गुरुवार, 10/15/2015 - 22:55 नवीन
मिळाल्यामुळे हुश्श.. झालेले आहे. लवकरच २/३ दिवसात लेख पाठवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ

धन्यवाद संपादक मंडळ

विशाल कुलकर्णी
Mon, 10/26/2015 - 11:43 नवीन
धन्यवाद संपादक मंडळ एक कविता पाठवलीय आजच, एका लेखावर काम चालु आहे, एक-दोन दिवसात तोही पाठवतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ

:)

पैसा
Mon, 10/26/2015 - 11:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

हुर्रॆ

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 10:48 नवीन
हुर्रॆ….धतड ततड…! मी आलोच! :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा