शुभेच्छा

महिला क्रिकेट ....भारत 3, इंग्लंड 0.... ये नया भारत है...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
27 Sep 2022 - 10:28 am

नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली.

हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले.

पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी. शतका नंतरच्या 39 धावा फक्त 11 चेंडूत काढल्या..

दोन्ही मॅचेस सुंदर झाल्या, पण लक्षांत राहिली ती तिसरी मॅच आणि कारण म्हणजे, दिप्ती शर्माने केलेला रन आऊट.

लिंक खाली देत आहे.

मौजमजाशुभेच्छाअभिनंदन

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
17 Sep 2022 - 9:48 pm

आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर,
पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला.

एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (नावे त्यांच्या उपस्थितीच्या वेळेनुसार नाहीत.)

संस्कृतीइतिहाससाहित्यिकसमाजप्रवासभूगोलमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनप्रतिसादशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भविरंगुळा

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
25 Jul 2022 - 1:31 pm

काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकरांच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या युट्युब चॅनल वरील “पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट” ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती.

शिर्षकावरून विषयाचा काही अंदाज न आल्याने उघडून बघीतला तर अवघ्या सव्वादोन वर्षांच्या वाटचालीत प्रतिपक्ष चॅनलच्या सदस्यसंख्येने (Subscribers) ५ लाखांचा आणि एकुण दर्शन संख्य्येने (Views) २० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी भाऊंनी हा छोटासा व्हिडीओ तयार केल्याचे लक्षात आले!

मांडणीशुभेच्छाअभिनंदनलेखअनुभव

हॅप्पी बर्थडे माही….

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
7 Jul 2022 - 10:13 am

जुन्या हिंदी चित्रपटात एक सिन असायचा बघा..एक गुंडांची टोळी हिरॉईनच अपहरण करते.. एका सूनसान जागी तिला बांधून ठेवल जातं.. आणि तिचा छळ केला जायचा...तिच्या अंगाला त्या टोळीच्या म्होरक्याचा हात लागतो न लागतो तोच आपला हिरो अचानक एन्ट्री मारायचा...आधी तो थोडा मार खायचा पण मग पुढे त्याचा पवित्रा अचानक बदलायचा आणि तो गुंडांना बदडून काढायचा...क्रिकेटच्या मैदानावर पण असाच एक हिरो होता. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडायचा तेव्हा तेव्हा तो अगदी शांतपणे मैदानात एन्ट्री करायचा आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकवूनच परतायचा..

क्रीडाशुभेच्छा

आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
24 Mar 2022 - 3:25 pm

50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ...

काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच.

चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते.

माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते. It's a family business.

मौजमजाचित्रपटशुभेच्छा

मराठी भाषा दिन

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
27 Feb 2022 - 2:00 pm

कणा
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !
– कुसुमाग्रज

मुक्तकप्रकटनविचारशुभेच्छालेख

सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
14 Jan 2022 - 10:03 am

नमस्कार,

कसे आहात?

सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच.

मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे.

संस्कृतीशुभेच्छा

शुभेच्छा २०२२

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
2 Jan 2022 - 2:05 pm

या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा‌ पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या‌ पिसाऱ्याचा गुलाम होत नाही.‌ हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो‌. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल.

मांडणीजीवनमानप्रकटनविचारशुभेच्छा